आजचं मार्केट – १६ November २०२३

.

आज क्रूड US $ ८०.८० प्रती बॅरेल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.५० आणि VIX ११.२७ होते. .
USA च्या मार्केट्स मध्ये USA मधील CPI ( कंझ्युमर प्राईस इंडेक्स ) आणि WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) हे दोन्ही कमी झाल्यामुळे तेजी होती. गॅप अप सुरुवात होऊन  निर्णायक  ब्रेकआऊट मिळाला. २७ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान USA मधील मार्केट १०% ने वाढले. UK मध्येही महागाई कंट्रोलमध्ये आली असल्याने रेट कमी होण्याची शक्यता वाढली. UK  आणि भारतामधील फ्री ट्रेड अग्रीमेंट सर्वंकष पद्धतीने होणार आहे. यात मुख्यतः अल्कोहोलची ट्राफिक, व्हिसा संबंधित बाबीही या चर्चेमध्ये समाविष्ट असल्यामुळे हे अग्रीमेंट व्हावयाला उशीर होण्याची शक्यता आहे.
सरकारने क्रूडवरील विंडफॉल टॅक्स Rs ९८००/टन वरून Rs ६३०० प्रती टन केला. डिझेल एक्स्पोर्ट सेस  Rs २ वरून Rs १ केला. पेट्रोल वर कोठलीही ड्युटी /सेस लागणार नाही.
FII ने आज Rs ५५०.०९ कोटींची तर DII ने Rs ६०९ कोटींची खरेदी केली.
MCX इंडिया, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, I बुल्स HSG  फायनान्स, SAIL आणि झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते.
मन्नापुरम फायनान्स, आणि चंबळ फर्टी बॅन मधून बाहेर आले.
बजाज  फायनान्सला RBI ने eCOM आणि इन्स्टा EMI कार्ड या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करायला किंवा मंजूर झालेले कर्ज डिसबर्स करायला बंदी घातलेली आहे. RBI ने  असे निरीक्षण केले की कंपनी RBI च्या डिजिटल लेन्डिंग विषयक मार्गदर्शक ततवाचे पालन करत नाही.
सुझलॉन एनर्जीने सांगितले की त्यांच्या ५१४४ ३ MW-३.१५MW विन्ड टर्बाइन्स च्या सीरिजला RLMM ( रिवाईज्ड लिस्ट ऑफ मॉडेल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स या MNRE ( मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी ) च्या लिस्टमध्ये समाविष्ट  करण्यात आले आहे.
ONE ९७ कम्युनिकेशनने जागतिक ट्रॅव्हेल टेक्नॉलॉजी कंपनी ‘AMADEUS’ बरोबर प्रवासाचा AI ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) सकट  अनुभव घेण्यासाठी पार्टनरशिप करार केला. पुढील तीन वर्षे कंपनी ‘AMADEUS’ च्या मोठ्या ट्रॅव्हेल प्लॅटफॉर्मचा सर्च , बुकिंग, आणि पेमेन्टच्या बाबीत प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी उपयोग करेल.
सॅटिन क्रेडिट केअर नेट वर्कचे  बोर्ड ऑफ डायरेक्टर्स  २० नोव्हेंबर २०२३ रोजी NCD द्वारे प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवर फंड उभारण्यावर विचार करेल.
आज बेयर क्रॉपसायन्सेस ( Rs १०५), पॉवरग्रीड, CIGNITI टेक, काँकॉर, MSTC,
सॅकसॉफ्ट आणि सुंदरम फासनर्स एक्सडिव्हिडंड होतील.
रेट गेन ट्रॅव्हेल टेक्नॉलॉजी या कंपनीचा Rs ६०० कोटींचा QIP १५ नोव्हेम्बरला ओपन होईल. याची फ्लोअर प्राईस Rs ६७६.६६ प्रती शेअर असेल.
TCS ने त्यांच्या Rs ४१५० प्रती शेअर दराने टेंडर ऑफर रूटने ४.०९ कोटी शेअर्सच्या बायबॅक साठी रेकॉर्ड डेट २५ नोव्हेंबर २०२३ निश्चित केली आहे.
NHPC च्या ग्रीन हायड्रोजेन मोबिलिटी स्टेशन EPC  प्रोजेक्टसाठी GENCOL ENGG लोएस्ट बीडर ठरली.
UCO बँकेने ब्लॉक्ड खात्यातून Rs ६४९ कोटींची वसुली केली.
इंडिगोचा प्रवासी हवाई वाहतुकीमधील मार्केट शेअर ६३.४% वरून ६२.६% झाला. स्पाईस जेट चा मार्केटशेअर ४.४% वरून ५% झाला. एअर इंडियाचा मार्केटशेअर २६.२% वरून २६.८% झाला.
RPP  इन्फ्राला १३३.४८ कोटींची ऑर्डर मिळाली.
PTC लवकरच DEBTFREE कंपनी होईल. PTC एनर्जीचे ONGC ला २०२१ कोटींना डायव्हेस्टमेन्ट करणार.
हिरोमोटोची फेस्टिव्ह सिझनची विक्री १४ लाख युनिटपेक्षा  जास्त झाली. कंपनीने फेस्टिव्ह पिरियड ३२ दिवसांचा पकडला आहे.
विकास लाईफ केअरला गुजरात गॅस कडून ४०,००० गॅस मीटर्स साठी Rs ४९.५ कोटींची ऑर्डर मिळाली.
सोम डिस्टीलरीजची मध्यप्रदेशातील बिअर चा मार्केट शेअर ४५% ने वाढला.
CFF फ्लुइड कंट्रोल लिमिटेडला TWAMCA ६२.५ सिस्टीम्सच्या स्पेअर पार्टसाठी Rs ११.३० कोटींची ऑर्डर मिळाली.
डिव्हीज लॅबला Rs १६४ कोटींची GST ऑथॉरिटीजकडून नोटीस मिळाली.
पेन्नार इंडस्ट्रीजला एकूण Rs ६६९ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
DR रेडिजनी मायग्रेन मॅनेजमेंट डिव्हाईस ‘NERIVIO’ भारतात लाँच केले.
 एअरटेलने 5G कव्हरेज गुजरातमधील  ३३ जिल्ह्यात आणि दादरानगर हवेली, दिऊ दमण येथे लाँच केले त्यांना २.२मिलियन कस्टमर झाले.
VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्स नी ट्रॅक्टर्सची ३ नवी मॉडेल्स लाँच केली. यात एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा समावेश आहे.
RIL ने ‘POKMAN’  बरोबर JIO सिनेमाला ३००० तास लहान मुलांसाठी कन्टेन्ट दाखवण्यासाठी करार केला.
भारतीय रेल्वेने IRCTC बरोबर ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ साठी करार केला.
सेबी आता कॉर्पोरेट डिस्क्लोजर साठी सिंगल विंडो उघडणार आहे. त्यामुळे कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजीस्ना डिस्क्लोजर फाईल करणे सोपे जाईल. म्युच्युअल फंडांसाठी आलेल्या अर्जाची मंजुरी प्रक्रिया त्वरित सुरु केली जाईल असे सेबीने सांगितले.
अरेबिका कॉफीच्या किमती वाढल्यामुळे टाटा कॉफीला फायदा होईल.
ONGC दोन पेट्रोकेमिकल प्लांटमध्ये Rs १ लाख कोटीची गुंतवणूक करणार आहे.
आज OMC, IT आणि एनर्जी कंपन्यांमध्ये खरेदी झाली..
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५९८२ NSE निर्देशांक निफ्टी १९७६५ तर बँक निफ्टी ४४१६१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.