आजचं मार्केट – १ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ७९.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.८८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८८ आणि VIX१४.६९ होते. PCR १.०२ होते. सोने Rs ६३३०० आणि चांदी Rs ७२२०० च्या आसपास होती. PCR १.०२ होते.
USA मध्ये मेटा कंपनीचे निकाल चांगले आले. त्यांनी शेअर बायबॅकची घोषणा केली. कंपनीने ५० सेन्ट्स लाभांश जाहीर केला. अमेझॉनचे निकाल चांगले आले. USA काही रिफायनरीज बंद होत आहेत. USA मध्ये रिजनल बँकांची स्थिती खराब आहे.
फेब्रुवारी ६ रोजी MPC ची मीटिंग सुरु होईल आणि ८ फेब्रुवारी २०२४ रोजी RBI त्यांचे द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.
FII ने Rs १८७९ कोटींची विक्री  आणि DII ने ८७२.४९ कोटींची खरेदी केली.
SAIL आणि झी एंटरटेनमेंट बॅनमध्ये होते.
आज गुजरात अंबुजा एक्स्पोर्टने १:१ बोनस शेअर इशू करणार असे जाहीर केले
हिरोमोटो ची विक्री २१.६% ने वाढली. डोमेस्टिक विक्री २०.५% ने तर निर्यात ७४.६% ने वाढली.
ABBOT लॅबोरेटरीजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
Mphasis चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
सोनाटा सॉफ्टवेअरचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
आयशर मोटर्सची विक्री २% ने वाढली. निर्यात ७४.६% ने वाढली. रॉयल एनफिल्ड ची विक्री कमी झाली.
PANACEA BIOTEK च्या बद्दी युनिटच्या तपासणीत USFDA ने OAI दिला
लाल पाथ LAB चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs १२ इंटरीम लाभांश जाहीर केला १२ फेब्रुवारीला कोल  इंडिया तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल तसेच लाभांशावर विचार करेल. लाभांशासाठी २० फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
अडाणी पोर्ट्स चे जानेवारी महिन्यासाठी कार्गो व्हॉल्युम ३५% ने वाढून ३५.१ मत एवढे झाले.
बाटाचे निकाल असमाधानकारक होते.
देवयानी इंटरनॅशनलचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले.
हेस्टर बायोसायन्सेसचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
AEGIS  लॉजिस्टिक्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
पनामा पेट्रोकेम चे प्रॉफिट कामरर झाले इन्कम तसेच मार्जिनही कमी झाले.
सेंच्युरी टेक्सटाईल्सचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन उल्लेखनीयरित्या वाढले. निकाल चांगले आले.
कावेरी सीड्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
TTK हेल्थकेअर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
ALKYL अमाईन्स चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले.
हिमसिंगका  सीड्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
व्हर्लपूलचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
महिंद्रा हॉलिडेज तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
NAVA  लिमिटेडचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
टोरंट फार्माचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
किर्लोस्कर फेरस प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
रेटगेन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
ज्युबिलण्ट pharmova तोट्यातून फायद्यात आली.

EIL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
JSW इन्फ्रा चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
स्पाईस जेट ला हज यात्रेसाठी ७ शहरातून फ्लाईट राईट्स मिळाले.
टायटन दुबईमध्ये ८-१० स्टोर्स उघडणार आहे. १४ आंतरराष्ट्रीय स्टोर्स आता आहेत. आयवेअर आणि वॉचेस मध्ये चांगली ग्रोथ आहे. हायव्हॅल्यू ज्वेलरीमध्ये चांगली ग्रोथ आहे.
 इंडियन हॉटेल्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांचा ऑक्युपन्सी रेट ७२.१ % वरून ७६.८ % झाला. कव्हरेज रूम रेंट १७% ने वाढून Rs १८११ झाला. जिंजर ब्रॅंड्सची ९० हॉटेल्स उघडणार आहेत. इंडियन हॉटेल्स त्यांच्या हॉटेल्स साठी नवीन ब्रँड बनवत आहेत.लवकरच  या नवीन ब्रँड अंतर्गत ते १० हॉटेल्स उघडणार आहेत.
HPCL, BPCL, IOC या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे कॅपेक्स प्लॅन लवकरच पूर्ण होतील BPCL चे कोची शिपयार्ड, मोझंबिक HPCL चे विझगापट्टणम आणि बिना आणि IOC चे ४ लाख कोटींचे कॅपेक्स प्लॅन आहेत. त्यामुळे आज या ऑइल मार्केटिंग कंपन्यांमध्ये चांगली खरेदी झाली.
आज इंट्राडे निफ्टीने ऑलटाइम हाय ( पूर्वीचा २२०८६) पार करून २२१२६ हा नवीन ऑल टाइम हाय प्रस्थापित केला. इंट्राडे मिडकॅप स्मॉल कॅप बँकिंग यांनी रेकॉर्ड पार केले पण मार्केट बंद होता होता मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२०८५ NSE निर्देशांक निफ्टी २१८५३ आणि बँक निफ्टी ४५९७० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.