आजचं मार्केट – २९ फेब्रुवारी २०२४

आज क्रूड US $ ८३.५४ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२८ आणि VIX १५.५७ होते. सोने Rs ६२२०० तर चांदी Rs ६९२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये तेजी तर नैसर्गिक गॅस मध्ये मंदी होती.
FII ने Rs १८७९ कोटींची विक्री तर DII ने Rs १८२७.४५ कोटींची खरेदी केली. इंडस टॉवर  आणि SAIL  हे बॅन मध्ये आहेत ABFRL कॅनरा बँक आणि झी हे बॅन मधून बाहेर पडले.
मार्च महिन्याच्या सिरीज साठी खालीलप्रमाणे काही रोलओव्हर झाले.
मॅक्स फायनॅन्शियल्स, ग्लेनमार्क फार्मा ९५% , गोदरेज कंझ्युमर ९३%, DLF ९२%, JSPL, डाबर ९१% , महानगर गॅस, वोल्टास ९०% इंडस टॉवर  ८९% बर्जर पेंट्स, आयशर मोटर्स SBI कार्ड्स ८८% आणि विप्रो ८७% झाले.
BEML ला इस्टर्न कोल फिल्ड्स कडून Rs ७३ कोटींची ऑर्डर मिळाली.
निफ्टीच्या रिबॅलन्सिंग मध्ये UPL ला निफ्टी ५० मधून वगळण्यात आले तर श्रीराम फायनान्स या कंपनीचा समावेश करण्यात आला. या कंपनीचे ६ महिन्याचे सरासरी फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन  योग्य आहे. या शेअरमध्ये US $ २७.१ कोटी इंफ्लो येण्याची शक्यता आहे.
PFC, REC, IRFC, अडाणी पॉवर, IRCTC, रिलायन्स जिओ, हे निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये सामील होतीळ.
PI इंडस्ट्रीज, प्रॉक्टर गॅम्बल हेल्थ आणि हायजिन, अडाणी विल्मर आणि MUTHUT  फायनान्स, श्रीराम फायनान्स  हे निफ्टी नेक्स्ट ५० मधून बाहेर पडतील. हे रिबॅलन्सिंग  २८ ,मार्च २०२४ पासून अमलांत येईल.
कोल इंडियाने BHEL बरोबर कोल टू  केमिकल्स  बिझिनेस प्रोजेक्टसाठी करार केला.
GPT हेअल्थकेअर चे  BSE वर Rs २१६ वर आणि NSE वर Rs २१५ वर लिस्टिंग झाले. हा शेअर Rs १८६ ला IPO मध्ये दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना माफक लिस्टिंग गेन्स झाले.
PB फिनटेक या कंपनीला कॉम्पोझिट इन्शुअरन्स ब्रोकर म्हणून काम करायला IRDAI नी परवानगी दिली.
व्हीनस पाईप्स ही कंपनी Rs १७५ कोटींची गुंतवणूक करून पाईप फिटिंगच्या व्यवसायात उतरणार आहे.
ऑइल इंडिया ८ मार्चच्या बैठकीत दुसरा अंतरिम लाभांश देण्यावर विचार करेल.
KSB पॅम्पचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs १७.५० लाभांश जाहीर केला. रिलायन्स इंडस्ट्रीज, VIA COM १८ मेडिया आणि वॉल्ट डिझनी यांनी JV केले. रिलायन्स इंडस्ट्रीज या JV मध्ये Rs ११५०० कोटी गुंतवेल. स्टार इंडियाला आता रिलायन्स इंडस्ट्रीज कंट्रोल करेल. रिलायन्स डिझनी JV ची व्हॅल्यू Rs ७०३५२ कोटी आहे. डिझनीच्या  ३०००० कन्टेन्ट ऍसेटचे लायसेन्स JV च्या मालकीचे होईल. नीता अंबानी या JV च्या चेअरमन  असतील.
गुजरात गॅसने कमर्शियल गॅस च्या किमती Rs ४५.४२/SCM वरून Rs ४१.६८/SCM केली.
