Monthly Archives: December 2023

आजचं मार्केट – २९ डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ७७.५० प्रती बॅरल्स च्या आसपास तर रुपया  US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. USA  $ निर्देशांक १००.८७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८३ आणि VIX १५.०२ होते. सोने Rs ६३३०० आणि चांदी Rs ७४५०० च्या आसपास होती कॉपर तेजीत तर अल्युमिनियम आणि झिंक मंदीत होते.
आज FII ने Rs ४३५८.९९ कोटींची खरेदी तर DII ने Rs १३६.६४ कोटींची खरेदी केली
PCR १.३० होते.
सरकारचा पेट्रोलच्या किमती Rs १० ने कमी करण्याचा प्रस्ताव आहे. यात काही हिस्सा केंद्र सरकार तर काही हिस्सा राज्य सरकार आणि काही हिस्सा OMC  शेअर करतील.
पूनावाला फिनकॉर्प १८ जानेवारीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत NCD दवारा Rs ४००० कोटी उभारण्यावर विचार करेल.
सॅटिन क्रेडिट केअर या कंपनीने कर्नाटक बँकेबरोबर कोलेन्डिंग अग्रीमेंट केले. ही  कंपनी पूर्णपणे मायक्रो फायनान्स क्षेत्रात आहे. RBI ची रिस्कवेटेज वाढवण्याच्या मार्गदर्शकतत्वातून मायक्रो फायनान्सला अपवाद केला आहे. ही कंपनी ग्रामीण क्षेत्रात कृषी आणि तत्सबंधित मायक्रोफायनान्स करते.
NBCC ला Rs ८८.९ कोटींची ऑर्डर मिळाली. .
C – हेवी मोलासिस पासून बनवलेल्या एथॅनॉलवर  सरकार OMC (IOL BPCL, HPCL, मंगलोर टिफायनरी) ना  Rs ६ .८७ सबसिडी देणार आहे. त्यामुळे आता या प्रकारच्या इथेनॉल ची किंमत Rs ५६.२७ प्रती लिटर झाली.
वारी एनर्जी या कंपनीने IPO साठी DRHP फाईल केले.
ICICI लोम्बार्डला Rs १९०२ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
रेलटेलला Rs १२०.४५ कोटींची ऑर्डर मिळाली.
टाटा कॉफी १ जानेवारी २०२४ पासून टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस मध्ये मर्ज होणार आहे. टाटा कॉफीच्या ५५ शेअर्सला टाटा कन्झ्युमर प्रोडक्टसचे १४ शेअर्स मिळतील.
हरयाणा रिन्यूएबल एनर्जी विभागाकडून कुसुम-३ योजनेअंतर्गत शक्ती पंप या कंपनीला Rs २५८ कोटींची ऑर्डर मिळाली.
इनोव्हा कॅपटॅब या कंपनीचे BSE वर Rs ४५६.१० तर NSE वर Rs ४५२.१० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ४४८ ला दिला आहे. लिस्टिंग नंतर या शेअरमध्ये चांगली खरेदी झाल्यामुळे शेअर वरच्या सर्किटला लागला.
टेक्नो इलेक्ट्रिक्स ला Rs १७५० कोटींची ऑर्डर मिळाली.
मरिन इलेक्ट्रिकल्स ला संरक्षण मंत्रालयाकडून Rs ३६ कोटींची ऑर्डर मिळाली.
GE &TD ला GBP ७ कोटींची ऑर्डर मिळाली.
कल्पतरू प्रोजेक्ट्सला Rs ३२४४ कोटींची ऑर्डर मिळाली. कंपनीने अंडरग्राऊंड मेट्रो रेल टनेल च्या आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझिनेसमध्ये TBM  क्षेत्रात पदार्पण केले
RBI ने ICICI प्रु ला इंडसइंड बँक, IDFC Ist बँक ,RBL बँक आणि फेडरल बँक या चार बँकांमध्ये ९.९५% स्टेक घ्यायला परवानगी दिली.
स्वान एनर्जीने Rs ४००० कोटी फंड उभारले.
रेंडिंग्टनला आयकर विभागाकडून Rs १२२ कोटींची वर्ष २०२१ -२२ साठी नोटीस मिळाली.
पॉवर मेक ला एकूण  Rs २१९२ कोटींच्या दोन ऑर्डर्स मिळाल्या.
मेडप्लसचे लायसेन्स ७ दिवसांसाठी ड्रग कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेशनने सस्पेंड केले.i
मिडकॅप, स्मॉल कॅप,ऑटो,FMCG, रिअल्टी, मेटल्स क्षेत्रात खरेदी झाली. एनर्जी, PSU, PSE, IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२२४० NSE निर्देशांक निफ्टी २१७२६ बँक निफ्टी ४८२७३  वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २८ डिसेंबर २०२३

.८३.२०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १००.५३ USA १० वर्षे  बॉण्ड यिल्ड ३.८१ आणि VIX १५.७६ होते.
FII ने Rs २९२६ कोटीची खरेदी , DII ने Rs १९२ कोटींची विक्री केली.
आज NALCO, RBL बँक बॅन मध्ये  डेल्टा कॉर्प, बलरामपूर चिनी, हिंदुस्थान कॉपर बॅनमधू बाहेर आले.
कॅनरा बँक कॅनरा रोबेको AMC या नावाने IPO आणणार.
झोमॅटोला Rs ४०१ कोटींची २०१९ ते २०२२ दरम्यान GST पेनल्टीसाठी नोटीस मिळाली.
टाटा पॉवरने बिकानेर III आणि निमराणा II हे दोन ट्रान्समिशन प्रोजेक्ट १८.६ कोटींना घेतले.
कोरोमंडळ इंटरनॅशनलमध्ये अमोनिया गळती झाल्यामुळे त्यांचा पेन्नारचा एन्नोर प्लांट बंद केला. कोरोमंडळ चा अमोनिया टॅंक आणि दुसऱ्या सिस्टिम्स तपासणीत OK आढळल्या. तामिळनाडू पोल्युशन कंट्रोल बोर्डाने कंपनीला आवश्यक त्या सेफ्टी स्टॅण्डर्डची पूर्ती करून  ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ या ऑथॉरिटीकडून NOC घ्यायला सांगितले.
डेल्टा कॉर्प हा शेअर १ मार्च २०२४ पासून F & O मधून बाहेर पडेल.
KP एनर्जी या कंपनीची ३० डिसेंबर २०२३ ला बोनस शेअर इशू करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.
बंधन बँक त्यांचे NPA विकणार आहे.
साऊथ इंडियन बंक Rs १७५० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे.
APRAAVA कडून सुझलॉन एनर्जीला ऑर्डर मिळाली.
HDFC बँकेची मार्केट कॅप Rs १३ लाख कोटींवर गेली.
हिंदुस्थान झिंकला  GST उदय[पूर कडून  २८.८२ कोटींची नोटीस मिळाली.
वेदांताने Rs २५०० कोटींच्या NCD वरील व्याजाचे पेमेंट वेळेवर केले.
हुडकोने  गुजरात मध्ये  गुजरात सरकारबरोबर Rs १४५०० कोटीची  गुंतवणूक करून नवीन शहर बसविण्यासाठी करार केला.
रामकी इंफ्राने विशाखा फार्मसी Rs १०२ कोटींना विकली.
GMM  PFAUDLAR आता  फार्मा माईन्स  मिनरल्स यांच्या शिवाय दुसऱ्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कंपनीच्या केमिकल सेगमेंट च्या कॅपेक्स मध्ये सुधारणा झाली. भारत आणि जागतिक मार्केटमध्ये केमिकल्सना चांगली मागणी आहे. पण भारतात किमती कमी होत आहेत.
अडाणी इंटरप्रायझेसची सबसिडीअरी अडाणी ग्लोबल मॉरिशस ने UAE तील कंपनी SIRIUS बरोबर AI, IOT आणि ब्लॉकचेन साठी JV केले.
पेट्रोनेट LNG ने गोपाळपूर पोर्टमध्ये LNG स्टेशन उभारण्यासाठी करार केला.
USA  ने त्यांची जहाजे सुएझ कालव्याच्या सागरांत आणून उभी केल्यामुळे जहाजांची येजा पुन्हा सुएझ कालव्यातून सुरु झाली. त्यामुळे क्रूडच्या भावांत घट झाली.
 NTPC ‘NTPC ग्रीन एनर्जीचा IPO आणणार आहे.
द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशनला TCS कडून ऑर्डर मिळाली.
ICICI बँकेला तामिळनाडू GST DEPT कडून नोटीस मिळाली. .
आज आझाद इंजिनीअरिंगचे BSE वर Rs ७१० आणि NSE वर Rs ७२० वर लिस्टिंग झाले. शेअर IPO मध्ये Rs ५२४ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
रिलायन्स कॅपिटल मध्ये स्टेक घेण्यासाठी  इडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स, IIHL BFSI ( इंडिया) आणि आशिया इंटरप्राइझेस ला CCI ने परवानगी दिली. रिलायन्स कॅपिटल ही कंपनी NCLT मध्ये रेझोल्यूशन प्रोसेस मध्ये आहे.
कजारिया सिरॅमिक्स केरळ प्लायवूड मध्ये Rs ११५ कोटींची गुंतवणूक करणार आहे.
सरकारने फ़ेम-३ चा ड्राफ्ट  जाहीर केला. या योजनेअंतर्गत EV ट्रॅक्टर्स आणि ट्रक्सचा समावेश केला जाईल. या योजनेत सरकार Rs ३३२४० कोटींची गुंतवणूक करणार आहे. महिलांना १०% सबसिडी जास्त मिळेल. फेम-३ योजनेतील सबसिडी प्रत्येक वर्षी कमी होत जाईल. सरकार Rs १००० कोटींचा इनोव्हेशन फंड स्थापन करणार आहे.
इझी ट्रिप चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स २ जानेवारी २०२४ ला फंड रेझिंगवर विचार करेल.
जानेवारी २०२४ सिरीज साठी खालीलप्रमाणे रोलओव्हर झाले
कोलगेट ९३%, मन्नापुरम ९२%, SBI कार्ड ९१%,SAIL,कमिन्स  ९०% , गोदरेज प्रॉपर्टीज ८९%, डाबर, आयशर मोटर्स, पॉलीकॅब ८८%, ब्रिटानिया ८५% बजाज ऑटो,HDFC लाईफ ८४%, इंडसइंड बँक, ICICI बँक ८३%,HDFC बँक,हिरो मोटो ८०%, मारुती ७८% SBI ७७% HCL TEK ७६%, रिलायन्स इंडस्ट्रीज ७२%. आज IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. PSE,फार्मा , एनर्जी ,FMCG मेटल्स ऑटो क्षेत्रात खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२४१० NSE निर्देशांक निफ्टी २१७७८ बँक निफ्टी ४८५०८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २७ डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ८१.००  प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.१२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८८ तर VIX १५.३७ होते. सोने Rs ६३२०० च्या आसपास तर चांदी Rs ७५१०० च्या आसपास होती.
USA च्या मार्केट्समध्ये तेजी होती. S & P  दोन वर्षांच्या कमाल स्तरावर होते. मास्टर कार्ड्स च्या रिपोर्ट  प्रमाणे रिटेल विक्री ३.१% ने कमी झाली.  कन्झ्युमर सेंटीमेंट खराब झाले. लोक खरेदी करताना किमतीला जास्त महत्व देऊ लागले.
तैवान सेमी कंडक्टर कंपनीमध्ये गेल्या २ वर्षांत गुंतवणूक झाली नव्हती, इंटेलच्या शेअरमध्ये खरेदी झाली.
FII ने Rs ९५.२० कोटींची विक्री तर तर DII ने Rs १६७.०४ कोटींची खरेदी केली.
RBL बँक, बलरामपूर चिनी, डल्टा कॉर्प, NALCO बॅन मध्ये होते.अशोक लेलँड, इंडिया सिमेंट,SAIL बॅन मधून बाहेर आले.
अडाणी एनर्जी सोल्युशन्स चा आर्म अडाणी ट्रान्समिशन स्टेप फोर आणि UAE स्थित Esyasoft होल्डिंग्स बरोबर इंडिया मध्ये आणि परदेशांत स्मार्ट मीटरिंग प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केले. यात ATSFL चा ४९% तर EHL चा ५१% स्टेक असेल. बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये दोन्ही कंपन्यांना समान प्रतिनिधित्व असेल. अडाणी एनर्जीला हलवाड ट्रान्समिशन हे स्पेशल पर्पज व्हेईकल PFC कन्स्लटिंग कडून खरेदी करण्यासाठी LOI मिळाले.
 आरती इंडस्ट्रीजला मोठे ९ वर्षे मुदतीचे आणि Rs ३००० कोटींचे  सप्लाय कॉन्ट्रॅक्ट मिळाले. कंपनीने सांगितले की ही ऑर्डर पुरी करण्यासाठी नवीन गुंतवणुकीची जरुरी नाही.
L & T ला सौदी अरेबिया कडून Rs ५००० कोटी ते Rs १०००० कोटी दरम्यान EPC कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
डिश टी व्ही च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या विरोधात २२/१२/२०२३  एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये शेअर होल्डर्सनी वोटिंग केल्यामुळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये मोठा बदल झाला.
CESC ला NCD द्वारे Rs ३०० कोटी उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली.
ऑरोबिंदो फार्माच्या  ‘POSACONAZOLE ‘ या इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.
बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट कौन्सिल कडून रेलटेल ला Rs ७६ कोटींची ऑर्डर मिळाली.
ICICI प्रु ला Rs २६९ कोटींची करासंबंधात डिमांड नोटीस मिळाली.
अल्ट्राटेकची मार्केटकॅप Rs ३ लाख कोटींच्यावर गेली.
JBM  ऑटोच्या व्यवस्थापनाने सांगितलेकी त्यांच्या नवीन प्लांटची क्षमता २०००० EV  बसेस उत्पादन करण्याची आहे. सध्या त्यांच्याकडे ५००० बसेससाठी ऑर्डर आहेत.EV बसेसची मागणी वाढत राहील. विमानतळ,शाळा, कंपन्या,यांच्या कडून EV बसेससाठी मागणी येत आहे.पर्यावरणासाठी EV बसेस उपकारक आहेत.
आज क्रेडो ‘मुफ्ती’ चे BSE वर Rs २८०.०० तर NSE वर Rs २८२.३५ वर लिस्टिंग झाले.
RBZ चे BSE वर  लिस्टिंग Rs १०० आणि NSE वरही Rs १०० वर लिस्टिंग झाले.
क्रेडो आणि RBZ चे लिस्टिंग AT PAR, IPO प्राईस झाल्याने ज्यांना शेअर अलॉट झाले त्यांना लिस्टिंग गेन्स झाले नाहीत.
झायड्स ला आयकर विभागाकडून Rs २८४.५८ कोटींची डिमांड नोटीस  मिळाली.
विष्णू प्रकाश पुंगलिया या कंपनीला उत्तराखंड राज्य सरकारकडून २ प्रोजेक्टसाठी एकूण Rs ८९९  कोटींची वॉटर सप्लाय सिस्टीम  डेव्हलप करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाली. यामध्ये  वॉटर सप्लाय प्रोजेक्टच्या १८ वर्षे मेंटेनंस साठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
हॅपी फोर्जिंग्स चे BSE वर Rs १००१.२० वर तर NSE वर Rs १००० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ८५० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
कन्साई नेरोलॅक ने त्यांची लोअर परेल येथील जागा रुणवाल बिल्डर्सची सबसिडीअरी AETHON ला Rs ७२६ कोटींना विकली.
आदित्य बिर्ला कॅपिटल आदित्य बिर्ला फॅशन मध्ये Rs ८५० कोटी आणि  ABC  डिजिटलमध्ये Rs ५० कोटी गुंतवणूक करणार आहे.
SJVN ला गुजरात ऊर्जा विकास निगम कडून Rs ५५० कोटीची ऑर्डर मिळाली.
अंबर एंटरप्रायझेसने ‘NOISE’ ब्रँड ओनर बरोबर JV केले.
वेदांता एक्सडिव्हिडंड झाला.
सुझलॉन एनर्जीला १००.८ MW साठी महिंद्रा SUSTEN कडून ऑर्डर मिळाली.
ऑटो,मेटल,बँकिंग,IT, रिअल्टी फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२०३८ NSE निर्देशांक निफ्टी  २१६५४  बँक निफ्टी ४८२८२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २६ डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ७९.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.६१ US १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८८ आणि VIX १४.५१ होते.. .
FII ने Rs २८२८.९४ कोटींची विक्री तर DII ने Rs २१६६.७२ कोटींची खरेदी केली.
NALCO, अशोक लेलँड, बलरामपूर चिनी, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट आणि SAIL  बॅनमध्ये होते.
मन्नापुरम फायनान्स आणि RBL बँक बॅन मधून बाहेर पडले.
अडाणी ग्रीन त्यांच्या अडाणी इन्व्हेस्टमेंट्स आणि ARDOUR प्रॉपर्टीज ना Rs १४८०.७५ प्रती वॉरंट या दराने ६.३१ कोटी वॉरंटस जारी  करून Rs ९३५० कोटी उभारेल.
अडाणी विल्मर मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग नॉर्मची पूर्तता करण्यासाठी प्रमोटर्स १.२४% स्टेक विकणार. UPL Rs ४२०० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे.
LT फुड्सला Rs १६१.४० कोटींच्या इन्शुअरन्स क्लेमसंबंधात हायकोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला.
BEL ला UP राज्य सरकारकडून Rs ६७८ कोटींची ऑर्डर मिळाली. BELच्या २०.३ लाख शेअर्समध्ये ३७ कोटींमध्ये लार्ज ट्रेड झाला.
आज तीन IPO च्या शेअर्सचे NSE आणि BSE वर लिस्टिंग झाले.
सुरज इस्टेट BSE वर Rs ३४३.८० आणि NSE वर Rs ३४० वर लिस्टिंग झाले.
मोतीसन्स चे BSE वर Rs १०३.९० आणि NSE वर Rs १०९ वर लिस्टिंग झाले.
मुथूट मायक्रो फायनान्स चे BSE वर Rs २७८ आणि NSE वर Rs २७५.३० वर लिस्टिंग झाले. सुरज इस्टेट आणि मुथूट मायक्रो फायनांस चे लिस्टींग IPO मध्ये दिलेल्या किमतीपेक्षा कमी झाल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले  त्यांना काहीही लिस्टिंग गेन्स झाले नाहीत. मोतीसन्स ज्वेलरी मात्र प्रीमियमवर लिस्टिंग झाल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
JSW एनर्जीने ५१ MW विंड पॉवर प्रोजेक्टमध्ये काम सुरु केले.
एशियन ग्रॅनाईट हया कंपनीने AGL सॅनिटरीवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही सबसिडीअरी सॅनिटरीवेअर आणि बाथवेअर बिझिनेससाठी स्थापन केली. या बिझिनेसमधून येत्या ५ वर्षांत Rs ४०० कोटींचा टर्नओव्हर होईल असे अनुमान आहे.
सरकारच्या सेमीकंडक्टर योजनेसाठी ४५ अर्ज आले आहेत. या योजनेनुसार सरकार गुंतवणुकीच्या ५०% सबसिडी देईल.सेमीकंडक्टर फॅब साठी ६ अर्ज आले. डिस्प्ले फॅब साठी ३ अर्ज आले. त्यात वेदांता आणि फॉक्सकॉनचा समावेश आहे. ATMP साठी १० अर्ज आले. ही IT मंत्रालयाची योजना आहे.
रेटगेनने  सॉफ्टवेअर & सपोर्ट सर्व्हिसेस साठी रेटगेन ADAR जपान GK ह्या नावाने सबसिडीअरी सुरु केली. बजाज फायनान्स ने NCD द्वारे १०५७ कोटी उभारले.
UP रोड ट्रान्सपोर्ट कडून टाटा मोटर्सला १३५० बसेसची ऑर्डर मिळाली.
गोदरेज प्रॉपर्टीजने गुरुग्राम हरियाणा येथे ६०० फ्लॅट Rs २६०० कोटींना विकले.
JSPL ने ब्लास्ट फर्नेस ३ साठी RINL बरोबर करार केला.
अनुपम रसायन ‘न्यू एज पॉलिमर इंटरमिजिएट’ हे केमिकल  जपानच्या कंपनीला ७-८ वर्षे सप्लाय करणार आहे. यातून कंपनीला Rs ५०० कोटी ते Rs ६०० कोटी मिळतील.
सरकार ने गुजरात मधील गिफ्ट सिटी मध्ये रेस्टारंट मध्ये मद्यप्राशनाला परवानगी दिल्यामुळे रॅडिको खेतान, युनायटेड बिव्हरेजीस या कंपन्यांना फायदा होईल.
सरकारने नायजेरियात ५ लिथियम च्या खाणी खरेदी केल्या. याचा फायदा NALCO., हिंदुस्थान कॉपर, हिंदुस्थान झिंक यांना होण्याची शक्यता आहे.
KPIT टेक N ड्रीम मध्ये युरो २.७ मिलियनची गुंतवणूक करून १३% स्टेक घेणार आहे. यामध्ये दुसरी गुंतवणूक  युरो ०.३ मिलियन करायची आहे यामध्ये स्टेक वाढवण्यासाठी ऑप्शन आहे.
झायड्स च्या अहमदाबादमधील चंगोदर येथील API साईटची तपासणी USFDA ने करून ६ त्रुटी दाखवल्या यामध्ये “नो रिपीट ऑबझर्व्हेशन, नो डेटा इंटीग्रीटी  इशू’ असे रिमार्क दिले.
बायोकॉनची सबसिडीअरी बायोकॉन बायालॉजीक्स ने सॅन्डोज बरोबर इंजेक्शन जपानमध्ये प्रमोट करणे विक्री करणे डिस्ट्रिब्युट करणे या साठी करार केला.
इन्फोसिसबरोबर एका ग्लोबल कंपनीने केलेला US $ १.५० बिलियनचा १५ वर्षे मुदतीचा करार संपुष्टात आणला.
ऑरोबिंदो फार्माच्या न्यू जर्सी येथील सबसिडीअरीचे ११ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान USFDAने  इन्स्पेक्शन  करून १० त्रुटी दाखवल्या.या सबसिडीअरीने अजून उत्पादन सुरू केले  नाही.
रिलायन्सने डिझनी या कंपनीबरोबर च्या मर्जर स्कीम साठी टर्म शीट सही केली. यात रिलायन्सचा ५१%तर  डिझनी चा ४९% स्टेक असेल.
