आज क्रूड US $ ८१.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.३० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.७८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.६४ आणि VIX ११.२७ होते. सोने आणि चांदी मध्ये मंदी होती. कॉपर झिंक अल्युमिनियम यांच्या मध्ये येत्या संवत्सरात तेजी राहण्याची शक्यता आहे. कॉपर आणि झिंक यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
मूडीजने USA संबंधित आउटलूक निगेटिव्ह केला कारण USA ची डेफिसिट खूप वाढत आहे. त्यामुळे रेट कट च्या शक्यता वाढते. फीचने याआधीच वॉर्निंग दिली आहे.
सप्टेंबर २०२३ या महिन्यासाठी भारताचा IIP १०.३% वरून कमी होऊन ५.८% झाला.
आयशर मोटर्सचे प्रॉफिट वाढून १०१६ कोटी, उत्पन्न वाढून Rs ४११५ कोटी आणि मार्जिन वाढून २६.४% झाले.
सन टीव्ही चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
RCF चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
E-CLERX चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन स्थिर राहिले.
PROTEAN e-GOV टेक चे BSE वर Rs ७९२ वर लिस्टिंग झाले.
LIC चे प्रॉफिट ५०% ने कमी झाले. प्रीमियम उत्पन्न १९% ने कमी झाले निकाल कमजोर आले.
ज्युबिलण्ट फार्मोवा च्या ‘TECHNETIUM SULPHUR COLLOID ‘ या इंजेक्शनला USFDA चे ANDA अप्रूव्हल मिळाले.
अलकार्गो लॉजिस्टिक्सने तुमच्या कडे असलेल्या १ शेअरमागे ३ शेअर्स बोनस म्हणून जाहीर केले.
ONGC चे प्रॉफिट १४२% वाढले, Rs १६५५३ कोटी झाले. रेव्हेन्यू १३% कमी होऊन Rs १४६८७३कोटी झाल. कंपनीने Rs ५.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. २१ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट आहे. क्रूड उत्पादन २.१% ने कमी झाले, नैसर्गिक गॅस चे २.८% ने कमी झाले कोल इंडियाने Rs १५.२५ लाभांश दिला. रेकॉर्ड डेट २१ नोव्हेंबर आहे.
नोव्हेंबर १४ २०२३ ला इंडसइंड बँक( US $२८८ मिलियन्स) , सुझलॉन एनर्जी( US $ १८६ मिलियन) , पर्सिस्टंट सिस्टीम( US $ २२८ मिलियन), APL अपोलो ट्यूब्स( US $ १९२ मिलियन) , ONE ९७कम्युनिकेशन्स ( US $ १५० मिलियन) ,पॉली कॅब( US $ १६८ मिलियन) टाटा कम्युनिकेशन्स ( US $ १४४ मिलियन्स) हे सात शेअर्स MSCI ग्लोबल स्टॅंडर्ड इंडेक्स मध्ये समाविष्ट केले जातील. यामुळे पॅसिव्ह फंडांकडून या ७ शेअर्समध्ये त्यांच्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे इनफ्लो येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. AU स्मॉल फायनान्स बँक या निर्देशांकातून बाहेर पडेल त्यामुळे या शेअरमध्ये US $ ७८ मिलियन्सचा आऊटफ्लो येण्याची शक्यता आहे.
M & M च्या व्यवस्थापनाने सांगितले की ऑक्टोबर २०२३ मध्ये ५१००० गाड्या बुक झाल्या . कंपनी त्यांची उत्पादन क्षमता ४९००० युनिट्स ने मार्च २०२४पर्यंत वाढवणार आहे. फार्म सेगमेंटमध्ये मार्केट शेअर १.५% ने वाढला. SUV सेगमेंटमध्ये मार्केट शेअर ०.०५% आहे. हा शेअर वाढवावयाचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. XUV ७०० साठी वेटिंग पिरियड सर्वात जास्त आहे. कंपनी XUV ३०, XUV ४०० आणि ५ डोअर्स ची थर २०२४ मध्ये लाँच करेल.
ऑक्टोबर २०२३ साठी CPI ४.८७ ( सप्टेंबर मध्ये ५.०२ होता) आला.
आज IT आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स च्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४९८३ NSE निर्देशांक निफ्टी १९४४३ आणि बँक निफ्टी ४३८९१ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !