आजचं मार्केट – २१ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८६.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०२.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२६ आणि VIX १२.५४ होते. सोने Rs ६६८०० तर चांदी Rs ७६८०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.
आज फेड ने आपल्या रेट्समध्ये कोणतेही बदल केले नाहीत. रेट ५.२५ ते ५.५० दरम्यान राहतील असे सांगितले. त्या त्या वेळचा इकॉनॉमिक डेटा पाहून येत्या वर्षात तीन रेट कट करून रेट ४.५०% ते ४.७५% पर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिला रेटकट जूनमध्ये त्यानंतर एक पॉलिसी सोडून पुन्हा एक रेट कट आणि पुन्हा एक पॉलिसी सोडून १ रेट कट असे तीन रेट कट केले जातील. फेडने सांगितले की काही प्रमाणांत महागाई कमी झाली  पण बेरोजगारी वाढली.

CYIENT ची ‘इन्फोटेक HAL ‘ हे JV आहे. HAL बरोबरच्या या JV संबंधित इंसॉल्व्हंसीची प्रक्रिया सुरु करा असा अर्ज केला.
RVNL  Rs १६७.२८ कोटींच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सर्व्हिस प्रोजेक्ट साठी लोएस्ट बीडर ठरली.
प्रिन्स पाईप & फिटिंग ने गुजरातमध्ये भुज येथे असलेला प्लांट आणि ‘AQUEL’ हा ब्रॅण्ड घेण्यासाठी Rs ५५ कोटींचे ऍसेट पर्चेस अग्रीमेंट केले.
सास्केन ने अनुप सिलिकॉन सर्व्हिसेसमध्ये ६०% स्टेक Rs ३३.२० कोटींना घेतला.
WOKHARDT Rs ५४४.०२ प्रती शेअर या किमतीने QIP आणणार आहे.
अंबर इंटरप्रायझेस RESOJET प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ५०% स्टेक Rs ३५ कोटींमध्ये घेणार आहे.
SBI कार्ड ने टायटन बरोबर TITANSBI CARD लाँच केले.
NMDC ने आयर्न ओअर च्या किमती Rs २०० ते Rs २५० प्रती टन कमी केल्या. तसेच फाईन्सच्या किमती Rs २५० प्रती टन कमी केल्या. यामुळे आयर्न ओअर आणि फाईन्सच्या किमती अनुक्रमे Rs ५८०० आणि Rs ५०६० प्रती टन झाल्या.
TVS होल्डिंगने Rs ९४ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. कंपनी NCD दवारा Rs ६५० कोटी उभारणार आहे.
ड्रीमफोक चे रेटिंग BBB+आणि आऊटलूक स्टेबल केला.
KRYSTAL बिझिनेस सर्व्हिसेस चे BSE वर Rs ७९५, NSE वर Rs ८७५ वर लिस्टिंग झाले.
JSW इंफ्राने १०० MMT कार्गो हँडलिंग चे लक्ष्य पूर्ण केले.
DOMS या कंपनीने ‘स्किड’ या कंपनीचे अधिग्रहण केले.
रेलटेलला बिहार  एज्युकेशन प्रोजेक्ट कौन्सिल कडून Rs ९९ कोटींची ऑर्डर मिळाली.
ज्युपिटर वॅगन Rs २७१ कोटींमध्ये ‘BONATRANS INDIA’  घेणार आहे.
PB फिनटेक ने पेमेंट अग्रीगेटर बिझिनेस साठी वेगळी सबसिडीअरी स्थापन करणार.
मार्च  २०२४ चा मॅन्युफॅक्चरिंग PMI ५६.९ वरून ५९.२ झाला. सर्व्हिसेस PMI ६०.६ चा ६०.३ झाला तर कॉम्पोझिट PMI ६०.६ चा ६१.३ झाला.
भारत डायनामिक्स आज स्टॉक स्प्लिट आणि लाभांशावर विचार करेल.
जना स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित Rs ६० कोटींच्या टॅक्स संबंधात रिलीफ मिळाला.
जिंदाल पॉलीच्या मायनॉरिटी शेअरहोल्डर्सनी मिसमॅनेजमेंट साठी क्लास ऍक्शन सूट दाखल केली.
TCS ने RAMBOLL या आर्किटेक्ट आणि इंजिनीअरिंग फर्म बरोबर ७ वर्ष मुदतीचा IT इन्फ्रा ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.
इंडीगो १२५ विमानतळावरून दर आठवड्याला १३७८१ उड्डाणे तर स्पाईस जेट या १६५७ उड्डाणे करेल. LIC ने Rs ६६३ कोटींच्या GST डिमांडविरुद्ध चेन्नई गस्त ऑथोरिटीजकडे अपील केले.
लॉईड्स मेटल QIP दवारा Rs ५००० कोटी उभारणार आहे.
दीपक नायट्रेटच्या बडोदा येथील प्लांट मध्ये ‘बेन्झो TRIFLUORIDE’ चे उत्पादन सुरु झाले.
अथर एनर्जीचा US $ ४०० मिलियनचा IPO जून मध्ये येऊ शकतो.
महिंद्रा & महिंद्रा आणि अडाणी टोटल  यांनी EV चार्जिंग इंफ्रासाठी भागीदारी केली.
आज रिअल्टी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, ऑटो, फार्मा, बँकिंग, IT क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२६४१ NSE निर्देशांक निफ्टी २२०११ बँक निफ्टी ४६६८४ वर बंद झाले.

.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.