आजचं मार्केट – २४ November २०२३

आज क्रूड US $ ८१.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. आज रुपया ऑल टाइम लो होता म्हणजे Rs ८३.३८ वर होता. US $ निर्देशांक १०३.६६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.४७ आणि VIX ११.३३ होते. PCR १.११ होते. सोने Rs ६१२००, चांदी Rs ७३००० च्या आसपास तर बेस मेटल्स तेजीत होती. चीनमध्ये रिअल इस्टेट सेक्टरला सवलती जाहीर होत असल्यामुळे बेस मेटल्स तेजीत होती.
जपानचा महागाई दर   ३.३% एवढा आला.
आता IIBX दवारा TRQ होल्डर्स दुबईतून सोने आयात करू शकतील. सोन्याची फिजिकल  डिलिव्हरी घेण्यासाठी SEZ वॉलेट असणे जरुरीचे आहे. IIBX ला चांदीची ग्रेन काँट्रॅक्टस लाँच करण्यासाठी परवानगी मिळाली.
FII ने Rs २५५ कोटींची खरेदी आणि DII ने Rs ४५७ कोटींची खरेदी केली.
बलरामपूर चिनी आणि HPCL बॅनमध्ये होते.
आज इन्शुअरन्स कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. LIC च्या दृष्टीने तर आजचा दिवस खूप चांगला होता. LIC चा शेअर १०% ने वाढला. LIC ३ ते ४ नवीन इन्शुअरन्स प्रोडक्ट लाँच करणार आहे. त्यामुळे LIC चा न्यू बिझिनेस प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. आज LIC शेअरच्या   २० दिवसाच्या सरासरी व्हॉल्यूमच्या २० पट व्हॉल्युम होते.त्याच बरोबर RBI ने जे रिस्क वेटेज वाढवले त्याचा परिणाम NBFC च्या शेअर्सवर झाला आणि म्युच्युअल फंडांनी इन्सशुरन्स संम्बंधित शेअर्समध्ये गुंतवणूक केली. काही इन्शुअरन्स कंपन्यांचे शेअर्स IPO च्या किमतीपेक्षा कमी किमतीत ट्रेड करत असल्यामुळे म्युच्युअल फंडाचा फायदा झाला .
रामकृष्ण फोर्जिंगने ७.८३ MWP सोलर प्रोजेक्ट साठी प्रोझिल ग्रीन एनर्जी बरोबर करार केला .
हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला ९७ फायटर  जेट, १५६ प्रचंड लाईफ कॉम्बॅट हेलिकॉप्टर साठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. डिफेन्स ऍक्विझिशन काउन्सिलची  बैठक आहे. त्यात हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
डिजिटल RUPEE ट्रान्झॅक्शन साठी दिल्ली NCR रिजन मध्ये इंडसइंड बँकेने IGL बरोबर करार केला.
गती ने TECH एनेबल्ड सर्फेस ट्रान्सशिपमेंट सेंटर आणि डिस्ट्रिब्युशन वेअरहाऊस मायासांद्र बंगलोर येथे सुरु केले. अशाप्रकारची २१ वेअरहाऊस गती बांधणार आहे.
बँक ऑफ बरोडा Rs ५००० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड इशू करणार आहे.
सूप्रजीत  इंडस्ट्रीज ने जिगनी  इंडस्ट्रियल एरिया मधील इंडस्ट्रियल मालमत्ता खरेदी केली.
ग्लॅन्ड फार्माच्या पशमायलाराम फॅसिलिटी ला EIR  मिळाला.
LTIMINDTREE ह्या कंपनीने QUANTUM सेफ व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क लिंक लंडन मध्ये लाँच केली.
NMDC ने Rs ५४०० प्रती टन लम्प ओअर साठी तर Rs ४६६० प्रती टन फाईन च्या किमती ठरवल्या.
प्रेस्टिजने  ग्लेनबुक हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बंगलोरच्या IT हब  लाँच केला. या हबमधून Rs ५५० कोटी उत्पन्न  अपेक्षित आहे.
GNFC आणि TCS एक्सबायबॅक झाले.
केसोरामचा  सिमेंट व्यवसाय अल्ट्राटेक सिमेंट खरेदी करणार
JSW  स्टीलने JSW पेन्टमध्ये आणखी Rs ७५ कोटींची गुंतवणूक केली.JSW स्टीलकडे आता JSW  पेन्ट्सचे  २.९४ कोटी शेअर्स म्हणजेच १२.८४ %  स्टेक झाला.
ल्युपिन ने  CANAGLIFLOZIN  टॅबलेट आणि OPTHALMIC सोल्युशन USA मध्ये लाँच केले.
अडाणी हिंडेनबुर्ग संबंधात सुप्रीम कोर्टांत सुनावणी सुरु झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६५९७० NSE निर्देशांक निफ्टी  १९७९४  बँक निफ्टी  ४३७६९  बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.