आज क्रूड US $ ८२.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs. ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.४४ आणि VIX ११.२९ होते. आज सोने Rs ६०००० च्या आसपास आणि चांदी ७१९०० च्या आसपास होती. बेस मेटल्समध्ये तेजी होती.
USA च्या तिन्ही निर्देशांकात तेजी होती. एशियन मार्केट्स तेजीत होती. USA मध्ये ऑक्टोबर महिन्यासाठी महागाईचा निर्देशांक ३.२ आला.चीनमध्ये सरकार अफोर्डेबल हाऊसिंग साठी US $ १३७ बिलियनचे पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे
इंडियाचा ऑक्टोबर महिन्यासाठी CPI ४.८७ ( ५.०२) आणि जपानचा -२.९ आला.
USA मधील महागाई, US $ निर्देशांक आणि बॉण्ड यिल्ड कमी झाले.
चीनमध्ये इंडस्ट्रियल प्रॉडक्शन ४.८% ने वाढले.
FII ने Rs १२४४.४४ कोटींची विक्री तर DII ने Rs ८३०.४० कोटींची खरेदी केली.
हिंदुस्थान कॉपर, I बुक्स हाऊसिंग, SAIL, चंबळ फर्टी , डेल्टा कॉर्प, मन्नापुरम फायनान्स, झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते.
GNFC आणि MCX बॅनमधून बाहेर आले.
गोल्डमन साखसने भारतीय शेअर्सचे वेटेज मार्केट वेट वरून ओव्हरवेट केले.
आस्क ऑटोमोटिव्हचे BSE वर Rs ३०४.९० आणि NSE वर ३०३.३० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs २८२ ला दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना माफक लिस्टिंग गेन्स झाले.
ग्रासिम इंडस्ट्रीजचे प्रॉफिट YOY १७.६ % ने कमी होऊन Rs ७९५ कोटी झाले.कॉस्टिक सोड्याची किंमत जागतिक स्तरावर कमी झाली. रेव्हेन्यू YOY ४.५% ने कमी होऊन Rs ६४४२ कोटी झाला. केमिकल बिझिनेस रेव्हेन्यू कमी झाला आणि VISCOS मधील ग्रोथ कमी झाली.
पुर्वांकरचे सेल्स Rs १६०० कोटी आणि कलेक्शन ८७९कोटी झाले.
IDFC Ist बँक आणि IDFC च्या मर्जरला PERDA ( पेन्शन फंड रेग्युलेटरी & डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) ने तत्वतः मंजुरी दिली.
बायाकॉन बायालॉजीक्स ला UK च्या MHRA ( मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी एजन्सी ) ‘YESAFILI’ ह्या AFLIBERCEPT च्या बायोसिमिलरच्या मार्केटिंगसाठी मंजुरी दिली. हे डोळ्याशी संबंधित औषध आहे.
GMM फाऊडलर चे प्रमोटर पटेल फॅमिली PFAUDLER INC कडून Rs १७०० प्रती शेअर या दराने ४.४९ लाख शेअर्स (१% इक्विटी) खरेदी करणार आहे.
RVNL ला बांधकाम, स्टोन BALLAST ट्रॅक लिंकिंग आणि साईड ड्रेन रिटेनिंग साठी दरकोह मॅरॅझिरीच्या तिसऱ्या लाइनसाठी Rs ३११.१८ कोटींच्या ऑर्डरसाठी LOA मिळाले.
NMDC चे प्रॉफिट YOY १५.७% ने वाढून १०२४.८६ कोटी झाले रेव्हेन्यू YOY २०.६% ने वाढून Rs ४०१३.९० कोटी झाला. कंपनीकडे छत्तीसगढ आणि कर्नाटक मध्ये मिळून ४ लोखंडाच्या खाणी आहेत.
कल्याण ज्वेलर्स चे प्रॉफिट २७.३३% ने वाढून Rs १३४.८७ कोटी झाले तर रेव्हेन्यू २७.११% ने वाढून Rs ४४१४.५३ कोटी झाले. निर्यात ५% ने वाढून Rs ६२९ कोटी झाली. BSE चे प्रॉफिट ३००% ने वाढून Rs ११८ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY ५९% ने वाढून Rs ३१५ कोटी झाला. इन्व्हेस्टमेंट उत्पन्न YOY ४७.५% ने वाढून ४७.५ कोटी झाले मार्जिन ३३% वरून ४५% झाले.
नाटको फार्माचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट,उत्पन्न वाढले.
PVR इनॉक्स ने जिओ वर्ल्ड मुंबईमध्ये ६ स्क्रीनचा मल्टिप्लेक्स तर भुवनेश्वरमध्ये ४ स्क्रीन मल्टिप्लेक्स GALLERIA मॉल मध्ये सुरू केला.
PTC इंडस्ट्रीजला SAFFRON या फ्रेंच कंपनीकडून कास्टिंग पार्ट्स सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली.
टाटा मोटर्सचे रेटिंग S & P ने वाढवले.
फेडरल बँकेच्या फेड बँक फायनान्सियल्सच्या IPO ला मंजुरी मिळाली.
एशियन पेंट्स त्यांच्या खंडाळा प्लांटमध्ये क्षमता विस्तार करणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजी या टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO २२ नोव्हेंबरला ओपन होऊन २४ नोव्हेम्बरला बंद होईल.
सीमेन्स इंडियामधील १८% स्टेक युरो २१० कोटींमध्ये सीमेन्स AG Rs ३३८० प्रती शेअर या भावाने सीमेन्स एनर्जीकडून खरेदी करेल. सीमेन्स एनर्जीचा भारतात एनर्जी बिझिनेस डिमर्ज करण्याची योजना आहे, डिमर्ज्ड कंपनीमध्ये सीमेन्स एनर्जीचा मेजॉरिटी स्टेक असेल.
आज सरकारने साखरेचा ८ लाख टन कोटा रिलीज केला. आणि पहिल्या कोट्याची मुदत ३० नोव्हेम्बरपर्यंत वाढवली.
आज BSE च्या सर्व सेक्टरल निर्देशांकात तेजी होती. विशेषतः IT, रिअल्टी, मेटल्स मध्ये तेजी होती. आज मार्केटमध्ये ब्रॉडबेस्ड खरेदी झाली. त्यामुळे जवळ जवळ ७४२ पाईंट मार्केट वाढले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५६७५ NSE निर्देशांक निफ्टी १९६७५ आणि बँक निफ्टी ४४२०१ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !