आजचं मार्केट – १ मार्च २०२४

.

आज क्रूड US $ ८२.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.७७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२९ आणि VIX १५.५४ होते. सोने Rs ६२५०० आणी चांदी
Rs ६९७०० च्या आसपास होती.
FII ने Rs ३५६८कोटींची खरेदी तर DII ने Rs २३० कोटींची विक्री केली.
काल  मार्केट संपल्यावर भारताचा GDP ग्रोथ ८.४% ( गेल्या वर्षी ४.५% होता.)
बायोकॉन बायालॉजीक्स JANGGEN बायोटेक आणि जॉन्सन & जॉन्सन बरोबर Bmab १२०० चे कमर्शियलायझेशन US मार्केटमध्ये करण्यासाठी लायसेन्स अग्रीमेंट केले.
बायोकॉन बायालॉजीक्सच्या इन्शुलिन युनिटच्या  USFDA ने केलेल्या २० फेब्रुवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान केलेल्या तपासणीत ४ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
ऑरोबिंदो फार्माच्या युजिया SEZ फॅसिलिटीच्या तपासणीत USFDA ने  ७ त्रुटी दाखवल्या ही तपासणी १९ फेब्रुवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान झाली होती.
वेलस्पन इंटरप्रायझेसला भांडुप महाराष्ट्रामध्ये २०००MLD च्या  वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी Rs ४१२३.८८ कोटींची ऑर्डर मिळाली. डिझाईन कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स या तत्वावर ऑर्डर मिळाली
सुवेंन  लाईफ सायन्सेस आणि COHANCE लाईफ सायन्सेस चे मर्जर होणार आहे. २९५ COHAANCE लाईफ सायन्सेसच्या शेअर्स च्या बदल्यात ११ सुवेंन  लाईफ सायन्सेसचे शेअर्स मिळणार . मर्ज्ड एंटिटीज मध्ये अडव्हेंट एंटिटीज ६६.७% स्टेक होल्ड करेल.
सरकारने क्रूड  पेट्रोलियम वरील विंडफॉल टॅक्स Rs ३३००/टन वरून Rs ३६०० प्रती टन केला. डिझेल, पेट्रोल आणि ATF वर कोणताही टॅक्स /सेस असणार नाही.
टिप्स ने वॉर्नर मेडिया बरोबरच्या  कराराची मुदत वाढवली. .
सरकारने मिग-२९ एअरक्राफ्ट इंजिन साठी HAL ला ऑर्डर दिली. तसेच हाय स्पीड रडार CIWS ( CLOSE IN WEAPON SYSTEM ) साठी लार्सन & टुब्रोला २ ऑर्डर दिल्या.
BLPL ( ब्राह्मोस ऐरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड) बरोबर ब्राम्होस मिसाईल साठी Rs १९५१८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट केले.
टाटा मोटर्स ची एकूण विक्री  YOY ८.४% वाढून  ८६४०६ युनिट तर  PV विक्री १९% ने वाढून ५१३२१ युनिट झाली. डोमेस्टिक विक्री ९% ने वाढून ८४८३४ तर EV विक्री ३०% ने वाढून ६९२३ आणि कमर्शियल व्हेईकल विक्री YOY ४% कमी होऊन ३५०८५ युनिट्स झाली.
SML इसुझू ची एकूण विक्री YOY ६% ने वाढून १०१० युनिट तर PV विक्री ४% कमी होऊन ६०४ युनिट आणि कार्गो व्हेइकल्स ची विक्री २६% ने वाढून ४०६ युनिट झाली.
ZAGGLE प्रीपेड ने ‘युरोपा असिस्टंट्स इंडिया’ बरोबर करार केला.
M & M ची एकूण विक्री २४% वाढून ७२९७३ युनिट झाली. SUV ची विक्री ४०% वाढून ४२४०१ युनिट ट्रॅक्टर्सची विक्री १६% ने कमी होऊन २१६७२ युनिट झाली ट्रॅक्टरची डोमेस्टिक विक्री २०१२१ झाली.
बजाज ऑटोची एकूण विक्री YOY २४% ने वाढून  ३.४६ लाख युनिट तर डोमेस्टिक विक्री ३५% वाढून २.०६ लाख आणि निर्यात १०% वाढून १.३९ लाख युनिट झाली.
एस्कॉर्टस कुबोट ची एकूण विक्री १७% ने कमी होऊन  ६४८१ युनिट तर डोमेस्टिक विक्री २६.६% ने कमी होऊन ६०४१ युनिट झाली कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटची विक्री ३०% ने वाढली  निर्यात २२.३% ने कमी होऊन ४४० युनिट झाली.
