Monthly Archives: January 2024

आजचं मार्केट – ३१ जानेवारी 2024

.

आज क्रूड US $ ८२.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.४९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०२ आणि VIX १५.९० होते. सोने Rs ६२४०० तर चांदी Rs ७१००० च्या आसपास होती. नैसर्गिक गॅस आणि कॉपर मंदीत  तर अल्युमिनियम तेजीत होते.
USA मध्ये मायक्रोसॉफ्ट, गूगल यांचे निकाल चांगले आले. पण फ्युचर गायडन्स चांगला दिला नाही. १२००० लोकांच्या नोकऱ्या जाणार. फेड दर वाढवण्याची शक्यता नाही पण कमी होण्याची आणि केव्हापासून कमी होण्याची शक्यता आहे याबाबतीत अनिश्चितता आहे. फेडच्या कॉमेंट्रीकडे मार्केटचे लक्ष आहे.  ९.०२६ मिलियन जॉब ओपनिंग झाली
L & T चे निकाल चांगले आले पण मार्केटला तितकेसे आवड़ले नाहीत. कंपनीने कॉमेंटरी चांगली दिली. २०% ऑर्डर ग्रोथ असेल असे सांगितले.
चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९.२(४९) आणि  कॉम्पोझिट PMI ५०.९( ५०.३ ) आले.
ब्ल्यू स्टार, कोची शिपयार्डस, KAYNES, ASTRAL यांचे निकाल चांगले आले.
टाटा पॉवर विजेचे दर वाढवणार आहे.
सरकारने मोबाईल उपकरणे आणि त्यांना लागणाऱ्या स्पेअरपार्ट्सवरची इम्पोर्ट ड्युटी १५% वरून १०% केली. भारताची मोबाईल ची निर्यात Rs ७०००० कोटी आहे. याचा फायदा मोबाईल कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना होईल.
नोव्हा ऍग्रीटेक चे BSE वर Rs ५६ वर आणि  NSE वर Rs ५५ वर लिस्टिंग झाले IPO मध्ये हा शेअर Rs ४१ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाला  त्यांना चांगले  लिस्टिंग गेन्स झाले.
KPIT टेक चे प्रॉफिट ११% रेव्हेन्यू ५% वाढला. CC रेव्हेन्यू ग्रोथ ४.३% होती. कंपनीने CC  ग्रोथ आऊटलूक ३७% तर EBITD आऊटलूक २०+% दिला. कंपनीने सांगितले की त्यांच्या ग्राहकांनी त्यांना बजेट मध्ये कपात करावी लागेल असे संकेत दिलेले नाहीत. कंपनीचे ऍट्रिशन किमान स्तरावर होते.
श्री लंका टेलिकॉमच्या अधिग्रहणात jio प्लॅटफॉर्म्स ने स्वारस्य दाखवले आहे. जिओने प्रिक्वालिफिकेशन केले आहे. GORTUNE इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पण यासाठी क्वालिफाय झाली आहे.
OCT- DEC तिमाहीत भारतातील सोन्यासाठी मागणी ४% ने कमी होऊन २६६.२ टन झाली.
श्री सिमेंटचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
डिक्सन टेकचे प्रॉफिट, उत्पन्नामध्ये उल्लेखनीय वाढ झाली. मार्जिन ३.८% राहिले.
गोदरेज कंझ्युमरचे प्रॉफिट Rs ५४६ कोटींवरून Rs ५८१ कोटी झाले. उत्पन्न Rs ३५९९ कोटींवरून Rs ३६६० कोटी झाले.
पॉली  मेडिक्युअर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न  वाढले मार्जिन वाढले.
पैसा लो डिजिटल ने १:१ बोनस शेअर इशू जाहीर केला. कंपनीचे प्रॉफिट,उत्पन्न NII आणि मार्जिन वाढले.
अंबुजा सिमेंट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले व्हॅल्यूम  % वाढून १.४१ टन्स झाले.
ज्योती लॅब चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
P &G ने Rs १६० अंतिम लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
मॅक्स हेल्थकेअरचे उत्पन्न वाढले प्रॉफिट वाढले.
NIIT लर्निंगचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
अडाणी विल्मरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
मारुती सुझुकीचे प्रॉफिट Rs २३५१ कोटींवरून Rs ३१३० कोटी झाले. उत्पन्न Rs २९०४४ कोटींवरून Rs ३३३०८ कोटी झाले. मार्जिन ९.७% वरून ११.७% झाले. कंपनीने एका वर्षांत २० लाख युनिट्सची विक्री केली. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत ७१००० युनिट्सची निर्यात केली.
कजरिया सिरॅमिक्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
बँक ऑफ बरोडा चे प्रॉफिट Rs ३८५३ कोटींवरून Rs ४५७९ कोटी झाले.
GNPA ३.३२% वरून ३.०८% झाले. NNPA ०.७६% वरून ०.७०% झाले.
NII Rs १०८१३ कोटींवरून Rs १११०१ कोटीं झाले. प्रोव्हिजन Rs २१६१ कोटींवरून Rs ६६६ कोटी झाले.
अतुल ऑटो चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
कार्बोरण्डम चे प्रॉफिट वाढले, इन्कम कमी झाले.  कंपनीने Rs १.५० इंटरिम  लाभांश जाहीर केला.
सुझलॉन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
सन फार्माचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ८.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
PVR इनॉक्स चे प्रॉफिट कमी झाले. उत्पन्न वाढले.
ग्रीन पॅनलचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
हायडलबर्ग सिमेंटचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
वेलस्पन स्पिनिंग चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
डाबरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
मोरेपन लॅबक्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
फिनो पेमेन्टचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
ज्युबिलण्ट फुड्सची एकूण स्टोर्स १९२८ झाली कंपनीने ४० नवीन स्टोर्स उघडली.
इन्फोसिसने MVS grave या युरोपियन कंपनीबरोबर ७ वर्षे मुदतीचा करार केला.
मिडकॅप, स्मॉल कॅप,फार्मा, रिअल्टी, ऑटो, बँकिंग, मेटल्स, FMCG, एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१७५२ NSE निर्देशांक २१७२५  बँक निफ्टी ४५९९६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – ३० जानेवारी 2024

.

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.४३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०५ आणि VIX १६.४६ होते. सोने Rs ६२३०० चांदी
 Rs ७२४०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
USA  च्या नागरिकांचे ड्रोनच्या हल्ल्यामध्ये जॉर्डनच्या सीमेवर निधन झाले या बाबतीत पँटागॉन लक्ष घालत आहे असे सांगुन USA ऍडमिनिस्ट्रेशनने सारवासारव केलीआणि सरकारी बॉरोइंग US $ ५५ बिलियनने कमी करू असे सांगितले. त्यामुळे बॉण्ड यिल्ड सुधारले.
FII ने Rs ११० कोटींची तर DII ने Rs ३२२१ कोटींची खरेदी केली.
GAIL ने ADNMC या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीबरोबर करार केला.
कृष्णा डायग्नॉस्टिक्सने महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर MRI आणि सिटी स्कॅन सर्व्हिसेस पुरवण्यासाठी करार केला.
