आजचं मार्केट – ३० जानेवारी 2024

.

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.४३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०५ आणि VIX १६.४६ होते. सोने Rs ६२३०० चांदी
 Rs ७२४०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
USA  च्या नागरिकांचे ड्रोनच्या हल्ल्यामध्ये जॉर्डनच्या सीमेवर निधन झाले या बाबतीत पँटागॉन लक्ष घालत आहे असे सांगुन USA ऍडमिनिस्ट्रेशनने सारवासारव केलीआणि सरकारी बॉरोइंग US $ ५५ बिलियनने कमी करू असे सांगितले. त्यामुळे बॉण्ड यिल्ड सुधारले.
FII ने Rs ११० कोटींची तर DII ने Rs ३२२१ कोटींची खरेदी केली.
GAIL ने ADNMC या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीबरोबर करार केला.
कृष्णा डायग्नॉस्टिक्सने महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर MRI आणि सिटी स्कॅन सर्व्हिसेस पुरवण्यासाठी करार केला.
चीन मध्ये ९ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत स्प्रिंग फेस्टिवलची सुट्टी असते.
DR रेड्डीज चे प्रॉफिट वाढले ( Rs १२४४ कोटींवरून Rs १३८१ कोटी) उत्पन्न वाढले ( Rs ६७९० कोटींवरून Rs ७२३७ कोटी ) मार्जिन वाढले ( २९% वरून २९.३% झाले.). निकाल चांगले आले.
SRF चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
टीमलीज चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ज्युबिलण्ट इंग्रेव्हीया चे प्रॉफिट कमी झाले,उत्पन्न, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs २.५० लाभांश जाहीर केला.
ब्ल्यू स्टार चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
शाम मेटॅलिक्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
कोरोमंडल प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
एशियन ग्रॅनाईट चा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले. कंपनीला थायलँड, इटली, UK मध्ये व्यवसाय सुरु करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.
अडाणी टोटलचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
द्वारिकेश शुगरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
अरविंद चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
 KPIT टेक चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले कंपनीने Rs २.१० इंटरींम  लाभांशाची घोषणा केली.
राणे ब्रेक्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
CHEVIOT चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले.
GPT इन्फ्रा प्रोजेक्ट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
मेघमनी ऑर्गनिक्स फायद्यातून तोट्यात गेली.
बजाज फिनसर्व चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले NII वाढले. कंपनीच्या लाईफ इन्शुअरन्स बिझिनेसचे उत्पन्न २१% ने वाढले.
सिम्फनी चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
सुवेंन  लाईफसायन्सेस चा तोटा कमी झाला उत्पन्न कमी झाले.
अपार इंडस्ट्रीजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
स्ट्राइड्स फार्मा तोट्यातून फायद्यात आली.
इंडियन मेटल्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सुब्रोस चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
J कुमार इन्फ्राचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
शांती गिअर्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
जिलेट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ८५ प्रती शेअर लाभांश दिला.
व्हील्स इंडियाचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
महिंद्रा फायनान्स चे प्रॉफिट कमी झाले NII वाढले.
PB फिनटेक तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न वाढले.
ITC चे प्रॉफिट १०.७५% ने वाढून Rs ५५७२ कोटी झाले. कंपनीचे इतर  उत्पन्न वाढले तर टॅक्स खर्च कमी झाला. रेव्हेन्यू १.६% वाढून Rs १६४८३ कोटी झाला. कंपनीने Rs ६.२५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. या लाभांसासाठी ८ फेब्रुवारी रेकॉर्ड डेट असून २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत तुमच्या खात्यात जमा केला जाईल.
‘VI’ चा तोटा कमी होऊन Rs ६९८६ कोटी झाला ( Rs ८७३८ कोटी) मार्जिन सुधारले. रेव्हेन्यू ०.४% ने कमी होऊन Rs १०६७३ कोटी झाला.
पेट्रोनेट LNG चे प्रॉफिट ४१.७% ने YOY  वाढून Rs १२१३ कोटी तर रेव्हेन्यू १७.७% वाढून Rs १४७४७ कोटी झाला.
मेरिको चे प्रॉफिट १६% ने वाढून Rs ३८६ कोटी झाले. इनपुट कॉस्ट कमी झाली. व्हॉल्युम २% ने वाढले. रेव्हेन्यू २% ने वाढून Rs २४२२ कोटी झाला.
NTPC चे  उत्पन्न  मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs २.२५ लाभांश जाहीर केला.
L & T ला तिसऱ्या तिमाहीत Rs २९४७ कोटी प्रॉफिट झाले. कंपनीचे उत्पन्न Rs ५५१२८ कोटी झाले. मार्जिन १०.५% होते.
 KEC इंटर्नॅशनलला Rs १३५० कोटींची ऑर्डर मिळाली.   TCS ने UK मध्ये AVIVA बरोबरच्या कराराची मुदत १५ वर्षांसाठी वाढवली.
BEL ला एकूण  Rs ८४७ कोटींच्या २ ऑर्डर्स वित्त मंत्रालयाकडून मिळाल्या.
NTPC ग्रीन एनर्जीने महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी करार केला.
बजाज फिनसर्व च्या सबसिडीअरीने ‘VIGAL हेल्थकेअर सर्व्हिसेस’ मधील १००% स्टेक Rs ३२५ कोटींना घेणार आहे.
झी एंटरटेनमेंट च्या शेअरहोल्डर्सनी कंपनीला झी सोनी मर्जरची अंमलबजावणी करायला सांगितली. झी इंटरटेन्मेन्ट सिंगापूरमध्ये इमर्जन्सी आर्बिट्रेशन संबंधात उद्या सुनावणी आहे.
झायड्स लाइफने प्रोस्ट्रेट कॅन्सर वरील औषध ‘REXIGO’ लाँच केले.
E-पॅक ड्युरेबल चे आज BSE वर Rs २२५ तर NSE वर २२१ वर लिस्टिंग झाले. लिस्टिंग डिस्काऊंट वर झाल्यामुळे लिस्टिंग गेन्स झाले नाही.
स्पाईस जेटच्या संबंधात केलेले इंसॉल्व्हंसी अप्लिकेशन NCLT ने रद्द केले.
L & T ला UAE मध्ये रिन्यूएबल सोलर एनर्जी जनरेशन प्लांटसाठी Rs १०००० कोटी ते Rs १५००० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
रॉयल ओर्चीड  गुजरातमधील जामनगर येथे हॉटेल सुरु करणार.
सर्वोटेक पॉवर सिस्टीम आणि BPCL मिळून देशभरात १८०० EV चार्जिंग स्टेशन्स लावणार आहेत.
महिंद्रा फायनान्स चे प्रॉफिट कमी झाले NII वाढले.
आज मिडकॅप, स्मॉल कॅप, एनर्जी, इन्फ्रा, FMCG, फार्मा, IT PSE मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. सरकारी बँका रिअल्टी आणि मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७११३९ NSE निर्देशांक निफ्टी २१५२२ आणि बँक निफ्टी ४५३६७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.