आजचं मार्केट – ७ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ७८.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक  १०४.११ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०९%  आणि VIX १५.९० होते. सोने Rs ६२५०० आणि चांदी
Rs ७०५०० च्या आसपास होते.
मूडीज ने रिजनल बँकांची रेटिंग जंक केली. न्यूयॉर्क कम्युनिटी बँक २२% पडली टोटल हाऊसहोल्ड कर्ज  US १७.५० ट्रिलियन झाले.
गोदावरी पॉवर Rs ६००० कोटींची गुंतवणूक करून स्टील प्लांट लावणार  आहे.
Kaynes ने सेमीकंडक्टर ट्रैनिंग साठी ‘APTOS टेक’ बरोबर करार केला.
कायनेटिक होंडा लुनाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे.
BF युटिलिटी, DP आभूषण , बिर्ला केबल चे सर्किट लिमिट ५% वरून २०% केले
JSPL ने कोलबेस्ड प्लांटसाठी बोली लावली. याआधी अडाणी पॉवर आणि वेदांता ने बोली लावली आहे.
चीनमधील स्टेट इन्व्हेस्टमेंट फंड त्यांचे शेअर होल्डिंग वाढवत आहेत.
FII ने Rs ९२.५२ कोटींची खरेदी आणि DII ने Rs १०९६ कोटींची खरेदी केली.
अशोक लेलँड, हिंदुस्थान कॉपर , इंडिया सिमेंट, इंडस टॉवर, NALCO, UPL आणि  झी एंटरटेनमेंट बॅन मध्ये होते.
ऑइल इंडिया ही कंपनी लिबियामध्ये ड्रिलिंग ऑपरेशन्स सुरु करणार आहे.
कॅनरा बँक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्टॉक स्प्लिट वर विचार करणार आहे.
टाटा स्टील आणि TRF यांचे मर्जर सध्या स्थगित करण्यात आले आहे.
IOB मध्ये २.२९ कोटी शेअर्सचा तर Paytm मध्ये २०.९१ लाख शेअर्सचा लार्ज ट्रेड झाला.
उनो मिंडा चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
गुजरात फ्लुओरोचे प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन कमी झाले.
ट्रेन्टचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीचे निकाल चांगले आले.
नागार्जुन फर्टिलायझर्सचा लॉस मोठ्या प्रमाणात वाढला.
वासकॉन engg चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
झुरिच इन्शुअरन्स कंपनी कोटक महिंद्रा जनरल इन्शुअरन्स मध्ये ७०% स्टेक घेणार आहेत.याला CCI नी मंजुरी दिली आहे.
EIH चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
ड्रीमफोक्स प्रॉफिट, उत्पन्न वाढते मार्जिन कमी झाले.
NLC तोट्यातून फायद्यात आली.
मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस चे APE Rs १७९५ कोटी, VNB Rs ४८९ कोटी VNB मार्जिन २७.२४% कंपनीचे APE वाढले VNB आणि VNB मार्जिन कमी झाले.
नजारा टेक चे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
फर्स्ट सोर्स चे प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू वाढले मार्जिन कमी झाले.
नेस्लेने Rs ७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. लाभांशासाठी १५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे,  प्रॉफिट ४.४% ने वाढून Rs ६५५ कोटी झाले. रेव्हेन्यू ८% ने वाढून Rs ४६०० कोटी झाला. टोटल सेल्स १३.३% वाढले. कंपनीने  वनटाइम लॉस ऑफ १०७.३० कोटी बुक केला. नेसकॅफे मिल्क आणि न्यूट्रिशन प्रॉडक्टस यामध्ये डबल डिजिट ग्रोथ दिसली.
रेड्डींग्टनचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
EID पॅरीचे प्रॉफिट उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.
ब्रिटानियाचे प्रॉफिट Rs ९३२ कोटींवरून YOY Rs ५५६ कोटी झाले. उत्पन्न Rs ४१९७ कोटींवरून Rs ४२५६ कोटी झाले. कंपनीची व्हॉल्युम ग्रोथ ५.५% होती.
रॅडिको खेतान चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
शीला फोमचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
आझाद इंजिनीअरिंगला प्रॉफिट Rs ३.८३ कोटींवरून १६.८ कोटी झाले. रेव्हेन्यू ४९% झाले. एनर्जी मधून ८१% आणि एअरोस्पेस आणि डिफेन्स १७%  रेव्हेन्यू आला.
QUESS कॉर्प ने QDIGI युनिटमधील १००% स्टेक ऑनसाईट इलेकट्रो ला Rs ८० कोटीला विकला.
SHALBY चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
रामको सिस्टिम्स चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.
सोलर इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
पराग मिल्कचे प्रॉफिट वाढले,इन्कम वाढले.
नवनीत एज्युकेशन फायद्यातून तोट्यात गेली.
FDC चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
GPT इंफ्राप्रोजेक्टला Rs ११४ कोटींची ऑर्डर मिळाली.
VARROC इंजिनीअरिंग चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
नोसिल चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
पॉवर ग्रीड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ४.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला .
आज बँकिंग, एनर्जी, फार्मा मेटल्स मध्ये खरेदी तर IT क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२१५२ NSE निर्देशांक निफ्टी २१९३० बँक निफ्टी ४५८१८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.