आजचं मार्केट – २० November २०२३

आज क्रूड US $ ८०.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.९५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.४५ आणि VIX १२.१५ होते.
PCR १.१८ वरून १.०२ झाला. PCR १ पेक्षा जास्त असतो तेव्हा लोक पुट बाय करत असतात. बेअरिश सेंटीमेंट वाढते आहे असा अर्थ होतो
आज FII ने Rs ४९७.७६ कोटींची विक्री आणि DII ने Rs ५६५.४८ कोटींची विक्री केली. RBL बँक, चंबळ फर्टी, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट मन्नापुरम, MCX आणि झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते. SAIL बॅन मधून बाहेर पडला.
OPEC क्रूड उत्पादनातील कपात चालू ठेवावी का यावर चर्चा करेल.
ऑरोबिंदो फार्माच्या तेलंगणा येथील युनिट १ आणि युनिट III या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे इन्स्पेक्शन USFDA ने १३ नोव्हेंबर २०२३ ते १७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान पूर्ण केले. USFDA कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
एक्साइड इंडस्ट्रीच्या बाजूने डिक्री संबंधात हायकोर्टाने निर्णय दिला.VGCL आणि व्हर्टिव्ह एनर्जी या दोन्ही कंपन्या आता क्लोराईड मार्क वापरणार नाहीत.
SBI कार्डची कॅपिटल एडीक्युअसी रेशिओ  ४% ने कमी झाला.
सिप्लाने ZAR ५ मिलियनची गॅरंटी फर्स्ट रँड बँकेच्या संदर्भात इशू केली.
RITES ला CFM मोझंबिक कडून १० डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हजची US $ ३७.६८ मिलियन्सच्या ऑर्डर मिळाली. पण ३०० HIGE साईड वॅगनचे टेंडर मिळाले नाही.
NBCC ने ICAI.प्लॅनिंग डिझाईन आणि एक्झिक्युशनसाठी MOU  केले. एकूण प्रोजेक्ट व्हॅल्यूच्या ६.५% एवढी फी या कामासाठी NBCC आकारेल
या आठवड्यात IREDA, FLAIR WRITING, टाटा टेक, गांधार ऑइल यांचे IPO  येणार आहेत.
NEUJEN सॉफ्टवेअर २७ नोव्हेंबर रोजीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत बोनस शेअर्स इशू  करण्यावर विचार करेल.
सरकारने IT हार्डवेअर उत्पादन करणाऱ्या २७ कंपन्यांची PLI योजनेसाठी निवड केली. त्यात ITI, SYRAMA SG TECH, नेटवेब, OPTIEMUS इन्फ्राकॉम, डिक्सन टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ४%ते ७% इन्सेन्टिव्ह दिली जाईल.
.तालब्रोस ला Rs ५८० कोटींचे मल्टी इअर कॉन्ट्रॅक्ट मिळाले
 L & T  ला मध्यपूर्वेतून Rs १०००० कोटी ते Rs १५००० कोटींची मेगा ऑर्डर मिळाली.
L & T ला कतार टॅक्स ऑथॉरिटी कडून १२७ कोटींची नोटीस मिळाली.
सिप्लाच्या पिथमपूर प्लाण्टला USFDA ने वॉर्निंग लेटर दिले.
पर्सिस्टंट  सिस्टिम्सने ओपन सोर्स मेंटेनन्स, सर्व्हिस सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म लाँच केला.
गोल्डमन साखस ने २०२४ अखेर निफ्टी २१८०० पर्यंत जाईल असे अनुमान केले आहे.                            इंडिया पोस्ट आणि ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस यांनी भागीदारी केली.
श्रीजी  ट्रान्सलॉजिस्टीक्सने रेल्वे रेक हँडलिंग आणि  ट्रान्स्पोर्टेशनसाठी आणखी ३ लोकेशन्स ऍड केली.
प्रताप स्नॅक्सचे प्रमोटर्स त्यांच्या स्टेकपैकी ५% स्टेक विकणार आहेत.
L & T टेक ने NVIDIA बरोबर मेडिकल डिव्हाइसेस साठी कोलॅबोरेशन केले.
TCS आणि ऑस्ट्रेलियन स्टॉक एक्स्चेंज ASX यांच्यात सेवा पुरवण्यासाठी करार झाला.
ओबेराय रिअल्टीने गुरुग्राममध्ये १४.८१ एकर जमीन Rs ५९७ कोटींमध्ये खरेदी केली. आज सेबीने ‘इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ऍक्सेस प्लॅटफॉर्म’ लाँच केला. टेक्निकल अडचणीच्या विरुद्ध गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यासाठी याचा उपयोग होईल असे SEBI ने सांगितले.
आज ऑटो FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग तर IT PSU बँका आणि हेल्थकेअर मध्ये हलकीशी खरेदी दिसली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५६५५ NSE निर्देशांक निफ्टी १९६९४ आणि बँक निफ्टी ४३५८४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.