चीन मध्ये ९ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत स्प्रिंग फेस्टिवलची सुट्टी असते.
DR रेड्डीज चे प्रॉफिट वाढले ( Rs १२४४ कोटींवरून Rs १३८१ कोटी) उत्पन्न वाढले ( Rs ६७९० कोटींवरून Rs ७२३७ कोटी ) मार्जिन वाढले ( २९% वरून २९.३% झाले.). निकाल चांगले आले.
SRF चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
टीमलीज चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ज्युबिलण्ट इंग्रेव्हीया चे प्रॉफिट कमी झाले,उत्पन्न, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs २.५० लाभांश जाहीर केला.
ब्ल्यू स्टार चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
शाम मेटॅलिक्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
कोरोमंडल प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
एशियन ग्रॅनाईट चा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले. कंपनीला थायलँड, इटली, UK मध्ये व्यवसाय सुरु करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.
अडाणी टोटलचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
द्वारिकेश शुगरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
अरविंद चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
 KPIT टेक चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले कंपनीने Rs २.१० इंटरींम  लाभांशाची घोषणा केली.
राणे ब्रेक्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
CHEVIOT चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले.
GPT इन्फ्रा प्रोजेक्ट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
मेघमनी ऑर्गनिक्स फायद्यातून तोट्यात गेली.
बजाज फिनसर्व चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले NII वाढले. कंपनीच्या लाईफ इन्शुअरन्स बिझिनेसचे उत्पन्न २१% ने वाढले.
सिम्फनी चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
सुवेंन  लाईफसायन्सेस चा तोटा कमी झाला उत्पन्न कमी झाले.
अपार इंडस्ट्रीजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
स्ट्राइड्स फार्मा तोट्यातून फायद्यात आली.
इंडियन मेटल्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सुब्रोस चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
J कुमार इन्फ्राचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
शांती गिअर्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
जिलेट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ८५ प्रती शेअर लाभांश दिला.
व्हील्स इंडियाचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
महिंद्रा फायनान्स चे प्रॉफिट कमी झाले NII वाढले.
PB फिनटेक तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न वाढले.
ITC चे प्रॉफिट १०.७५% ने वाढून Rs ५५७२ कोटी झाले. कंपनीचे इतर  उत्पन्न वाढले तर टॅक्स खर्च कमी झाला. रेव्हेन्यू १.६% वाढून Rs १६४८३ कोटी झाला. कंपनीने Rs ६.२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. या लाभांसासाठी ८ फेब्रुवारी रेकॉर्ड डेट असून २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत तुमच्या खात्यात जमा केला जाईल.
‘VI’ चा तोटा कमी होऊन Rs ६९८६ कोटी झाला ( Rs ८७३८ कोटी) मार्जिन सुधारले. रेव्हेन्यू ०.४% ने कमी होऊन Rs १०६७३ कोटी झाला.
पेट्रोनेट LNG चे प्रॉफिट ४१.७% ने YOY  वाढून Rs १२१३ कोटी तर रेव्हेन्यू १७.७% वाढून Rs १४७४७ कोटी झाला.
मेरिको चे प्रॉफिट १६% ने वाढून Rs ३८६ कोटी झाले. इनपुट कॉस्ट कमी झाली. व्हॉल्युम २% ने वाढले. रेव्हेन्यू २% ने वाढून Rs २४२२ कोटी झाला.
NTPC चे  उत्पन्न  मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs २.२५ लाभांश जाहीर केला.
L & T ला तिसऱ्या तिमाहीत Rs २९४७ कोटी प्रॉफिट झाले. कंपनीचे उत्पन्न Rs ५५१२८ कोटी झाले. मार्जिन १०.५% होते.
 KEC इंटर्नॅशनलला Rs १३५० कोटींची ऑर्डर मिळाली.   TCS ने UK मध्ये AVIVA बरोबरच्या कराराची मुदत १५ वर्षांसाठी वाढवली.
BEL ला एकूण  Rs ८४७ कोटींच्या २ ऑर्डर्स वित्त मंत्रालयाकडून मिळाल्या.
NTPC ग्रीन एनर्जीने महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी करार केला.
बजाज फिनसर्व च्या सबसिडीअरीने ‘VIGAL हेल्थकेअर सर्व्हिसेस’ मधील १००% स्टेक Rs ३२५ कोटींना घेणार आहे.
झी एंटरटेनमेंट च्या शेअरहोल्डर्सनी कंपनीला झी सोनी मर्जरची अंमलबजावणी करायला सांगितली. झी इंटरटेन्मेन्ट सिंगापूरमध्ये इमर्जन्सी आर्बिट्रेशन संबंधात उद्या सुनावणी आहे.
झायड्स लाइफने प्रोस्ट्रेट कॅन्सर वरील औषध ‘REXIGO’ लाँच केले.
E-पॅक ड्युरेबल चे आज BSE वर Rs २२५ तर NSE वर २२१ वर लिस्टिंग झाले. लिस्टिंग डिस्काऊंट वर झाल्यामुळे लिस्टिंग गेन्स झाले नाही.
स्पाईस जेटच्या संबंधात केलेले इंसॉल्व्हंसी अप्लिकेशन NCLT ने रद्द केले.
L & T ला UAE मध्ये रिन्यूएबल सोलर एनर्जी जनरेशन प्लांटसाठी Rs १०००० कोटी ते Rs १५००० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
रॉयल ओर्चीड  गुजरातमधील जामनगर येथे हॉटेल सुरु करणार.
सर्वोटेक पॉवर सिस्टीम आणि BPCL मिळून देशभरात १८०० EV चार्जिंग स्टेशन्स लावणार आहेत.
महिंद्रा फायनान्स चे प्रॉफिट कमी झाले NII वाढले.
आज मिडकॅप, स्मॉल कॅप, एनर्जी, इन्फ्रा, FMCG, फार्मा, IT PSE मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. सरकारी बँका रिअल्टी आणि मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७११३९ NSE निर्देशांक निफ्टी २१५२२ आणि बँक निफ्टी ४५३६७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २९ जानेवारी 2024

आज क्रूड US $ ८४.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होती. US $ निर्देशांक १०३.४७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१२ आणि VIX १५.६२ होते. सोने Rs ६२००० च्या आसपास तर चांदी Rs ७२०००च्या आसपास होती. कॉपर मंदीत तर अल्युमिनियम तेजीत होते.
USA चा DETA सुधारला. १ फेब्रुवारीला फेडच्या मीटिंगचा निकाल येईल. GDP ग्रोथ रेट २.५% PCE( पर्सनल कंझमप्शन एक्सपेंडिचर ) निर्देशांक  ०.२ % ने वाढला. इंटेल ने त्यांचा गायडन्स कमी केला.
चीनने शॉर्ट सेलिंगवर बंदी घातली. हौथींनी रशियन जहाजावर हल्ला केला.
IRB इन्फ्राला Rs १६८१ कोटींचे आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.
सुबेक्सला RBI कडून ऍग्रीगेटरचे लायसेन्स मिळाले.
