आजचं मार्केट – १७ November २०२३

आज क्रूड US $ ७८.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.४० आणि VIX ११.८३ होते.
USA मधील जॉबलेस  क्लेम २.२१ लाखावरून २.३१ लाख झाले. चीनमधील युटूश रिफायनरीमध्ये २.१% घट झाली.
FII ने Rs ९५७.२५ कोटींची खरेदी तर DII ने Rs ७०५.६५ कोटींची खरेदी केली.
चंबळ फर्टी, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, MCX इंडिया, SAIL आणि झी इंटरटेनमेन्ट बॅन मध्ये होते. I बुल्स HSG फायनान्स बॅनमधून बाहेर आले.
RBI ने KYC नियमांचे उल्लंघन केले म्हणून ऍक्सिस बँक, आनंद राठी, मन्नापुरम फायनान्स यांच्यावर कडक कारवाई केली.
RBI नी अनसिक्युअर्ड लोनवरील रिस्क वेटेज १००% वरून १२५% केले. TIER  १ कॅपिटल वाढवावे लागेल. यात हाऊसिंग व्हेईकल, आणि गोल्ड लोन सामील नाहीत.
क्रूड US $७७ प्रती बॅरलच्या स्तरावर पोहोचले. क्रूडची इन्व्हेन्टरी वाढत आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगढ दोन्ही ठिकाणी मतदान होईल.
TVS मोटर्स यूरोपमध्ये विस्तार करण्यासाठी स्वित्झर्लंड च्या ‘एमिल फ्रे’ बरोबर पार्टनरशिप करणार आहे . जानेवारी  २०२४ मध्ये फ्रांस मध्ये लाँच करणार. TVS मोटर्सच्या इम्पोर्ट आणि डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला
JSW इन्फ्राला कर्नाटक मेरी टाइम बोर्डाकडून केणी बंदराच्या विकास, पब्लिक प्रायव्हेट तत्वावर करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले. या प्रोजेक्टची कॉस्ट Rs ४११९ कोटी असून क्षमता ३०MTPA आहे.
टाटा मोटर्सची सबसिडीअरी टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा IPO नोव्हेंबर २२ २०२३ ला ओपन होऊन नोव्हेंबर २४, २०२३ बंद होईल. ही सर्व OFS असेल. या IPO चा  प्राईस बँड  Rs ४७५ ते Rs ५०० असून लॉट साईझ ३० शेअर्सचा आहे.ही एक आंतरराष्ट्रीय इंजिनीअरिंग सेवा पुरवणारी कंपनी आहे. कंपनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिजिटल सोल्युशन्स, आणि टर्न की सोल्युशन्स जागतिक OEM ला पुरवते. (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग). या कंपनीचा भर ऑटो इंडस्ट्रीवर आहे. कंपनीचा शैक्षणिक सोल्युशन ‘PHYGITAL’ ENGG  आणि उत्पादक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान iGet IT प्लॅटफॉर्मवरून पुरवते.FY २३ मध्ये कंपनीला Rs ६२४ कोटी आणि रेव्हेन्यू Rs ४४१४.२० कोटी उत्पन्न झाले. FY २४ च्या पहिल्या अर्ध वर्षांत Rs ३५१.९० कोटी प्रॉफिट आणि रेव्हेन्यू Rs २५२६.७० कोटी झाला.
JSW स्टीलने भारतातील पुरवठा आणी  मागणी यांचा विचार करून केओंझार ओडिशामधील जाजन्ग खाण  बंद करण्यासाठी दिलेला अर्ज मागे घेतला.
DCX सिस्टिमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीला IPO, प्रेफरन्स इशू, राईट्स इशू प्रायव्हेट प्लेसमेंट दवारा Rs ५०० कोटी उभारायला मंजुरी दिली.
SJVN ने सोलर एनर्जी कॉरपोरेशन ऑफ इंडिया बरोबर २०० MW ग्रीड कनेक्टेड विंड पॉवर प्रोजेक्टसाठी पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले. SJVN ग्रीन एनर्जीने Rs ३.२४ प्रती युनिट या दराने ‘बिल्ड ओन ऑपरेट’ तत्वावर २०० MW चे प्रोजेक्ट जिंकले.
DELHIVERY मधील परदेशी गुंतवणूकदार सॉफ्ट बँकेने ४.२% स्टेक  Rs ४०४ ते Rs ४१४ प्रती शेअर दरम्यान US $ १५० मिलियनला विकला.
मॉर्गन स्टॅन्लेने SBI लाईफ च्या बाबतीत ओव्हरवेट  स्टान्स कायम ठेवून टार्गेट Rs १६५० केले.
FLAIR रायटिंग इंडस्त्रीचा Rs ५९३.०० कोटींचा (यात Rs २९२ कोटींचा फ्रेश इशू आणि ३०१ कोटींचा OFS) नोव्हेंबर २२ ला ओपन होऊन २४ नोव्हेंबरला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs २८८ ते  Rs ३०४ असून मिनिमम लॉट साईझ ४९ शेअर्सची आहे. ही कंपनी १९७६ मध्ये स्थापन झाली असून वेगवेगळ्या कालानुरूप  रायटिंग इंस्ट्रुमेंट्सचे उत्पादन करते. कंपनी HAUSER,  PIERRE CARDIN, FLAIR क्रिएटिव्ह, आणि ZOOX या ब्रॅण्डान्तर्गत उत्पादन करते. कंपनी आता डायव्हर्स हाऊसवेअर म्हणजे बॉटल्स, स्टोरेज कंटेनर्स, क्लिनिंग सोल्युशन्स, च्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कंपनीला FY २३ साठी Rs ११८.१० कोटी प्रॉफिट तर रेव्हेन्यू Rs ९५४.२९ कोटी झाला. कंपनी    गुजरात मध्ये बलसाड येथे रायटिंग  इंस्ट्रमेंट्स चा नवीन प्लांट लावणार आहे.
गांधार ऑइल रिफायनरी चा Rs ५००.६९ कोटींचा IPO  ( यात Rs ३०२ कोटींचा फ्रेश  इशू आणि १९८.६९ कोटींचा OFS)  २२ नोव्हेम्बरला ओपन होऊन २४ नोव्हेम्बरला बंद होईल. प्राईस बँड  Rs १६० ते Rs १६९ असून मिनिमम लॉट ८८ शेअर्सचा आहे. ही कंपनी हेल्थकेअर आणि कन्झ्युमर इंडस्ट्रीजला लागणारी व्हाइट ऑइल्स  ‘DIVYOL’ या ब्रॅण्डखाली बनवते. ही कंपनी पर्सनल केअर, हेल्थकेअर आणि परफॉर्मन्स ऑईल्स आणि ल्युब्रिकंट्स प्रोसेसिंग ऑईल्स आणि इन्शुलेटिंग ऑईल्स या प्रकारची व्हाइट ऑइल बनवते. या कंपनीचा FY २३ साठी PROFIT Rs २१३.१८ कोटी तर रेव्हेन्यू ४१०१.७९ कोटी होता.
AFFLE  इंडिया ने ५ पेटंट्स फाईल केली. ही पेटंट्स AI आणि ऑटोमेशन क्षेत्रातील आहेत.
AGS ट्रँझॅक्टला Rs ११०० कोटींची ७ वर्षे   मुदतीची ऑर्डर स्टेट बँकेकडून मिळाली.
टायर कंपन्या, पेंट कंपन्या आणि इन्शुअरन्स मध्ये  खरेदी झाली तर बँका आणि NBFC मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५७९४ NSE निर्देशांक निफ्टी १९७३१ आणि बँक निफ्टी ४३५८३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.