आजचं मार्केट – २० मार्च २०२४

आज क्रूड US $ ८७.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.६४ USA १० वर्षे  बॉण्ड यिल्ड ४.२९ आणि VIX १४.०९ होते. सोने Rs ६५६०० तर चांदी
Rs ७५५०० च्या आसपास होती.
USA मधील नवीन घरांच्या विक्रीचा डेटा  १२% वाढला.
‘VI’ Rs १४४० कोटींच्या डिबेंचर्सचे इक्विटीमध्ये कॉन्व्हर्जन करणार आहे.
ICICI प्रु च्या म्युच्युअल फंडाने स्टार हेल्थमधील ०.६% स्टेक Rs ५४० प्रती शेअर या दराने घेतला.
SBI कार्ड्सनी Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
शक्ती पम्प Rs १२७२ फ्लोअर प्राईसने Rs २०० कोटी QIP दवारा उभारणार आहे.
FII ने Rs १४२१.४८ कोटींची आणि DII ने Rs ७४४९.४८ कोटींची खरेदी केली. आज PCR ०.७३ होता.
अल्ट्राटेक सिमेंटला ‘केसोराम सिमेंट खरेदी करण्यासाठी CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ची मंजुरी मिळाली.
ABSL AMC मध्ये  ओव्हरसबस्क्रिप्शन झाल्यास ग्रीन शू ऑप्शन घेतले जाईल असे ठरले होते. त्याप्रमाणे ४.४७ % ग्रीन  शु ऑप्शन आणि ७% बेस OFS झाली.
ऑरोबिंदो फार्माला ५०mcg/स्प्रे मोमेटोसोन फ्युरॉईट मोनोहायड्रेट नसाल स्प्रे उत्पादन करायला आणि विक्री  करायला USFDA ची मंजुरी मिळाली.
TCS चे BaNCs हे युनिव्हर्सल फायनान्सियल सोल्युशन USA मधील सेंट्रल बँक वापरणार आहे.
झोमॅटोने आता शाकाहारी लोकांसाठी प्युअर व्हेज फ्लीट  आणि प्युअर व्हेज मोड लाँच केला.
NBCC ला विदेश मंत्रालयाकडून Rs २४९ कोटींची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी साठी ऑर्डर मिळाली. खादीम इंडियाची भारतात ८६४ स्टोर्स आहेत. त्यांचा या वर्षांत १०० स्टोर्स उघडण्याचा विचार आहे.कंपनीची ७५% प्रोडक्टस Rs १००० किमतीपेक्षा कमी किमतीची आहेत. E-कॉमर्स आणि अनऑर्गनाईझ्ड सेक्टर कडून स्पर्धा आहे. कंपनीने रिटेल डिव्हिजनला डि-मर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेप्रमाणे डिमर्ज्ड कंपनीचा १ शेअर खादिमच्या शेअरहोल्डरला मिळेल.
हुडको बॉण्ड्स आणि डिबेंचर्स दवारा Rs ४०००० कोटी उभारणार आहे.
अनुप इंजिनीअरिंग ने १;१ बोनस शेअरचा इशू जाहीर केला.
२८ डिसेम्बरला झालेल्या निर्णयाप्रमाणे IREDA चा समावेश निफ्टीमध्ये होणार होता पण सेबीच्या ‘पोर्टफोलिओ कॉन्सेन्ट्रेशन नॉर्म्स’  चे पालन न केल्यामुळे आता इरेडाचा समावेश कोणत्याही निफ्टीच्या निर्देशांकात केला जाणार नाही.
HUL त्यांच्या  ‘MAGNUM’ आईस्क्रीम ब्रॅण्ड स्पिन ऑफ करणार आहे यामुळे ७५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून  काढणार आहेत.HUL आता ‘ब्युटी’ ‘वेलबीईंग’ ‘पर्सनल केअर’ आणि ‘न्यूट्रिशन’ या चार डिव्हिजन वर लक्ष्य केंद्रित करणार आहे.
टाइम टेक्नोप्लास्टला हाय प्रेशर IV कॉम्पोझिट हायड्रोजन सिलिंडरच्या उत्पादन करायला आणि  टेस्टिंग साठी पेसो ( पेट्रोलियम एक्सप्लोझीव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन ) कडून परवानगी  मिळाली..
रामकि इन्फ्राला Rs २१८ कोटींच्या २ ऑर्डर मिळाल्या.
JK सिमेंटने  २ कोल  ब्लॉक्ससाठी बोली जिंकली.
VENKY’ज ने ऍनिमल हेल्थ आणि व्हेटरनरी मेडिसिनल प्रॉडक्टस उत्पादन करणाऱ्या केसुरडी, सातारा येथील युनिटमध्ये उत्पादन सुरु केले.
ज्युपिटर वॅगनला ‘BONATRANS INDIA’ च्या अधिग्रहणासाठी मंजुरी मिळाली.
ब्ल्यू स्टार ने ६० लिटर ते ६०० लिटर डीप  फ्रिझर्सची रेंज लाँच केली.
सेबीने LIC च्या शेअर्समध्ये फ्रंट-रनिंग अनियमितता झाल्याचे कन्फर्म केले. कंपनीच्या ग्राहकांना माहिती देण्याआधी एखादी फर्म किंवा ब्रोकर या मिळालेल्या माहितीच्या आधारावर ट्रेड करतो तेव्हा त्याला शेअरमध्ये फ्रंट रनिंग झाले असे म्हणतात. याचा परिणाम म्हणजे सेबीने ५ एंटिटीजवर शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यावर बंदी घातली.
TCS लंडन मध्ये पेस पोर्ट इनोव्हेशन हब डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी उघडला.
ITC च्या १२.३० लाख शेअर्समध्ये लार्ज ट्रेड झाले.
आज ऑटो, इन्फ्रा रिअल्टी ऑइल&गॅस, एनर्जी मध्ये खरेदी तर केमिकल्स मेटल्स फार्मा बँकिंग IT मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२१०१ NSE निर्देशांक निफ्टी २१८३९ बँक निफ्टी ४६३१० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.