Monthly Archives: March 2024

आजचं मार्केट – २८ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८६.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२१ आणि VIX १२.७४ होते. सोने Rs ६६६०० आणि चांदी Rs ७४८०० च्या आसपास होते.
USA मध्ये मार्केटच्या शेवटच्या तासात तुफानी तेजी होती.
 FII ने Rs २१७० कोटींची खरेदी तर DII ने Rs ११९८ कोटींची खरेदी केली.
IDFC FIRST बँकेचे क्लोव्हरडेल इन्व्हेस्टमेंटने  २.२५% इक्विटी फ्लोअर प्राईस Rs ७५ ने विकले. एकूण IDFC १st बँकेमध्ये २.६९% इक्विटीचे १९.५ लाख शेअर्सचे Rs १३२९ कोटीचे डील झाले.
DR रेड्डीजने सॅनोफीबरोबर व्हॅक्सिन ब्रँड प्रमोट करणे आणि डिस्ट्रिब्युट करण्यासाठी  करार केला.
BHELला छत्तीसगढ मधील रायगड येथे थर्मल पॉवर प्लांट २X ८०० MW चा सेट अप करण्यासाठी अडाणी पॉवर असून ऑर्डर मिळाली.
अल्केम लॅबच्या बद्दी येथील युनिटच्या केलेल्या १९ मार्च ते २७ मार्च २०२४ दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने १० त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला.कंपनीने सांगितले की यात  डेटा इंटेग्रिटी इशू नाही.
महिंद्रा लाइफस्पेसने बंगलोर येथे २ एकर जमीन घेतली. याची डेव्हलपमेंट व्हॅल्यू Rs २२५ कोटी आहे.
बायोकॉन च्या मधुमेहावरील ‘LIRAGLUTIDE’ या औषधाला UK हेल्थ केअर ऑथॉरिटी कडून मान्यता मिळाली.
लोकेश मशिन्सला छोट्या  हत्यारांचे उत्पादन आणि टेस्टिंग साठी मंजुरी मिळाली.
ICICI सिक्युरिटीज आणि ICICI बँकेच्या मर्जरला तसेच ICICI सिक्युरिटीजच्या शेअर्सच्या डीलीस्टिंगला शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली.
RBI ने AIF ( आल्टर्नेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंड) संबंधित नियम सोपे केले.
SEBI ने MCX च्या MD आणि CEO च्या निवडीची प्रक्रिया पुन्हा करायला सांगितली.
लेटन्ट  व्ह्यू डिसिजन पॉईंट मध्ये ७० % स्टेक  US $ ३.९१ कोटींना घेणार आहे. राहिलेला ३० % स्टेक येत्या दोन वर्षांत लेटन्ट  व्ह्यू घेणार आहे.
अडाणी इंटरप्रायझेसची  सबसिडीअरी ‘KUTCH कॉपर’ च्या मुंद्रा  येथील कॉपर समेल्टिंग प्लांटमध्ये कामकाज सुरु झाले.
अडाणी ग्रुपने अंबुजा सिमेंटमधील त्यांचा स्टेक  ३.६% ने वाढवून ६६.७% केला.
कल्पतरू पॉवर ला Rs २०७१ कोटींची ऑर्डर मिळाली.
CHALET हॉटेल्स Rs १२०० कोटींचा QIP फ्लोअर प्राईस Rs ७८० प्रती शेअर या दराने ( १०% डिस्काऊंटवर) लाँच केला.
टेक्समॅको ने QIP द्वारे Rs १५५ प्रती शेअर या भावाने Rs २५० कोटी उभारले.
कर्नाटक बँकेने Rs २२७ प्रती शेअर या भावावर QIP केला.
GMR  इन्फ्रा विशाखापट्टणम या सबसिडीअरीला Rs ३९४.८८ कोटींचा पहिला इंस्टालमेंट  मिळाला.
सुदर्शन केमिकल या कंपनीने ३ नवीन प्रॉडक्टस लाँच केले. ही प्रॉडक्टस कॉम्प्लेक्स इनऑरगॅनिक कलर्ड पिगमेंट फॉर प्लास्टिक फॉर कोटिंग, फॉर वॉटर बेस डेकोरेटिव्ह कोटिंगसाठी आहेत.
ESAB ने Rs २४ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला. यासाठी ५ एप्रिल ही रेकॉर्ड डेट  निश्चित केली.
CYIENT ने डच एअरक्राफ्टबरोबर एअरक्राफ्ट डिझाईन साठी करार केला.
अल्ट्राटेक ने योग्य संधी शोधून अडचणी दूर करून क्षमता २.४ MTPA पर्यंत  वाढवली. ग्रेची १४०.८MTPA
ओव्हरसीज ५.४ आणि ग्लोबल १४६.२ MTPA एवढी क्षमता झाली.
श्रीराम पिस्टन आणि रिंग्स च्या पिठमपूर येथील युनिटमध्ये कामकाज सुरु झाले.
रिलायन्सने अडाणी पॉवर बरोबर २० वर्षांसाठी पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
झायड्स लाईफ च्या मार्च १८ ते मार्च २७ दरम्यान USFDA ने केलेल्या अहमदाबाद येथील ONCO इंजेक्टीबल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट च्या केलेल्या तपासणीत ४ त्रुटी दाखवल्या कंपनीने सांगितले की डेटा  इंटेग्रिटीचा इशू नाही.
टाटा एलेक्सिच्या पुणे युनिटने DRGER बरोबर करार केला.
L & T कन्स्ट्रक्शन ला  पारादीप पोर्ट ऑथॉरिटी कडून Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटीं दरम्यान ऑर्डर मिळाली.
GOCL ने त्यांच्या हैदराबाद येथील २६४.५ एकर जमिनीच्या मोनेटायझेशन साठी ‘SQUARESPACE’ बरोबर Rs ३४०२ कोटींचा करार केला.
मुक्का प्रोटीनचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
RKEC प्रोजेक्टला Rs १२ कोटींचे आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.
JTEKT ला Rs १२ लाखांची डिमांड कस्टम्स DEPT कडून मिळाली.
वर्धमान पॉलीटेक्सच्या  १ शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट झाले.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने MG सुवर्ण नावाचा टँकर विकला.
कोटक महिंद्रा बँकेने सोनाटा फायनान्समध्ये Rs ५३७ कोटींना १००% स्टेक  घेतला.
IREDA ला Rs २४२०० कोटी कर्जाच्या द्वारा उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी.
कॅपलीन पॉईंट च्या ड्रॉप स्वरूपातील डोळ्यांच्या विकारावरील औषधाला USFDA ची मान्यता मिळाली.
BEL कडून अस्त्र मायक्रोवेव्हला Rs ३८५ कोटींची ऑर्डर मिळाली.
एशियन पेन्ट्स त्यांच्या २ सबसिडीअरीजचे कंपनीत मर्जर करणार आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्स चा IPO येण्याची शक्यता आहे. त्याचे  व्हॅल्युएशन US $ १००० कोटी असेल.
मिडकॅप, PSE, फार्मा, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.  BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३६५१ NSE निर्देशांक निफ्टी २२३२६  बँक निफ्टी ४७१२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २७ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८५.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२३ आणि VIX १२.७६ होते. सोने Rs ६६६०० आणि चांदी Rs ७४४०० च्या आसपास होते.
भारती हेक्साकॉम चा Rs ४२७५ कोटींचा IPO ( पूर्णपणे OFS ) ३ एप्रिल २०२४ ला ओपन होऊन ५ एप्रिल २०२४ ला बंद होईल. ह्या IPO तील  शेअरची दर्शनी किंमत Rs ५ असून प्राईस बँड Rs ५४२ ते Rs ५७० निश्चित केला आहे. सरकारी कंपनी टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडीया लिमिटेड (TCIL) त्यांच्या ३०% स्टेक  पैकी १५% स्टेक या IPO  दवारा विकत आहे. राहिलेला १५% स्टेक  TCIL  पुढील सहा महिन्यांपर्यंत विकू शकणार नाही( लॉक-इन पिरियड). हेक्साकॉम ही कंपनी राजस्थान आणि उत्तरपूर्वी राज्यात मोबाइल सर्व्हिसेसचा बिझिनेस करते. भारती एअरटेलचा भारती हेक्साकॉममधील स्टेक ७० % आहे तो कायम राहील.
