आजचं मार्केट – २९ November २०२३

आज क्रूड US $ ८१.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.७५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३० आणि VIX १२.६५ होते.आज सोने ६२५०० चांदी Rs ७५००० च्या आसपास होती.
चीनमध्ये सोडा ASH च्या किमती ९% ने कमी झाल्या. नोव्हेम्बरमध्ये अमोनियाच्या किमती US मार्केटमध्ये ३८% तर भारतात १८% ने वाढल्या . दीपक फर्टिलायझर या भारतातील अमोनियाच्या सर्वात मोठ्या उत्पादकाला फायदा होईल.
BSE  लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप US $ ४ लाख कोटींच्यावर गेली.
सरकारला काँकॉर कडून Rs १०० कोटींचा लाभांश मिळाला.
आज BPCL ने Rs २१ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. रेकॉर्ड डेट १२ डिसेंबर २०२३ निश्चित केली आहे.
अल्ट्राटेक सिमेंटने  बर्नपूर सिमेंटचे ग्राइंडिंग युनिट Rs १७० कोटी मध्ये खरेदी केले.
मान इन्फ्रा Rs ५५० कोटींची उभारणी करणार आहे.
हॅवेल्स या कंपनीने त्यांचा ब्रँड ‘लॉईड’ हा दुबईस्थित TEKNODOME बरोबर भागीदारी करून लाँच केला. ‘DARUNAVIR’  या  HIV वरील टॅब्लेटसाठी ऑरोबिंदो ला USFDA कडून मंजुरी मिळाली.
अथेरच्या प्लांटमध्ये आग लागली.
GMDC ओडिशामध्ये २ कोल माईन्स एक्स्प्लोअर करणार आहे. यांच्याकडे लिग्नाइटच्या  ५ खाणी आहेत.
ASTRAL DM ची सबसिडीअरी अफिनिटी होल्डिंग त्यांचा स्टेक  US $१.०१ बिलियनला विकेल.
PCBL ने  ‘AQUAPHARM केमिकल्स’ ही कंपनी Rs ३८०० कोटींना अकवायर करायला परवानगी.
BHEL ला १६ सुपर रॅपिड गन माऊंटसाठी संरक्षणमंत्रालयाकडून Rs २९७० कोटींची ऑर्डर मिळाली.
कॅनरा बँकेला कॅन बॅन्क फॅक्टर मधील ७०% स्टेक डायव्हेस्ट करायला RBI ने मंजुरी दिली.
टाटा पॉवरला २०० MW फर्म आणि डिस्पॅचेबल रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट SJVN बरोबर डेव्हलप करण्यासाठी LOA मिळाले.
सीमेन्स ने आज त्यांचे वार्षिक  निकाल  जाहीर केले. कंपनीचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन वाढले. कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
झोमॅटोमधील ALIPAY  त्यांचा ३.१४% स्टेक  Rs ९४० कोटींना Rs १११.२८ प्रती शेअर या दराने २९.६ कोटी शेअर्स विकणार.
आज IREDA या रिन्यूएबल एनर्जी फायनांशियर चे लिस्टिंग झाले. हा शेअर Rs ५० वर BSE आणि NSE वर लिस्टिंग होऊन Rs ६० च्या वरच्या सर्किटला बंद झाला. IPO मध्ये हा शेअर Rs ३२ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
दिल्लीने  रिअल इस्टेटीच्या संदर्भात असलेले नियम हटवले.याचा फायदा Tarc आणि signature global या कंपन्यांना होईल
वरुण  बिव्हरेजीस ने MOZAAMBIQ  मध्ये सबसिडीअरी स्थापन केली.
ज्युबिलण्ट  फूडने जी कंपनी अकवायर केली ती  स्वस्तात केली आहे.
JIO फायनान्स ने Rs ३००००/- चे डिजिटल लोन देण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीचे भाव वाढत आहे. हिंदुस्थान झिंक ही भारतातील सर्वांत मोठी चांदीचे उत्पादन करणारी कंपनी आहे. त्यामुळे हिंदुस्थान झिंकला फायदा होईल.
फिचने TCS चे रेटिंग ‘A’ आणि आऊटलूक स्टेबल केला.
बँक ऑफ कॉमर्सने कोअर बँकिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी इन्फोसिसची  निवड केली.
ऑटो, एनर्जी,सोन्याशी संबंधित शेअर्स तेजीत होते. स्मालकॅप शेअर्स तेजीत होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६६९०१  NSE निर्देशांक निफ्टी २००९६  बँक निफ्टी  ४४५६६वर बंद झाले.
                                      भाग्यश्री

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.