आजचं मार्केट – १२ फेब्रुवारी 2024

आज क्रूड US $ ८१.९०  प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१७ आणि VIX १६.१० होते. सोने Rs ६२५०० आणि चांदी ७१३०० च्या आसपास होते. बेस मेटल मंदीत होते.
जानेवारीचा CPI ५.६९ वरून ५.१० झाला. डिसेंबर महिन्यासाठी  IIP २.४ वरून ३.८ झाला.
आज साऊथ कोरिया, जपान, हॉंगकॉंग, सिंगापूर, मधील मार्केट्स चायनीज न्यू इयर साठी बंद आहेत.
S & P, NASDAQ मध्ये तेजी होती तर डाऊ जोन्स मंदीत  होते. NVIDIA मध्ये एका महिन्यात ३२% तेजी झाली.
राणे इंजिन आणि राणे ब्रेक्स या दोन्ही कंपन्या राणे मद्रास मध्ये मर्ज होतील, राणे इंजिनच्या २० शेअर्सला राणे मद्रासचे ९ ध्येअर्स मिळतील तर राणे ब्रेक्सच्या २० शेअर्सला राणे मद्रास चे २१ शेअर्स मिळतील. मर्जरनंतर  राणे मद्रासमध्ये राणे होल्डींगचा ६३.८% स्टेक  असेल.
इजी ट्रिप जीवनी हॉस्पिटॅलिटीमध्ये  ५०%  स्टेक Rs १०० कोटींना घेणार आहे. कंपनी अयोध्येला ५ स्टार हॉटेल बांधणार
यथार्थ हॉस्पिटलने फरिदाबाद येथील  १७५ बेड्सचे  फिडेलिस हॉस्पिटल खरेदी केले.
सरकारने सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड चा इशू सुरु केला. यामध्ये सरकारने Rs ६२६३ प्रती १ ग्राम ( ऑन लाईन खरेदी केले तर Rs ५० डिस्काउंट) या किमतीने केले. या बॉण्ड्स वर २.५% व्याज मिळेल आणि ते दर सहामाहीला व्याजाचे पेमेंट केले जाईल.
ONGC चे प्रॉफिट १०% ने कमी होऊन Rs १०३५६ कोटी ( ११४८९.००) कोटी झाले. रेव्हेन्यू २.२% ने कमी होऊन १६५५६९ कोटी झाले ( १६९२१३ कोटी) झाला. कंपनीने Rs ४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी कंपनीने फेब्रुआरी १७ २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. पन्ना मुक्ता प्लॅटफॉर्म बंद असल्यामुळे उत्पादन ३.३ % ने कमी होऊन ५.२१९ MMT  झाले.
मिधानी ( मिश्र धातू निगम) चे प्रॉफिट Rs १२.५० कोटी  ( ३८.५० कोटींवरून) झाले. उत्पन्न YOY ८.८५% वाढून Rs २५२ कोटी झाले.
फेब १३ २०२४ ला ओपन होऊन  विभोर स्टील पाईप्स चा Rs ७२ कोटींचा IPO १५ फेब्रुवारीला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs १४१-Rs १५१ असून मिनिमम लॉट ९९ शेअर्सचा आहे. कंपनी क्रॅश बॅरियर्स, शेतीसाठी, पाणी, ऑइल, गॅस वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टील पाईप्स बनवते. कंपनीचे महाराष्ट्रांत रायगढ़ येथे आणि तेलंगणात मेहबूबनगर येथे प्लांट आहेत कंपनीला FY २३ मध्ये २१.०७ कोटी प्रॉफिट आणि १११४.३८ कोटींचा रेव्हेन्यू झाला.
आज एपीजय सुरेंद्र पार्क हॉटेल चे BSE वर Rs १८१ आणि NSE वर Rs १८१ लिस्टिंग झाले.
फेब्रुवारी १४ २०२४ रोजी जन स्माल फायनान्स बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आणि राशी पेरिफरल्स या कंपन्यांचे लिस्टिंग होईल.
होनासा  कंझ्युमर्सचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
औरोबिंदो फार्मा प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
ऍडव्हान्स एन्झाईमचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
डिव्हीज लॅबचे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
रेणुका शुगर फायद्यातून तोट्यात गेली मार्जिन कमी झाली.
MCX फायद्यातून तोट्यात गेली उत्पन्न वाढले.
PI इंडस्ट्रीज प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ६ इंटरीम लाभांश जाहीर केला.
डिश टीव्हीचा लॉस कमी झाला उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
IRFC चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले.
इनॉक्स ग्रीन फायद्यातून तोट्यात गेली.
मुथूट फिनकॉर्प चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.
फ्रान्स नंतर आता श्रीलंकेत आणि मॉरिशसमध्ये सुद्धा UPI  सुरु होणार आहे.
अनुप ENGG चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
CERA सॅनिटरीवेअर चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
EMS लिमिटेडचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
साकुमा  एक्स्पोर्टने मक्याच्या व्यापारांत पदार्पण केले.
NHPC चे प्रॉफिट कमी झाले, इन्कम कमी झाले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १.४० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
ऑरोबिंदो च्या ‘DEFLAZACORT’ औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
BASF चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
SEAMAC ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली मार्जिन ४५% राहिले.
संवर्धनाचे मदर्सन चे प्रॉफिट वाढले मार्जिन वाढले उत्पन्न वाढले.
प्रिकॉट मिल्स तोट्यातून फायद्यात आली उत्पन्न कमी झाले.
थरमॅक्सचे निकाल चांगले आले. प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. व्यवस्थापनाने सांगितले की ते इंडस्ट्रियल प्रॉडक्टस, इंडस्ट्रियल इन्फ्रा, ग्रीन सोल्युशन्स आणि केमिकल्स अशा चार क्षेत्रांत काम करतात. इंडस्ट्रियल प्रॉडक्टसमध्ये २०% ग्रोथ आहे. रिफायनिंग, पॉवर, स्टील आणि केमिकल्स यामध्ये ऑर्डर्सचे प्रमाण कमी झाले. तिसऱ्या तिमाहीत Rs २५०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या. कंपनी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक एनर्जी क्षेत्रात करणार आहे.
सिग्नेचर ग्लोबल गुरुग्राममध्ये Rs ४५०० कोटींचे एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे.
आज IT  आणि फार्मा क्षेत्रात खरेदी झाली. तर PSE, PSU बँका,ऑटो  एनर्जी, मेटल्स, रिअल्टी, FMCG  या क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७१०७२ NSE निर्देशांक निफ्टी २१६१६ बँक निफ्टी ४४८८२ वर बंद झाले. 

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.