ब्रह्मपुत्रा इन्फ्राला Rs ६० कोटींची ऑर्डर मिळाली.
ज्युबिलण्ट फुड्सला GST ऑथॉरिटीकडून Rs १७.१२ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
PAKKA च्या जागृती प्रोजेक्टची कॉस्ट Rs ५५० कोटींवरून Rs ६७५ कोटी झाली.
शक्ती पंप्स QIP दवारा Rs २०० कोटी उभारणार आहे.
अडाणी ग्रीन ने राजस्थानमध्ये १८० MW सोलर पॉवर प्रोजेक्ट ऑपरेशनलाइझ्ड केले.
T +० सेट्लमेन्ट मध्ये अंबुजा, अशोक लेलँड, बजाज ऑटो, BPCL, बिर्ला सॉफ्ट, बँक ऑफ बरोडा, MRF, नेस्ले,ONGC, SBI, युनियन बँक, पेट्रोनेट LNG, सिप्ला, कोफोर्ज,डिव्हीज लॅब, हिंदाल्को, इंडियन हॉटेल्स JSW स्टील, NMDC,LIC HSG, LTI MINDTREE  सॅवर्धना मदर्सन, टाटा कम्युनिकेशन, ट्रेंट,वेदांत या  २५ शेअर्सचा समावेश असेल. ही सेटलमेंट ऑप्शनल बेसिसवर २८ मार्च २०२४ पासून सुरु होईल.
S & P ने भारताच्या ग्रोथचे अनुमान ६.८% केले. कारण भारतातील डोमेस्टिक डिमांड आणि भारताची निर्यात वाढत आहे.
L & T ला त्यांच्या बिल्डिंग आणि फॅक्टरी बिझिनेससाठी Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटीं दरम्यान ऑर्डर मिळाली.
 इंडिया रेटिंग्सने कल्याण ज्वेलर्सचे रेटिंग ‘A’ वरून ‘A +’ केले.
ऍस्टर  DM  हेल्थकेअरमधील ९.८% इक्विटी स्टेक ऑलिम्पस कॅपिटल एशिया Rs ४०० ते ४३२ प्रती शेअर दरम्यान भावाने  Rs १९५२.८० कोटींना  विकला
स्टॅन्डर्स चार्टर्ड बँकेने CDSL मधील ७.८% स्टेक Rs १६७२ प्रती शेअर या भावाने US $ १५१ मिलियनला विकला.
नोसिलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने दहेज येथील रबर केमिकल प्लांटची क्षमता २०% वाढवण्यासाठी Rs २५० कोटींची गुंतवणुपर्यंत करण्यासाठी मंजुरी दिली. या प्लांटची वर्तमान क्षमता ११५०००MTA आहे.
ऍव्हेन्यू  सुपरमार्केटने .तेलंगणामध्ये करीमनगर आणि नरसिंगी आणि गुजरातमध्ये सचिन येथे ३ नवीन स्टोर्स उघडली. आता त्यांच्या स्टोर्स ची संख्या ३५७ झाली.
SH  केळकर मार्च २९ २०२४ रोजी लाभांशावर विचार करतील. या लाभांशासाठी २ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
इंडो रामा सिंथेटिक्स च्या प्रमोटर उर्मिला लोहिया यांनी ओपन मार्केटमधून कंपनीचे ५.३५ कोटी शेअर्स खरेदी केले.
LIC HSG  फायनान्सचा शेअर LUXEMBERG स्टॉक एक्स्चेंज मधून डीलीस्ट झाला.
प्रिझ्म जॉन्सन च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स २९ मार्चच्या बैठकीत NCD द्वारे फंड उभारण्यावर विचार करेल.
शाम मेटॅलिक्सला महाराष्ट्रांत १५२६ एरियाच्या आयर्न ब्लॉक साठी कॉम्पोझिट लायसेन्स साठी LOI मिळाले.
सिप्लाने सॅनोफी आणि सॅनोफी हेल्थकेअर बरोबर त्यांच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमशी संबंधित ६ ब्रँडेड औषधांच्या  भारतात डेव्हलपमेंट आणि वितरण करण्यासाठी केला. यांत कंपनीच्या FRISIUM या फीटवरील प्रसिद्ध औषधाचा समावेश आहे.
कोकोच्या किमती ४२% ने वाढल्या. US $ १०००० पर्यंत गेल्या.
ल्युपिनला आयकर विभागाकडून Rs ४७७ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
ORIOLA यांनी HCL टेक बरोबर पार्टनरशिप केली.
सेंच्युरी प्लाय ने आंध्र प्रदेशातील MDF युनिटमध्ये कामकाज सुरु केले.
अन्नपूर्णा स्वादिष्टने मस्टर्ड ऑईलचा ‘आरती’ हा ब्रॅण्ड Rs २८ कोटींना खरेदी केला.
टाटा मोटर्सच्या सबसिडीअरीने टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी ने HPCL  बरोबर करार केला.
IPCA लॅबने ओमेक्सा फॉर्म्युलरी बरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरसाठी करार केला.
अपोलो पाईप्स किसान मोल्डिंग मध्ये ५३.५७ % स्टेक घेणार आहे.
वेलस्पन कॉर्पची सबसिडीअरी सिंटेक्स-BAPL मध्ये Rs २३५५ कोटींची गुंतवणूक करेल.
आज इन्फ्रा, रिअल्टी, ऑटो क्षेत्रांमध्ये खरेदी झाली तर PSE, IT, FMCG या क्षेत्रांत प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक ७२९९६ NSE निर्देशांक निफ्टी २२१२३ बँक निफ्टी ४६७८५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २६ मार्च २०२४

.

आज क्रूड US $ ८६.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२३ आणि VIX १२.६८ होते. सोने Rs ६५९०० तर चांदी Rs ७४७०० होती.
FII ने Rs ३३१० कोटींची विक्री आणि DII ने Rs ३७६५ कोटींची खरेदी केली.
JSW एनर्जीने रिलायन्स पॉवर बरोबर Rs १३२ कोटींचे बिझिनेस कॉन्ट्रॅक्ट केले.
वेलस्पन यांच्या असोसिएट कंपनीने सौदी आरामको बरोबर केलेले Rs ३३९ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल  केले
सेबीने ICICI सिक्युरिटीजच्या मर्चंट बँकिंग डिव्हिजन च्या डिसेंबर २०२३ मध्ये केलेल्या तपासणीनंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्निंग इशू केली.
हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सने त्यांचे  ऑप्टिकल फायबर ऍसेट्स त्यांची सबसिडीअरी इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्सला Rs २०८.०४ कोटींना विकण्यासाठी करार केला.
ल्युपिन त्यांचा जनरिक्स ट्रेड बिझिनेस स्लम्प सेल बेसिसवर ल्युपिन लाईफ सायन्सेस ला Rs १०० कोटी – Rs १२० कोटी ना वेगळा करण्याचा विचार करत आहे.
DR रेड्डीज लॅबने USA मधील बायोफार्मास्युटिकल कंपनी ‘PHARMAZZ INC’ बरोबर ‘CENTHAQUINE’या  ‘HYPOVOLEMIC SHOCK ‘ च्या ट्रीटमेंट मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाला भारतात  कमर्शियलाईझ करण्यासाठी करार केला.
अडाणी पोर्ट गोपाळपूर पोर्टमध्ये ९५% स्टेक  घेणार त्याची एंटरप्राइज व्हॅल्यू Rs ३०८० कोटी आहे. अडाणी पोर्ट हे डील Rs १३४९ कोटी देऊन करणार आहे.
IRDAI ने  सरेंडर व्हॅल्यू ठरवली ३ वर्षापर्यंत पॉलिसी सरेंडर केल्यास तेव्हढीच किंवा थोडी कमी देण्यात येईल. ४-७ वर्षापर्यंत थोडी वाढेल.