वेदांता ग्रुपच्या बाल्को या कंपनीला GST ऑथॉरिटीज कडून Rs ८४ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
एनर्जी,फार्मा,मेटल्स,ऑटो, इन्फ्रा शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१३३६ NSE निर्देशांक निफ्टी २१४४१ आणि बँक निफ्टी ४७७२४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २२ डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८९ आणि VIX १३.७९ होते. सोने Rs ६२७०० आणि चांदी Rs ७५६०० च्या आसपास होती. बेस मेटल्समध्ये तेजी होती.
USA मधील मार्केट्स तेजीत होती. USA मध्ये बेरोजगारीचा आकडा २.०५,००० होता.
जपानमध्ये महागाई कमी झाली.
सेमीकंडक्टर चिपचा सप्लाय सामान्य होईल या शक्यतेमुळे मायक्रॉन टेक तेजीत होता.
USA च्या GDP ग्रोथ रेट चा अंदाज ४.९% आला.
पश्चिम बंगालच्या डिपार्टमेंट PHED कडून WPIL( WORTHINGTON पंप्स इंडिया लिमिटेड). ला Rs ४२५ कोटींची ऑर्डर मिळाली.
FII ने Rs १६३६ कोटींची विक्री आणि DII ने Rs १४६४.७० कोटींची खरेदी केली.
हिंदुस्थान कॉपर, अशोक लेलँड, बलरामपूर चिनी, डेल्टा कॉर्प, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, RBL बँक, सैल बॅन मध्ये  होते. इंडस टॉवर, NALCO, पिरामल बॅन मधून बाहेर आले.
 LIC ला मिनिमम २५% पब्लिक शेअरहोल्डिंग नियमातून लिस्टिंगच्या तारखेपासून  १० वर्षांसाठी सूट दिली. आता ९६.५ % सरकारचे शेअरहोल्डिंग आहे.
ल्युपिन ने  आयर्वेदिक लिक्विड लॅक्सेटिव्ह लाँच केले.ल्युपिनच्या सबसिडीअरीने सॅनोफी बरोबर करार केला.कॅनडा UK ,युरोप या देशातील वेल एस्टॅब्लिश्ड ब्रँड साठी करार केला.

MOIL चे उत्पादन २०१६-२०१७ मधील उत्पादनापेक्षा २६% ने वाढून १६ लाख टन झाले.
३६० ONE WAM ने MAVM बरोबर उरलेला स्टेक घेण्यासाठी करार केला.
NIIF  AP ( भोगपूरम)   विमानतळामध्ये Rs ६७५ कोटी गुंतवणार आहे. याचा फायदा GMR एअरपोर्ट ला होईल.
ब्रिगेडने ‘SIDWIN कोअरटेक’ बरोबर लिजिंग अग्रीमेंट केले.
अल कार्गो त्यांचा लॉजिस्टीक्सचा इंटरनॅशनल सप्लाय चेन बिझिनेस डीमर्ज करणार आहे. गतीच्या १० शेअर्सवर अल कार्गो चे ६३ शेअर्स मिळतील.गती अल कार्गोमध्ये मर्ज होईल. त्याचे नाव अल कार्गो गती असेल. अल कार्गोचा भारतातील इंटरनॅशनल सप्लाय चेन बिझिनेस तसेच अल कार्गोच्या इंटरनॅशनल सबसिडीअरीज या अल कार्गो ECU म्हणून  ओळखली  जाईल.अल कार्गोच्या एका शेअरमागे अल कार्गो ECU चा एक शेअर मिळेल. अलकार्गो गतीकडे एक्स्प्रेस बिझिनेस आणि कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स बिझिनेस राहील.

BEL ला Rs २७५९ कोटींची ऑर्डर मिळाली.
इझी ट्रिप प्लॅनरने ECO हॉटेल आणि रिसॉर्ट्स मध्ये १३.३९% स्टेक घेतला.
एशियन  पेन्ट्स च्या बांधकाम चालू असलेल्या गुजरातमधील अंकलेश्वर येथील प्लांटमध्ये छोटी आग लागली. आगीमुळे कोणतीही वित्त किंवा प्राण हानी झाली नाही.
SVF इंडिया होल्डिंगने Paytm मधील २.१३% स्टेक कमी केला. आता त्यांच्या कडे ७% स्टेक राहिला.
गोदावरी पॉवर आणि इस्पात यांना त्यांची उत्पादन क्षमता ४ लाख मेट्रिक टनवरून ५.२५ लाख टन मेट्रिक टन पर्यंत वाढवायला परवानगी मिळाली.
 KPI ग्रीनला १.८MW सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळाली.
सरकारने इथेनॉल साठी १७ लाख टन उसाचा रस ही मर्यादा ठरवली आहे. सरकारने उसाच्या रसापासून मद्यार्क बनवण्यावर बंदी घातली. धान्य  आणि उसाचा रसापासून इथेनॉल बनवण्याच्या फॅक्टरीज वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. याबाबत सरकारला प्रत्येक महिन्याला रिपोर्ट दिला पाहिजे. आता साखरेची आयात करायला लागण्याची शक्यता कमी आहे.
PSP प्रोजेक्टला गांधीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून Rs १५९ कोटींची ऑर्डर मिळाली
सरकारने सांगितले की खाद्य तेलावर मार्च २०२५ पर्यंत किमान इम्पोर्ट ड्युटी सुरु राहील.
स्नोमॅन लॉजिस्टिक्स मध्ये गेटवे डिस्ट्रिपार्कने  ०.२६% स्टेक घेतला.
पॉलीकॅबच्या ५० ठिकाणांवर IT  विभागाने छापे मारले.
इन्फोसिसने LKQ बरोबर IT ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.
IT, रिअल्टी, मेटल्स, फार्मा, इन्फ्रा, ऑटो, मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेंसेक्स ७११०६ NSE निर्देशांक निफ्टी २१३४९ आणि बँक निफ्टी ४७४९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.९९ तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८६ आणि VIX १४.०१ होते. सोने Rs ६२४०० च्या आसपास तर चांदी ७५४०० च्या आसपास होती.
FII ने Rs १३२२.०८ कोटींची विक्री तर DII ने Rs ४७५४.३४ कोटींची खरेदी केली
झी एंटरटेनमेंट आणि IRCTC बॅन मधून बाहेर पडले. बलरामपूर चिनी, डेल्टा कॉर्प, इंडस टॉवर, मन्नापुरम फायनान्स, NALCO, RBL बँक, SAIL, पिरामल इंटरप्रायझेस बॅन मध्ये होते.
रेड सी च्या परिसरात जे काही चालू आहे त्याचा लॉजिस्टिक कंपन्यांवर आणि पर्यायाने उद्योग जगावर  परिणाम होईल.
५० दिवसांचे मूव्हिंग  ऍव्हरेज  २०० दिवसाच्या मूव्हिंग ऍव्हरेज ला वरच्या दिशेने क्रॉस करते तो बुलिश सिग्नल असतो.त्याला गोल्डन क्रॉसओव्हर म्हणतात. अशा प्रकारचा गोल्डन क्रॉस ओव्हर HDFC बँकेसंबंधात झाला. ह्या  गोल्डन क्रॉसमुळे  शॉर्ट टर्म मध्ये तेजीचा सिग्नल मिळतो. त्यामुळे काल आणि आज HDFC बँकेचा शेअर तेजीत होता.
अशोक लेलँड ला तामिळनाडू रोड स्टेट ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन कडून Rs ५०१ कोटींची ५५२ बसेस सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली.
इनॉक्स इंडियाचे BSE वर ९३३.१५ आणि NSE वर ९४९.६५ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये शेअर Rs ६६० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट  झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
टेक्समको रेल ला ३४०० वॅगन साठी ऑर्डर मिळाली.
PVR इनॉक्सने गुरुग्राममध्ये ३ स्क्रीनचे मल्टिप्लेक्स सुरु केले.