आज क्रूड तेजीत होते कारण USA ची अर्थव्यवस्था सुधारत आहे. चीन क्रूडचा रिझर्व्ह साठा करत असल्यामुळे चीनची मागणी वाढली. १ फेब्रुवारीला ओपेकची बैठक आहे. लाल सागरात अतिरेक्यांकडून हल्ले होत असल्यामुळे क्रूड वाहून नेणाऱ्या जहाजांची वाहतूक बंद आहे.
FII ने Rs २१४४ कोटींची विक्री तर DII ने Rs ३४७५ कोटींची खरेदी केली.
HDFC बँकेमध्ये एक वर्षांत  ९.९९% पर्यंत स्टेक वाढवायला LIC ला RBI ने परवानगी दिली. सध्या LIC कडे ५.१९% स्टेक असून त्याचे व्हॅल्युएशन Rs ५०००० कोटी आहे.
I बुल्स हाऊसिंग फायनान्स चा  राईट्स इशू Rs १५० प्रती राईट या दराने ( अप्लिकेशन करताना Rs ५० भरायचे आहेत, उर्वरित रक्कम अलॉटमेंटच्या तारखेपासून १२ महिन्यांच्यात भरायची आहे ) ७ फेब्रुवारी रोजी ओपन होऊन १३ फेब्रुवारीला बंद होईल. तुमच्या जवळ असलेल्या २ शेअर्समागे १ राईट ऑफर केला जाईल या राईट्स इशूसाठी रेकॉर्ड डेट १ फेब्रुवारी २०२४ निश्चित केली आहे.
अडाणी पॉवर चे रेव्हेन्यू ६७.३% वाढून Rs १२९९१.४० कोटी झाले तर मार्जिन ३५.८% सेल्स व्हॉल्युम ८२% वाढले.
संघी इंडस्ट्रीज चा तोटा वाढला उत्पन्न वाढले मार्जिन वाढले फायनान्सियल कॉस्टस वाढल्या.
येस बँकेचे प्रॉफिट वाढले, NII वाढले, NPA स्टेबल राहिले, प्रोव्हिजन कमी झाले. रिकव्हरी आणि अपग्रेडस १३०० कोटी.झाले
श्रीराम फायनान्स चे NII Rs ५०९३ कोटी, डिसबर्समेंट्स २९.२% वाढली, AUM ग्रोथ २०.७% झाली NPA कमी झाले. कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला यासाठी रेकॉर्ड डेट ६ फेब्रुवारी निश्चित केली.
DLF ने गुरुग्राम मध्ये २९ एकर जमीन Rs ८२५ कोटींना खरेदी केली.
DRC सिस्टीम या कंपनीने १ शेअरमागे २ शेअर्सचा बोनस जाहीर केला याची रेकॉर्ड डेट २७ फेब्रुवारी २०२४ निश्चित केली आहे. ही IT क्षेत्रातील कंपनी आहे.
कॅप्री ग्लोबल यांनी १:१ बोनस शेअर आणि त्यांच्या एका शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट करणार असल्याचे जाहीर केले.
भारत बिजलीची १४ फेब्रुवारी २०२४ रोजी स्टॉक स्प्लिट वर विचार करण्यासाठी बैठक आहे.
ज्युबिलण्ट फार्मोवा त्यांची सबसिडीअरी ‘SOFIE बायोसायन्सेस USA ‘ मधील २५.८% स्टेक US $ १३९.४३ मिलियन्स ला विकणार आहे. यांच्यापैकी US $ ११३.०६ मिलियन एवढे मर्जर क्लोज झाल्यावर आणि उर्वरित रक्कम काही लक्ष्य साध्य झाल्यावर मिळेल.
कोल इंडिया GIPC लिमिटेड यांच्या खावडा येथील ३०० MW क्षमता रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट  पार्क साठी यशस्वी बिडर ठरली. गुजरात ऊर्जा विकास निगम LTD २५ वर्षांसाठी पॉवर पर्चेस करार कोल इंडिया बरोबर करेल.
लौरस लॅब स्लोव्हेनिया मधील KRKA बरोबर (५१% स्टेक ) बरोबर JV  करणार आहे KRKA ची फिनिश्ड उत्पादने नवीन मार्केटमध्ये विकण्यासाठी करार केला.
महाराष्ट्र सिमलेसला IOC कडून Rs ११६ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
एमी ऑर्गनिक्सने लिथियम आयन बॅटरी सेलचे उत्पादन सुरु केले.
अहलुवालिया काँट्रॅक्टस ला Rs १६० कोटींची ऑर्डर मिळाली.
पॉवर मेक ला Rs ६४५ कोटींची ऑर्डर RVNL आणि NUPPL  कडून मिळाली.
मान इन्फ्रा मुंबईत घाटकोपर पूर्व येथे ‘आचार्य वन पार्क’ हा Rs १२०० कोटींचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लाँच करणार आहे.
आझाद इंजिनीअरिंगने ‘रोल्स रॉईस’ बरोबर क्रिटिकल इंजिनीअरिंग पार्ट्सच्या उत्पादन आणि सप्लाय साठी करार केला.
अडाणी ग्रीनचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १०० कोटी वन टाइम खर्च बुक केला. कंपनीच्या फायनान्स कॉस्ट वाढल्या.
उत्कर्ष फायनान्स बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले. NIM वाढले. स्लीपेजिस वाढले. डिसबर्समेंट २८% वाढली. मायक्रो फायनान्समध्ये २०-२२% ग्रोथचे अनुमान व्यवस्थापनाने केले.
झेन टेक चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
BPCLचे प्रॉफिट Rs ८५०१ कोटींवरून Rs ३३९७कोटी झाले. उत्पन्न १.०२ लाख कोटींवरून १.१५ लाख कोटी झाले. मार्जिन ५.४% होते. GRM १३.३०/BBL होते.
BEL चे प्रॉफिट Rs ५९९ कोटींवरून Rs ८९३ कोटी झाले. उत्पन्न Rs ४१३१ कोटींवरून Rs ४१३७ कोटी झाले. मार्जिन २०.७ % वरून २५.४ %झाले. कंपनीने Rs ०.७० लाभांश जाहीर केला.
महिंद्रा EPC तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले.
वोल्टेम्प ट्रान्सफॉर्मर्सचे प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.
अडाणी एनर्जीसोल्युशन चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
लॅटेन्ट व्ह्यू चे प्रॉफिट कमी झाले. उत्पन्न वाढले.
GAILचे  प्रॉफिट Rs २८४३ कोटी,उत्पन्न Rs ३४२५४ कोटी मार्जिन ११.२ % आहे. कंपनीने Rs ५.५० लाभांश जाहीर केला.
STYLAM चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
टाटा पॉवर रिन्यूएबल्सने १०४० KW बायोफेशियल सोलर सिस्टीम प्रोजेक्ट चेन्नमारी इस्टेट मध्ये कमिशन केले.
पिरामल इंटरप्रायझेस फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs ३३३९.०० कोटींचा वन टाइम लॉस बुक केला.
मेरीकोचे प्रॉफिट वाढले मार्जिन २१.२% उत्पन्न  कमी होऊन Rs २४२२ कोटी झाले.