क्युपिड या कंपनीने १:१ बोनस शेअर इशू आणि  त्यांच्या १ शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले यासाठी ४ एप्रिल ही रेकॉर्ड डेट ठरवली.
पर्सिस्टंट सिस्टिम्सने त्यांच्या १ शेअरचे २ शेअरमध्ये स्प्लिट केले १ एप्रिल २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
REC ने Rs ४.५० प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. यासाठी २८ मार्च २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
बर्जर पेन्ट्स ने रामकृष्ण मिशन विद्यामंदिर बरोबर ग्रीन अमोनिया चे इंडस्ट्रियल स्केल वर उत्पादन आणि एक्स्प्लोरेशन करण्यासाठी करार केला.
अशोक लेलँड ने Rs ४.९५ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला.यासाठी ३ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
अनमॅनड एरियल व्हेईकल UAV ड्रोन मेजर IDEAFORJ ही लॉजिस्टिक्स मध्ये उतरणार आहे. १०० किलो वजन १०० किलोमीटर वाहून नेईल असे ड्रोन बनवणार आहे.
क्रिसिल च्या Rs २८ लाभांशासाठी २८ मार्च २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित  केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने MSKVY १९TH सोलर SPV आणि MSKVY २२ND सोलर SPV मध्ये १००% स्टेक   MSEB ऍग्रो पॉवर कडून घेण्यासाठी रिलायन्स च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.
हा स्टेक  महाराष्ट्रांत १२८MW स्प्रेड वेगवेगळ्या सोलर क्षमता उभारण्यासाठी खरेदी केला आहे.
 आहे.
RVNL ने एअरपोर्ट ऑथॉरिटी बरोबर Rs २२९.४३ कोटींचा करार केला.
मारुतीने ११८५१ बॅलेनो आणि ४१९० वॅगनार  रिकॉल केल्या.
पारादीप पोल्युशन कंट्रोल बोर्डाने ओरिसामधील प्लांट बंद करायला सांगितले.
झायडस लाईफ LETERMOVIR टॅब्लेट २४० mg साठी USFDA ची संमती दिली. हे व्हायरसमुळे  होणाऱ्या आजारावर औषध आहे.
HAL ने गयाना डिफेन्स फोर्स बरोबर हिंदुस्थान २२८ COMMUTAR एअरक्राफ्ट आणि स्पेअर पार्टससाठी Rs १९४ कोटींचा करार केला.
रशिया आणि युक्रेन मधील जिओपॉलिटिकल तणावामुळे क्रूड US $ ८७ प्रती बॅरलवर पोहोचले.
मनकाईन्ड फार्मा ने २.९% स्टेक जो सध्या BIEGE आहे तो Rs २१०३ ते Rs २२१४  प्रती शेअर या भावाने
ब्लॉक डीलदवारा Rs २४६० कोटींना विकणार आहे.
युनो मिंडाने EV इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करणे आणि विकणे यासाठी स्टारचार्ज एनर्जी बरोबर टेक्निकल लायसेन्स अग्रीमेंट केले.
EXIDE ने क्लोराईड मेटल या WHOLLY OWNED सबसिडीअरीमध्ये Rs ११० कोटी गुंतवले. एक्साइड ची सबसिडीअरीला Rs १३३ कोटींची इन्कम  टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
अल्ट्राटेक सिमेंटने १ MTPA ब्राऊन फिल्ड  सिमेंट क्षमता उत्तराखंडमध्ये रुडकी  येथे सुरु केली. त्यामुळे या प्लांटची क्षमता २.१ MTPA झाली.
NTPC  झारखंड मधील चट्टी बॅरियातू कोल  मायनिंग प्रोजेक्ट मध्ये १ एप्रिल २०२४ पासून कमर्शियल ऑपरेशन सुरु करणार.
सन टीव्ही २८ मार्च २०२४ रोजी डिव्हिडंड देण्यावर विचार करेल.
इंडियन मेटल अँड फेरो अलॉयज २९ मार्च रोजी स्पेशल लाभांशावर विचार करेल.
HG इन्फ्राला जोधपूर विद्युत निगम लिमिटेड कडून Rs ५३४ कोटींची ऑर्डर मिळाली.
सुदर्शन केमिकल्स त्यांचे युरोप BV मधील स्टेक  विकणार आहे.
JM फायनॅन्शियल्स आणि IIFL यांचे स्पेशल ऑडिट RBI ने सुरु केले.
सोम डिस्टीलरीज ची सबसिडीअरी वूडपेकर डिस्टीलरीजच्या हसन युनिटमध्ये ३० मार्च पासून ट्रायल रन सुरु होईल.
फोर्टिस हेल्थकेअरच्या सबसिडीअरीला Rs ८९.५८ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
सुंदरम क्लेटन ने Rs ५.१५ अंतरिम लाभांश जाहीर केला.
स्पाईस जेटने एक्स्पोर्ट ऑथॉरिटी कॅनडा बरोबर Rs ७५५ कोटींच्या सेटलमेंट साठी करार केला.
आज ऑईल आणि गॅस, रिअल्टी, मिडकॅप ,स्मालकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली तर IT बँकिंग FMCG क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२४७० NSE निर्देशांक निफ्टी २२००४ तर बँक निफ्टी ४६६०० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २२ मार्च २०२४

.

आज क्रूड US $ ८५.२० प्रती बॅरलच्या आसपास तरं रुपया US $१= Rs ८३.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.९० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२४ आणि VIX १२.९१ होते. सोने Rs ६६१०० आणि चांदी Rs ७४७०० च्या आसपास होती.
एक्सेंच्युअर या कंपनीचे FY ऑगस्टमध्ये पूर्ण झाले. या कंपनीने रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स २% ते ५% वरून १% ते ३% केला. याचा परिणाम म्हणून भारतातील IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
बँक ऑफ इंग्लंड जून २०२४ पासून रेटकट करणार आहे.
स्विस सेंट्रल बँकेने रेटकट केला १.७५% वरून १.५०% केला.
FII ने Rs १८२७ कोटींची विक्री तर DII ने Rs ३२०९ कोटींची खरेदी केली.
भारत डायनॅमिक्स ( BDL) ने Rs ८.८५ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट २ एप्रिल २०२४  ही ठेवली आहे. कंपनीने  त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले. ही प्रक्रिया शेअरहोल्डर्सची संमती मिळाल्यानंतर २-३ महिन्यात पूर्ण होईल.
REC ही कंपनी फंड उभारण्यावर २७ मार्च २०२४ रोजी विचार करेल.
मान इन्फ्राला  मुंबईमध्ये प्रोजेक्ट मिळाले.या प्रोजेक्ट मधून कंपनीला Rs २१०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.
सारडा एनर्जीला सुरजगड येथे १ आयर्न ओअर ब्लॉकसाठी कॉम्पोझिट लायसेन्स मिळाले.
टाटा केमिकलला Rs १०४ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
SAMHI हॉटेल्स त्याच्या कॉर्पोरेट गॅरंटीची रक्कम ३ WHOLLY OWNED  सबसिडीअरीजसाठी Rs ८०१.६० कोटींनी वाढवणार.
विप्रोच्या सबसिडीअरीने जनरल मोटर्स आणि मॅग्ना इंटरनॅशनल बरोबर नवी एंटीटी स्थापन करण्यासाठी करार केला.
माझगाव डॉक्सने संजीव सिंघल यांना ६ महिन्यांकरता मुदतवाढ दिली. कंपनी १४.५५ एकर जमीन आणि बिल्डिंग २९ वर्षांच्या लीजवर देणार आहे.
टाटा कम्युनिकेशन्स त्यांचा डिजिटल सर्व्हिसेस व्यवसाय ‘नोव्हामेश’ या सबसिडीअरीकडे Rs ४५८ कोटींना ट्रान्स्फर करणार आहे.
प्रेस्टिज ‘इंदिरापूरम एक्स्टेंशन NCR’ येथे ६२.५ एकर जागा Rs ४६८ कोटींना घेतली. या जागेत ‘प्रेस्टिज सिटी’ ही टाऊनशिप बांधणार आहे.
