आजचं मार्केट – २६ मार्च २०२४

.

आज क्रूड US $ ८६.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.१८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२३ आणि VIX १२.६८ होते. सोने Rs ६५९०० तर चांदी Rs ७४७०० होती.
FII ने Rs ३३१० कोटींची विक्री आणि DII ने Rs ३७६५ कोटींची खरेदी केली.
JSW एनर्जीने रिलायन्स पॉवर बरोबर Rs १३२ कोटींचे बिझिनेस कॉन्ट्रॅक्ट केले.
वेलस्पन यांच्या असोसिएट कंपनीने सौदी आरामको बरोबर केलेले Rs ३३९ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल  केले
सेबीने ICICI सिक्युरिटीजच्या मर्चंट बँकिंग डिव्हिजन च्या डिसेंबर २०२३ मध्ये केलेल्या तपासणीनंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्निंग इशू केली.
हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सने त्यांचे  ऑप्टिकल फायबर ऍसेट्स त्यांची सबसिडीअरी इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्सला Rs २०८.०४ कोटींना विकण्यासाठी करार केला.
ल्युपिन त्यांचा जनरिक्स ट्रेड बिझिनेस स्लम्प सेल बेसिसवर ल्युपिन लाईफ सायन्सेस ला Rs १०० कोटी – Rs १२० कोटी ना वेगळा करण्याचा विचार करत आहे.
DR रेड्डीज लॅबने USA मधील बायोफार्मास्युटिकल कंपनी ‘PHARMAZZ INC’ बरोबर ‘CENTHAQUINE’या  ‘HYPOVOLEMIC SHOCK ‘ च्या ट्रीटमेंट मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाला भारतात  कमर्शियलाईझ करण्यासाठी करार केला.
अडाणी पोर्ट गोपाळपूर पोर्टमध्ये ९५% स्टेक  घेणार त्याची एंटरप्राइज व्हॅल्यू Rs ३०८० कोटी आहे. अडाणी पोर्ट हे डील Rs १३४९ कोटी देऊन करणार आहे.
IRDAI ने  सरेंडर व्हॅल्यू ठरवली ३ वर्षापर्यंत पॉलिसी सरेंडर केल्यास तेव्हढीच किंवा थोडी कमी देण्यात येईल. ४-७ वर्षापर्यंत थोडी वाढेल.
क्युपिड या कंपनीने १:१ बोनस शेअर इशू आणि  त्यांच्या १ शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले यासाठी ४ एप्रिल ही रेकॉर्ड डेट ठरवली.
पर्सिस्टंट सिस्टिम्सने त्यांच्या १ शेअरचे २ शेअरमध्ये स्प्लिट केले १ एप्रिल २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
REC ने Rs ४.५० प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला. यासाठी २८ मार्च २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
बर्जर पेन्ट्स ने रामकृष्ण मिशन विद्यामंदिर बरोबर ग्रीन अमोनिया चे इंडस्ट्रियल स्केल वर उत्पादन आणि एक्स्प्लोरेशन करण्यासाठी करार केला.
अशोक लेलँड ने Rs ४.९५ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला.यासाठी ३ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
अनमॅनड एरियल व्हेईकल UAV ड्रोन मेजर IDEAFORJ ही लॉजिस्टिक्स मध्ये उतरणार आहे. १०० किलो वजन १०० किलोमीटर वाहून नेईल असे ड्रोन बनवणार आहे.
क्रिसिल च्या Rs २८ लाभांशासाठी २८ मार्च २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित  केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने MSKVY १९TH सोलर SPV आणि MSKVY २२ND सोलर SPV मध्ये १००% स्टेक   MSEB ऍग्रो पॉवर कडून घेण्यासाठी रिलायन्स च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली.
हा स्टेक  महाराष्ट्रांत १२८MW स्प्रेड वेगवेगळ्या सोलर क्षमता उभारण्यासाठी खरेदी केला आहे.
 आहे.
RVNL ने एअरपोर्ट ऑथॉरिटी बरोबर Rs २२९.४३ कोटींचा करार केला.
मारुतीने ११८५१ बॅलेनो आणि ४१९० वॅगनार  रिकॉल केल्या.
पारादीप पोल्युशन कंट्रोल बोर्डाने ओरिसामधील प्लांट बंद करायला सांगितले.
झायडस लाईफ LETERMOVIR टॅब्लेट २४० mg साठी USFDA ची संमती दिली. हे व्हायरसमुळे  होणाऱ्या आजारावर औषध आहे.
HAL ने गयाना डिफेन्स फोर्स बरोबर हिंदुस्थान २२८ COMMUTAR एअरक्राफ्ट आणि स्पेअर पार्टससाठी Rs १९४ कोटींचा करार केला.
रशिया आणि युक्रेन मधील जिओपॉलिटिकल तणावामुळे क्रूड US $ ८७ प्रती बॅरलवर पोहोचले.
मनकाईन्ड फार्मा ने २.९% स्टेक जो सध्या BIEGE आहे तो Rs २१०३ ते Rs २२१४  प्रती शेअर या भावाने
ब्लॉक डीलदवारा Rs २४६० कोटींना विकणार आहे.
युनो मिंडाने EV इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करणे आणि विकणे यासाठी स्टारचार्ज एनर्जी बरोबर टेक्निकल लायसेन्स अग्रीमेंट केले.
EXIDE ने क्लोराईड मेटल या WHOLLY OWNED सबसिडीअरीमध्ये Rs ११० कोटी गुंतवले. एक्साइड ची सबसिडीअरीला Rs १३३ कोटींची इन्कम  टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
अल्ट्राटेक सिमेंटने १ MTPA ब्राऊन फिल्ड  सिमेंट क्षमता उत्तराखंडमध्ये रुडकी  येथे सुरु केली. त्यामुळे या प्लांटची क्षमता २.१ MTPA झाली.
NTPC  झारखंड मधील चट्टी बॅरियातू कोल  मायनिंग प्रोजेक्ट मध्ये १ एप्रिल २०२४ पासून कमर्शियल ऑपरेशन सुरु करणार.
सन टीव्ही २८ मार्च २०२४ रोजी डिव्हिडंड देण्यावर विचार करेल.
इंडियन मेटल अँड फेरो अलॉयज २९ मार्च रोजी स्पेशल लाभांशावर विचार करेल.
HG इन्फ्राला जोधपूर विद्युत निगम लिमिटेड कडून Rs ५३४ कोटींची ऑर्डर मिळाली.
सुदर्शन केमिकल्स त्यांचे युरोप BV मधील स्टेक  विकणार आहे.
JM फायनॅन्शियल्स आणि IIFL यांचे स्पेशल ऑडिट RBI ने सुरु केले.
सोम डिस्टीलरीज ची सबसिडीअरी वूडपेकर डिस्टीलरीजच्या हसन युनिटमध्ये ३० मार्च पासून ट्रायल रन सुरु होईल.
फोर्टिस हेल्थकेअरच्या सबसिडीअरीला Rs ८९.५८ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
सुंदरम क्लेटन ने Rs ५.१५ अंतरिम लाभांश जाहीर केला.
स्पाईस जेटने एक्स्पोर्ट ऑथॉरिटी कॅनडा बरोबर Rs ७५५ कोटींच्या सेटलमेंट साठी करार केला.
आज ऑईल आणि गॅस, रिअल्टी, मिडकॅप ,स्मालकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली तर IT बँकिंग FMCG क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२४७० NSE निर्देशांक निफ्टी २२००४ तर बँक निफ्टी ४६६०० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.