आजचं मार्केट – १८ मार्च २०२४

.८२.६० च्या आसपास होते US $ निर्देशांक १०३.०३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३० आणि VIX १४.३२ होते. सोने Rs ६५३०० तर चांदी Rs ७५२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये तेजी  होती.
चीनचे औद्योगिक उत्पादन वाढले.याचा परिणाम मेटल्ससंबंधीत विशेषतः स्टील उत्पादक कंपन्यांवर झाला.
सरकारने क्रूड वरील विंडफॉल टॅक्स Rs ४६०० वरून Rs ४९०० केला. डिझेल पेट्रोल आणि ETF वरील करांत  कोणताही बदल केला नाही.
बलरामपूर चिनीने बायोप्लास्टिक साठी टाय अप केले.
LIC  आपल्या कर्मचाऱ्यांना  १६% पगारवाढ APRIL २०२२ पासून देणार आहे.
KBI ग्रीन ला १०० MW AC सोलर प्रोजेक्ट मिळाले.
कोफोर्ज QIP दवारा Rs ३२०० कोटी उभारले.
रेलटेलला BMC कडून Rs ३५२ कोटींची तर बिहारमधून Rs १३० कोटींची ऑर्डर मिळाली.
अडाणी ग्रुप रिन्यूएबल एनर्जी व्यवसायात Rs १.२० लाख कोटी गुंतवणार आहे.
TCNS क्लोदिंग आणि AB फॅशनच्या मर्जरला  BSE आणि NSE ने नो ऑब्जेक्शन लेटर दिले.
ल्युपिनच्या औरंगाबाद फॅसिलिटी चे ६ मार्च पासून केलेल्या तपासणीत USFDA ने  १ त्रुटी दाखवून फॉर्म NO. ४८३ इशू केला.
अंबरने रेल्वेसाठी स्वतंत्र सबसिडी सुरु केली.
SJVN ला गुजरात ऊर्जा निगम कडून २०० MW सोलर प्रोजेक्टसाठी LOI मिळाले.
RVNL ला महाराष्ट्र मेट्रो रेल कडून Rs ३३९.२० कोटींच्या प्रोजेक्ट साठी LOI  मिळाले.
इरकॉन ला NHIDCL ऎझोल कडून एझोल मध्ये ट्वीन ट्यूब  टनेल  साठी Rs ६३० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
HAL ला २५ डॉर्नियर एअरक्राफ्टसाठी Rs २८९० कोटींची ऑर्डर मिळाली.
सुलावाईनयार्डचा  टॅक्स संबंधात Rs ११६ कोटींचा मामला रिझॉल्व झाला.
D -मार्ट ने राजस्थान आणि आंध्र प्रदेशांत २ स्टोर्स उघडली. आता एकूण स्टोर्सची संख्या ३५४ झाली.
अनुप इंजिनीअरिंगची बोनस  इशूवर विचार करण्यासाठी २० मार्च रोजी बैठक आहे.
अंबुजा सिमेंटची सबसिडीअरी GEOCLEAN THE WASTE मॅनेजमेंट ने २ नवीन इनोव्हेटिव्ह फॅसिलिटी लाँच केल्या.
कुमार वेंकटसुब्रमनियम यांची  १ मे २०२४ पासून प्रॉक्टर आणि गॅम्बल चे MD म्हणून नेमणूक झाली.
स्नोमॅन लॉजिस्टिक्स मध्ये प्रमोटर गेटवे डिस्ट्रिपार्क यांनी ४.५ लाख शेअर्स खरेदी केले.
NTPC ने उत्तर कर्णपुरा थर्मल पॉवर प्रोजेक्ट नंबर २ मध्ये काम सुरु केले.
ऑरोबिंदो फार्माचे CURATEQ बायालॉजीक्स ची BP ११ या औषधाची यशस्वी चाचणी केली.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड  ऍसेट मॅनेजमेंटचे लिस्टिंग १९ मार्च २०२४ रोजी होईल. सरकारने केमिकल्सवर  अँटी डम्पिंग ड्युटी ५ वर्षांसाठी बसवली. याचा फायदा विनती ऑर्गनिक्स  ला होईल.
RITES ला Rs ६७.५ कोटींची ऑर्डर मिळाली.
सरकारने ग्लोबल EV उत्पादकांना भारतात त्यांच्या EV चे उत्पादन करण्यासाठी उत्तेजन देण्याचे ठरवले आहे. सरकार EV इंपोर्टवरील इम्पोर्ट  ड्युटी १०० % वरून १५% करण्याची शक्यता आहे. Rs २९  लाखांपेक्षा जास्त किमत असलेल्या कार्सना ही योजना लागू होईल. ही योजना तीन वर्षांत मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी US ५०० मिलियन गुंतवणूक करून उभारायला पाहिजे  ज्या EV ची CIF कॉस्ट  US $३५०००
असलेल्या कार्स वर १५% इम्पोर्ट ड्युटी आकारली जाईल. हा इम्पोर्ट ड्युटीचा फायदा कंपनी ने केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेपर्यंन्त किंवा US $ ६१८४ कोटींपर्यंत मर्यादित असेल.
अडाणी पॉवरने लेट पेंमेंट सरचार्ज आकारण्यासाठी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली.
आज फार्मा, रिअल्टी, इन्फ्रा, ऑटो, मेटल्स, मध्ये खरेदी झाली. IT, FMCG आणि बँकिंग, मिडकॅप स्मालकॅप  मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२७४८ NSE निर्देशांक निफ्टी २२०५५ बँक निफ्टी ४६५७५  वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.