DOMS ही कंपनी SIKDO या बॅग,स्कूल बॅग्स,पाऊचेस उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये ५१% स्टेक घेणार आहे.
महिंद्रा लाईफ ही कंपनी बंगलोर येथे नवीन प्रोजेक्ट ‘महिंद्रा झेन’ लाँच करणार आहे.
श्री राम  फायनान्स मध्ये ७७.७८ लाख शेअर्सचे Rs १७९६ कोटींचे Rs २३१० प्रती शेअर या भावाने लार्ज डील झाले.
कर्नाटक बँक Rs ६०० कोटींचे QIP इशू आणणार आहे.
टेक्समको रेल Rs २५० कोटींचा QIP इशू आणणार आहे.
टेक्समको इंजिनीअरिंग Rs १५०० कोटींचा QIP Rs १६२.८८ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने आणणार आहे.
क्रॉम्प्टन ला Rs ६८ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
लेमन ट्री हॉटेलने रांचीमध्ये  ४५रूम्सच्या हॉटेलसाठी लायसेन्सिंग अग्रीमेंट केले.
इंडिगो त्यांचा क्षमता विस्तार करणार आहे. या वर्षी १०% क्षमता विस्तार होईल असे कंपनीने सांगितले. दर आठवड्याला १ विमान त्यांच्या फ्लीट मध्ये वाढेल आणि ५५००-५६०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.
एंजल १ ने Rs ४१० कोटींची IPL स्पॉन्सरशिप जिंकली.
चीनच्या एव्हरग्रँड नी US ७८ अब्ज चा घोटाळा केला. कागदोपत्री हेराफेरी केली, खोट्या उत्पन्नाच्या आधारावर रोखे चढ्या भावाने विकले. आता ज्यांनी हे रोखे खरेदी केले ते अडचणीत आले आलेत.एव्हरग्रँडवर US $ ३०० अब्ज एवढे कर्ज आहे.
सेबी ने सांगितले की म्युच्युअल फंडांनी इझी एंट्री बरोबरच ग्राहकांना  इझी एक्सिट  मिळेल याची काळजी घ्यायला हवी. Rs २५० SIP कसे व्हायेबल होईल याचा सेबी अभ्यास करत आहे.
सेबी २८ मार्च पासून T+० सेटलमेंटची ट्रायल सुरु करणार आहे.
ओव्हरसीज सिक्युरिटीज मध्ये म्युच्युअल फंडांनी  गुंतवणूक करण्याची मर्यादा US $ ७ बिलियन आहे. आणि ओव्हरसीज ETF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा  US $ १ बिलियन आहे. ही ETF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा पूर्ण होण्याच्या बेतात आहे. त्यामुळे सेबीनी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडांना या ओव्हरसीज एटीफमध्ये १ एप्रिल २०२४ पासून  गुंतवणुकीसाठी SIP  स्वीकारू नयेत असा आदेश दिलेला आहे.
NMDC ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमध्ये लिथियम ऍसेट खरेदी करणार आहे.
KPI ग्रीन इंजिनीअरिंग IPO चे आज BSE वर Rs २०० वर लिस्टिंग झाले.
वेलस्पन कॉर्पला Rs २०३९ कोटींची ऑर्डर मिळाली.
सेबीच्या  वेदांताला ‘कॅप्रीकान  UK’ ला डिव्हिडंड देण्यामध्ये झालेल्या उशिरापोटी Rs ७७.६० कोटी व्याज म्हणून देण्याच्या  आदेशाला SAT ( सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनल) ने स्थगिती दिली.
इरेडा FY २०२४-२०२५ मध्ये Rs २४२०० कोटी कर्जाच्या रूटने उभारेल.
शाम मेटॅलिक्स ला महाराष्ट्र राज्य सरकार कडून कॉम्पोझिट लायसेन्ससाठी LOI मिळाले.
KEC इंटरनॅशनल ला Rs १००४ कोटींची ऑर्डर मिळाली.
न्यूलँड लॅबच्या हैदराबाद युनिटच्या इन्स्पेक्शनमध्ये एकही त्रुटी मिळाली नाही. क्लीन चिट मिळाली.
उदयपूर GST ऑथॉरिटीज कडून हिंदुस्थान झिंकला Rs ९१.९० कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
क्रॉम्प्टन मध्ये ४८.३३ लाख शेअर्सचा Rs १२९ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
इन्फोसिसमध्ये ४९ लाख शेअर्सचे लार्ज ट्रेड झाले.
LTICCL ( L & T इनोव्हेशन कॅम्पस चेन्नई लिमिटेड ही कंपनी LTSL ( L & T SEAWOODS लिमिटेड) यामध्ये मर्ज  करण्यासाठी NCLT ने मंजुरी दिली.
 आज IT क्षेत्र सोडून मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स आणि बाकीच्या क्षेत्रात( रिअल्टी ऑटो फार्मा ईंफ्रा, एनर्जी  FMCG) मध्ये  खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२८३१ NSE निर्देशांक निफ्टी २२०९६  बँक निफ्टी  ४६८६३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २१ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८६.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२६ आणि VIX १२.५४ होते. सोने Rs ६६८०० तर चांदी Rs ७६८०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.
आज फेड ने आपल्या रेट्समध्ये कोणतेही बदल केले नाहीत. रेट ५.२५ ते ५.५० दरम्यान राहतील असे सांगितले. त्या त्या वेळचा इकॉनॉमिक डेटा पाहून येत्या वर्षात तीन रेट कट करून रेट ४.५०% ते ४.७५% पर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिला रेटकट जूनमध्ये त्यानंतर एक पॉलिसी सोडून पुन्हा एक रेट कट आणि पुन्हा एक पॉलिसी सोडून १ रेट कट असे तीन रेट कट केले जातील. फेडने सांगितले की काही प्रमाणांत महागाई कमी झाली  पण बेरोजगारी वाढली.

CYIENT ची ‘इन्फोटेक HAL ‘ हे JV आहे. HAL बरोबरच्या या JV संबंधित इंसॉल्व्हंसीची प्रक्रिया सुरु करा असा अर्ज केला.
RVNL  Rs १६७.२८ कोटींच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सर्व्हिस प्रोजेक्ट साठी लोएस्ट बीडर ठरली.
प्रिन्स पाईप & फिटिंग ने गुजरातमध्ये भुज येथे असलेला प्लांट आणि ‘AQUEL’ हा ब्रॅण्ड घेण्यासाठी Rs ५५ कोटींचे ऍसेट पर्चेस अग्रीमेंट केले.
सास्केन ने अनुप सिलिकॉन सर्व्हिसेसमध्ये ६०% स्टेक Rs ३३.२० कोटींना घेतला.
WOKHARDT Rs ५४४.०२ प्रती शेअर या किमतीने QIP आणणार आहे.
अंबर इंटरप्रायझेस RESOJET प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ५०% स्टेक Rs ३५ कोटींमध्ये घेणार आहे.
SBI कार्ड ने टायटन बरोबर TITANSBI CARD लाँच केले.
NMDC ने आयर्न ओअर च्या किमती Rs २०० ते Rs २५० प्रती टन कमी केल्या. तसेच फाईन्सच्या किमती Rs २५० प्रती टन कमी केल्या. यामुळे आयर्न ओअर आणि फाईन्सच्या किमती अनुक्रमे Rs ५८०० आणि Rs ५०६० प्रती टन झाल्या.
TVS होल्डिंगने Rs ९४ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. कंपनी NCD दवारा Rs ६५० कोटी उभारणार आहे.
ड्रीमफोक चे रेटिंग BBB+आणि आऊटलूक स्टेबल केला.
KRYSTAL बिझिनेस सर्व्हिसेस चे BSE वर Rs ७९५, NSE वर Rs ८७५ वर लिस्टिंग झाले.
JSW इंफ्राने १०० MMT कार्गो हँडलिंग चे लक्ष्य पूर्ण केले.
DOMS या कंपनीने ‘स्किड’ या कंपनीचे अधिग्रहण केले.