अशोक लेलँड ची एकूण विक्री १७४६४ युनिट झाली. डोमेस्टिक विक्री ६% कमी होऊन १६४५१ युनिट झाली. M &H CV ची विक्री १०% ने कमी होऊन ११३६६ युनिट झाली. निर्यात १% ने वाढून १०१३ युनिट्स झाली.
TVS मोटर्सची एकूण विक्री ३३% ने वाढून ३.६८ लाख युनिट झाली.EV ची विक्री १६% ने वाढून १७९५९ झाली. टू  व्हिलर्सची विक्री ३४% ने वाढून ३.५७ लाख युनिट झाली.मोटारसायकलची विक्री ४६% ने वाढून १.८४ लाख झाली.
मारुती ची विक्री १४.५% ने वाढून १.९७ लाख युनिट झाली.
आयशर ची VECV ची विक्री १.९% ने वाढून ७४२४ युनिट झाली.ट्रक बस विक्री ५.८% ने कमी होऊन १७८ युनिट झाली.
कोल उत्पादन ८.७% ने वाढून ७४.८ MT झाले. ऑफटेक १२% ने वाढून ६५.३ MT झाला .
अव्हनटेल ला गार्डन रिच शिपबिल्डरकडून Rs ५.४८ कोटींची ऑर्डर मिळाली.
CANTABIL ने १३ नवीन शोरूम उघडल्या आता एकूण शोरुमची संख्या ५२९ झाली.
दिलीप बिल्डकॉनला Rs १९५५ कोटींची ऑर्डर NHAI कडून  उर्गा पाताळगाव सेक्शन साठी ४लेन रोड साठी मिळाली.
HG इंफ्राने Rs ७०९ कोटींच्या प्रोजेक्टसाठी किमान बोली लावली.
MCX ने सांगितले की त्यांनी Paytm  पेमेंट बँकेबरोबरचे बरेच करार रद्द करणार./केले
हाजीरा  येथे L & T ने पहिला इलेक्ट्रोलायझर प्लांट सुरु केला.
लॅन्डमार्क्स कार्स ला MG मोटर इंडियाने उज्जैन MP मध्ये डीलर शिप ओपन करण्यासाठी LOI मिळाले. ही डिलरशिप ऐरोमार्क कार्स PVT लिमिटेड ही  लँडमार्क कार्स ची सबसिडीअरी ओपन करेल.
क्राफ्ट्समन ऑटोच्या  पेरांम्बवूडूर येथील युनिटमध्ये काम सुरु झाले.
बँक ऑफ इंडियाला Rs ११२६.५० कोटींचा टॅक्स रिफंड मिळाला.
TVS मोटर्सने KILLWATT GMBH मढीला स्टेक  ३९.२८% वरून ४९% केला ८००० शेअर्स युरो २ मिलियनला घेतले.
CHALET हॉटेल आयुषी आणि पूनम इस्टेटमध्ये  १००%  स्टेक Rs ३१५ कोटींना घेणार.
CMS इन्फो चे चेअरमन राजीव कौल यांनी त्यांचा स्टेक २.६२% वरून ६.२% केला.
केसोराम  टाटा कॅपिटल, टाटा हाऊसिंग कडून Rs १८५० कोटी कर्ज घेऊन पूर्वी घेतलेलं कर्ज रिफायनान्स करणार.
 MOIL मँगेनीज कन्टेन्ट असलेल्या फेरो ग्रेड मँगेनीज च्या किमती १ मार्च २०२४ पासून ५% वाढवणार आहे.
पीडिलाइट एप्रिल २०२५ मध्ये भारत पुरी यांची टर्म संपल्यावर सुधांशु हे MD आणि कवींदरसिंग जॉईंट MD असतील.
वेदांताने केलेल्या थूथुकुडी  स्मेल्टरचे काम सुरु करायला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नाही.
लोम्बार्डमध्ये ICICI बँकेने २५.१ लाख शेअर्स Rs ४३१ कोटींना घेतले. त्यामुळे ICICI लोम्बार्ड ही ICICI बँकेची सबसिडीअरी झाली.
सॅनोफीच्या लाभांशासाठी ७ मार्च हे रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
schaeffler ने Rs २६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. हा लाभांश एप्रिल २०२४ मध्ये मिळेल.
भारती एअरटेल ने Rs ३०० अर्पुचे लक्ष्य ठेवले आहे.
आज IT फार्मा मध्ये प्रॉफिट बुकिंग तर मेटल्स एनर्जी इन्फ्रा रिअल्टी मध्ये खरेदी झाली
आज मार्च महिन्याचे मार्केटने जोरदार स्वागत केले. निफ्टी आज इंट्राडे ऑल टाइम हायवर होता.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३७४५ NSE निर्देशांक निफ्टी २२३३८ बँक निफ्टी ४७२८६ वर बंद झाले

.
भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.