APL अपोलो ट्यूब चे सेल्स व्हॉल्युम कमी झाले कर्ज वाढले.
SBI कार्ड चे निकाल ठीक आले.
टाटा टेकचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. ५ लार्ज डील झाली. TCV बरोबर US $७५ मिलियन्सची दोन डील झाली.
पिरामल इंटरप्रायझेस श्रीराम इन्व्हेस्टमेंट होल्डिंग मधील २०% स्टेक Rs ११४० कोटींना विकणार आहे.
SJVN ने गुजरात ऊर्जा  विकास निगमच्या e -reverse  ऑक्शनमध्ये १००MW सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवला.
रेस्टारंट्स ब्रँड चा तोटा वाढला उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.      Bajaj finance 2973 कोटी वरून 3639 कोटी तर gross NPA 0.91 वरून 0.95 आणि net NPA 0.31 वरून 0.37 आणि NII 7436 वरून 9293 कोटी झाले
आज FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. एनर्जी, इन्फ्रा, ऑटो, मेटल्स रिअल्टी ऑइल & गॅस मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१९४१ NSE निर्देशांक निफ्टी २१७३७ आणि बँक निफ्टी ४५४४२ वर बंद झाले.

आजचं मार्केट – २५ जानेवारी 2024

आज क्रूड US $ ८०.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.१८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१६ आणि VIX १४.७२ होते. सोने Rs ६१८०० तर चांदी ७१७०० च्या आसपास होती. कॉपर आणि झिंक मध्ये तेजी होती.
USA च्या मार्केट्समध्ये  ASML चा शेअर ९% वाढला. IBM, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, आल्फाबेट, मेटा आणि NVIDIA या शेअर्स मध्ये तेजी होती.
FII ने Rs ६९३४ कोटींची विक्री तर DIIने  Rs ६०१२ कोटींची खरेदी केली.
ग्लेनमार्क फार्माने जिंगसू ALPHAMAB BIO बरोबर KNO ३५ या ट्युमर आणि हेपटायटिस B वरील औषधासाठी लायसेन्सिंग करार केला.
कोल इंडियाला SNG ( सिंथेटिक नॅचरल गॅस) चा प्लांट लावण्यासाठी मंजुरी मिळाली.
लौरास लॅबमधील शेअर्समध्ये १६.२१ लाख शेअर्ससाठी Rs ५९ कोटी आणि १८.३९ लाख शेअर्स साठी Rs ६६ कोटींची लार्ज डील झाली.
PNB हाऊसिंग च्या शेअर्समध्ये ९.९४% इक्विटीचे (२.५ कोटी शेअर्स) Rs २१४१ कोटींचे लार्ज डील झाले.
बाळकृष्ण टायर्सच्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज मधील मर्जरला मंजुरी मिळाली.
रेलटेलचा नफा ९४% तर रेव्हेन्यू ४७% वाढले. कंपनीला नवोदय विद्यालय समितीकडून Rs १६३ कोटींची ऑर्डर मिळाली.
DLF या रिअल्टी कंपनीचे Rs ९०४७ कोटींचे बुकिंग झाले.
काँकॉर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने १०%-१२ % व्हॉल्युम ग्रोथ आणि  २३-२५%  मार्जिन गायडन्स दिला.
FY २०२४ मध्ये साखरेचे उत्पादन ३४-३५ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. उत्पादनात ५%-१०%वाढ होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मी ऑर्गनिक्सचे प्रॉफिट फ्लॅट राहिले उत्पन्न वाढले.
स्वराज इंजिन चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
DB कॉर्प चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
LT फूड्स चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
स्टरलाईट टेक्नॉलॉजी फायद्यातून तोट्यात गेली.
ELCON इंजिनीअरिंगचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
टाटा टेक्नॉलॉजीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. मार्जिन वाढले.
HPCL चा फायदा Rs ५११८ कोटींवरून Rs ५२९ कोटी झाला. कंपनीने Rs १५ लाभांश दिला. रेव्हेन्यू Rs ९५२०७ वरून १.११ लाख कोटी झाले. मार्जिन ८.५९ वरून १.९४% झाले.
वेदांत फॅशन चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
EQUITAS SFB चे प्रॉफिट वाढले, NII वाढले GNPA वाढले NNPA वाढले.
SBFC चे प्रॉफिट वाढले NPA वाढले.
ACC चे प्रॉफिट Rs ११० कोटींवरून Rs ५२७ कोटी झाले. उत्पन्न Rs ४५३७ कोटींवरून Rs ४९१८ कोटी झाले. मार्जिन ८.४% वरून १८.४% झाले.
सालासार टेक्नॉलॉजी Rs ८०६ कोटी फंड उभारणार आहे.
PNB चे प्रॉफिट Rs ६२८.९ कोटींवरून YOY Rs २२२३ कोटी झाले. NII Rs ९१७९ कोटींवरून Rs १०२९३ कोटी झाले. NPA कमी झाले. प्रोव्हिजन Rs ३०१९ कोटींवरून Rs २९९४ कोटी झाले.
SBI लाईफ चे APE Rs ५४३० कोटींवरून Rs ६१३० कोटी झाले. प्रॉफिट Rs ३०४ कोटींवरून Rs ३२२ कोटी झाले. प्रीमियम आय Rs १९१७१ कोटींवरून Rs २२३९६ कोटी झाले. VNB Rs १५१० कोटींवरून Rs १६८० कोटी झाले. VNB मार्जिन २७.८१% वरून २७.४१% झाले.
सिंजीनचे प्रॉफिट Rs १०९ कोटींवरून Rs ११० कोटी झाले. उत्पन्न Rs ७८५ कोटीवरून Rs ८५३ कोटी झाले.
झायड्स लाईफ च्या ‘GABAPENITIN’ या मिरगी वरील औषधाला USFDA ने मंजुरी दिली.
वेलस्पन स्पेशालिटी ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.
नोव्हार्टिसचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
सूर्य रोशनीला Rs ६० कोटींची ऑर्डर मिळाली.
माझगाव डॉक्स ला १४ फास्ट पॅट्रोल व्हेसल्स साठी Rs १०७० कोटींची ऑर्डर मिळाली.
अनमोल ला Rs ६००० कोटींच्या VGF (व्हायाबिलिटी गॅप फंडिंग) साठी परवानगी मिळाली.
झोमॅटोला पेमेंट ऍग्रीगेटर म्हणून RBI ची मंजुरी मिळाली.
JSW स्टीलचे प्रॉफिट Rs २४१५ कोटी झाले उत्पन्न Rs ४१९४० कोटी झाले. मार्जिन १७.१% राहिले.
गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट  २ फेब्रुवारीला बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करणार आहे.
IEX प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. Rs १ इंटरींम  लाभांश जाहीर केला.
चोला इन्व्हेस्टमेन्टचे प्रॉफिट वाढले. NII वाढले NPA कमी झाले. कंपनीने Rs १.३० इंटरीम लाभांश जाहीर केला.
वेदांता लिमिटेड चे प्रॉफिट Rs २४६४ कोटींवरून कमी होऊन Rs २०१० कोटी झाले. उत्पन्न Rs ३४१०२ कोटींवरून वाढून  Rs ३५५४१ कोटी झाले.