रेलटेलला बिहार  एज्युकेशन प्रोजेक्ट कौन्सिल कडून Rs ९९ कोटींची ऑर्डर मिळाली.
ज्युपिटर वॅगन Rs २७१ कोटींमध्ये ‘BONATRANS INDIA’  घेणार आहे.
PB फिनटेक ने पेमेंट अग्रीगेटर बिझिनेस साठी वेगळी सबसिडीअरी स्थापन करणार.
मार्च  २०२४ चा मॅन्युफॅक्चरिंग PMI ५६.९ वरून ५९.२ झाला. सर्व्हिसेस PMI ६०.६ चा ६०.३ झाला तर कॉम्पोझिट PMI ६०.६ चा ६१.३ झाला.
भारत डायनामिक्स आज स्टॉक स्प्लिट आणि लाभांशावर विचार करेल.
जना स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित Rs ६० कोटींच्या टॅक्स संबंधात रिलीफ मिळाला.
जिंदाल पॉलीच्या मायनॉरिटी शेअरहोल्डर्सनी मिसमॅनेजमेंट साठी क्लास ऍक्शन सूट दाखल केली.
TCS ने RAMBOLL या आर्किटेक्ट आणि इंजिनीअरिंग फर्म बरोबर ७ वर्ष मुदतीचा IT इन्फ्रा ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.
इंडीगो १२५ विमानतळावरून दर आठवड्याला १३७८१ उड्डाणे तर स्पाईस जेट या १६५७ उड्डाणे करेल. LIC ने Rs ६६३ कोटींच्या GST डिमांडविरुद्ध चेन्नई गस्त ऑथोरिटीजकडे अपील केले.
लॉईड्स मेटल QIP दवारा Rs ५००० कोटी उभारणार आहे.
दीपक नायट्रेटच्या बडोदा येथील प्लांट मध्ये ‘बेन्झो TRIFLUORIDE’ चे उत्पादन सुरु झाले.
अथर एनर्जीचा US $ ४०० मिलियनचा IPO जून मध्ये येऊ शकतो.
महिंद्रा & महिंद्रा आणि अडाणी टोटल  यांनी EV चार्जिंग इंफ्रासाठी भागीदारी केली.
आज रिअल्टी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, ऑटो, फार्मा, बँकिंग, IT क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२६४१ NSE निर्देशांक निफ्टी २२०११ बँक निफ्टी ४६६८४ वर बंद झाले.

.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २० मार्च २०२४

आज क्रूड US $ ८७.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.६४ USA १० वर्षे  बॉण्ड यिल्ड ४.२९ आणि VIX १४.०९ होते. सोने Rs ६५६०० तर चांदी
Rs ७५५०० च्या आसपास होती.
USA मधील नवीन घरांच्या विक्रीचा डेटा  १२% वाढला.
‘VI’ Rs १४४० कोटींच्या डिबेंचर्सचे इक्विटीमध्ये कॉन्व्हर्जन करणार आहे.
ICICI प्रु च्या म्युच्युअल फंडाने स्टार हेल्थमधील ०.६% स्टेक Rs ५४० प्रती शेअर या दराने घेतला.
SBI कार्ड्सनी Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
शक्ती पम्प Rs १२७२ फ्लोअर प्राईसने Rs २०० कोटी QIP दवारा उभारणार आहे.
FII ने Rs १४२१.४८ कोटींची आणि DII ने Rs ७४४९.४८ कोटींची खरेदी केली. आज PCR ०.७३ होता.
अल्ट्राटेक सिमेंटला ‘केसोराम सिमेंट खरेदी करण्यासाठी CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ची मंजुरी मिळाली.
ABSL AMC मध्ये  ओव्हरसबस्क्रिप्शन झाल्यास ग्रीन शू ऑप्शन घेतले जाईल असे ठरले होते. त्याप्रमाणे ४.४७ % ग्रीन  शु ऑप्शन आणि ७% बेस OFS झाली.
ऑरोबिंदो फार्माला ५०mcg/स्प्रे मोमेटोसोन फ्युरॉईट मोनोहायड्रेट नसाल स्प्रे उत्पादन करायला आणि विक्री  करायला USFDA ची मंजुरी मिळाली.
TCS चे BaNCs हे युनिव्हर्सल फायनान्सियल सोल्युशन USA मधील सेंट्रल बँक वापरणार आहे.
झोमॅटोने आता शाकाहारी लोकांसाठी प्युअर व्हेज फ्लीट  आणि प्युअर व्हेज मोड लाँच केला.
NBCC ला विदेश मंत्रालयाकडून Rs २४९ कोटींची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी साठी ऑर्डर मिळाली. खादीम इंडियाची भारतात ८६४ स्टोर्स आहेत. त्यांचा या वर्षांत १०० स्टोर्स उघडण्याचा विचार आहे.कंपनीची ७५% प्रोडक्टस Rs १००० किमतीपेक्षा कमी किमतीची आहेत. E-कॉमर्स आणि अनऑर्गनाईझ्ड सेक्टर कडून स्पर्धा आहे. कंपनीने रिटेल डिव्हिजनला डि-मर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेप्रमाणे डिमर्ज्ड कंपनीचा १ शेअर खादिमच्या शेअरहोल्डरला मिळेल.
हुडको बॉण्ड्स आणि डिबेंचर्स दवारा Rs ४०००० कोटी उभारणार आहे.
अनुप इंजिनीअरिंग ने १;१ बोनस शेअरचा इशू जाहीर केला.
२८ डिसेम्बरला झालेल्या निर्णयाप्रमाणे IREDA चा समावेश निफ्टीमध्ये होणार होता पण सेबीच्या ‘पोर्टफोलिओ कॉन्सेन्ट्रेशन नॉर्म्स’  चे पालन न केल्यामुळे आता इरेडाचा समावेश कोणत्याही निफ्टीच्या निर्देशांकात केला जाणार नाही.
HUL त्यांच्या  ‘MAGNUM’ आईस्क्रीम ब्रॅण्ड स्पिन ऑफ करणार आहे यामुळे ७५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून  काढणार आहेत.HUL आता ‘ब्युटी’ ‘वेलबीईंग’ ‘पर्सनल केअर’ आणि ‘न्यूट्रिशन’ या चार डिव्हिजन वर लक्ष्य केंद्रित करणार आहे.
टाइम टेक्नोप्लास्टला हाय प्रेशर IV कॉम्पोझिट हायड्रोजन सिलिंडरच्या उत्पादन करायला आणि  टेस्टिंग साठी पेसो ( पेट्रोलियम एक्सप्लोझीव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन ) कडून परवानगी  मिळाली..
रामकि इन्फ्राला Rs २१८ कोटींच्या २ ऑर्डर मिळाल्या.
JK सिमेंटने  २ कोल  ब्लॉक्ससाठी बोली जिंकली.
VENKY’ज ने ऍनिमल हेल्थ आणि व्हेटरनरी मेडिसिनल प्रॉडक्टस उत्पादन करणाऱ्या केसुरडी, सातारा येथील युनिटमध्ये उत्पादन सुरु केले.
ज्युपिटर वॅगनला ‘BONATRANS INDIA’ च्या अधिग्रहणासाठी मंजुरी मिळाली.
ब्ल्यू स्टार ने ६० लिटर ते ६०० लिटर डीप  फ्रिझर्सची रेंज लाँच केली.
सेबीने LIC च्या शेअर्समध्ये फ्रंट-रनिंग अनियमितता झाल्याचे कन्फर्म केले. कंपनीच्या ग्राहकांना माहिती देण्याआधी एखादी फर्म किंवा ब्रोकर या मिळालेल्या माहितीच्या आधारावर ट्रेड करतो तेव्हा त्याला शेअरमध्ये फ्रंट रनिंग झाले असे म्हणतात. याचा परिणाम म्हणजे सेबीने ५ एंटिटीजवर शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यावर बंदी घातली.
TCS लंडन मध्ये पेस पोर्ट इनोव्हेशन हब डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी उघडला.
