आजचं मार्केट – ३१ जानेवारी 2024

.

आज क्रूड US $ ८२.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.४९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०२ आणि VIX १५.९० होते. सोने Rs ६२४०० तर चांदी Rs ७१००० च्या आसपास होती. नैसर्गिक गॅस आणि कॉपर मंदीत  तर अल्युमिनियम तेजीत होते.
USA मध्ये मायक्रोसॉफ्ट, गूगल यांचे निकाल चांगले आले. पण फ्युचर गायडन्स चांगला दिला नाही. १२००० लोकांच्या नोकऱ्या जाणार. फेड दर वाढवण्याची शक्यता नाही पण कमी होण्याची आणि केव्हापासून कमी होण्याची शक्यता आहे याबाबतीत अनिश्चितता आहे. फेडच्या कॉमेंट्रीकडे मार्केटचे लक्ष आहे.  ९.०२६ मिलियन जॉब ओपनिंग झाली
L & T चे निकाल चांगले आले पण मार्केटला तितकेसे आवड़ले नाहीत. कंपनीने कॉमेंटरी चांगली दिली. २०% ऑर्डर ग्रोथ असेल असे सांगितले.
चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९.२(४९) आणि  कॉम्पोझिट PMI ५०.९( ५०.३ ) आले.
ब्ल्यू स्टार, कोची शिपयार्डस, KAYNES, ASTRAL यांचे निकाल चांगले आले.
टाटा पॉवर विजेचे दर वाढवणार आहे.
सरकारने मोबाईल उपकरणे आणि त्यांना लागणाऱ्या स्पेअरपार्ट्सवरची इम्पोर्ट ड्युटी १५% वरून १०% केली. भारताची मोबाईल ची निर्यात Rs ७०००० कोटी आहे. याचा फायदा मोबाईल कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना होईल.
नोव्हा ऍग्रीटेक चे BSE वर Rs ५६ वर आणि  NSE वर Rs ५५ वर लिस्टिंग झाले IPO मध्ये हा शेअर Rs ४१ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाला  त्यांना चांगले  लिस्टिंग गेन्स झाले.
KPIT टेक चे प्रॉफिट ११% रेव्हेन्यू ५% वाढला. CC रेव्हेन्यू ग्रोथ ४.३% होती. कंपनीने CC  ग्रोथ आऊटलूक ३७% तर EBITD आऊटलूक २०+% दिला. कंपनीने सांगितले की त्यांच्या ग्राहकांनी त्यांना बजेट मध्ये कपात करावी लागेल असे संकेत दिलेले नाहीत. कंपनीचे ऍट्रिशन किमान स्तरावर होते.
श्री लंका टेलिकॉमच्या अधिग्रहणात jio प्लॅटफॉर्म्स ने स्वारस्य दाखवले आहे. जिओने प्रिक्वालिफिकेशन केले आहे. GORTUNE इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पण यासाठी क्वालिफाय झाली आहे.
OCT- DEC तिमाहीत भारतातील सोन्यासाठी मागणी ४% ने कमी होऊन २६६.२ टन झाली.
श्री सिमेंटचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
डिक्सन टेकचे प्रॉफिट, उत्पन्नामध्ये उल्लेखनीय वाढ झाली. मार्जिन ३.८% राहिले.
गोदरेज कंझ्युमरचे प्रॉफिट Rs ५४६ कोटींवरून Rs ५८१ कोटी झाले. उत्पन्न Rs ३५९९ कोटींवरून Rs ३६६० कोटी झाले.
पॉली  मेडिक्युअर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न  वाढले मार्जिन वाढले.
पैसा लो डिजिटल ने १:१ बोनस शेअर इशू जाहीर केला. कंपनीचे प्रॉफिट,उत्पन्न NII आणि मार्जिन वाढले.
अंबुजा सिमेंट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले व्हॅल्यूम  % वाढून १.४१ टन्स झाले.
ज्योती लॅब चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
P &G ने Rs १६० अंतिम लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
मॅक्स हेल्थकेअरचे उत्पन्न वाढले प्रॉफिट वाढले.
NIIT लर्निंगचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
अडाणी विल्मरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
मारुती सुझुकीचे प्रॉफिट Rs २३५१ कोटींवरून Rs ३१३० कोटी झाले. उत्पन्न Rs २९०४४ कोटींवरून Rs ३३३०८ कोटी झाले. मार्जिन ९.७% वरून ११.७% झाले. कंपनीने एका वर्षांत २० लाख युनिट्सची विक्री केली. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत ७१००० युनिट्सची निर्यात केली.
कजरिया सिरॅमिक्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
बँक ऑफ बरोडा चे प्रॉफिट Rs ३८५३ कोटींवरून Rs ४५७९ कोटी झाले.
GNPA ३.३२% वरून ३.०८% झाले. NNPA ०.७६% वरून ०.७०% झाले.
NII Rs १०८१३ कोटींवरून Rs १११०१ कोटीं झाले. प्रोव्हिजन Rs २१६१ कोटींवरून Rs ६६६ कोटी झाले.
अतुल ऑटो चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
कार्बोरण्डम चे प्रॉफिट वाढले, इन्कम कमी झाले.  कंपनीने Rs १.५० इंटरिम  लाभांश जाहीर केला.
सुझलॉन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
सन फार्माचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ८.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
PVR इनॉक्स चे प्रॉफिट कमी झाले. उत्पन्न वाढले.
ग्रीन पॅनलचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
हायडलबर्ग सिमेंटचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
वेलस्पन स्पिनिंग चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
डाबरचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
मोरेपन लॅबक्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
फिनो पेमेन्टचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
ज्युबिलण्ट फुड्सची एकूण स्टोर्स १९२८ झाली कंपनीने ४० नवीन स्टोर्स उघडली.
इन्फोसिसने MVS grave या युरोपियन कंपनीबरोबर ७ वर्षे मुदतीचा करार केला.
मिडकॅप, स्मॉल कॅप,फार्मा, रिअल्टी, ऑटो, बँकिंग, मेटल्स, FMCG, एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१७५२ NSE निर्देशांक २१७२५  बँक निफ्टी ४५९९६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.