शक्ती पंप्स चे प्रॉफिट, उत्पन्न वाढते. निकाल सुंदर आले.
TVS होल्डिंगचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
IT,FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले .ऑटो आणि मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७०७०० NSE निर्देशांक निफ्टी २१३५२ बँक निफ्टी ४४८६६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – 2४ जानेवारी 2024

.

आज क्रूड US $ ७९.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.१० USA  १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१४ आणि VIX १४.८३ होते. सोने Rs ६२००० आणि चांदी Rs ७१००० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये तेजी होती.
USA मध्ये ३M ने गायडन्स नकारात्मक दिला, गोल्डमन साखस, होम डेपो या शेअर्समध्ये मंदी  तर नेटफ्लिक्स, व्हेरिझॉन, P & G या शेअर्समध्ये तेजी होती.
चीनच्या सेंट्रल बँकेने ५ फेब्रुवारी पासून त्यांच्या रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशियो मध्ये ०.५०% ची कपात केली. त्यामुळे आज मेटल्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
KEI इंडस्ट्रीज चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या एक्सट्रा हाय वोल्टेज केबल या प्रोडक्टला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. केबल आणि  वायर्ससाठी चांगली मागणी. सरकारी आणि खाजगी भांडवल गुंतवणूक वाढत आहे. सोलर पॉवरला उत्तेजन देण्याचे सरकारचे धोरण आहे.सोलर मध्ये केबल्स आणि वायरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कंपनीचे ऑर्डर बुक Rs ३८०० कोटींचे असून कंपनीने ४५० कोटींची निर्यात केली आहे.
एक्साइड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
BLISS GV फार्माचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
रमा स्टील ट्यूबने १ शेअरवर २ बोनस शेअर्स इशु करण्याची घोषणा केली.
सरकारने कोलगॅसिफिकेशन साठी इन्सेन्टिव्ह योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत सरकारने कोळशापासून गॅस बनविण्याची परवानगी दिली आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्लांट आणि मशिनरी साठी भांडवली मदत करेल. जर हा प्लांट सरकारी कंपनीने चालू केला तर Rs १३५० कोटी आणि खाजगी प्लांट्सना Rs १००० कोटी सबसीडी सरकार देईल. सरकारने या योजनेसाठी एकूण Rs ८५०० कोटी मंजूर केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्लांटची क्षमता ४ लाख टन असली पाहिजे.
IOB चे प्रॉफिट Rs ५५५ कोटींवरून Rs ७२३ कोटी झाले. GNPA ४.७०% वरून ३.९% झाले. NNPA ०.६८ वरून ०.६२ झाले. प्रोव्हिजन Rs ११२७ कोटींवरून Rs ३६७ कोटी झाले.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले GNPA कमी झाले.
कॅनरा बँकेचे प्रॉफिट Rs २८८२ कोटींवरून Rs ३६५६ कोटी झाले. NII Rs ८६०० कोटींवरून Rs ९४१७ कोटी झाले. GNPA ४.७६% वरून ४.३९% झाले. NNPA १.४१% वरून १.३२% झाले. प्रोव्हिजन Rs २२०१ कोटींवरून Rs २१०७ कोटी झाले. NIM ३.०२ होते. प्रोव्हिजन कव्हरेज रेशियो ८९.०१ होते.
सरकारने सूर्योदय योजनेअंतर्गत १ कोटी घरांवर रुफटॉप बसविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आह. या योजनेअंतर्गत सरकार १ KV ते ३ KV च्या रुफटॉप सोलर साठी ६०% तर ३ KV ते ५ KV ला ४०% आणि ५KV ते १० KV साठी १०% सबसिडी दिली जाईल. या योजनेचा फायदा REC ( योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी), IREDA ला होईल. सरकारने ४० GW सोलर पॉवर रुफटॉप १ कोटी घरावर लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इरेडाचे लोन बुक Rs ५०००० कोटींचे आहे. कंपनीचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
कामत हॉटेलने ‘CONSTRICT हॉस्पिटॅलिटी बरोबर जगन्नाथ पुरी येथे ५ स्टार हॉटेल उघडण्यासाठी Rs ७५ कोटींचा  १५ महिने मुदतीचा करार केला.
भारत डायनामिक्सचे प्रॉफिट Rs ८४ कोटींवरून Rs १३५ कोटी झाले. रेव्हेन्यू Rs ४६२ कोटींवरून ६०२ कोटी झाले. मार्जिन १९.५% वरून १९.८% झाले.
रेड टेप चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
सारडा क्रॉपकेम चे निकाल असमाधानकारक होते.
CMS इन्फोचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले
मंगलोर केमिकल्सने ५.९% तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.
MAS  फायनान्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
IOC चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
मोतीलाल ओस्वालचे निकाल चांगले आले कंपनीने Rs १४ लाभांश जाहीर केला.
कोल इंडिया, BHEL,आणि गेल हे कोल टू अमोनियम नायट्रेट ह्या सिन्थेटिक फर्टिलायझरचे उत्पादन करणार आहेत.
ग्लेनमार्क लाईफ ,युनायटेड स्पिरिट, टाटा एलेक्सी, सोना BLW, पूर्वाणकारा, महानगर गॅस,पीडिलाइट, इंडस टॉवर या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
हॅवेल्स, ICRA,लौरस लॅब, कर्नाटक बँकेचे निकाल कमजोर होते.
UFO मुव्हिजने  TSR फिल्म बरोबर अलायन्स केला. ४०३ स्क्रीनच्या ऍडव्हर्टायजिंग राईट्स साठी करार केला.
DCB  बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले GNPA वाढले NNPA कमी झाले.
सेबीच्या ऑर्डर नुसार ज्या एंटिटीज बेनीफिशियल ओनरशिप स्टँडर्ड्स पूर्ण करू शकणार नाहीत अशा एंटिटीज १ फेब्रुआरीपासून भारतीय मार्केटमध्ये नवीन शेअर्स खरेदी करू शकणार नाहीत. तसेच त्यांच्याकडील होल्डिंग त्यांना १८० दिवसांत लिक्विडेट करावे लागेल.
जर FPI जवळ भारतीय इक्विटीमध्ये Rs २५००० कोटी AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) असेल किंवा ज्या FPI चे ५०% पेक्षा जास्त भारतीय इक्विटी AUM एका कॉर्पोरेट ग्रुपमध्ये असतील अशा FPI ना बेनेफिशियल स्टँडर्ड्स लागू होतील.
अशा FPI ना त्यांचे  बेनिफिशियल ओनर्स डिसक्लोज करावे लागतील. या साठी शेअरहोल्डिंगची कोणतीही मर्यादा नाही, तसेच किंवा इंटरमीजिअरीज एंटिटीजची मर्यादा नाही. FPI ना नैसर्गिक बेनिफिशियल व्यक्तींची माहिती द्यावी लागेल.
प्रत्येक FPI किंवा त्याचा सब अकाउंट एका कंपनीत १०% इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि सर्व FIIS, NRI आणि OCB मिळून एका कंपनीत २४% पर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही  २४% मर्यादा शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर ३०% पर्यंत वाढवली जाऊ शकते.