ITC च्या १२.३० लाख शेअर्समध्ये लार्ज ट्रेड झाले.
आज ऑटो, इन्फ्रा रिअल्टी ऑइल&गॅस, एनर्जी मध्ये खरेदी तर केमिकल्स मेटल्स फार्मा बँकिंग IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२१०१ NSE निर्देशांक निफ्टी २१८३९ बँक निफ्टी ४६३१० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८६.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.५७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३२ आणि VIX १४.२७ होते. सोने Rs ६५५०० आणि चांदी Rs ७५२०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
NVIDIA ने नवी चिप लाँच केली. ही नवी चिप आधीच्या चिपपेक्षा तिप्पट फास्ट आहे.
जपानच्या  सेंट्रल बँकेने २००७ नंतर प्रथमच व्याजाचे दर वाढवले. यिल्ड कर्व्ह कंट्रोल करणे थांबवले. जपानमध्ये व्याज चार्ज केले जात नव्हते. तेथून पैसा घ्यायचा आणि जेथे व्याज मिळते तेथे गुंतवायचे. व्याज दरातल्या फरकांत  ट्रेड करणे याला कॅरी ट्रेड म्हणतात. जपानमध्ये व्याजाचे दर वाढवल्यामुळे सोन्यामध्ये तेजी आली. जपान १० वर्षांच्या बॉण्ड्सची खरेदी विक्री करेल. ETF आणि REIT मध्ये खरेदी करणार नाही.
क्रूड ५ महिन्याच्या कमाल स्तरावर आहे. इराकने त्यांच्या क्रूडच्या निर्यातीमध्ये ३.३BPD इतकी कपात केली. इराण क्रूडचे उत्पादन वाढवणार आहे. क्रूडच्या मागणीमध्ये १.५ मिलियन BPD एवढी वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गीक गॅसच्या किमती वाढत आहेत.
FII ने Rs २०५१ कोटींची विक्री तर DII ने Rs २२६१ कोटींची खरेदी केली.
टाटा सन्स ने TCS मधील त्यांचा ०.६४% इक्विटी स्टेक Rs ४००१ ऑफर प्राईसने म्हणजे CMP ला ३.६% डिस्काउंटने विकला.
AB सन्स लाईफ AMC ३.३ कोटी शेअर्स म्हणजेच ११.४७% इक्विटी लार्ज देवालच्या माध्यमारून विकेल. यातील ७% OFS आणि उरलेला ग्रीन शु ऑप्शन द्वारे Rs ४५० प्रती शेअर या दराने विकणार आहे.
ग्रासिम ने NCD दवारा Rs १२५० कोटी उभारले.
DR. रेड्डीजने UK  मध्ये कॅन्सरवरील बायोसिमिलर औषध ‘VERASOVA’ लाँच केले.
HCL टेक ने ‘कम्प्युटर एडेड सॉफ्टवेअर’ बरोबरच्या कराची मुदत वाढवली.
जिंदाल स्टेनलेस ने JBM ऑटो बरोबर ५००+ EV बसेससाठी करार केला.
REC ने Rs ४.५ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.
टाटा स्टिलने NCD द्वारा Rs २७०० कोटी उभारण्याचा निर्णय घेतला.टाटा स्टील पोर्ट तालबोट येथील कोक ओव्हनचे कामकाज बंद करणार आहे.कोकची आयात वाढवली जाईल.
पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीसंबंधात पतंजलीने कोर्टाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने कोर्टाने CONTEMPT ऑफ COURT ची कारवाई कंपनी विरुद्ध सुरु केली आहे.
पॉप्युलर व्हेइकल्स आणि सर्व्हिसेसचे  BSE वर Rs २९२ आणि NSE वर Rs २८९.२० वर लिस्टिंग झाले.
JBM ऑटोला १३९० EV बसेस साठी Rs ७५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
ब्राझीलच्या हेल्थ रेग्युलेटर्स ने ११ ते १५ मार्च २०२४ दरम्यान १० युनिट्सची तपासणी केली. एकही त्रुटी दाखवली नाही. क्लीन चिट दिली. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.
GENESYS ला BMC कडून  Rs १५५.८५ कोटीच्या प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
HG इन्फ्रा आणि STOCKWELL सोलर सर्व्हिसेसच्या JV ला  जोधपूर विद्युत वितरण निगम कडून Rs १०२६ कोटींची ऑर्डर मिळाली.
लेमन ट्री हॉटेलने त्रिपुरामध्ये ८० रूम्सच्या हॉटेलसाठी करार केला.
शिपिंग कॉरपोरेशन लँड  ऍसेट मॅनेजमेंटचे लिस्टिंग Rs ४४.४६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर T टू T ग्रुपमध्ये ठेवला आहे.
ओलेक्ट्रा ग्रीन ला आसाम स्टेट कॉर्पोरेशन कडून १० EV बसेससाठी ऑर्डर मिळाली.
इनॉक्स ग्रीन सर्व्हिसेस एनर्जी च्या सबसिडीअरीला  फॉक्स विंडटेकनिक ला NLC इंडिया कडून ३३WTGS रिस्टोरेशन साठी LOA मिळाले
अशोक लेलँड ने ‘MINUS ZERO’ बरोबर सेल्फड्रायव्हिंग ट्रक डेव्हलप करण्यासाठी पार्टनरशिप केली.  सन फार्माने सांगितले की ऑस्ट्रेलियन THERAPEUTIC गुड्स ऍडमिनिस्ट्रेशन ने विनलेवि क्रीम या ट्रॉपिकल ACNE ट्रीटमेंट साठी वापरल्या जाणाऱ्या औषधाला मंजुरी दिली.
इझी ट्रिप प्लॅनर्सने ZOOMCARS बरोबर बुकिंग करून मागणीप्रमाणे सेल्फड्राईव्ह CAR सेवा पुरवण्यासाठी करार केला.
आज IT, FMCG,फार्मा, PSE, एनर्जी, इन्फ्रा,बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२०१२ NSE निर्देशांक निफ्टी २१८१७ बँक निफ्टी ४६३८४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ मार्च २०२४

.८२.६० च्या आसपास होते US $ निर्देशांक १०३.०३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३० आणि VIX १४.३२ होते. सोने Rs ६५३०० तर चांदी Rs ७५२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये तेजी  होती.
चीनचे औद्योगिक उत्पादन वाढले.याचा परिणाम मेटल्ससंबंधीत विशेषतः स्टील उत्पादक कंपन्यांवर झाला.
सरकारने क्रूड वरील विंडफॉल टॅक्स Rs ४६०० वरून Rs ४९०० केला. डिझेल पेट्रोल आणि ETF वरील करांत  कोणताही बदल केला नाही.
बलरामपूर चिनीने बायोप्लास्टिक साठी टाय अप केले.
LIC  आपल्या कर्मचाऱ्यांना  १६% पगारवाढ APRIL २०२२ पासून देणार आहे.
KBI ग्रीन ला १०० MW AC सोलर प्रोजेक्ट मिळाले.
कोफोर्ज QIP दवारा Rs ३२०० कोटी उभारले.
रेलटेलला BMC कडून Rs ३५२ कोटींची तर बिहारमधून Rs १३० कोटींची ऑर्डर मिळाली.
अडाणी ग्रुप रिन्यूएबल एनर्जी व्यवसायात Rs १.२० लाख कोटी गुंतवणार आहे.
TCNS क्लोदिंग आणि AB फॅशनच्या मर्जरला  BSE आणि NSE ने नो ऑब्जेक्शन लेटर दिले.
ल्युपिनच्या औरंगाबाद फॅसिलिटी चे ६ मार्च पासून केलेल्या तपासणीत USFDA ने  १ त्रुटी दाखवून फॉर्म NO. ४८३ इशू केला.
अंबरने रेल्वेसाठी स्वतंत्र सबसिडी सुरु केली.
SJVN ला गुजरात ऊर्जा निगम कडून २०० MW सोलर प्रोजेक्टसाठी LOI मिळाले.
RVNL ला महाराष्ट्र मेट्रो रेल कडून Rs ३३९.२० कोटींच्या प्रोजेक्ट साठी LOI  मिळाले.
