आजचं मार्केट – २७ फेब्रुवारी २०२४

.
८२.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.७८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२७ आणि VIX १५.८८ होते. सोने Rs ६२२०० च्या आसपास तर चांदी Rs ७०००० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होते.
जपानमधील महागाई कमी झाली.
FII ने Rs २८५ कोटींची तर DII ने Rs ५कोटींची विक्री केली.
ABFRL, बलरामपूर चिनी, कॅनरा बँक, SAIL, झी एंटरटेनमेंट, हे बॅन मध्ये होते.
हिंदुस्थान कॉपर, बायोकॉन, GMR, GNFC, RBL बँक, अशोक लेलँड, पिरामल इंटरप्रायझेस, PVR इनॉक्स हे बॅन मधून बाहेर आले.
Paytm पेमेंट बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधून श्री विजय शेखर शर्मा यांनी राजीनामा दिला. सेंट्रल बँकेचे चेअरमन श्रीनिवासन श्रीधरन आणि IAS देवेंद्रनाथ सारंगी आणि BOB चे अशोककुमार गर्ग यांचा समावेश करण्यात आला,
CMS इन्फोचे प्रमोटर त्यांचा २६.७% स्टेक  ब्लॉक डील च्या माध्यमातून Rs ३६० फ्लोअर प्राईसने Rs १५०० कोटींना विकणार.
२७ फेब्रुवारी आणि २८ फेब्रुवारी २०२४ रोजी आंध्र सिमेंट OFS च्या माध्यमातून ५% EQUITEE विकणार आहे. सागर सिमेंटचा आंध्र सिमेंटमध्ये ९५% स्टेक  आहे. प्रमोटर्सचा स्टेक  कमाल ७५% असू शकतो .
कॅनरा बँकेने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट केले.
ICICI लोम्बार्डमधील भारती इंटरप्रायझेसचा स्टेक भारती इंटरप्रायझेसने विकला ICICI बँकेने ICICI लोम्बार्डमध्ये स्टेक खरेदी केला.
महानगर गॅस मध्ये ‘३EV’ ने Rs ९६ कोटींमध्ये ३१% स्टेक घेतला.
PVR INOX ने अंधेरी पूर्व येथे ICONIC संगम सिनेमा पुन्हा सुरु केला.
झायड्स लाईफ चा शेअर बायबॅक २९ फेब्रुवारी २०२४ पासून ६ मार्च २०२४ दरम्यान ओपन राहील.
क्रॉम्प्टन ला Rs २२ कोटींची ऑर्डर मिळाली. सोलर वॉटर पम्प सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली.
JTEKT ला MS GEARLINE च्या  क्षमतेचा  विस्तार करायला मंजुरी मिळाली.
DCM श्रीराम ऍडव्हान्स मटेरियलच्या बिझिनेसमध्ये Rs १००० कोटींची गुंतवणूक करणार. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
महाराष्ट्र राज्य सरकार ग्लोबल फास्ट फूड चेन्सची तपासणी करणार आहे. नॉन चीज आयटेम्सच्या भ्रामक प्रमोशन साठी चौकशी करणार आहे. वेस्टलाइफ फूड आणि मॅक्डोनाल्ड्स च्या सर्व आउटलेट्स ची तपासणी करणार आहे.
विप्रोनी नोकिया बरोबर ५G प्रायव्हेट वायरलेस सोल्युशन लाँच केले.
‘VI’ ची फंड रेझिंग वर विचार करण्यासाठी बैठक आहे.
HFCL ला ऑप्टिकल फायबर केबल सप्लाय करण्यासाठी Rs ४०.३६ कोटींची ऑर्डर मिळाली.
TVS मोटर्स चा आर्म TVS (सिंगापूर) ही कुवेत GMBH मधील शेअर होल्डिंग ३९.२८% वरून ४९% करणार आहे. यासाठी ते युरो ४ मिलियन खर्च करतील.
MCX ने जकार्ता फ्युचर्स एक्स्चेंज बरोबर नॉलेज शेअरिंग, रिसर्च, एज्युकेशन, ट्रेनिंग अवेअरनेस क्रिएशन आणि मार्केटला आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टींसाठी MOU केले.
पॉवर मेकला  ‘दाढापरा बेलाहा डागोरी निपाणिया भातापारा हाथबंध’ या छत्तीसगढ राज्यातील स्टेशनांना जोडणाऱ्या रेल्वे लाईन साठी Rs ३९६.२५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
AVG लॉजिस्टिक्स ला इंडियन रेल्वे कडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
इज माय ट्रिप ने लीप इयर ट्राव्हेल सेल ची घोषणा केली. ट्राव्हेल बुकिंगवर डिस्काउंट मिळणार.
मीरा इंडस्ट्रीजला US $ २०४८०० ची ऑर्डर मिळाली
देल्हीवरीला फ्रेट शिपिंग कॉन्ट्रॅक्ट वेलनेस ब्रँड PLIX कडून क्रॉस बॉर्डर फ्रेट शिपिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
अडाणी ग्रीनचे रेटिंग BBB आणि आऊटलूक स्टेबल केले.
आयुर्वेदाअंतर्गत औषधे ही ऍलोपॅथीच्या औषधांपेक्षा जास्त गुणकारी आहेत अशी जाहिरात करण्यावर पतंजलीला मनाई केली. कंपनी कोठेही प्रोडक्ट औषध म्हणून विकू शकत नाही.
युनियन बँकेने मारुती इंडस्ट्रीज बरोबर इन्व्हेन्टरी फंडिंग साठी करार केला.
आज IT रिअल्टी मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३०९५ NSE निर्देशांक निफ्टी २२१९८ आणि बँक निफ्टी ४६५८८ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.