जे FPI बेनिफिशयरी डिस्क्लोजर देऊ इच्छीत नाहीत त्यांना येत्या १८० दिवसांत त्यांचे होल्डिंग लिक्विडेट करावे लागेल. म्हणून येत्या १८० दिवसांत अशा FPIची शेअर मार्केटमध्ये विक्री येऊ शकते.
मास्टेकने जनरेटिव्ह AI साठी मायक्रोसॉफ्ट बरोबर करार केला.
टेक महिंद्रा चे प्रॉफिट वाढून Rs ५१० कोटी उत्पन्न वाढून Rs १३१०१ कोटी झाले, तर मार्जिन वाढून ५.४% झाले. कंपनीची US $ इन्कम ग्रोथ १.१% होती. ऍट्रिशन रेट १०% होता.
बजाज ऑटोचे प्रॉफिट Rs १४९१ कोटींवरून Rs २०४२ कोटी झाले. उत्पन्न Rs ९३१५ कोटींवरून Rs १२११४ कोटी झाले. तर मार्जिन १९.१% वरून २०.१% झाली.
PNB हौसिंगचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
 यूको बँक फायदा कमी झाला NII वाढले NPA कमी झाले.
DLF चे YOY प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
रिअल्टी सोडून सर्व क्षेत्रांमध्ये तेजी होती. FMCG, इन्फ्रा, एनर्जी, ऑटो, फार्मा,  IT मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स  ७१०६० NSE निर्देशांक २१४५३ बँक निफ्टी ४५०८२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – 23 जानेवारी 2024

आज क्रूड US $ ८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.०८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१२ आणि VIX १४.९४ होते. सोने Rs ६२१०० आणि चांदी Rs ७१००० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.
FII ने Rs ५४६ कोटींची विक्री तर DII ने ७१९ कोटींची खरेदी केली.
चीनच्या सेंट्रल बँकेने १ वर्ष आणि ५ वर्षांच्या व्याजदरात काही बदल केला नाही.
USA मध्ये डाऊ जोन्स आणि NASDAQ तेजीत होते.
टिप्स इंडस्ट्रीज ने Rs ३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला कंपनीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
ICICI बँकेचा फायदा १७ तिमाहीतील किमान फायदा आहे. NIM ५ तिमाहीतील किमान स्तरावर होते. NPA चा स्तर ९ वर्षातल्या किमान स्तरावर होते. CASA कमी झाले स्लिपेजीस वाढले.
सिप्लाचे उत्पन्न वाढले फायदा वाढले मार्जिन वाढले.
पर्सिस्टंट सिस्टिम्स ने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट केले. तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs ३२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
कोफोर्ज चे निकाल चांगले आले. कंपनीला Rs २३८ कोटी प्रॉफिट झाले तर मार्जिन १३.५% राहीले. CC रेव्हेन्यू ग्रोथ १.८ होती. नवीन ऑर्डर्स US $ ३५४ मिलियनच्या मिळाल्या. कंपनीने ७ नवीन ग्राहक जोडले. कंपनीने ग्रोथ गायडन्स १३%-१६% दिला. ऍट्रिशन रेट कमी होऊन १२.१% झाला.
सरकारने २२ जानेवारी २०२४ पासून सोने आणि चांदीवरील इम्पोर्ट ड्युटी १२.५% वरून १५% केली.
PSP प्रोजेक्टला गुजरातमध्ये डेअरी प्लांटसाठी ऑर्डर मिळाली.
ग्रीव्हज कॉटन ची सबसिडीअरी ग्रीव्हज फायनान्सने ELEKTRIPCE बरोबर EV फायनान्सिंग साठी करार केला.
महिंद्रा लॉजिस्टीक्सने महाराष्ट्रामध्ये ६.५ लाख SQFT एरियाचे वेअरहाऊस ऑटो आणि इंजिनीअरिंग कंपन्यांसाठी लाँच केले. हे वेअरहाऊस या वर्षाच्या अखेर सेवा देणे सुरु करेल.
झी इंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये १.३९ कोटी शेअर्सचे Rs २२६ कोटीचे लार्ज डील झाले.
वास्कॉन इंजिनीअरिंगला कॅप जेमिनीकडून Rs ४१६ कोटींची ऑर्डर मिळाली.
हिरोमोटोने नवी Xtreme १२५R मोटारसायकल लाँच केली.
ग्रॅन्युअल्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
इंडोको रेमिडीजचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले,मार्जिन कमी झाले.
इन्फिबीमचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
अशोक बिल्डकॉन ला सिडको कडून Rs ६६२.५५ कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOI मिळाले.
VST इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
लुडलो ज्यूट प्रॉफिटमधून तोट्यात गेली. Rs १ कोटी फायदा YOY २.५ कोटी तोट्यात परावर्तित झाला.
उत्पन्न Rs १२७ कोटींवरून Rs १०० कोटी झाले. मार्जिन ४.२% वरून ०.८% झाले.
नवकार कॉरपरेशन फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
कोलते पाटिलना Rs ५४५ कोटींची २ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मिळाली.
सेंच्युरी एन्काचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले.
REC चे NII Rs ३५२५ कोटींवरून Rs ४१५९ कोटी झाले. प्रॉफिट Rs २८७८ कोटींवरून Rs ३२६९ कोटी झाले. फायनान्स कॉस्ट Rs ६१३५ कोटींवरून २५% वाढून Rs ७६५३ कोटी झाली. त्यामुळे शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
ग्रॅव्हिटाचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले.
CG पॉवर चे प्रॉफिट उल्लेखनीयरित्या वाढले. उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
कीस्टोन डेव्हलपर्सना मालाड मध्ये Rs १२०० कोटींचे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट मिळाले.
सोनी आणि झी एंटरटेनमेंट मधील मर्जर करार सोनीने रद्द केल्याचे पत्र पाठवले.
टाटा मोटर्स त्यांच्या पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती ०.७% ने १ फेब्रुवारीपासून वाढवणार आहे.
सिप्ला च्या सब्सिसिडीअरीने मेक्सिकोमध्ये औषधाची विक्री करण्यासाठी नवीन युनिट सुरु केले.
CYIENT विरुद्ध USA मधील अँटीट्रस्ट LAW सूट US $ ७.४ मिलियनमध्ये समेट झाला.
अंबर इंटरप्रायझेस ने साऊथ कोरियाची कंपनी ‘कोरिया सर्किट’ बरोबर करार केला.
ल्युपिनच्या ‘RIVAROXABAN’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
नोव्हा ऍग्रीटेक या कंपनीचा Rs १४४ कोटींचा IPO (Rs ११२ कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ७७.५८ कोटींचा OFS) २२ तारखेला ओपन होऊन २५ जानेवारीला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ३९ ते Rs ४१ असून मिनिमम लॉट ३६५ शेअर्सचा आहे.ही कंपनी सॉईल हेल्थ मॅनेजमेंट,क्रॉप प्रोटेक्शन आणि क्रॉप न्यूट्रिशन क्षेत्रांत काम करते. कंपनीची ७२० प्रोडक्टस रजिस्टर्ड आहेत.
