आजचं मार्केट – २२ मार्च २०२४

.

आज क्रूड US $ ८५.२० प्रती बॅरलच्या आसपास तरं रुपया US $१= Rs ८३.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०३.९० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२४ आणि VIX १२.९१ होते. सोने Rs ६६१०० आणि चांदी Rs ७४७०० च्या आसपास होती.
एक्सेंच्युअर या कंपनीचे FY ऑगस्टमध्ये पूर्ण झाले. या कंपनीने रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स २% ते ५% वरून १% ते ३% केला. याचा परिणाम म्हणून भारतातील IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
बँक ऑफ इंग्लंड जून २०२४ पासून रेटकट करणार आहे.
स्विस सेंट्रल बँकेने रेटकट केला १.७५% वरून १.५०% केला.
FII ने Rs १८२७ कोटींची विक्री तर DII ने Rs ३२०९ कोटींची खरेदी केली.
भारत डायनॅमिक्स ( BDL) ने Rs ८.८५ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट २ एप्रिल २०२४  ही ठेवली आहे. कंपनीने  त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले. ही प्रक्रिया शेअरहोल्डर्सची संमती मिळाल्यानंतर २-३ महिन्यात पूर्ण होईल.
REC ही कंपनी फंड उभारण्यावर २७ मार्च २०२४ रोजी विचार करेल.
मान इन्फ्राला  मुंबईमध्ये प्रोजेक्ट मिळाले.या प्रोजेक्ट मधून कंपनीला Rs २१०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.
सारडा एनर्जीला सुरजगड येथे १ आयर्न ओअर ब्लॉकसाठी कॉम्पोझिट लायसेन्स मिळाले.
टाटा केमिकलला Rs १०४ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
SAMHI हॉटेल्स त्याच्या कॉर्पोरेट गॅरंटीची रक्कम ३ WHOLLY OWNED  सबसिडीअरीजसाठी Rs ८०१.६० कोटींनी वाढवणार.
विप्रोच्या सबसिडीअरीने जनरल मोटर्स आणि मॅग्ना इंटरनॅशनल बरोबर नवी एंटीटी स्थापन करण्यासाठी करार केला.
माझगाव डॉक्सने संजीव सिंघल यांना ६ महिन्यांकरता मुदतवाढ दिली. कंपनी १४.५५ एकर जमीन आणि बिल्डिंग २९ वर्षांच्या लीजवर देणार आहे.
टाटा कम्युनिकेशन्स त्यांचा डिजिटल सर्व्हिसेस व्यवसाय ‘नोव्हामेश’ या सबसिडीअरीकडे Rs ४५८ कोटींना ट्रान्स्फर करणार आहे.
प्रेस्टिज ‘इंदिरापूरम एक्स्टेंशन NCR’ येथे ६२.५ एकर जागा Rs ४६८ कोटींना घेतली. या जागेत ‘प्रेस्टिज सिटी’ ही टाऊनशिप बांधणार आहे.
DOMS ही कंपनी SIKDO या बॅग,स्कूल बॅग्स,पाऊचेस उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये ५१% स्टेक घेणार आहे.
महिंद्रा लाईफ ही कंपनी बंगलोर येथे नवीन प्रोजेक्ट ‘महिंद्रा झेन’ लाँच करणार आहे.
श्री राम  फायनान्स मध्ये ७७.७८ लाख शेअर्सचे Rs १७९६ कोटींचे Rs २३१० प्रती शेअर या भावाने लार्ज डील झाले.
कर्नाटक बँक Rs ६०० कोटींचे QIP इशू आणणार आहे.
टेक्समको रेल Rs २५० कोटींचा QIP इशू आणणार आहे.
टेक्समको इंजिनीअरिंग Rs १५०० कोटींचा QIP Rs १६२.८८ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने आणणार आहे.
क्रॉम्प्टन ला Rs ६८ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
लेमन ट्री हॉटेलने रांचीमध्ये  ४५रूम्सच्या हॉटेलसाठी लायसेन्सिंग अग्रीमेंट केले.
इंडिगो त्यांचा क्षमता विस्तार करणार आहे. या वर्षी १०% क्षमता विस्तार होईल असे कंपनीने सांगितले. दर आठवड्याला १ विमान त्यांच्या फ्लीट मध्ये वाढेल आणि ५५००-५६०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.
एंजल १ ने Rs ४१० कोटींची IPL स्पॉन्सरशिप जिंकली.
चीनच्या एव्हरग्रँड नी US ७८ अब्ज चा घोटाळा केला. कागदोपत्री हेराफेरी केली, खोट्या उत्पन्नाच्या आधारावर रोखे चढ्या भावाने विकले. आता ज्यांनी हे रोखे खरेदी केले ते अडचणीत आले आलेत.एव्हरग्रँडवर US $ ३०० अब्ज एवढे कर्ज आहे.
सेबी ने सांगितले की म्युच्युअल फंडांनी इझी एंट्री बरोबरच ग्राहकांना  इझी एक्सिट  मिळेल याची काळजी घ्यायला हवी. Rs २५० SIP कसे व्हायेबल होईल याचा सेबी अभ्यास करत आहे.
सेबी २८ मार्च पासून T+० सेटलमेंटची ट्रायल सुरु करणार आहे.
ओव्हरसीज सिक्युरिटीज मध्ये म्युच्युअल फंडांनी  गुंतवणूक करण्याची मर्यादा US $ ७ बिलियन आहे. आणि ओव्हरसीज ETF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा  US $ १ बिलियन आहे. ही ETF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा पूर्ण होण्याच्या बेतात आहे. त्यामुळे सेबीनी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडांना या ओव्हरसीज एटीफमध्ये १ एप्रिल २०२४ पासून  गुंतवणुकीसाठी SIP  स्वीकारू नयेत असा आदेश दिलेला आहे.
NMDC ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमध्ये लिथियम ऍसेट खरेदी करणार आहे.
KPI ग्रीन इंजिनीअरिंग IPO चे आज BSE वर Rs २०० वर लिस्टिंग झाले.
वेलस्पन कॉर्पला Rs २०३९ कोटींची ऑर्डर मिळाली.
सेबीच्या  वेदांताला ‘कॅप्रीकान  UK’ ला डिव्हिडंड देण्यामध्ये झालेल्या उशिरापोटी Rs ७७.६० कोटी व्याज म्हणून देण्याच्या  आदेशाला SAT ( सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनल) ने स्थगिती दिली.
इरेडा FY २०२४-२०२५ मध्ये Rs २४२०० कोटी कर्जाच्या रूटने उभारेल.
शाम मेटॅलिक्स ला महाराष्ट्र राज्य सरकार कडून कॉम्पोझिट लायसेन्ससाठी LOI मिळाले.
KEC इंटरनॅशनल ला Rs १००४ कोटींची ऑर्डर मिळाली.
न्यूलँड लॅबच्या हैदराबाद युनिटच्या इन्स्पेक्शनमध्ये एकही त्रुटी मिळाली नाही. क्लीन चिट मिळाली.
उदयपूर GST ऑथॉरिटीज कडून हिंदुस्थान झिंकला Rs ९१.९० कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
क्रॉम्प्टन मध्ये ४८.३३ लाख शेअर्सचा Rs १२९ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
इन्फोसिसमध्ये ४९ लाख शेअर्सचे लार्ज ट्रेड झाले.
LTICCL ( L & T इनोव्हेशन कॅम्पस चेन्नई लिमिटेड ही कंपनी LTSL ( L & T SEAWOODS लिमिटेड) यामध्ये मर्ज  करण्यासाठी NCLT ने मंजुरी दिली.
 आज IT क्षेत्र सोडून मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स आणि बाकीच्या क्षेत्रात( रिअल्टी ऑटो फार्मा ईंफ्रा, एनर्जी  FMCG) मध्ये  खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२८३१ NSE निर्देशांक निफ्टी २२०९६  बँक निफ्टी  ४६८६३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.