वरूण  बिव्हरेजीस ने सांगितले की दक्षिण आफ्रिकेचे बिव्हरेजीस मार्केट भारताच्या मार्केटच्या तुलनेत ४० % आहे. २ ते ३ वर्षांत दुप्पट ते तीपट्ट होईल. कंपनी हिमाचल प्रदेशमध्ये Rs २७० कोटीचा नवीन प्लांट लावणार आहे. भारतात डबल डिजिट ग्रोथ म्हणजे १४% पर्यंत राहील. कंपनीने सांगितले की भारतात मार्केट पेनिट्रेशन साठी खूप वाव आहे.
सुझलॉन एनर्जी ला KP ग्रुपकडून १९३.२ MW साठी रिपीट ऑर्डर मिळाली.
इंनोवा कॅप टॅब लिमिटेड या फार्मास्युटिकल क्षेत्रात भारतातील १४ मोठ्या कंपन्यांकरता  कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरींग करणाऱ्या कंपनीचा Rs ५७० कोटींचा ( Rs ३२० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs २५० कोटींची OFS ) IPO २१ डिसेम्बरला ओपन होऊन २६ डिसेम्बरला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ४२६ ते Rs ४४८ असून मिनिमम लॉट ३३ शेअर्सचा आहे. या कंपनीने जून २३ मध्ये शेरॉन बायोमेडीचे अक्विझिशन केले होते.कंपनीला FY २३ मध्ये Rs १०१ कोटी प्रॉफिट आणि रेव्हेन्यू Rs १११२ कोटी झाला.
अमी ऑर्गनिक्स ने गुजरात सरकारबरोबर इलेक्ट्रोलायसिस चे उत्पादन करण्यासाठी Rs ३०० कोटींची गुंतवणूक करण्यासाठी करार केला.
माझगाव डॉक्स ला संरक्षण मंत्रालयाकडून सहा ( नेक्स्ट जनरेशन OFFशोअर  PATROL) जहाजे इंडियन कोस्टल गार्डस साठी बांधण्यासाठी Rs १६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
कोची शिपयार्डसला नेव्हीच्या जहाजांवरील यंत्राची दुरुस्ती आणि मेंटेनन्स साठी Rs ४८८.२५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
अल्ट्राटेक सिमेंटने ‘CLEAN MAX TERA ‘ या जनरेशन अँड ट्रान्समिशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीमध्ये २६% स्टेक Rs २०.२५ कोटींमध्ये खरेदी केला.
BSE च्या गव्हर्निंग बॉडीचे  चेअरमन  म्हणून प्रमोद अगरवाल यांच्या नेमणुकीला SEBI ने मंजुरी दिली.
ICICI बँकेचे  एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून संदीप बात्रा यांच्या नेमणुकीला DEC २०२५ पर्यंत म्हणजे दोन वर्ष मुदतवाढीला RBI ने मंजुरी दिली. शेअरहोल्डर्सनी याआधीच ५ वर्षे मुदतीसाठी मंजुरी दिलेली आहे.
ASTRAZENECA भारतात एक औषध लाँच करणार आहे.
भारती एअरटेलने INTELLISMART बरोबर २० मिलियन स्मार्ट मीटरसाठी भागीदारी केली.
झी एंटरटेनमेंटने सोनी बरोबरच्या मर्जरची तारीख पुढे ढकलण्यासाठी केलेल्या विनंतीला सॊनीकडून  अनुकूल प्रतिसाद मिळाला
फ्लेअर रायटिंग इंस्ट्रुमेंट्स चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढले मार्जिन कमी झाले.
बंधन बँक Rs ७.७ बिलियनचा स्ट्रेस्स्ड होम लोन पोर्टफोलिओ ARC ला विकणार आहे.
टायगर लॉजिस्टिक्स शेअर स्प्लिटवर विचार करणार आहे.
पंचकुला सेक्टर ६७ मध्ये DLF ने Rs १४०० कोटींची विक्री केली.
बँकिंग, फार्मा, इन्फ्रा, एनर्जी, PSE, मेटल्स, IT, मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७०६५९ NSE निर्देशांक निफ्टी २११९५ बँक निफ्टी ४७४२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २० डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ८०.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.२८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९१ आणि VIX १४.७७ होते. सोने Rs ६२४०० तर चांदी Rs ७४००० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.
USA मध्ये लहान घरांसाठी मागणी १८% ने वाढली. अक्सेंचरचे निकाल ठीक आले.
UK मध्ये नोव्हेम्बरमध्ये महागाई ४.६ झाली ( YOY  ३.९ होती )
FII ने Rs ६०१.५२ कोटींची विक्री तर DII ने Rs २९४.३५ कोटींची खरेदी केली.
डेल्टा कॉर्प, IRCTC, इंडस टॉवर, पिरामल, RBL बँक, बलरामपूर चिनी, मन्नापुरम फायनान्स, नाल्को, SAIL, झी एंटरटेनमेंट बॅन मध्ये होते.
हिंदुस्थान कॉपर आणि इंडिया सिमेंट बॅन मधून बाहेर आले.
औरोबिंदो फार्माच्या आंध्र प्रदेशमधील युनिट नंबर ४ ला EIR मिळाला.
सलासार टेक ने १ शेअरमागे ४ शेअर बोनसची घोषणा केली.
कॅन फिना होम्स ने Rs २ इंटरीम लाभांश जाहीर केला.
BPCL कोची रेफायनरीमध्ये पॉलीप्रोपोलिनचे युनिट लावणार आहे.
उत्तर प्रदेशाच्या मंत्रिमंडळाचा ने कोविद काळात लावलेले व्याज आणि दंड नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील रिअल्टी  प्रोजेक्टसाठी माफ केले. याचा मोठा फायदा या प्रोजेक्ट मधील घरग्राहकांना होईल. राज्य सरकारने अमिताभ कांत समितीच्या शिफारशी मान्य केल्या.
आझाद इंजिनीरिंग चा IPO २० डिसेम्बरला ओपन होऊन २२ डिसेम्बरला बंद होईल. प्राईस बँड Rs ४९९ ते Rs ५२४ असून मिनिमम लॉट २८ शेअर्सचा आहे. IPO एकूण Rs ७४० कोटींचा असून Rs २४० कोटींचा फ्रेश इशू असून Rs ५०० कोटींचा OFS असेल. कंपनी एअरोस्पेस, डिफेन्स, एनर्जी उद्योगांसाठी टर्बाइन बनवते. त्यांचे ९५% ग्राहक ग्लोबल कंपन्या आहेत. कंपनी आणखी २ प्लांट लावण्याची योजना करत आहे. सध्या प्रमोटर्सचे होल्डिंग ७८.६१ आहे ते IPO नंतर ५६.८०% राहील.
स्पाईस जेट दोन टप्प्यात Rs २२४१ कोटी ( Rs १५९१ कोटी +Rs ६५०कोटी ) उभारेल. जुन २०२४ पर्यंत १२९१ कोटी आणि जुलै २०२५ पर्यंत Rs ६५० कोटी उभारेल. यापैकी Rs ५०४ कोटी TDS, GST, आणि PF याची बाकी क्लिअर करण्यासाठी करण्यात येईल.
एम्बसी ऑफिस मध्ये २२.३६ कोटींच्या शेअरचे (२८.९८% इक्विटी ) Rs ७१४७ कोटींचे लार्ज डील झाले.
DOMS इंडस्ट्रीजचे BSE आणि NSE  वर Rs १४०० वर लिस्टिंग झाले. शेअर IPO मध्ये Rs ७९० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
इंडियन शेल्टर फायनान्स चे BSE वर Rs ६१२.७० वर आणि NSE VR Rs ६२० वर झाले. ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
सरकारने ऑफ शोअर विंड एनर्जीसाठी नियम सोपे केले. सरकार आता SEA -BEDS चे ऑक्शन करणार आहे. रिलायन्स, अडाणी ग्रुप, स्टर्लिंग & विल्सन, इनॉक्स विंड यांना फायदा होईल.
जिओ ला ३४.७५ लाख नवीन ग्राहक, भारती एअरटेल ला १३.२० लाख ग्राहक मिळाले. तर ‘VI’ ने ७.४९ लाख ग्राहक आणि BSNL ने Rs २३.३० लाख ग्राहक गमावले.
RBI ने बँका आणि NBFC यांनी AIF ( अल्टर्नेट इन्व्हेस्टमेंट फंड) मध्ये  केलेल्या गुन्तवणुकीशी संबंधित नियम कडक केले.जर RE ( रेग्युलेटेड एंटीटी) ने एका वर्षाच्या कालावधीत  जर DEBTOR  कंपनीला  सध्या किंवा पूर्वी कर्ज दिले असेल किंवा त्या कंपनीत गुंतवणूक केली असेल अशी कंपनी debtor कंपनी मानली जाईल. RE ने ज्या AIF ची थेट किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक DEBTOR कंपनीमध्ये असेल अशा AIFच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करु नये.  आता बँका आणि NBFC ना AIF मधील गुंतवणूक १ महिन्याच्या आत विकायला लागेल नाहीतर त्यांना या गुंतवणुकी एवढ्या रकमेची प्रोव्हिजन करावी लागेल. याचा परिणाम पिरामल इटरप्रायझेस, I बुल्स HSG फायनान्स, IIFL  यांच्यावर होईल.
RVNL आणि केरळ रेल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन JV ला शिवगिरी रेल्वे स्टेशन चा विकास करण्यासाठी ३० महिने मुदतीचे Rs १२३ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
वरूण बिव्हरेजीस दक्षिण आफ्रिकेतील एक कंपनी Rs १३२० कोटींमध्ये घेणार आहे.वरूण  बिव्हरेजीस झारखंड राज्यातील पतरत्तू येथे Rs ४५० कोटी गुंतवणूक करू न नवीन प्लांट उभारण्यासाठी राज्य सरकारबरोबर MOU केले.
 निरमा ला ग्लेनमार्क लाईफसायन्सेसमध्ये  कंट्रोलिंग स्टेक  घेण्यासाठी CCI ने मंजुरी दिली.
 दीपक नायट्रेटने पेट्रोनेट LNG बरोबर करार केला.
ICICI बँकेला GST ऑथारिटीजने Rs ७.४७ कोटींची डीमांड  नोटीस पाठवली.
ICICI सिक्युरिटीज च्या डीलीस्टिंग मध्ये FII ने विरोधात  मतदान केल्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.
इंडस इंड बँक निपॉन AMC मधील २.८६% स्टेक Rs ७६२ कोटींना विकणार आहे.
नजारा टेक्नॉंलॉजीने ४ गेम्स स्टुडिओबरोबर ५ नवीन गेम्स प्रकाशित करण्यासाठी करार केला.
सुप्रीम पेट्रो ने चेन्नई प्लांट मध्ये पुन्हा काम सुरु केले.
महिंद्रा लॉजिस्टीक्स ट्रान्स्टेक लॉजिस्टिक्स मधला ४०% स्टेक विकणार आहे. या स्टेक विक्री नंतर ट्रान्स टेक लॉजिस्टिक्स महिंद्रा लॉजिस्टिक्स ची असोसिएट कंपनी राहणार नाही.
अडानि ग्रुप,, मेटल, पॉवर, ऑटो, मिडकॅप आणि स्माल कॅपमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग झाले.
इतर क्षेत्रांत थोड्या फार प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७०५०६ NSE निर्देशांक निफ्टी २११५० बँक निफ्टी ४७४४५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १९ डिसेंबर २०२३

आज क्रूड US $ ७८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.१०   च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.०८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९४ आणि VIX १४.०१ होते. सोने Rs ६२५००च्या आसपास होते .
बँक ऑफ जपानने अल्ट्रालुज मॉनेटरी पॉलिसी चालू ठेवली आणि यात नजीकच्या भविष्यकाळात काही बदल होण्याचे संकेतही दिले नाहीत. त्यामुळे येनचा भाव US $ १= १४४.२७ येन एवढा  झाला . आणि  १ युरो =१५७.६८ येन असा भाव झाला.
FII ने Rs ३३.५१ कोटींची विक्री तर DII ने Rs ४१३.३८ कोटींची खरेदी केली.
NALCO, बलरामपूर चिनी, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, मन्नापुरं फायनान्स, SAIL, आणि झी एंटरटेनमेंट बॅन मध्ये होते. डेल्टा कॉर्प बॅन मधून बाहेर आला.
सफायर फूड्स मधील ४६७ कोटी शेअर्स समारा कॅपिटल आणि सफायर फूड्स मॉरिशस ने विकले. सिंगापूर सरकारने १.५८% स्टेक  घेतला आणि HDFC म्युच्युअल फंडाने २२ लाख शेअर्स खरेदी केले.
गोल्डमन साखस, टाटा AIA  लाईफ, आणि DSP MF ने ARCHEAN केमिकल्स मध्ये २.४६% स्टेक घेतला.
सन फार्मा ने ‘LYNDRA THERAPEUTICS’ मध्ये १६.७% स्टेक US $ ३० मिलियन्सला घेण्यासाठी करार केला. ही कंपनी मॅसॅच्युएट्स मधील असून दीर्घकाळ चालणाऱ्या थेरपिसाठी नवीन डिलिव्हरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करत आहे.
इंटरनॅशनल चेम्बर ऑफ कॉमर्सने IRCON ला Rs १०३.६२ कोटींचे आर्बिट्रेशन अवॉर्ड जाहीर केले. Rs ११५.९८ क्लेमसाठी IRCON ने अवॉर्ड स्वीकारले.
देवयानी इंटरनॅशनलने थायलंडच्या  QSR ( QUICK सर्विंग रेस्टारंटस) आणि LSR ( लिमिटेड सर्विंग रेस्टारंट) मार्केट मध्ये ‘रेस्टारंट डेव्हलपमेंट  LTD.’ थायलंड’ मध्ये कंट्रोलिंग स्टेक घेऊन पदार्पण केले.
सरकारने क्रूड पेट्रोलियम वरचा विंडफॉल टॅक्स ७४% ने कमी केला. Rs ५००० प्रती टनावरून Rs १३०० प्रती टन केला.डिझेल सेस  Rs १ प्रती लिटर होता तो ५० पैसे केला आणि ATF वर Rs १ प्रती  लिटर आकारला जाईल.
सरकारने कंपन्यांना नॉन बासमती तांदुळाच्या किमती ताबडतोब कमी करायला सांगितल्या.
अपोलो टायर व्हाईट एरिस इन्व्हेस्टमेंट ने ३% स्टेक ९० दिवसांच्या लॉक इन पिरियड नंतर Rs ४४० प्रती शेअर भावाने विकले.
DCW ने तामिळनाडूमध्ये पूर आल्यामुळे त्यांच्या युनिटमधील काम थांबवले.
इंडिया ग्लायकॉल ला OMC, RIL, आणि नयारा  एनर्जी कडून एकूण Rs ११६४ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
PNC इन्फ्राला MPRDC कडून ११७४ कोटींची ऑर्डर मिळाली.
IDFC आणि IDFC Ist बँकेच्या मर्जरला RBI ने परवानगी दिली.
NHPC २ डिसेम्बरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या बैठकीत ऍसेट मोनेटायझेशनवर विचार करणार आहे.
KPI ग्रीन Rs ११८३ प्रती शेअर दराने Rs ३०० कोटींचा QIP आणत आहे.