ओरिएंटल बेल फायद्यातून तोट्यात गेली इन्कम कमी झाले मार्जिन कमी झाले.
ऍक्सिस बँकेचे प्रॉफिट Rs ५८५३ कोटींवरून Rs ६०७१.१० कोटी झाले. NII Rs ११४५९ कोटींवरून Rs १२५३२ कोटीं झाले. GNPA १.७३% वरून १.५८ % झाले NNPA ०.३६% वर फ्लॅट राहिले.
कर्नाटक बँकेचे प्रॉफिट Rs ३००.७० कोटींवरून Rs ३३१.१० कोटी झाले. NII Rs ८३४.८० कोटींवरून Rs ८२७.६ कोटी झाले. GNPA ३.४७% वरून ३.६४% झाले NNPA १.३६ वरून १.५५% झाले.
रॅलीज इंडिया चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
आज रिअल्टी, PSE, मेटल्स, बँकिंग, एनर्जी, इन्फ्रा, ऑटो, FMCG, मिडकॅप, स्मॉल कॅप मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. फार्मा मध्ये माफक खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७०३७० NSE निर्देशांक निफ्टी २१२३८ बँक निफ्टी ४५०१५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ जानेवारी २०२४

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७०३७० NSE निर्देशांक निफ्टी २१२३८ बँक निफ्टी ४५०१५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २० जानेवारी २०२४

आज क्रूड US $ ७८.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.२४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१३ आणि VIX १३.७६ होते. सोने Rs ६१९०० तर चांदी Rs ७१४०० च्या आसपास होते.
USA मार्केटमधील तिन्ही निर्देशांक डाऊजोन्स, S & P आणि NASDAQ तेजीत होते. होम सेल्स विक्री ३७.८ लाख झाली. ११९५ नंतर प्रथमच घरांची विक्री कमी झाली.
Paytm चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रॉफिट ११% ने वाढून Rs १९६४१ कोटी झाले . रिटेल, जिओ, ऑइल & गॅस विभागाच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रॉफिटमध्ये ही वाढ झाली. रेव्हेन्यू ३.२% वाढून २.४८ लाख कोटी झाले. ऑइल & गॅस सेगमेंटचे रेव्हेन्यू ५०% ने वाढून Rs ६७१९ कोटी झाले.  जिओचा  ARPUJ Rs १८१ आला.
गोदावरी पॉवरच्या छत्तीसगढ पर्यावरण विभागाने रायपूर प्लांटच्या  क्षमता  विस्ताराला कॉन्सेंट टू  ऑपरेट क्लॉज सकट मंजुरी   दिली.
धामपूर शुगर १०००००० शेअर्सच्या बाय बॅक साठी  Rs ३०० प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर रूटने Rs ३० कोटी खर्च करेल. हा शेअरबायबॅक २३ जानेवारीला सुरु होऊन जानेवारी ३० ला बंद होईल.
पर्सिस्टंट सिस्टिम्स ने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट केले. कंपनीचे प्रॉफिट Rs २६३ कोटींवरून Rs २८६ कोटी झाले. कंपनीचे उत्पन्न Rs २४१२ कोटींवरून Rs २४९८ कोटी झाले. कंपनीने Rs ३२ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.
ICICI बँकेचे प्रॉफिट २३.५% वाढून Rs १०२७१ कोटी झाले. NII  १३% ने वाढून Rs १८६७९कोटी झाले. NPA २.४८ % वरून २.३०% झाले. CASA रेशियो ३९.४%. डिपॉझिट्स १८.७% ने वाढले. लोन ग्रोथ १८.८% झाली. प्रोव्हिजन कव्हरेज रेशियो ८०.७% कॅपिटल ADEQUACY रेसीयो. १६.७० होता.
कोटक महिंद्रा बँकेचे प्रॉफिट Rs २७२१.९० कोटींवरून ३००५ कोटी झाले. NII Rs ५६५२.९० कोटींवरून Rs ६५५४ .०० कोटी झाले. NIM  ५.२२ राहिले. GNPA १.७३ % वरून १.७२ % झाले NNPA ०.३७ %वरून०.३४ % झाले. प्रोव्हिजन Rs ३६७ कोटींवरून Rs ५७९ कोटी झाले. डिपॉझिट्स १८.६% ने वाढली.
आरती सर्फेक्टंटसचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढते मार्जिन वाढले.
IDBI बँकेचे प्रॉफिट Rs ९२७ कोटींवरून Rs १४५८ कोटी झाले. GNPA  ४.९०% वरून ४.६९ झाले. NNPA  ०.३९% वरून ०.३४% झाले. NII Rs २९२५.३० कोटींवरून Rs ३४३४ .५० कोटी झाले.
IREDA चे प्रॉफिट Rs २०३.०० कोटींवरून Rs ३३६ कोटी झाले.Iरेव्हेन्यू Rs ८६९ कोटींवरून  १२५३ कोटी झाले.. GNPA ४.२४% वरून २.९०% झाले. NNPA २.०३% वरून १.५२% झाले.
कॅनफीना होम्सचे प्रॉफिट वाढले NII वाढले, GNPA वाढले NNPA वाढले.
युनियन बँकेचे प्रॉफिट Rs २२४५ कोटींवरून Rs ३५९० कोटी झाले. GNPA ६.३८% वरून ४.८३ % झाले.
NNPA १.३०% वरून १.०८% झाले. प्रोव्हिजन Rs १६९१ कोटींवरून Rs.१२२६ कोटी झाली. NII Rs ८६२८ कोटींवरून ९१६८ कोटी झाले.
JK सिमेंटचे प्रॉफिट वाढून Rs २८४ कोटी उत्पन्न वाढून Rs २९३५ कोटी झाले.मार्जिन वाढून २१.३% झाले.
शेषशायी पेपरचा फायदा, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
भारत एअरटेलची सबसिडीअरी हेक्साकॉममध्ये सरकारी स्टेक ३०% आहे. या कंपनीचे व्हॅल्युएशन Rs २०००० कोटी झाले. कंपनीने IPO साठी DRHP दाखल केले.
सालासार  टेक्नोमध्ये  हिलव्ह्यू  इन्फ्रा बिल्ड लिमिटेड चे मर्जर होणार आहे.
अस्रझेनेकाच्या ‘ANDEXANET’ ची आयात करण्यासाठी CDSCO ची परवानगी मिळाली. (सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)
टाटा स्टीलने टॉलबॉट आणि वेल्स मधील दोन ब्लास्ट फरनेसेसचे प्लांट बंद केले आणि २८०० लोकांना कामावरून काढले.
पेट्रोनेट LNG ने कतार बरोबर ८.५ MTP  सांठी २० वर्ष मुदतीचा करार केला.
आज एनर्जी मेटल्स बँकिंग मध्ये खरेदी तर FMCG, IT, फार्मा, रिअल्टी, ऑटो मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
रेल्वे, आणि PSE मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१४२३ NSE निर्देशांक निफ्टी २१५७१ बँक निफ्टी ४६०५८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १९ जानेवारी २०२४

आज क्रूड US $ ७८.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.४३ USA १० वर्षे बॉण्ड यील्ड ४.१५ विक्स १३.९६ होते. सोने Rs ६१८०० आणि चांदी Rs ७१५०० होते.