SVF इंडिया होल्डिंग्ज ने Paytm मधील त्यांचा २.१७% स्टेक  विकला. आता त्यांच्याकडे २.८३% Paytm मधील स्टेक आहे.
आज सुप्रीम कोर्टाने औषधांच्या आणि विविध वैद्यकीय सेवांसाठी आकारण्यात येणारे  कमाल दर सरकारला ठरवायला सांगितले. जर सरकारने त्वरित या बाबतीत कारवाई केली नाही तर सुप्रीम कोर्टाला हे दर निश्चित करावे लागतील असे सांगितले. ही बातमी आल्यावर सर्व हॉस्पिटल चालवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले. अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअरमध्ये १.८५ लाख शेअर्सचे म्हणजे ०.१३% इक्विटीचे लार्ज डील झाले.
हॅप्पीएस्ट माईंड ने NEXTJENXDR सर्व्हिसेस साठी ‘SECURE WORKS’  बरोबर करार केला.
CG पॉवरला Rs १८९ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
NBCC ला दिल्ली मध्ये कमर्शियल स्पेस विक्रीतून Rs २७३ कोटी मिळाले.
मॅरिको या कंपनीने Rs ६.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला आणि १९ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
सुझलॉन ३ MW विंड टरबाइन ची १० विंड टर्बाइन्स सप्लाय करणार आहे.
NBCC च्या सब्सिडिअरीला महाराष्ट्र राज्य सरकारकडून Rs ४६० कोटींची ऑर्डर मिळाली.
सरकारने डोमेस्टिक गॅसच्या किमती US $ ७.१५/MBTU वरून US $ ८.१७ /MBTU एवढी केली.
CG पॉवर ही कंपनी  सेमीकंडक्टर चिप प्लांट गुजराममध्ये सानंद येथे सुरु करेल. या चिप्स रेल्वे, डिफेन्स, स्पेस आणि EV साठी वापरण्यात येतील. जपानची रेनेसाँस आणि स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स थायलंड यांच्या बरोबर JV  करण्यात येईल. या प्लांटमध्ये Rs ७६०० कोटींची गुंतवणूक करण्यात येईल.
या प्लांटची क्षमता प्रती दिन  १५ मिलियन चिप्स एवढी असेल.
टाटा सेमी कंडक्टर चिप  फॅब्रिकेशनक्षेत्रांत   गुजरात, आसाम मध्ये Rs ५०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.  या प्लॅन्टचे बांधकाम येत्या १०० दिवसात सुरु होईल. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तैवानच्या PSMC या कंपनीबरोबर पार्टनरशिप करणार आहे. हे युनिट ढोलेरा गुजरातमध्ये असेल. टाटा सेमीकंडक्टर असेम्ब्ली अँड टेस्ट PVT लिमिटेड ही कंपनी आसाम मध्ये  मोरीगाव येथे Rs २७००० कोटी गुंतवून  सेमीकंडक्टर युनिट सुरु करेल.
लेमन ट्री हॉटेलने  बरोडा  येथे ६३ रूम्सच्या हॉटेलसाठी लायसेन्सिंग करार केला.
 मंत्रिमंडळाने  Rs २४४२० कोटी NPK फर्टिलायझरसाठी,  खरीप हंगामासाठी, सबसिडी मंजूर केली ( नायट्रोजनसाठी Rs ४७.०२/किलो  फॉस्फेटिकसाठी Rs २८.७२ /किलो,( Rs २०.८२ /किलो) पोटॅश साठी Rs २.३८ /किलो, सल्फर Rs १.८९ / किलो ).DAP ची सबसिडी Rs ४५००/ टन मंजूर केली.
मंत्रिमंडळाने PM सूर्योदय योजना ४५ GW साठी ६०% सबसिडी मंजूर केली. २०२५ पर्यंत सर्व  सरकारी ऑफिसेस मध्ये सोलर पॅनल बसवले जातील.
आज मेटल्स, बँकिंग, PSE मध्ये खरेदी तर फार्मा,FMCG, IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२५०० NSE निर्देशांक निफ्टी २१९८२ बँक निफ्टी ४६१२० वर बंद झाले.

.
भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.