इरकॉन ला NHIDCL ऎझोल कडून एझोल मध्ये ट्वीन ट्यूब  टनेल  साठी Rs ६३० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
HAL ला २५ डॉर्नियर एअरक्राफ्टसाठी Rs २८९० कोटींची ऑर्डर मिळाली.
सुलावाईनयार्डचा  टॅक्स संबंधात Rs ११६ कोटींचा मामला रिझॉल्व झाला.
D -मार्ट ने राजस्थान आणि आंध्र प्रदेशांत २ स्टोर्स उघडली. आता एकूण स्टोर्सची संख्या ३५४ झाली.
अनुप इंजिनीअरिंगची बोनस  इशूवर विचार करण्यासाठी २० मार्च रोजी बैठक आहे.
अंबुजा सिमेंटची सबसिडीअरी GEOCLEAN THE WASTE मॅनेजमेंट ने २ नवीन इनोव्हेटिव्ह फॅसिलिटी लाँच केल्या.
कुमार वेंकटसुब्रमनियम यांची  १ मे २०२४ पासून प्रॉक्टर आणि गॅम्बल चे MD म्हणून नेमणूक झाली.
स्नोमॅन लॉजिस्टिक्स मध्ये प्रमोटर गेटवे डिस्ट्रिपार्क यांनी ४.५ लाख शेअर्स खरेदी केले.
NTPC ने उत्तर कर्णपुरा थर्मल पॉवर प्रोजेक्ट नंबर २ मध्ये काम सुरु केले.
ऑरोबिंदो फार्माचे CURATEQ बायालॉजीक्स ची BP ११ या औषधाची यशस्वी चाचणी केली.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड  ऍसेट मॅनेजमेंटचे लिस्टिंग १९ मार्च २०२४ रोजी होईल. सरकारने केमिकल्सवर  अँटी डम्पिंग ड्युटी ५ वर्षांसाठी बसवली. याचा फायदा विनती ऑर्गनिक्स  ला होईल.
RITES ला Rs ६७.५ कोटींची ऑर्डर मिळाली.
सरकारने ग्लोबल EV उत्पादकांना भारतात त्यांच्या EV चे उत्पादन करण्यासाठी उत्तेजन देण्याचे ठरवले आहे. सरकार EV इंपोर्टवरील इम्पोर्ट  ड्युटी १०० % वरून १५% करण्याची शक्यता आहे. Rs २९  लाखांपेक्षा जास्त किमत असलेल्या कार्सना ही योजना लागू होईल. ही योजना तीन वर्षांत मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी US ५०० मिलियन गुंतवणूक करून उभारायला पाहिजे  ज्या EV ची CIF कॉस्ट  US $३५०००
असलेल्या कार्स वर १५% इम्पोर्ट ड्युटी आकारली जाईल. हा इम्पोर्ट ड्युटीचा फायदा कंपनी ने केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेपर्यंन्त किंवा US $ ६१८४ कोटींपर्यंत मर्यादित असेल.
अडाणी पॉवरने लेट पेंमेंट सरचार्ज आकारण्यासाठी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली.
आज फार्मा, रिअल्टी, इन्फ्रा, ऑटो, मेटल्स, मध्ये खरेदी झाली. IT, FMCG आणि बँकिंग, मिडकॅप स्मालकॅप  मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२७४८ NSE निर्देशांक निफ्टी २२०५५ बँक निफ्टी ४६५७५  वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १५ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८५.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते.USA $ निर्देशांक १०३.०४ आणि USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२८, VIX  १४.०६ होते. सोने Rs ६५६०० आणि चांदी ७५६०० होती.
USA चा PPI ( प्रोड्युसर्स प्राईस इंडेक्स) ०.३ वरून ०.६  झाला. ह्या इंडेक्समधील वाढ इन्फ्लेशन बऱ्याच  काळ रेंगाळेल अशी शक्यता दर्शवते.
 जून २०२४ पासून ओपेक+उत्पादनात आणखी कपात करण्याची शक्यता आहे.
आज क्रूडच्या किमतीत वाढ झाली. USA मधील इन्व्हेन्टरी कमी झाली. युक्रेनने रशियन रिफायनरीवर ड्रोनने हल्ला केला. त्यामुळे रशियातून क्रूड चा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. चीनची अर्थव्यवस्था डळमळीत आहे. ओपेक+ देशांचा कल USA च्या प्रेसिडेन्शियल निवडणुकीत ट्रम्प यांच्या बाजूने असल्यामुळे क्रूड च्या किमती वाढल्या तर ते बिडेन यांच्या विरोधात जाईल असे त्यांना वाटते. भारतासाठी क्रूडची किंमत US $ ८० प्रति बॅरलच्या आसपास राहिली तर सोयीचे आणि फायदेशीर होते.
आज FTSE चे रिबॅलन्सिंग  आणि भारत २२ ETF चे रिविजन होणार आहे.
आज सरकारने १५ मार्चपासून  पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये Rs २ प्रती लिटर कपात केली. क्रूडची किंमत वाढत आहे आणि सरकारने ही किमतीत कपात केल्यामुळे ३ OMC कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. ( BPCL, HPCL,IOC )
Paytm चे ग्राहक आता UPI मध्ये पार्टिसिपेट करू शकतील. ऍक्सिस, HDFC, SBI आणि येस बँक पेमेंट सिस्टीम प्रोव्हायडर म्हणून काम पाहतील. येस  बँक मर्चंट अकवायरिंग बँक म्हणून काम बघेल.
रेलटेल ला ओडिशा कॉम्प्युटर अप्लिकेशन सेंटर कडून Rs ११३.४६ कोटींची ऑर्डर मिळाली.
TVS मोटर्सची सिंगापूर मधील सबसिडी ION मोबिलिटीमध्ये US ५.५ मिलियनची गुंतवणूक करणार आहे. US $ २.५मिलियन ची गुंतवणूक १४ मार्च २०२४ ला केली. उरलेली US $ ३ मिलियनची गुंतवणूक ३१ मार्च २०२४ ला केली जाईल. TVS मोटर्स २० मार्च 2024 रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.
कंपनीने Rs ८ लाभांशासाठी १९ मार्च ही रेकॉर्ड डेट तर १४ मार्च ही एक्स-डेट निश्चित केली.
अहलुवालिया कॉन्ट्रक्टस ला Rs ३६४ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
INDIGO चा मार्केटशेअर ६०.२% वरून ६०.१% वर आला तर एअर इंडियाचा मार्केटशेअर १२.२% वरून १२.८% झाला, भारताच्या डोमेस्टिक एअर ट्राफिक ३.७% ने कमी झाली.
अपीजय सुरेंद्र पार्क हॉटेलने कोलकात्यामध्ये हॉटेल सुरु केले.
QUANTUM एअरवेज बरोबर ११ रूटवर  इंडिगोने  अग्रीमेंट केले.
कोफोर्ज १६ मार्चला फंड रेजिंग वर विचार करेल.
गुफीक बायोसायन्सेस ला  ‘LYOPHILIZED कॉम्पोझिशन्स OF  DALBAVANCIN ‘ साठी नोव्हेंबर २३ १६ पासून  २० वर्ष मुदतीचे पेटंट मिळाले.
NHPC ला गुजरात ऊर्जा विकास निगम ने २०० MW  साठी LOI  दिले. या प्रोजेक्टची किंमत Rs ८४६.६६ कोटी आहे.
SJVN ला गुजरात ऊर्जा विकास निगम ने ५०० MV चा प्रोजेक्ट खावंडा येथे विकसित करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. हा प्रोजेक्ट BOT ( बिल्ड ऑपरेट ट्रान्स्फर) तत्वावर आहे. Rs २.५७ प्रती युनिट टॅरिफ असेल.
एरिस लाइफसायन्सेस  बायोकॉनचा ब्रँडेड फॉर्म्युलेशन बिझिनेस US $ १५० मिलियन मध्ये खरेदी करणार आहे.
