आजचं मार्केट – १ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ८०.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.४५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९३ तर VIX १६.०१ होते. सोने Rs ६२७०० चांदी Rs ७१८००   च्या आसपास होते.
USA फेड ने व्याज दरांत कोणताही बदल केला नाही. पण आता व्याजदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली नाही तसेच व्याज दरांत मार्चच्या बैठकीत रेट कटला सुरुवात होणार नाही असे सांगितले.व्याज दर ५.२५% ते ५.५०% च्या दरम्यान ठेवले.
USA च्या  मार्केट्समध्ये मंदी होती.अल्फाबेट आणि मायक्रोसॉफ्ट चे निकाल चांगले आले पण  शेअर्स मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
FII ने Rs १६६१ कोटींची खरेदी तर DII ने Rs २५४३ कोटींची खरेदी केली.
SAIL  आणि झी एंटरटेनमेंट बॅन मध्ये होते.
भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI जानेवारी महिन्यासाठी ५६.५ आला ( ५४.९ डिसेम्बरमध्ये होता)
इंडस टॉवर्स मध्ये २६ कोटी शेअर्सचे लार्ज डील Rs ५५१२ कोटींना झाली.
इंडिया सिमेंटच्या चेन्नई ऑफिसवर ED ने फेम कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल छापे टाकले.
इंडिया सिमेंट फायद्यातून तोट्यात गेली.इन्कम कमी झाले.
ऑरोबिंदो फार्माच्या IV युनिटची २३ जानेवारीपासून USFDA करत आहे.
L & T ला मोबिलिटी टेक्नॉलॉजी सप्लायर MARELLI कडून सप्लाय ऑर्डर मिळाली.
बजाज ऑटो ची एकूण विक्री २४% ने वाढून ३.५६ लाख युनिट्स झाली. निर्यात १२% वाढून १.२५ लाख झाली.
M & M ची एकूण विक्री १५% ने वाढून ७३९४४ युनिट्स झाली. ट्रॅक्टर विक्री १७% कमी होऊन २३९४८ युनिट्स झाली. SUV विक्री ३१% ने वाढून ४३०६८ युनिट्स झाली.
SML इसुझूची  कार्गोव्हेइकलची विक्री ३९% ने आणि पॅसेंजर व्हेइकल्सची विक्री ९३% ने वाढली..
टाटा मोटर्सची डोमेस्टिक विक्री ६% ने वाढून ८४२७६ युनिट्स, EV ची विक्री ६९% वाढून ६९७९ झाली.
पॅसेंजर व्हेईकल विक्री १२% ने वाढून ५४०३३ युनिट्स झाली CV विक्री २% ने कमी होऊन ३२०९२ युनिट्स झाली.
मारुतीची विक्री १.७२ लाख युनिट्सवरून १.९९ लाख युनिट झाली. डोमेस्टिक विक्री १३% ने वाढून १.७५ लाख युनिट झाली. निर्यात ३७.५% ने वाढून २३९२१ युनिट्स झाली. पॅसेंजर व्हेइकल्सची विक्री १३.२% वाढली.
अशोक लेलँड ची विक्री ७%ने कमी होऊन १५९३९ युनिट झाली.
आयशर मोटर्सची निर्यात २०% कमी होऊन ५६३१ युनिट झाली विक्री २% वाढून ७६१८७ युनिट झाली.
सरकार एनर्जी आणि मिनरल सिमेंट साठी ३ नवीन  डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर बनवणार.आहे याचा फायदा काँकॉर आणि गेटवे डिस्ट्रिपार्क ना मिळेल. .
RBI Ptm बँकेला नवीन ग्राहक घेण्यास मनाई केली. नवीन ठेवी घ्यायला ही मनाई केली. बँकेतून पैसे काढता येतील.
कोचीन शिपयार्डला हायब्रीड सर्व्हिस ऑपरेशन व्हेसल साठी ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर Rs ५०० कोटींची असून ह्या व्हेसलची डिलिव्हरी २०२६ मध्ये द्यायची आहे.
DIVGI या कंपनीला  Rs २१२ कोटींची ऑर्डर ५ वर्षे मुदतीची ऑटोमोटिव्ह ट्रान्स्मिशनसाठी मिळाली.
बर्मन कुटुंबाने रेलिगेअरमधील स्टेक ४% ने वाढवला.आता रेलिगेअरमध्ये ओपन ऑफर येईल कारण आता त्यांचा स्टेक २५.१८% होईल.
डिक्सन  टेक्नॉलॉजीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
मनकाईन्ड फार्माचा रेव्हेन्यू २५% ने आणि प्रॉफिट ५०% ने वाढले.
JSPL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
लाल पाथ लॅबचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
रेमंड च्या प्रॉफिट उत्पन्नात उल्लेखनीय वाढ झाली. मार्जिन वाढले. कंपनीच्या रिअल्टी उत्पन्नात चांगली वाढ झाली.
अथेर चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले
ओरिएंट इलेक्ट्रिक चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ०.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. V -गार्ड इंडस्ट्रीज चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सुमिटोमो केमिकल्स चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
प्रिसम जॉन्सन तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले.
अडाणी पोर्ट्सचे  प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
ट्यूब इन्व्हेस्टमेंट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs २ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला.
प्राज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
RITES चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ४.७५ इंटरींम  लाभांश जाहीर केला.
कल्पतरू पॉवर NCD दवारा Rs १५० कोटी उभारणार आहे.
ग्लेनमार्क फार्मा च्या ‘ABROCITINIB’ भारतात लाँच करण्यासाठी फायझर बरोबर भागीदारी करणार आहे. हे अट्रोपीक DERMATITIS वरील औषध आहे.
डिझनी ‘व्हायाकॉम १८’ ला ६०% स्टेक Rs ३९० कोटींना विकणार आहे.
आज माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी  इंटरीम अंदाजपत्रक सादर केले.
या अंदाजपत्रकात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये कोणताही बदल केला नाही.
सरकार १ कोटी सोलर रूफ टॉप पॅनेलवाल्या यूजर्सना ३०० युनिट वीज मोफत देणार.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ७०% घरे महिलांना मिळतील.
९ वर्षे ते १४ वर्षे मुलींना सर्व्हायकल कॅन्सरसाठी मोफत व्हॅक्सिनेशन केले जाईल.
 नॅनो DAP चा सर्व झोनमध्ये वापर करणार.
सरकार मध्यमवर्गीयांच्या घरांसाठी एक योजना बनवणार आहे.
१३६१ मंडीना e- NAM दवारा जोडणार.
५  इंटिग्रेटेड AQUA पार्क लावणार फिशरीज स्कीम साठी Rs १ लाख कोटींचे  निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.
सरकार ५ वर्षांत २ कोटी घरे बनवणार.
येत्या १० वर्षांत देशात एकूण विमानतळ १४९ होतील.
वंदे भारत मध्ये ४०००० बोगी अपग्रेड करणार.
२०३० पर्यंत कोल गॅसिफिकेशनची क्षमता १० कोटी MMT करणार यामुळे भारताची अमोनियाची  आयात कमी होईल.
टुरिझम क्षेत्राला व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. सरकार टुरिझम डेव्हलपमेंट पार्क सुरु करणार.
FDI इंफ्लो Rs ५९६०० कोटी झाला.
मार्च २०२५ पर्यंत सॉव्हरिन फंडांना टॅक्सेस मध्ये दिलेली सूट मार्च २०२५ पर्यंत वाढविली.
सरकारने FY २५ साठी फिस्कल  डेफिसिट साठी ५.१% चे लक्ष्य ठेवले आहे.२०२६ साठी ४.५% चे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या इकॉनॉमिक रेटिंगमध्ये सुधारणा झाली. त्यामुळे १० इयर बॉण्ड  यिल्ड मध्ये १% ची घट होऊन ते ७.०४% ( जुन २०१९ पासूनच्या किमान स्तरावर ) झाले. म्हणजे बॉण्ड्सची किंमत वाढली. बँका आणि इन्शुअरन्स कंपन्यांच्या बॉन्ड्समधील गुंतवणूकीची व्हॅल्यू  वाढली त्यामुळे आज बँका आणि इन्शुअरन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
अडाणी इंटरप्रायझेस चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
कोल  इंडियाचे उत्पादन ९.१% ने वाढून ७.८४ कोटी टन झाले.
EMS या कंपनीला उत्तर प्रदेशामध्ये Rs ३४.६८ कोटींची ऑर्डर मिळाली.
AB कॅपिटल चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
अतुल ऑटोची विक्री ४.९% ने वाढून २३१३ युनिट झाली.
ल्युपिनच्या ‘DRONEDARONE’ या नवीन औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
आज सरकारी बँका आणि इन्शुअरन्स कंपन्यां, एनर्जी क्षेत्राच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१६४५  NSE निर्देशांक निफ्टी २१६९७ बँक निफ्टी ४६१८८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.