झी सोनी मर्जरची तारीख पुढे ढकलण्यासाठी झी ने केलेल्या विनंतीवर सहमती होऊ शकली नाही.
JSW   स्टीलने JSW USA मधील उरलेला १० % स्टेक   ACQUIRE केला.
LIC ने टाटा मोटर्स मधील त्यांचा स्टेक ५.११% वरून ३.०९% केला.
ज्युबिलण्ट फूड्स ने DP यूरेशिया मध्ये उरलेला ४५.३% स्टेक युरो ७.३४ कोटींना  खरेदी केला.
जिंदाल स्टील ने ‘RABIRUN विनिमय ‘ मध्ये १०० % स्टेक Rs ९६ कोटींमध्ये घेणार आहे.
ब्रिटिश अनेरिकन टोबॅको चा ITC मध्ये २९% स्टेक आहे. त्यापैकी BAT ४%  स्टेक विकण्याची शक्यता आहे. BAT ITC हॉटेल्समधील स्टेक विकणार आहे.
LTT MINDTREE ने AI पॉवर अप्लिकेशनसाठी मायक्रोसॉफ्ट बरोबर करार केला.
पॉवर ग्रीड कडून ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायरला Rs २३७ कोटींची ऑर्डर मिळाली.
सांघी मूव्हर्सला Rs १६६ कोटींची ऑर्डर मिळाली.
क्रेडो ब्रॅण्ड्स मार्केटिंग  कंपनीचा IPO १९ डिसेम्बरला ओपन होऊन २१ डिसेम्बरला बंद होईल. प्राईस बँड  Rs २६६ ते Rs २८० असून दर्शनी किंमतRs २ आहे. मिनीमम लॉट  ५३ शेअर्सचा आहे.  ही कंपनी मुफ्ती या ब्रॅण्डखाली गारमेंट्स आणि ऍक्सेसरीजची किरकोळ विक्री करते. कंपनी कोठल्याही प्रकारचे उत्पादन करत नाही.
हॅपी फोर्जिंग्ज चा IPO १९ डिसेंबरला ओपन होऊन २१ डिसेम्बरला बंद होईल. प्राईस  Rs ८०८ ते Rs ८५० असून मिनिमम लॉट १७ शेअर्सचा आहे. दर्शनी किंमत Rs २  असून IPO ची रक्कम Rs १००८ कोटी असून Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू आणि ६०८ कोटींची OFS आहे. कंपनी कमर्शियल वाहनांसाठी हेवी फोर्ज्ड आणि प्रिसिजन मशीन पार्ट्स बनवते. कमर्शियल वाहने ४३%, ऍग्री मशिनरी ३७% ,तसेच ही कंपनी इतर कंपन्यांना पार्ट पुरवते आणि ९ देशात निर्यात करते. कंपनीचे ३ प्लांट्स पंजाबमध्ये आहेत . FY २३ साठी प्रॉफिट Rs ३४१ कोटी  आणि रेव्हेन्यू ११९६ कोटी झाला.
आज एनर्जी, FMCG, PSE, इन्फ्रा, फार्ममध्ये, रेल्वेसंबंधीत, शेअर्समध्ये खरेदी झाली. IT, ऑटो, मेटल्स रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेंसेक्स ७१४३७ NSE निर्देशांक निफ्टी २१४५३ बँक निफ्टी ४७८७० वर बंद झाले.
                                                      भाग्यश्री फाटक
                                              bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १८ डिसेंबर २०२३

आज  क्रूड  US $ ७६.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.५६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९० आणि VIX १३.९० होते. सोने Rs ६२००० च्या आसपास तर चांदी Rs ७४००० च्या आसपास होती.
आज जपानचे मार्केट मंदीत होते. महागाईचे लक्ष्य २% साध्य झालेच  पाहिजे. यासाठी  ०.५०% एवढाच रेट कट होईल.असे फेडच्या विलियम यांनी सांगितले.
देवयानी इंटरनॅशनल त्याची सबसिडीअरी ‘रेस्टारंट डेव्हलपमेंट ‘मध्ये कंट्रोलिंग स्टेक  घेणार आहे. रेस्टारंट डेव्हलपमेंट चे २७४ KFC आउटलेट आहेत.
वेदांताने Rs ११ प्रतिशेअर दुसरा इंटरिम लाभांश जाहीर केला. यासाठी २७ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट असेल.
FII ने Rs ९२३९.४२ कोटींची खरेदी तर DII ने Rs ३०७७.४३ कोटींची विक्री केली.
बलरामपूर चिनी, डेल्टा कॉर्प, हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, मन्नापुरम फायनान्स, SAIL, आणि झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स बॅन मधून बाहेर आले.
 MCX वर पुढील वर्षी स्टीलमध्ये वायदा चालू होईल.
माझगाव डॉक्सने युरोपियन कंपनी बरोबर ३ ( ७५०० DWT मल्टिपर्पज हायब्रीड पॉवर) व्हेसल्स बांधण्यासाठी करार केला हे कॉन्ट्रॅक्ट US $ ४२ मिलियनचे आहे.
मनकाईन्ड फार्माने GBP ९,९९,९००.ची गुंतवणूक ‘ACTIMED  THERAPEUTICS ‘ मध्ये केली. ही कंपनी कॅन्सर CACHEXIA आणि AMYOTROPHIC SCLEROSIS आणि इतर स्नायूंच्या दुर्बल होण्याच्या क्षेत्रात काम करते.
यावर्षीचे ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शन २० % ने वाढले.  .
सांडूर मँगेनीज ने तुमच्या जवळ १ शेअर असला तर तुम्हाला ५ बोनस शेअर मिळतील असे जाहीर केले.
 ल्युपिनच्या ALLOPURINOL च्या USP १००mg आणि ३००mg टॅब्लेट मार्केट करण्यासाठी  USFDA ची मंजुरी  मिळाली. हे CASPER फार्माच्या ‘ZYLOPRIM’ टॅब्लेट्सचे  जनरिक इक्विव्हॅलंट आहे.
युनायटेड स्पिरिट्सकडे  राष्ट्रीय  इन्स्टिट्यूशनल कस्टमर कडून Rs ३६५.३३ कोटींचा क्लेम मिळाला. या क्लेम बाबतीत युनायटेड स्पिरिट्स ने या आधी सेटलमेंट केली होती. या क्लेमचा कंपनीवर आर्थिक परिणाम काय होईल याचा कंपनी अभ्यास करत आहे.
टाटा पॉवर कंपनीने १५२ MWP DCR सोलर PV  मोडूल्स NTPC च्या NOKH सोलर PV प्रोजेक्टला सप्लाय करण्यासाठी Rs ४१८ कोटींचा करार केला.
इन्फोसिसने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार १०% ने वाढवण्याचा निर्णय घेतला.
सरकारने उसाच्या रसापासून एथनोल बनवण्यावर बंदी घालण्याच्या त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार केला.
आता साखर उद्योगाला  १७ लाख टन उसाचा रस इथेनॉल बनवण्यासाठी वापरता येईल. तसेच B-हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल बनवायला मंजुरी दिली.
लँडमार्क कार्सने मर्सिडीज बेंझ बरोबर हैदराबाद येथे वर्कशॉप साठी आणि MG मोटर्सबरोबर अहमदाबाद येथे डिलरशिपसाठी करार केला.
सोलर एक्सप्लोझीव्हज च्या नागपूर येथील युनिटमध्ये स्फोट झाला.
TDSAT ने VODA आयडिया च्या मर्जरच्या वेळी दिलेली रक्कम  १५ दिवसांत  Rs ७५५ कोटी सरकारने  कंपनीला  परत करावी असे  सांगितले. सरकारने बाकी असलेल्या लायसेन्स फीमध्ये ही रक्कम अड्जस्ट करावी असे सुचवले.
