आजचं मार्केट – १९ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८६.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.०० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.५७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३२ आणि VIX १४.२७ होते. सोने Rs ६५५०० आणि चांदी Rs ७५२०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
NVIDIA ने नवी चिप लाँच केली. ही नवी चिप आधीच्या चिपपेक्षा तिप्पट फास्ट आहे.
जपानच्या  सेंट्रल बँकेने २००७ नंतर प्रथमच व्याजाचे दर वाढवले. यिल्ड कर्व्ह कंट्रोल करणे थांबवले. जपानमध्ये व्याज चार्ज केले जात नव्हते. तेथून पैसा घ्यायचा आणि जेथे व्याज मिळते तेथे गुंतवायचे. व्याज दरातल्या फरकांत  ट्रेड करणे याला कॅरी ट्रेड म्हणतात. जपानमध्ये व्याजाचे दर वाढवल्यामुळे सोन्यामध्ये तेजी आली. जपान १० वर्षांच्या बॉण्ड्सची खरेदी विक्री करेल. ETF आणि REIT मध्ये खरेदी करणार नाही.
क्रूड ५ महिन्याच्या कमाल स्तरावर आहे. इराकने त्यांच्या क्रूडच्या निर्यातीमध्ये ३.३BPD इतकी कपात केली. इराण क्रूडचे उत्पादन वाढवणार आहे. क्रूडच्या मागणीमध्ये १.५ मिलियन BPD एवढी वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गीक गॅसच्या किमती वाढत आहेत.
FII ने Rs २०५१ कोटींची विक्री तर DII ने Rs २२६१ कोटींची खरेदी केली.
टाटा सन्स ने TCS मधील त्यांचा ०.६४% इक्विटी स्टेक Rs ४००१ ऑफर प्राईसने म्हणजे CMP ला ३.६% डिस्काउंटने विकला.
AB सन्स लाईफ AMC ३.३ कोटी शेअर्स म्हणजेच ११.४७% इक्विटी लार्ज देवालच्या माध्यमारून विकेल. यातील ७% OFS आणि उरलेला ग्रीन शु ऑप्शन द्वारे Rs ४५० प्रती शेअर या दराने विकणार आहे.
ग्रासिम ने NCD दवारा Rs १२५० कोटी उभारले.
DR. रेड्डीजने UK  मध्ये कॅन्सरवरील बायोसिमिलर औषध ‘VERASOVA’ लाँच केले.
HCL टेक ने ‘कम्प्युटर एडेड सॉफ्टवेअर’ बरोबरच्या कराची मुदत वाढवली.
जिंदाल स्टेनलेस ने JBM ऑटो बरोबर ५००+ EV बसेससाठी करार केला.
REC ने Rs ४.५ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.
टाटा स्टिलने NCD द्वारा Rs २७०० कोटी उभारण्याचा निर्णय घेतला.टाटा स्टील पोर्ट तालबोट येथील कोक ओव्हनचे कामकाज बंद करणार आहे.कोकची आयात वाढवली जाईल.
पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीसंबंधात पतंजलीने कोर्टाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने कोर्टाने CONTEMPT ऑफ COURT ची कारवाई कंपनी विरुद्ध सुरु केली आहे.
पॉप्युलर व्हेइकल्स आणि सर्व्हिसेसचे  BSE वर Rs २९२ आणि NSE वर Rs २८९.२० वर लिस्टिंग झाले.
JBM ऑटोला १३९० EV बसेस साठी Rs ७५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
ब्राझीलच्या हेल्थ रेग्युलेटर्स ने ११ ते १५ मार्च २०२४ दरम्यान १० युनिट्सची तपासणी केली. एकही त्रुटी दाखवली नाही. क्लीन चिट दिली. त्यामुळे हा शेअर तेजीत होता.
GENESYS ला BMC कडून  Rs १५५.८५ कोटीच्या प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
HG इन्फ्रा आणि STOCKWELL सोलर सर्व्हिसेसच्या JV ला  जोधपूर विद्युत वितरण निगम कडून Rs १०२६ कोटींची ऑर्डर मिळाली.
लेमन ट्री हॉटेलने त्रिपुरामध्ये ८० रूम्सच्या हॉटेलसाठी करार केला.
शिपिंग कॉरपोरेशन लँड  ऍसेट मॅनेजमेंटचे लिस्टिंग Rs ४४.४६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर T टू T ग्रुपमध्ये ठेवला आहे.
ओलेक्ट्रा ग्रीन ला आसाम स्टेट कॉर्पोरेशन कडून १० EV बसेससाठी ऑर्डर मिळाली.
इनॉक्स ग्रीन सर्व्हिसेस एनर्जी च्या सबसिडीअरीला  फॉक्स विंडटेकनिक ला NLC इंडिया कडून ३३WTGS रिस्टोरेशन साठी LOA मिळाले
अशोक लेलँड ने ‘MINUS ZERO’ बरोबर सेल्फड्रायव्हिंग ट्रक डेव्हलप करण्यासाठी पार्टनरशिप केली.  सन फार्माने सांगितले की ऑस्ट्रेलियन THERAPEUTIC गुड्स ऍडमिनिस्ट्रेशन ने विनलेवि क्रीम या ट्रॉपिकल ACNE ट्रीटमेंट साठी वापरल्या जाणाऱ्या औषधाला मंजुरी दिली.
इझी ट्रिप प्लॅनर्सने ZOOMCARS बरोबर बुकिंग करून मागणीप्रमाणे सेल्फड्राईव्ह CAR सेवा पुरवण्यासाठी करार केला.
आज IT, FMCG,फार्मा, PSE, एनर्जी, इन्फ्रा,बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२०१२ NSE निर्देशांक निफ्टी २१८१७ बँक निफ्टी ४६३८४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.