आजचं मार्केट – ८ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ७९.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.११ तर VIX १५.६५ होते. सोने Rs ६२४०० तर चांदी
Rs ७०२०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होते.
इंद्रप्रस्थ गॅस १९ कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्लांट दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे लावणार आहे.
VENKY’S फायद्यातून तोट्यात गेली. Rs  १७ कोटीं फायदा YOY  कंपनीला Rs ८ कोटी तोटा झाला. उत्पन्न १०३६ कोटींवारून ९५३ कोटी झाले. मार्जिन कमी झाले.
झायड्स वेलनेस चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
ग्रीव्हज कॉटन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.
कारट्रेड फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
३M चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
रत्तन इंडिया तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले.
मुकंदचे प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
BEML चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
थरमॅक्सचे  प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले
सरकार MRPL आणि पारादीप फॉस्फेट यांचे मर्जर करणार आहे. MRPL च्या १०० शेअर्सला पारादीप फॉस्फेटचे १४७ शेअर्स मिळतील.
IRB इन्फ्राचे टोल  कलेक्शन २५% ने वाढले. वेलस्पन इंटरप्रायझेसला Rs ४१२८ कोटींचे प्रोजेक्ट .घाटकोपरमध्ये मिळाले.
मनकाईन्ड फार्माने मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग नॉर्म्सचे  पालन करण्यासाठी  त्यांच्या प्रमोटर्सनी १.६२% स्टेक  Rs २०५० फ्लोअर प्राईसने Rs १३३० कोटींना विकले.
अपोलो टायर्सचे प्रॉफिट ७८% ने वाढले रेव्हेन्यू २.७% ने वाढला.
SJVN ला गुजरात ऊर्जा निगम कडून २०० MW साठी LOI मिळाले.
ल्युपिनचे प्रॉफिट Rs १५३.५ कोटींवरून Rs ६१३.१० कोटी तर रेव्हेन्यू २०.२% ने वाढून Rs ५१९७.४० कोटी झाले. US बिझिनेस २३.७% ते डोमेस्टिक बिझिनेस १३.४% वाढला.
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस चे प्रॉफिट १७.३% कमी झाले  रेव्हेन्यू ९.५% ने वाढून Rs ३८०४ कोटी झाला कंपनीने Rs ९१.५३ कोटींचा एक्ससेप्शनल लॉस बुक केला.
वान्ड्रेला हॉलिडेजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
मॅरेथॉन नेक्सटजेन चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
विंडलास बायोटेक चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
बलरामपूर  चिनीचे प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
अपोलो हॉस्पिटल्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
पेज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs १०० प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला.
हिंदुस्थान फुड्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. एस्कॉर्टस कुबोटा चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
झोमॅटो तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न मार्जिन वाढले.
पतंजली फूड्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन कमी झाले.
आज RBI ने त्यांचे द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. त्यांनी व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
रेपोरेट ६.५०% रिव्हर्स रेपो रेट ३.३५% SDF ६.२५% आणि MSDF आणि बँक रेट ६.७५% कायम ठेवले.
RBI ने त्यांचा विथड्रॉव्हल ऑफ  अकोमोडेशन हा स्टॅन्डही कायम ठेवला. वर्ष २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था सुधारेल अशी आशा आहे. भारताची GDP ग्रोथ ७.३% राहील असे अनुमान आहे.
RBI ने सांगितले की बिझिनेस ऍक्टिव्हिटी वाढत आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस PMI वाढत आहेत. ग्रामीण भागात मागणी वाढत आहे. सरकार विविध क्षेत्रांत भांडवली गुंतवणूक करत आहे. त्यामुळे क्षमता उपयोगात वाढ होत आहे. खाजगी गुंतवणूक वाढत आहे. CAD मॅनेजेबल आहे. भारताच्या  चलनाचा ( रुपयांचा ) विनिमय दर स्थिर आहे. RBI ने महागाईचे लक्ष ४% ठेवले आहे.फिझिकल इन्फ्रा, डिजिटल टेक्नॉलॉजी यात प्रगती होत आहे. रबीची पेरणी समाधानकारक आहे. खाद्यान्नाची महागाई मधून मधून वाढत आहे. बँकांमध्ये लिक्विडीटी पुरेशी आहे.
RBI ने GDP ग्रोथ रेट FY २०२४-२०२५ साठी ७% राहील असे अनुमान केले आहे. हा पहिल्या तिमाहीत ७.२% दुसऱ्या तिमाहीत ६.८% तिसऱ्या तिमाहीत ७.०० आणि चौथ्या तिमाहीत ६.९% राहील असे अनुमान केले आहे.
RBI ने FY २०२३ -२०२४ साठी महागाईचे अनुमान ५.४% केले आहि FY २०२३-२०२४ च्या चौथ्या तिमाहीत महागाईचे अनुमान ५% केले आहे. FY २०२४-२०२५ साठी महागाईचे अनुमान ४.५% केले आहे.
FY २०२४-२०२५ च्या पहिल्या तिमाहीत ५% दुसऱ्या तिमाहीत ४% तिसऱ्या तिमाहीत ४.६% आणि चौथ्या तिमाहीत ४.७% राहील असे अनुमान केले आहे.
RBI ने इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म साठी २०१८ मध्ये रेग्युलेटरी फ्रेमवर्क इशू केले होते. RBI लवकरच सुधारित रेग्युलेटरी फ्रेमवर्क जाहीर करेल. ०
रेसिडेंट एंटिटीजना आता IFSC वर OTC गोल्ड ची किंमत हेज करता येईल.
RBI ने सांगितले आता बँकेला MSME आणि रिटेल कर्जासाठी बँक आकारत असलेल्या प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंट चार्जेस, व्हॅल्युएशन चार्जेस आणि इतर कोणत्याची चार्जेसचा समावेश करून लोन साठी  सर्व समावेशक वार्षिक व्याज दर निश्चित करायला सांगितला आहे. यासाठी बँकेला रिटेल आणि MSME कर्जासाठी ऑल इनक्लुजिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट असलेले ‘KEY FACTOR STATEMENT’ द्यायला सांगितले आहे.
ONGC ने रिन्यूएबल एनर्जीसाठी NTPC बरोबर करार केला.
PFC चे निकाल चांगले आले कंपनीने Rs ३.५० लाभांश जाहीर केला.
आज FMCG, बँकिंग.,ऑटो, रिअल्टी फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. एनर्जी आणि IT मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेंसेक्स  ७१४२८ NSE निर्देशांक निफ्टी  २१७१७ बँक निफ्टी ४५०१२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.