आजचं मार्केट – ९ फेब्रुवारी 2024

.
आज क्रूड US $ ८१.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१५ आणि VIX १६ होते. सोने Rs ६२५०० चांदी
Rs७१००० च्या आसपास होती.
USA चे जॉब मार्केट, अर्थव्यवस्था अरनिंग मजबूत आहे.
एंटेरो चा Rs १६०० कोटींचा ( यांत Rs १००० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ६०० कोटींचा OFS ) IPO ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ओपन होऊन १३ फेब्रुवारीला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ११९५ ते Rs १२५८ असून मिनिमम लॉट ११ शेअर्सचा आहे. दर्शनी किंमत Rs १० असून फेब्रुवारी १६ २०२४ ला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. ही कंपनी हेल्थकेअर प्रॉडक्ट  डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रात असून १९०० हेल्थ केअर प्रोडक्ट उत्पादक करणाऱ्या कंपन्यांशी संबंध असून ६४५०० औषध विकणाऱ्या संस्था, ८१०००फार्मसीज  आणि ३४०० हॉस्पिटल्स ग्राहक आहेत..कंपनीची १९ राज्यातील ३७ शहरांत  ७३ वेअरहाऊसेस आहेत.कंपनी ऑन लाईन औषधे  विकते.२३ साठी कंपनीचा रेव्हेन्यू ३३०५.७२ कोटी असून कंपनीला Rs ११.१० कोटी लॉस झाला होता
     LIC चे प्रॉफिट ४९.१% वाढून Rs ९४४४.४० कोटी झाले. नेट प्रीमियम इन्कम ४.७% ने वाढून Rs १,१७,०१७ कोटी होते. नेट  कमिशन ३.२% वाढून Rs ६५२० कोटी झाले.
BHEL ला हरियाणा पॉवर जनरेशन कॉरपोरेशन कडून १X ८०० MW अल्ट्रा सुपर क्रिटिकल एक्स्पान्शन युनिट यमुना नगरमध्ये लावण्यासाठी Rs ५५७० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
बायोकॉन तोट्यातून फायद्यात आली Rs ६६० कोटी फायदा झाला. रेव्हेन्यू ३४.४% Rs ३९५३.७० कोटी झाले.
युनायटेड बिव्हरेजीस तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट Rs ८४.८५ कोटी झाले रेव्हेन्यू १३.१% वाढून Rs १८२२ कोटी झाला.
टॉरंट पॉवरचा फायदा ४७.४% ने कमी होऊन Rs ३५९.८ कोटी झाला. रेव्हेन्यू १.२% ने वाढून Rs ६३६६ कोटी झाला.
सूर्योदय  स्मॉल फायनान्स बँकेचे प्रॉफिट २१७% ने वाढून Rs ५७.२२ कोटी झाले. यात इतर इन्कम ५१.९ कोटी ( १०२.३% ) वाढले.
रेल्वेच्या ६ प्रोजेक्टसना मंजुरी मिळाली.
सरकारने स्पेक्ट्रम ऑक्शन ला मंजुरी दिली.
एस्कॉर्टस ने त्यांचा गायडन्स +३% वरून -६% इतका कमी केला.
 MAX  ‘ऍलेक्सिस मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये १००% स्टेक  घेणार आहे.
ऑन मोबाईल ग्लोबल फायद्यातून तोट्यात गेली. Rs ८.५ कोटींच्या फायद्यातून Rs २.५ कोटी तोट्यात गेली.
J कुमार इन्फ्रा आणि NCC च्या JV ला Rs ४५४८ कोटींची ऑर्डर मिळाली.
PVR इनॉक्स ने इनॉक्स-एरॉस या नावाने मल्टिप्लेक्स चालू केले..
NRB बेअरिंगचा तोटा वाढला उत्पन्न कमी झाले.
MRF चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले कंपनीने Rs ३ इंटरीम लाभांश जाहीर केला.
PSP  प्रोजेक्ट्सचे  प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
बजाज हिंदुस्थान ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.उत्पन्न वाढले.
झायड्स लाईफचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs १००५ प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर रुटने बायबॅक जाहीर केला. कंपनी या बायबॅकवर Rs ६०० कोटी खर्च करेल.
अल्केम लॅबचे  प्रॉफिट उत्पन्न मार्जिन  वाढले.
सफायर फुड्सचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
इमामी चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
मोल्ड ट्रेक चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
डाटामाटिक्स चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.
हेरंब इंडस्ट्रीजचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन  वाढले.
इंडिगो पेंटस्चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
पारस डिफेन्स चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
रॉयल ऑर्चिडचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
तेगा इंडस्ट्रीज प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
INBREAER डिफेन्स आणि सेक्युरिटी बरोबर महिंद्रा आणि महिंद्रा ने करार केला.
ग्लोबस स्पिरिटचा  फायदा उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
जैन इरिगेशन तोट्यातून फायद्यात आली.
भारती एअरटेलला ६ सर्कल मध्ये  स्पेक्ट्रम अलॉट  केले.
GNA  एक्सल निकाल कमजोर आला. फायदा उत्पनात  मोठी घट झाली
सारेगम फायदा  कमी झाला उत्पन्न वाढलं मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ४ लाभांश जाहीर केला.
शालिमार पेंट्स तोटा वाढला, उत्पन्न वाढले,
इझी ट्रिप चा फायदा वाढला, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
हुडको चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न आणि NII वाढले.
GMDC प्रॉफिट आणि उत्पन्न कमी झाले.
SJVNचे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.
बंधन बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले GNPA आणि NNPA कमी झाले.
IT, इन्फ्रा, ऑटो मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. बँकिंग फार्मा FMCG मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक ७१५९५ NSE निर्देशांक निफ्टी २१७८२ आणि बँक निफ्टी ४५६३४ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.