USA मध्ये जॉब्सलेस क्लेम १६००० ने कमी होऊन १.८७ लाख झाले. डिमांड नाही ON लाईन शॉपिंग वर जोर असल्याने दुकानदार दुकाने बंद करतील.
जपानची महागाई कमी झाली.
FII ने Rs ९९०२ कोटींची विक्री तर DII ने Rs ५९७७ कोटींची खरेदी केली.
डिक्सन टेक या कंपनीवर रेव्हेन्यू इंटेलिजन्स नी सर्च ऑपरेशन केले.
EMS या कंपनी उत्तराखंड विकासनगरच्या Rs ४७८.९३ कोटींच्या प्रोजेक्टसाठी L १ बीडर ठरली.
REC ला रुफटॉप सोलर प्रोजेक्टसाठी पूर्ण जबाबदारी देऊन इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून नेमले. २०२६ पर्यंत ४०००० MW क्षमतेचे लक्ष्य दिले आहे.
SHALBY ‘PK हेल्थकेअर’ मधील ८७.२६% स्टेक Rs १०२ कोटींना विकत घेणार आहे. .
 अनंतराज ने QIP दवारा Rs ५०० कोटी उभारले Rs २९६ प्रती शेअर या दराने १.६८ कोटी शेअर्स इशू केले.
आलेम्बिक फार्मा ‘RIG IMMUNE’ मध्ये US $  १ मिलियन गुंतवणार आहे.त्यामुळे त्यांचा स्टेक  १२.८२% होईल.
सलासर टेक्नोच्या बोनस इशू साठी १ फेब्रुवारी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
टाटा कन्झ्युमर प्रोडक्टस कमर्शियल पेपरद्वारा Rs ३५०० कोटी आणि राईट्स इशू द्वारा Rs ३००० कोटी उभारणार आहे.
इंडियन हॉटेल्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की SELEQTIONS ब्रॅण्ड्स अंतर्गत जैसलमीर येथे २०० वे हॉटेल उघडणार आहे या हॉटेलचे नाव ‘गोरबंध पॅलेस’ असेल. या हॉटेलला ८०००० SQFT चे आउटडोअर लॉन असेल. ह्या हॉटेलमध्ये ८३ रूम्स असतील. अयोध्येमध्ये कंपनी ‘जिंजर ‘  ‘विवांता’ ब्रॅण्ड्स लाँच करणार आहे.स्पिरिच्युअल टुरीझम वर फोकस राहील. अयोध्येत एकूण  ५०० रूम्सची ३  हॉटेल्स येत्या दोन वर्षात ऑपरेशनला होतील.लक्षद्वीपमध्ये हॉटेल सुरु करण्यासाठी योजना विचारात आहे. डोमेस्टिक टुरिझम साठी मागणी वाढत आहे.
सेबी IPO ची प्रक्रिया सोपी करणार आहे. IPO ला मंजुरी देण्यासाठी लागणारा वेळ कमी करणार आहे.
CE इन्फोला हुंडाई ऑटो एव्हरकॉर्पोरेशन कडून Rs ४०० कोटींची ५ वर्ष मुदतीची ऑर्डर मिळाली.
पॉलीकॅबने सांगितले की कंपनीचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही आयकर विभागाच्या तपासणीत संपूर्ण सहकार्य करत आहोत. IT विभागाकडून कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत. केबल वायर सेगमेंटमध्ये बिझनेस चांगला आहे. व्हॉल्युम ग्रोथ २०% जास्त आहे.
श्री दिग्विजय सिमेंटचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सेंट्रल बँकेचे प्रॉफिट वाढले. GNPA, NNPA कमी झाले. NII Rs ३२८४ कोटींवरून Rs ३१५१ कोटी झाले.
सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
हट्सन ऍग्रो चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
अल्ट्राटेक सिमेंटचे प्रॉफिट Rs १०६३ कोटींवरून Rs १७७५ कोटी झाले.उत्पन्न Rs १५५२१ कोटींवरून १६७४० कोटी झाले. मार्जिन १५.१% वरून १९.४% झाले. कॅपॅसिटी युटिलायझेशन ७७% होते. कॉन्सॉलिडिटेड व्हॉल्युम २७.३२ MT तर डोमेस्टिक ग्रे सिमेंट व्हॉल्युम २५.४४ MT  होते.
अतुल लिमिटेड चे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
फिनोलेक्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
मेट्रो ब्रॅण्ड्स चे प्रॉफिट कमी झाले,उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
शॉपर्स स्टॉपचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल खराब आले.
सुप्रीम पेट्रो या कंपनीने हरयाणातील  मुनाक येथे कर्नाल जिल्ह्यात ९६.३५ एकर जागा घेतली.
हिंदुस्थान झिंक चा फायदा Rs २१५७  कोटींवरून Rs २०२८ कोटी उत्पन्न Rs ७८६६ कोटींवरून ७३१० कोटी तर मार्जिन ४७.१% वरून ४८% झाले.
HUL चे प्रॉफिट Rs २५०५ कोटींवरून Rs २५१९ कोटी झाले. उत्पन्न Rs १५२२८ वरून कमी होऊन Rs १५१८८ कोटी झाले. मार्जिन २३.२% वरून २३.३% झाले.
पनामा पेट्रोला IOC कडून Rs २२.३ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज E- PACK ड्युरेबल या कंपनीचा IPO सुरु होऊन २३ जानेवारीला बंद होईल. हा Rs ६४० कोटींचा IPO असून Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू  असून Rs २४० कोटींची OFS आहे. या इशूचा प्राईस बँड Rs २१८ ते Rs २३० आहे.मिनिमम लॉट साईझ ६५ शेअर्सचा आहे.कंपनीला FY २३  साठी Rs ३१.९७ कोटी फायदा आणि रेव्हेन्यू Rs १५४०.२५ कोटी झाले.
ही कंपनी निरनिराळ्या ब्रॅण्डसाठी एअरकंडिश्नर बनवते ऊदा ब्ल्यू स्टार, DAIKIN, हॅवेल्स इत्यादी. कंपनी रूम एअर कंडिशनर ,त्यांचे कॉम्पोनंट्स,स्मॉल डोमेस्टिक अप्लायन्सेस उदा मिक्सर ग्राइंडर, वॉटर डिस्पेन्सर इत्यादी. कंपनीचा ८०% बिझिनेस एअर कंडिशनरचा आहे. कंपनीचा २४% मार्केट शेअर आहे.
अयोध्येमध्ये रामजन्मभूमीमध्ये लाईटिंगचे काम हॅवेल्स या कंपनीने पूर्ण केले.
सूर्य रोशनीला Rs ५२.९ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज एनर्जी, ऑटो, IT, रिअल्टी,फार्मा, PSU, इन्फ्रा मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१६८३ NSE निर्देशांक निफ्टी २१६१२ बँक निफ्टी ४५७०१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !