आजचं मार्केट – २७ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८५.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२३ आणि VIX १२.७६ होते. सोने Rs ६६६०० आणि चांदी Rs ७४४०० च्या आसपास होते.
भारती हेक्साकॉम चा Rs ४२७५ कोटींचा IPO ( पूर्णपणे OFS ) ३ एप्रिल २०२४ ला ओपन होऊन ५ एप्रिल २०२४ ला बंद होईल. ह्या IPO तील  शेअरची दर्शनी किंमत Rs ५ असून प्राईस बँड Rs ५४२ ते Rs ५७० निश्चित केला आहे. सरकारी कंपनी टेलिकम्युनिकेशन्स कंसल्टंट्स इंडीया लिमिटेड (TCIL) त्यांच्या ३०% स्टेक  पैकी १५% स्टेक या IPO  दवारा विकत आहे. राहिलेला १५% स्टेक  TCIL  पुढील सहा महिन्यांपर्यंत विकू शकणार नाही( लॉक-इन पिरियड). हेक्साकॉम ही कंपनी राजस्थान आणि उत्तरपूर्वी राज्यात मोबाइल सर्व्हिसेसचा बिझिनेस करते. भारती एअरटेलचा भारती हेक्साकॉममधील स्टेक ७० % आहे तो कायम राहील.
ब्रह्मपुत्रा इन्फ्राला Rs ६० कोटींची ऑर्डर मिळाली.
ज्युबिलण्ट फुड्सला GST ऑथॉरिटीकडून Rs १७.१२ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
PAKKA च्या जागृती प्रोजेक्टची कॉस्ट Rs ५५० कोटींवरून Rs ६७५ कोटी झाली.
शक्ती पंप्स QIP दवारा Rs २०० कोटी उभारणार आहे.
अडाणी ग्रीन ने राजस्थानमध्ये १८० MW सोलर पॉवर प्रोजेक्ट ऑपरेशनलाइझ्ड केले.
T +० सेट्लमेन्ट मध्ये अंबुजा, अशोक लेलँड, बजाज ऑटो, BPCL, बिर्ला सॉफ्ट, बँक ऑफ बरोडा, MRF, नेस्ले,ONGC, SBI, युनियन बँक, पेट्रोनेट LNG, सिप्ला, कोफोर्ज,डिव्हीज लॅब, हिंदाल्को, इंडियन हॉटेल्स JSW स्टील, NMDC,LIC HSG, LTI MINDTREE  सॅवर्धना मदर्सन, टाटा कम्युनिकेशन, ट्रेंट,वेदांत या  २५ शेअर्सचा समावेश असेल. ही सेटलमेंट ऑप्शनल बेसिसवर २८ मार्च २०२४ पासून सुरु होईल.
S & P ने भारताच्या ग्रोथचे अनुमान ६.८% केले. कारण भारतातील डोमेस्टिक डिमांड आणि भारताची निर्यात वाढत आहे.
L & T ला त्यांच्या बिल्डिंग आणि फॅक्टरी बिझिनेससाठी Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटीं दरम्यान ऑर्डर मिळाली.
 इंडिया रेटिंग्सने कल्याण ज्वेलर्सचे रेटिंग ‘A’ वरून ‘A +’ केले.
ऍस्टर  DM  हेल्थकेअरमधील ९.८% इक्विटी स्टेक ऑलिम्पस कॅपिटल एशिया Rs ४०० ते ४३२ प्रती शेअर दरम्यान भावाने  Rs १९५२.८० कोटींना  विकला
स्टॅन्डर्स चार्टर्ड बँकेने CDSL मधील ७.८% स्टेक Rs १६७२ प्रती शेअर या भावाने US $ १५१ मिलियनला विकला.
नोसिलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने दहेज येथील रबर केमिकल प्लांटची क्षमता २०% वाढवण्यासाठी Rs २५० कोटींची गुंतवणुपर्यंत करण्यासाठी मंजुरी दिली. या प्लांटची वर्तमान क्षमता ११५०००MTA आहे.
ऍव्हेन्यू  सुपरमार्केटने .तेलंगणामध्ये करीमनगर आणि नरसिंगी आणि गुजरातमध्ये सचिन येथे ३ नवीन स्टोर्स उघडली. आता त्यांच्या स्टोर्स ची संख्या ३५७ झाली.
SH  केळकर मार्च २९ २०२४ रोजी लाभांशावर विचार करतील. या लाभांशासाठी २ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
इंडो रामा सिंथेटिक्स च्या प्रमोटर उर्मिला लोहिया यांनी ओपन मार्केटमधून कंपनीचे ५.३५ कोटी शेअर्स खरेदी केले.
LIC HSG  फायनान्सचा शेअर LUXEMBERG स्टॉक एक्स्चेंज मधून डीलीस्ट झाला.
प्रिझ्म जॉन्सन च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स २९ मार्चच्या बैठकीत NCD द्वारे फंड उभारण्यावर विचार करेल.
शाम मेटॅलिक्सला महाराष्ट्रांत १५२६ एरियाच्या आयर्न ब्लॉक साठी कॉम्पोझिट लायसेन्स साठी LOI मिळाले.
सिप्लाने सॅनोफी आणि सॅनोफी हेल्थकेअर बरोबर त्यांच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमशी संबंधित ६ ब्रँडेड औषधांच्या  भारतात डेव्हलपमेंट आणि वितरण करण्यासाठी केला. यांत कंपनीच्या FRISIUM या फीटवरील प्रसिद्ध औषधाचा समावेश आहे.
कोकोच्या किमती ४२% ने वाढल्या. US $ १०००० पर्यंत गेल्या.
ल्युपिनला आयकर विभागाकडून Rs ४७७ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
ORIOLA यांनी HCL टेक बरोबर पार्टनरशिप केली.
सेंच्युरी प्लाय ने आंध्र प्रदेशातील MDF युनिटमध्ये कामकाज सुरु केले.
अन्नपूर्णा स्वादिष्टने मस्टर्ड ऑईलचा ‘आरती’ हा ब्रॅण्ड Rs २८ कोटींना खरेदी केला.
टाटा मोटर्सच्या सबसिडीअरीने टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी ने HPCL  बरोबर करार केला.
IPCA लॅबने ओमेक्सा फॉर्म्युलरी बरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरसाठी करार केला.
अपोलो पाईप्स किसान मोल्डिंग मध्ये ५३.५७ % स्टेक घेणार आहे.
वेलस्पन कॉर्पची सबसिडीअरी सिंटेक्स-BAPL मध्ये Rs २३५५ कोटींची गुंतवणूक करेल.
आज इन्फ्रा, रिअल्टी, ऑटो क्षेत्रांमध्ये खरेदी झाली तर PSE, IT, FMCG या क्षेत्रांत प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक ७२९९६ NSE निर्देशांक निफ्टी २२१२३ बँक निफ्टी ४६७८५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.