आजचं मार्केट – ५ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ७७.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.०० च्या  आसपास होते. US $ निर्देशांक १०४.११ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०९% आणि VIX  १५.५३ होते.
USA चा जॉब डेटा ५५३००० नवीन जॉब निर्माण झाले. मेटा आणि अमेझॉन यांचे निकाल चांगले आले फेसबुकने बायबॅक आणि लाभांश जाहीर केला शेअर २०% वाढला.
चीनचा ब्ल्यू चिप निर्देशांक ४.६% घसरला.
FII ने Rs ७१ कोटींची तर DII ने Rs २४६३ कोटींची खरेदी केली
भारताचा कॉम्पोझिट PMI जानेवारीसाठी  ६१.२.( ५८.५) आला तर सर्व्हिस PMI जानेवारी महिन्यासाठी ६१.८( ५९) होता.
सिंगापूर आर्बिट्रेशन ऑथॉरिटीने सोनीचे इमर्जन्सी इंटरींम  रिलीफ साठी अर्ज दाखल करून घ्यायला नकार दिला. झीला NCLT कडे मर्जर अमलांत आणण्यासाठी इंजंक्शन देणे आमच्या ऑथॉरिटीच्या किंवा जुरिसडिक्शनमध्ये येत नाही असे सांगितले. या संबंधात निर्णय NCLT घेईल असे सांगितले.
Paytm च्या बिझिनेस मध्ये KYC अनियमितता,अटींची पूर्तता न करताच कॉम्प्लायन्स देणे.,पेमेंट बँकेने प्रमोटर्सपासून सुरक्षित अंतर न राखणे, KYC घेतल्याशिवाय खूप गाहकांची खाती उघडणे ,एकाच पॅनकार्डावर १००० पेक्षा जास्त खाती उघडणे या सारख्या त्रुटी Paytm बँकेचे व्यवहार बंद करण्यासाठी कारणीभूत  झाल्या असण्याची शक्यता आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रॉफिट ३५% ने कमी होऊन Rs ९१६४ कोटी  झाले.बँकेने कर्मचाऱयांचे वाढणारे पगार (अग्रीमेंट नुसार) आणि पेन्शनसाठी Rs ७१०० कोटींची प्रोव्हिजन केली. NII Rs ३९८१५ कोटी झाले. GNPA २.५५% वरून २.४२% तर NNPA ०.६४ या स्तरावर कायम राहिले. प्रोव्हिजन Rs ११५ कोटींवरून Rs ६८७.५ कोटी झाली तर स्लीपेजिस Rs ३०९८ कोटींवरून Rs ४९६० कोटी झाले.बँकेचे ऍडव्हान्सेस १२.४% ने वाढून Rs ३४.१० लाख कोटी झाले. ऍडव्हान्सेसमध्ये १५%-१६% ग्रोथ अपेक्षित आहे असे व्यवस्थापनाने सांगितले.
टाटा मोटर्सचे :JLR चे मार्जिन वाढले मार्जिन ८% पेक्षा जास्त झाले. नेट प्रॉफिट Rs ७०२५ कोटी झाले. JLR मध्ये FY २०२५ मध्ये पॉझिटिव्ह कॅश फ्लो देईल असे अनुमान आहे.
UPL चे कर्ज वाढले. मार्जिन कमी झाले ४.२% राहिले. व्हॉल्युम ५% कमी झाले. लॉसीस वाढले. व्यवस्थापनाने चौथ्या  तिमाहीचा परफॉर्मन्स  याच्यापेक्षा कमजोर असेल असा गायडन्स दिला.युरोप नॉर्थ USA मध्ये दि-स्टॉक झाले. किमती २४% ने कमी झाल्या.
मेट्रोपोलीस हेल्थ केअरचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
LIC हौसिंगचे प्रॉफिट NII NIM वाढले. GNPA NNPA कमी झाले.
व्हा टेक व्हा बाग ला US $३.३५ कोटींची ऑर्डर मिळाली.
NLC इंडियाच्या २४००MW ओरिसातील संभलपूर मधील तालवीरा प्रोजेक्टचा कोनशिला समारंभ माननीय पंतप्रधांनांच्या हस्ते झाला.
L & T ला Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटींच्या दरम्यान मोठी ऑर्डर हायड्रोकार्बन बिझिनेससाठी मिळाली.
SBI आणि ONGC मधील काही स्टेक  सरकार विकण्याची शक्यता आहे.
 एपीजय सुरेंद्र पार्क हॉटेल्सचा Rs ९२० कोटींचा IPO ( Rs ६०० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ३२० कोटींचा OFS ) ५ फेब्रुवारी २०२४ रोजी ओपन होऊन ७ जानेवारीला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs १४७ तर Rs १५५ असून  मिनिमम लॉट ९६ शेअर्सचा आहे. कंपनीची ८० हॉटेल्स रेस्टारंटस आहेत. IPO च्या प्रोसिड्स पैकी Rs ५५० कोटी कर्जफेड करण्याकरता वापरणार. FY २३ रेव्हेन्यू Rs ५२४.४३ कोटी असून प्रॉफिट Rs ४८.०६ कोटी होते.
राशी पेरिफेरल्स या कंपनीचा Rs ६०० कोटींचा ( हा पूर्णपणे फ्रेश इशू आहे) ७ फेब्रुवारी २०२४ ला ओपन होऊन ९ फेब्रुवारीला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs २९५ ते Rs ३११ असून मिनिमम लॉट ४८ शेअर्सचा आहे. ही एक मुंबई स्थित इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी ग्लोबल टेक्नॉलॉजी ब्रॅंड्सचे डिस्ट्रिब्युशन करते. कंपनी IPO प्रोसिड्स पैकी Rs ३२६ कोटी कर्ज फेडीसाठी आणि Rs २२० कोटी वर्किंग कॅपिटलसाठी वापरेल. कंपनीचा FY २३ साठी Rs ९४५४.३० कोटी रेव्हेन्यू होता.
जना स्मॉल फायनान्स बँकैचा Rs ५७० कोटींचा IPO  ( Rs ४६२ कोटींचा फ्रेश इशू आणि २६.०८ लाख शेअर्सचा OFS) ७ फेब्रुवारी २०२४ ला ओपन होऊन ९ फेब्रुवारीला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ३९३ -Rs ४११ असून मिनिमम लॉट ३६ शेअर्सचा आहे. FY २३ साठी PAT Rs २५५.९७ कोटी आणि रेव्हेन्यू  Rs ३६९९.८८ कोटी होता. या शेअरचे लिस्टिंग १४ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
पंजाब बेस्ड कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचा Rs ५२३.७० कोटींचा ( फ्रेश इशू ऑफ शेअर्स ४५० कोटी आणि ७३.०७ कोटींचा OFS आहे ) IPO ७ फेब्रुवारीला ओपन होऊन ९ फेब्रुवारीला बंद होईल प्राईस बँड Rs ४४५ – Rs ४६८ चा असून मिनिमम लॉट ३२ शेअर्सचा आहे. FY २३ साठी रेव्हेन्यू Rs ७२५.४८ असून PAT Rs ९३.६० कोटी होते.
BLS E-सर्व्हिसेस चे ६ फेब्रुवारीला लिस्टिंग होईल. IPO मध्ये हा शेअर Rs १३५ ला दिला होता.
औरोबिंदो फार्माची सबसिडीअरी EUGIA फार्माची २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान  तपासणी करून USFDA ने ९ त्रुटी दाखवल्या.
अहलुवालिया काँट्रॅक्टसला Rs ३९४ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट हरयाणामध्ये गुरुग्राम येथे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आणि क्लब हाऊस बनवण्यासाठी मिळाली.
बिर्लासॉफ्टने AI प्लॅटफॉर्म COGITO बिझिनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी लाँच केला.
मान इन्फ्रा Rs ३६७ प्रती शेअर या दराने ६८.१२ लाख प्रेफरन्स शेअर्स जारी करणार.
रामकृष्ण फोर्जिंग्स ला ४ वर्ष मुदतीची US $ १.३१ कोटींची ऑर्डर USA नॉर्थ  मधून मिळाली.
केरळ राज्य सरकारने IMFL ( इंडियन मेड फॉरीन लिकर ) वरील एकसाईझ ड्युटी Rs १० प्रती लिटरने वाढवली.
सेंच्युरी प्लायवूडने आंध्र प्रदेशांत नवीन लॅमिनेट युनिट चालू केले.
TCS ने ‘युरोप असिस्टंस’ बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी करार  केला.
भारती एअरटेलचे प्रॉफिट Rs १३४० कोटींवरून Rs २४४२ कोटी झाले तर उत्पन्न Rs ३७०४३ कोटींवरून Rs ३७८९९.५० कोटी झाले. मार्जिन ५३.१% वरून ५२.९% झाले. अर्पू Rs १९३ वरून Rs २०८ झाले.
वरूण  बिव्हरेजीस चे प्रॉफिट Rs ७५ कोटींवरून Rs १३२ कोटी, उत्पन्न Rs २२५७ कोटीवरून २७३१ कोटी झाले तर मार्जिन १३.६% वरून १५.३% झाले. कंपनेने Rs १.२५ प्रतिशेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.
अवंती फीड्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
चोला  फायनान्स चे NII, प्रॉफिट वाढले.
कल्याणी  स्टील्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
ताज GVK चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
KPR मिल्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. कंपनीने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
मान इन्फ्रा चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
SPARC चा तोटा वाढला
RBZ चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
बजाज इलेक्ट्रिकल्स चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.
EIH चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
सुंदरम फायनान्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
आलेम्बिक फार्माचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
युनिकेम लॅब तोट्यातून फायद्यात आली. फायदा Rs ८४ कोटी झाला.
VRL चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
विजया डायग्नॉस्टिक्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
BARBEQ नेशनचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
पारादीप फॉस्फेट्स चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
त्रिवेणी टर्बाइन्सचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
PSE, फार्मा, ऑटो, एनर्जी, रिअल्टी, मेटल्स मध्ये खरेदी झाली. FMCG, इन्फ्रा, IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१७३१ NSE निर्देशांक निफ्टी २१७७१ बँक निफ्टी ४५८२५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.