आजचं मार्केट – ६ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ७८.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते.
USA $ निर्देशांक १०४.१० आणि USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१४% आहे. VIX १५.८६ होते. सोने Rs ६२३०० चांदी Rs ७२४०० च्या आसपास होते.
USA ची PMI ५०.७ झाला. डाऊ जोन्स आधी मंदीत होते. नंतर सुधारले.
चीनचा स्मॉल कॅप इंडेक्स ६% ने पडला
FII ने Rs ५१८.८८ कोटींची खरेदी आणि DII ने  Rs ११८८.६८ कोटींची विक्री केली.
NALCO, UPL ,हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, इंडस टॉवर, झी एंटरटेनमेंट हे बॅन मध्ये होते तर SAIL बॅन मधून बाहेर आला.
भारत सरकारने भारत राईस Rs २९ प्रती किलो या दराने लाँच केला.
HDFC ग्रुपला इंडसइंड बँकेमध्ये ९.९९% पर्यंत घेण्यासाठी परवानगी दिली.
भारती एअरटेलची ८ फेब्रुवारीला लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.
झायड्स  लाईफची ९ फेब्रुवारी २०२४ रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
Paytm मधील  १.०६% इक्विटी मध्ये ( ६८.२५ लाख शेअर्स ) चा  Rs २६९ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
अडाणी टोटल गॅसने INOXCVA बरोबर   LNG आणि LCNG इक्विपमेंट सप्लाय करण्यासाठी करार केला.
इंडिया फोर्ज तोट्यातून फायद्यात आली.रेव्हेन्यूत लक्षणीय वाढ झाली.
 LIC त्यांचे तिमाही निकाल ८ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर करेल आणि लाभांशावर विचार करेल.
IEX चे जानेवारी महिन्यात व्हॉल्युम २६.१% वाढले.
BLS E-सर्व्हिसेसचे BSE वर Rs ३०९ वर आणि NSE वर Rs ३०५ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये
Rs १३५  ला दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
रेटगेन ला ‘एअरगेन प्लॅटफॉर्मसाठी’  एअर सिसिली कडून ऑर्डर मिळाली
L & T ला ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रा बिझिनेससाठी आसाम मध्ये १२.२ KM चा पूल बांधण्यासाठी Rs २५०० कोटी -Rs ५००० कोटींच्या दरम्यान ऑर्डर मिळाली.
एक्झो नोबेलचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ५० प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.
ट्रायडंटचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
CAMS चे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १२ प्रती शेअर इंटरीम लाभांशाची घोषणा केली.
एन्ड्युअरन्स टेकने प्रिंटेड सर्किट बोर्डसचे कमर्शियल स्तरावर उत्पादन सुरु केले.
चंबळ फर्टिलायझर्सचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
TTK प्रेस्टिजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
फोर्स मोटर्सची जानेवारी महिन्यासाठी  विक्री २५०८ युनिट आणि निर्यात ४८१ युनिट झाली.
गोदरेज प्रॉपर्टीजचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.बुकिंग व्हॅल्यू ७६% ने वाढून Rs ५७२० तर कलेक्शन ४३% ने वाढून Rs २४११ झाले. आणि एरिया विक्री ४.३४MSF झाली.
PNC इन्फ्रा चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
अशोक लेलँडचे प्रॉफिट ६०.५% वाढले . रेव्हेन्यू २.७% ने वाढले. मार्जिन १२.८% राहिले.
टाटा केमिकल्सचा प्रॉफिट ६०% ने  कमी झाले रेव्हेन्यू १०% ने कमी झाला.
ASK ऑटोमोटिव्हचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमच्या ५ राज्यात १५ उत्पादन युनिट आहेत. आम्ही लवकरच दक्षिण भारतात नवीन युनिट सुरु करत आहे. चौथ्या तिमाहीत डबल डिजिट ग्रोथ अपेक्षित आहे.
सोनी मर्जर संबंधांत झी एंटरटेनमेंटचा अर्ज  NCLT ने दाखल करून घेतला. याची सुनावणी १२ मार्चला होईल.
सुवेन लाइफ सायन्सेसला त्यांच्या डिप्रेशनवरील ‘ROPANICANT’  औषधासाठी USA मध्ये पेटंट मिळाले
अजमेरा रिअल्टीज चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
गो फॅशन चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
पंजाब केमिकल्स चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
उषा मार्टिन चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
SP अपरल्स ने ‘यंग ब्रँड अपरल्स’ मधील १००% स्टेक  Rs २२३ कोटीना  घेतला.
आज पासून भारतात ऊर्जा संमेलन चालू झाले. कॅनडा,जर्मनी, नेदर्लंड्स, रशिया, ब्रिटन, इंडिया हे देश या संमेलनांत सामील होतील.
गुड इयर टायर्स या कंपनीने Rs २६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. या साठी १२ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
वेलस्पन कॉर्प चे प्रॉफिट, उत्पन्न आणि मार्जिन वाढले.
हॉकिन्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
JK  टायर चे प्रॉफिट उत्पन्न वाढले कंपनीने Rs १ अंतरिम लाभांश जाहीर केला.
इमामीचे प्रॉफिट उत्पन्न मार्जन वाढले निकाल सुंदर आले.
नायिका चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
टाटा टेलीचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
Eveready चे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले.
टाटाग्रुप त्यांच्या टाटा NEU या अँपद्वारे ONDC ( ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) द्वारा फूड ऑर्डरींग बिझिनेस मध्ये पदार्पण करत आहेत.
NLC तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १.५० प्रती शेअर लाभांश दिला.
JB केमिकल्सचा प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
 V-मार्ट चे उत्पन्न वाढले फायदा वाढला
पेट्रोनेट LNG ने कतार बरोबर ७.५ MMTPA LNG साठी दीर्घ (२०४८ सालपर्यंत)  मुदतीचा करार केला.
(७५ लाख मेट्रिक टन LNG)
आज ऑटो, फार्मा, पेपर, सिमेंट, हॉटेल्स चे शेअर्स तेजीत होते. बँकिंग मध्ये प्रॉफिट बुकींग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२१८६ NSE निर्देशांक निफ्टी २१९२९ आणि बँक निफ्टी ४५६९० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.