बायोकॉनने  १० वर्षांसाठी सप्लाय अग्रीमेंट केले याची किंमत Rs १२४२ कोटी आहे.
L & T टेक्निकल ला महाराष्ट्र राज्य सरकार कडून Rs ८०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हे कॉन्ट्रॅक्ट सायबर सेक्युरिटी इंटेलिजन्स सोल्युशन्स सेंटर उभारून ५ वर्ष चालवण्यासाठी मिळाले. ह्या प्रोजेक्टमध्ये कंपनी KPMG बरोबर काम करेल. अशी २५ सेंटर भरणार आहे. इतर राज्य सरकारांबरोबर कंपनीची बोलणी सुरु आहेत.
KSB पंप ला तामिळनाडू मधून Rs २६७ कोटींची ऑर्डर मिळाली.
शक्ती पंप ला महाराष्ट्र एनर्जी डिपार्टमेंटल एजन्सीकडून Rs ९३ कोटींची ऑर्डर मिळाली.
नवीन फ्ल्युओरीन तिची सबसिडीअरी नवीन फ्ल्युओरीन ऍडवान्सड सायन्सेसमध्ये Rs २५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
क्रॉम्प्टन ला महाराष्ट्र हरयाणा राजस्थान राज्य सरकारांकडून ‘PM कुसुम’ योजनेअंतर्गत सोलर फोटोव्होल्टाइक वॉटर पंपिंग सिस्टीम साठी एकूण Rs १०२ कोटींच्या ऑर्डर मिळाल्या.
आज फार्मा, इन्फ्रा, बँकिंग, एनर्जी, IT, रिअल्टी, PSE  या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२६४३ NSE निर्देशांक निफ्टी २२०२३ बँक निफ्टी ४६५९४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १४ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८४.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.५१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१९ आणि VIX  १३.८० होते. सोने Rs ६५८०० आणि चांदी Rs ७५३०० होते. खाद्य तेलांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच रबराच्या किमती वाढत आहेत.
FII ने Rs ४५९५कोटींची विक्री तर DII ने Rs ९०९४ कोटींची खरेदी केली.
फेब्रुवारी महिन्यासाठी WPI ०.२०% ( ०.२७%वरून कमी झाला)
ITC च्या लार्ज डीलमध्ये GIC, अम्बर्डिन, ICICI प्रु, ABSL म्युच्युअल फंड, मॅक्स लाईफ, DSPMIREI, UTI पेन्शन फंड्स, सॉव्हरिन फंड्स, BOA , सोसायटी जनरल ने खरेदी केली.
रिलायन्सने VIACOM १८ मध्ये पॅरामाऊंट  ग्लोबलचा १३.०१ % स्टेक Rs ४२८६ कोटींना घेतला. आता RIL चा VIACOM १८ मधील स्टेक ७०.४९% झाला.
टाटा मोटर्सने तामिळनाडू राज्य सरकार बरोबर ५ वर्षांत Rs ९००० कोटी  गुंतवणूक करण्यासाठी करार केला.
फेडरल बँकेने कोब्रांडेड क्रेडिट कार्ड इशू करणे बंद केले आणि साऊथ  इंडियन बँकेने RBI च्या सर्व  मार्गदर्शक तत्वांचे  पालन करूनच बँक कोब्रांडेड क्रेडिट कार्ड इशू करू असे सांगितले.
KEC इंटरनॅशनलला  Rs २२५७ कोटीची ऑर्डर मिळाली. एकंदर Rs १६००० कोटींच्या  ऑइल आणि गॅस बिझिनेससाठी आफ्रिकेतून ऑर्डर मिळाल्या.
DB रिअल्टीने Rs २५८ कोटींचा QIP केला.
कल्पतरू प्रोजेक्टला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन बिझिनेससाठी Rs २४४५ कोटींची ऑर्डर मिळाली.
CYIENT ने केबिन आणि कार्गो इंजिनीअरिंगसाठी एअरबस बरोबर करार केला.
SANOFI ने एमक्युअर फार्मा बरोबर कार्डिओव्हॅस्क्युलर ब्रॅण्ड्स  साठी करार केला.
इंडियन ह्यूमपाइपने AMR इंडिया बरोबरच्या JV ला Rs ११३७ कोटींची ऑर्डर मिळाली. यात इंडियन ह्यूम पाइपचा हिस्सा Rs २२७.५५ कोटींचा आहे.
चीनमध्ये काही स्मेल्टर बंद केले त्यामुळे कॉपर चे उत्पादन कमी झाले  त्यामुळे मेटल्स मध्ये तेजी आली. कॉपर  मध्ये तेजी होती.
अडाणी ग्रीन ने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बरोबर ५३४ MV साठी PPA केले. आता पोर्टफोलिओ २१७७८ MW चा झाला.
चोलामंडळम  ने DLF कडून चेन्नईतील ४.६७ एकर जमीन Rs ७३५ कोटींना घेतली.
आज गोपाळ स्नॅक्स चे BSE वे Rs ३५० आणि NSE वर Rs ३५१ वर लिस्टिंग झाले. शेअर IPO मध्ये Rs ४०१ ला दिला असल्याने लिस्टिंग १३% डिस्काऊंटवर
HAL ला Rs ८०७३ कोटींची ऑर्डर मिळाली.
HDFC बँकेच्या शेअर्समध्ये ६.०८ लाख शेअर्सचे लार्ज डील झाले.
L & T  ला Rs १००० ते Rs ५००० कोटींदरम्यान गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट साठी मध्येंपूर्वेतून ऑर्डर मिळाली. स्पाईस जेटला १० एअरक्राफ्टच्या लीज साठी मंजुरी मिळाली.
भारताच्या GDP ग्रोथचे अनुमान वाढवून ६.५% वरून ७% केले. वाढती डोमेस्टिक मागणी आणि गुंतवणूक यामुळे ही वाढ होण्याची शक्यता आहे.
SJVN ने राजस्थान ऊर्जा विकास आणि IT सर्व्हिसेस बरोबर ६०० MW साठी PPA (पॉवरपर्चेस करार) केला. राजस्थान सोलर पॉवर बरोबर १०० MV साठी PPA  केले. गुजरात ऊर्जा विकास निगम कडून ५०० MV सोलर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट क्षमता ७००० MV तर FY २०२४-२०२५ साठी उत्पन्नात Rs २००० ते Rs २५०० कोटींची वाढ होईल. कंपनी सोलर हायड्रो थर्मल प्रोजेक्टमध्ये काम करते.
TCS ने NUUDAY बरोबर क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. सरकार EV  साठी १ एप्रिल ते ३१ /०७/ २०२४ पर्यंत Rs ५०० कोटी सबसिडी देईल. सरकारने  EV मोबिलिटी ला उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सबसिडी २ व्हिलर्ससाठी Rs १००००, स्मॉल थ्री व्हिलर्स साठी २५००० आणि लार्ज थ्री व्हिलर्ससाठी Rs ५०००० सबसिडीची तरतूद केली आहे.
पॉवर मेकला Rs ३०६ कोटींची ऑर्डर मिळाली.
सोम डिस्टीलरीज २ एप्रिलला शेअर्सस्प्लिटवर विचार करेल.
पॉवर मेकला Rs ३०६ कोटींची ऑर्डर मिळाली.
GAIL चा  रिटेल LNG सेक्टरमध्ये Rs ६५० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय. GAIL नॅशनल हायवेवर LNG डिस्पेंसिंग सेंटर उभारणार.
बायोकॉन ने एरिस लाईफसायन्सेस बरोबर भारतामध्ये प्रोडक्ट ब्रँड चा विस्तार करण्यासाठी करार केला.
BEL ला Rs १९४० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
GENESYS इंटरनॅशनलला BMC कडून Rs १५५.८५ कोटींची ऑर्डर ३D सिटी मोड आणि मॅप स्टेक साठी
ऑर्डर दिली.
आज मिडकॅप,स्माल कॅप, PSE,एनर्जी,IT,फार्मा, FMCG, रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३०९७ NSE निर्देशांक निफ्टी २२१४६ बँक निफ्टी ४६७८९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७