मुथूट मायक्रो फायनान्स या कंपनीचा IPO १८ डिसेम्बरला  ओपन होऊन २० डिसेम्बरला बंद होईल. प्राईस बँड  Rs २७७ ते Rs २९१ लॉट साईझ ५१ शेअर्सचा असून दर्शनी किंमत Rs १० आहे. ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी असून १८ राज्यात व्यवहार करते. सर्व व्यवहार महिला मित्र ऍप मार्फत होतात. कंपनी प्रामुख्याने महिलांना कर्ज देते.
झी एंटरटेनमेंट ने त्यांची सोनी बरोबरच्या मर्जरची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली.
जेफ्रीजने भारताच्या GDP ग्रोथचे अनुमान FY  २०२४-२०२५ साठी ७% केले.
सीमेन्सला त्यांचा एनर्जी कारभार डीमर्ज करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.
सेबीने NSE ला टेक इन्फ्रा मजबूत करायला,IPO  फाइलिंगसाठी लीगल मॅटर्स क्लिअर करायला आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मजबूत करायला सांगितले. सेबीने इतरही काही अटी  घातल्या आहेत.
BEML SCI आणि IDBI  बँकेमध्ये डायव्हेस्टमेन्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार त्यांच्या २३ कंपन्या बंद करण्याच्या  विचारात आहे
सुरज इस्टेट चा IPO १८ डिसेम्बरला  ओपन होऊन २०.डिसेम्बरला बंद होईल. प्राईस बँड Rs ३४० ते Rs  ३६० आहे लॉट साईझ ४१ शेअर्सची आहे. दर्शनी किंमत Rs ५ आहे.
 मोतीसन्स चा IPO १८ डिसेम्बरला ओपन होऊन २० डिसेम्बरला  बंद होईल. प्राईस बँड Rs ५२ ते Rs ५५     असून लॉट साईझ २५० शेअर्सची आहे. दर्शनी किंमत Rs १० आहे. लिस्टिंग २६ डिसेम्बरला  अपेक्षित आहे
आज  रिअल्टी, बँकिंग, FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग तर फार्मा, मेटल्स, ऑटो, PSE, इन्फ्रा, मिडकॅप, स्माल कॅप मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेंसेक्स ७१३१५ NSE निर्देशांक २१४१८ आणि बँक निफ्टी ४७८६७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १५ डिसेंबर २०२३

८३.२०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.९७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९५ आणि VIX १२.४८ होते. सोने Rs ६२५०० चांदी Rs ७५००० च्या आसपास होती.
FII ने Rs ३५०७.०७ कोटींची खरेदी आणि DII ने Rs ५५३ कोटींची खरेदी केली.
PLR १.३७ झाला.
हिरो मोटो कॉर्प ही अथर एनर्जी मध्ये Rs १४० कोटींपर्यंत स्टेक  खरेदी करणार आहे. कंपनीने १ मार्च २०२४ पासून विवेक आनंद यांची CFO म्हणून नेमणूक केली.
स्टेट बँकेने CANPAC या पेपर पॅकेजिंग सोल्युशन्स कंपनीचे ३,७०,६४४ (६.३५% स्टेक ) Rs १३४९ प्रती शेअर प्रमाणे Rs ५० कोटींना घेण्यासाठी करार केला.
प्लेनटी प्रायव्हेट ग्रुप आणि मल्टिपल प्रायव्हेट ग्रुप  PVR इनॉक्स मधील २.३३% स्टेक Rs १७५० ते Rs १७६९.५० प्रती शेअर दराने Rs ४०४.५ कोटींना विकतील .
M & M फायनान्सियल्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कंपनीला ग्रुप आणि व्यक्तीशः आयुर्विमा, हेल्थ आणि जनरल  विमा क्षेत्रात पदार्पण करायला मंजुरी दिली.
  टेक्समॅको रेल ENGG ला रेल्वे मंत्रालयाकडून ३४०० BOXN वॅगन साठी Rs १३७४ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
   PB फिनटेक ची सबसिडीअरी पैसाबझार मार्केटिंग आणि कन्सल्टिंग ची डिसेंबर १३ आणि डिसेंबर १४ रोजी आयकर विभागाने चौकशी केली .
K -FIN टेक मधील ६.२% स्टेक  ८% डिस्काऊंटवर Rs ४९० प्रती शेअर या दराने अटलांटिक विकणार आहे. Rs ८३३ कोटींचा ९० दिवसांचा लॉक- इन – पिरियड संपला.
GENUS पॉवर ला स्मार्ट मीटर्स साठी Rs १०२६ कोटींची ऑर्डर मिळाली.
ECB ने त्याच्या रेटमध्ये बदल केला नाही.
 बँक ऑफ इंग्लंडने ही त्यांच्या रेट मध्ये बदल केला नाही.
FTSE चे रिबॅलन्सिंग आज आहे. निफ्टी २१५५० जाण्याची शकता आहे. अडोबे ६% पडला.
कर्ज कमी करण्यासाठी बायोकॉन API व्यवसाय विकणार आहे.
टायटन च्या सबसिडीअरीने CUEZEN बरोबर करार केला टायटन CUEZEN मध्ये  US $ ३५ लाखाची
गुंतवणूक करणार आहे.
j कुमार इन्फ्राला चेन्नई मध्ये ४ लेन कॉरिडार बनवण्यासाठी  Rs ५८३ कोटींची ऑर्डर मिळाली
भारत व्हेनिझुएला कडून क्रूड ऑइल खरेदी करणार आहे.
रेलटेलला Rs २५.३ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले
J & K बँक Rs १०७.६० प्रती शेअर दराने QIP लाँच करत आहे.
GE शिपिंगने ‘जगप्रभा’ टँकर  विकण्यासाठी करार केला. मार्च २०२४ पर्यंत या टँकरची डिलिव्हरी करायची आहे .
संवर्धना मदर्सन LUMEN ग्रुप मध्ये स्टेक खरेदी करणार आहे.
सॅनोफीच्या स्लिपींग  सिकनेस वरील ट्रीटमेंट वर EMA ओपिनियन पॉझिटिव्ह मिळाले
गेटवे डिस्ट्रिपार्कने न्यू कंटेनर ट्रेन इन्डक्ट केली. आणखी २ ट्रेन इन्डक्ट करणार आहे.
सनफ्लॅग आयर्नला महाराष्ट्रांत सुरजगढ-६ आयर्न ओअर ब्लॉकसाठी लायसेन्स मिळाले.
MUNDI लिमिटेड ही अडाणी एन्नोर कंटेनर PVT LTD मध्ये ४९% स्टेक Rs २४७ कोटींना  घेणार आहे.
एक्झो नोबलला GST ऑथॉरिटीज कडून नोटीस मिळाली.
BEL ला संरक्षण मंत्रालयाकडून इलेक्ट्रॉनिक फ्युज साठी Rs ५३०० कोटींची ऑर्डर मिळाली.
फिचने JSW इंफ्राचा  आऊटलूक पॉझिटिव्ह केला.
NLCने  झारखंडमध्ये नॉर्थ धुधू कोल  ब्लॉक जिंकला
झायड्स लाईफच्या HIV वरील ‘DARUNAVIR’ या औषधाला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली.
सुजलॉनला १००.८ MW विंड पॉवर प्लांट गुजरात मध्ये लावण्यासाठी ऑर्डर मिळाली.
आज रुपया US $ च्या तुलनेत ३० पैसे सुधारला.
IT ,मेटल्स , PSU बँका यात खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१४८३ NSE निर्देशांक निफ्टी २१४५६ बँक निफ्टी  ४८१४३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !