आजचं मार्केट – २८ मार्च २०२४

आज क्रूड US $ ८६.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.०७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.२१ आणि VIX १२.७४ होते. सोने Rs ६६६०० आणि चांदी Rs ७४८०० च्या आसपास होते.
USA मध्ये मार्केटच्या शेवटच्या तासात तुफानी तेजी होती.
 FII ने Rs २१७० कोटींची खरेदी तर DII ने Rs ११९८ कोटींची खरेदी केली.
IDFC FIRST बँकेचे क्लोव्हरडेल इन्व्हेस्टमेंटने  २.२५% इक्विटी फ्लोअर प्राईस Rs ७५ ने विकले. एकूण IDFC १st बँकेमध्ये २.६९% इक्विटीचे १९.५ लाख शेअर्सचे Rs १३२९ कोटीचे डील झाले.
DR रेड्डीजने सॅनोफीबरोबर व्हॅक्सिन ब्रँड प्रमोट करणे आणि डिस्ट्रिब्युट करण्यासाठी  करार केला.
BHELला छत्तीसगढ मधील रायगड येथे थर्मल पॉवर प्लांट २X ८०० MW चा सेट अप करण्यासाठी अडाणी पॉवर असून ऑर्डर मिळाली.
अल्केम लॅबच्या बद्दी येथील युनिटच्या केलेल्या १९ मार्च ते २७ मार्च २०२४ दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने १० त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला.कंपनीने सांगितले की यात  डेटा इंटेग्रिटी इशू नाही.
महिंद्रा लाइफस्पेसने बंगलोर येथे २ एकर जमीन घेतली. याची डेव्हलपमेंट व्हॅल्यू Rs २२५ कोटी आहे.
बायोकॉन च्या मधुमेहावरील ‘LIRAGLUTIDE’ या औषधाला UK हेल्थ केअर ऑथॉरिटी कडून मान्यता मिळाली.
लोकेश मशिन्सला छोट्या  हत्यारांचे उत्पादन आणि टेस्टिंग साठी मंजुरी मिळाली.
ICICI सिक्युरिटीज आणि ICICI बँकेच्या मर्जरला तसेच ICICI सिक्युरिटीजच्या शेअर्सच्या डीलीस्टिंगला शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली.
RBI ने AIF ( आल्टर्नेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंड) संबंधित नियम सोपे केले.
SEBI ने MCX च्या MD आणि CEO च्या निवडीची प्रक्रिया पुन्हा करायला सांगितली.
लेटन्ट  व्ह्यू डिसिजन पॉईंट मध्ये ७० % स्टेक  US $ ३.९१ कोटींना घेणार आहे. राहिलेला ३० % स्टेक येत्या दोन वर्षांत लेटन्ट  व्ह्यू घेणार आहे.
अडाणी इंटरप्रायझेसची  सबसिडीअरी ‘KUTCH कॉपर’ च्या मुंद्रा  येथील कॉपर समेल्टिंग प्लांटमध्ये कामकाज सुरु झाले.
अडाणी ग्रुपने अंबुजा सिमेंटमधील त्यांचा स्टेक  ३.६% ने वाढवून ६६.७% केला.
कल्पतरू पॉवर ला Rs २०७१ कोटींची ऑर्डर मिळाली.
CHALET हॉटेल्स Rs १२०० कोटींचा QIP फ्लोअर प्राईस Rs ७८० प्रती शेअर या दराने ( १०% डिस्काऊंटवर) लाँच केला.
टेक्समॅको ने QIP द्वारे Rs १५५ प्रती शेअर या भावाने Rs २५० कोटी उभारले.
कर्नाटक बँकेने Rs २२७ प्रती शेअर या भावावर QIP केला.
GMR  इन्फ्रा विशाखापट्टणम या सबसिडीअरीला Rs ३९४.८८ कोटींचा पहिला इंस्टालमेंट  मिळाला.
सुदर्शन केमिकल या कंपनीने ३ नवीन प्रॉडक्टस लाँच केले. ही प्रॉडक्टस कॉम्प्लेक्स इनऑरगॅनिक कलर्ड पिगमेंट फॉर प्लास्टिक फॉर कोटिंग, फॉर वॉटर बेस डेकोरेटिव्ह कोटिंगसाठी आहेत.
ESAB ने Rs २४ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला. यासाठी ५ एप्रिल ही रेकॉर्ड डेट  निश्चित केली.
CYIENT ने डच एअरक्राफ्टबरोबर एअरक्राफ्ट डिझाईन साठी करार केला.
अल्ट्राटेक ने योग्य संधी शोधून अडचणी दूर करून क्षमता २.४ MTPA पर्यंत  वाढवली. ग्रेची १४०.८MTPA
ओव्हरसीज ५.४ आणि ग्लोबल १४६.२ MTPA एवढी क्षमता झाली.
श्रीराम पिस्टन आणि रिंग्स च्या पिठमपूर येथील युनिटमध्ये कामकाज सुरु झाले.
रिलायन्सने अडाणी पॉवर बरोबर २० वर्षांसाठी पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
झायड्स लाईफ च्या मार्च १८ ते मार्च २७ दरम्यान USFDA ने केलेल्या अहमदाबाद येथील ONCO इंजेक्टीबल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट च्या केलेल्या तपासणीत ४ त्रुटी दाखवल्या कंपनीने सांगितले की डेटा  इंटेग्रिटीचा इशू नाही.
टाटा एलेक्सिच्या पुणे युनिटने DRGER बरोबर करार केला.
L & T कन्स्ट्रक्शन ला  पारादीप पोर्ट ऑथॉरिटी कडून Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटीं दरम्यान ऑर्डर मिळाली.
GOCL ने त्यांच्या हैदराबाद येथील २६४.५ एकर जमिनीच्या मोनेटायझेशन साठी ‘SQUARESPACE’ बरोबर Rs ३४०२ कोटींचा करार केला.
मुक्का प्रोटीनचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
RKEC प्रोजेक्टला Rs १२ कोटींचे आर्बिट्रेशन अवॉर्ड मिळाले.
JTEKT ला Rs १२ लाखांची डिमांड कस्टम्स DEPT कडून मिळाली.
वर्धमान पॉलीटेक्सच्या  १ शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट झाले.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने MG सुवर्ण नावाचा टँकर विकला.
कोटक महिंद्रा बँकेने सोनाटा फायनान्समध्ये Rs ५३७ कोटींना १००% स्टेक  घेतला.
IREDA ला Rs २४२०० कोटी कर्जाच्या द्वारा उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी.
कॅपलीन पॉईंट च्या ड्रॉप स्वरूपातील डोळ्यांच्या विकारावरील औषधाला USFDA ची मान्यता मिळाली.
BEL कडून अस्त्र मायक्रोवेव्हला Rs ३८५ कोटींची ऑर्डर मिळाली.
एशियन पेन्ट्स त्यांच्या २ सबसिडीअरीजचे कंपनीत मर्जर करणार आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्स चा IPO येण्याची शक्यता आहे. त्याचे  व्हॅल्युएशन US $ १००० कोटी असेल.
मिडकॅप, PSE, फार्मा, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.  BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३६५१ NSE निर्देशांक निफ्टी २२३२६  बँक निफ्टी ४७१२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.