आजचं मार्केट – १ एप्रिल २०२४

.

आज क्रूड US $ ८७.३० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.१९ आणि VIX १२.२२ होते. सोने Rs ६९४०० आणि चांदी Rs ७५९०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये तेजी होती.
चीन आणि रशियाच्या सेंट्रल बॅंक्स सोने खरेदी करत आहेत, जूनमध्ये फेड व्याजाचे दर कमी करेल अशी मार्केटमध्ये अपेक्षा आहे, आणि रशिया -युक्रेन, इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील जिओ पॉलिटिकल ताणतणाव यामुळे सोने या आठवड्यात तेजीत राहण्याची शक्यता आहे.
FII ने Rs १८८ कोटींची तर DII ने Rs २६९२ कोटींची खरेदी केली.
महिंद्रा आणि महिंद्राची मार्च महिन्यात  एकूण विक्री ४% ने वाढून ६८४१३ युनिट, SUV ची विक्री १३% ने वाढून ४०६३१ युनिट, ट्रॅक्टरची एकूण विक्री २६% ने कमी होऊन २६२०४ युनिट, निर्यात २६% ने वाढून १७४८ युनिट, तर ट्रॅक्टर्सची डोमेस्टिक विक्री २४२७६ युनिट झाली.
एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री १६.७% ने कमी होऊन ८५८७ युनिट झाली.
G. E. पॉवरला NTPC कडून Rs २४ कोटींची ऑर्डर मिळाली.
मिधानी ची विक्री कमाल स्तरावर Rs १०६५ कोटी एवढी झाली.
ग्लोबल स्पिरिट च्या झारखंड आणि पश्चिम बंगालमधील युनिट्स मध्ये क्षमता विस्ताराचे काम  पूर्ण झाले.
PNC इन्फ्राला NHAI कडून सेटलमेंटमध्ये Rs २५० कोटी मिळाले.
MOIL ने फेरोग्रेड मँगेनीज च्या किमती ६% ने वाढवल्या.
इजी ट्रीपने ‘ETRAV’ चे  अधिग्रहण केले.
GM ब्रुअरीज ४ एप्रील २०२४ च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत बोनस शेअर इशु करण्यावर विचार करेल.
NCC ला Rs ३०८६ कोटींच्या नव्या ऑर्डर्स मिळाल्या.
बँक ऑफ इंडियाला Rs ११२८ कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
HDFC बँक त्यांच्या एज्युकेशन आर्म मधील १००% स्टेक  विकणार आहे.
इन्फोसिस ला Rs ६३२९ कोटींची रिफंड ऑर्डर आयकर विभागाकडून मिळाली.
IOC ने लिथियम CELLS भारतात करण्यासाठी पॅनासॉनिक एनर्जी बरोबर करार केला.
RVNL ला साऊथ ईस्टर्न रेल्वे, नॉर्थ ईस्टर्न फ्रॉन्टियार रेल्वे, एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन  कडून अनुक्रमे Rs १४८.२६ कोटी, US $ ७.१५ मिलियन आणि Rs ९५.९५ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
गार्डन रिच शिपबिल्डर चा ऍन्युअल टर्नओव्हर ३३% वाढून  Rs ३४०० कोटींच्यावर झाला.
PG इलेक्ट्रोप्लास्टच्या AC च्या कॉम्पोनंट्स साठी जो PLI इन्सेन्टिव्ह दिला जातो त्याची Rs १५ कोटींची  डिसबर्समेंट करण्यासाठी परवानगी मिळाली.
न्यूजेंन  सॉफ्टवेअरला ट्रेंड फायनान्स प्रोजेक्ट साठी Rs ४९.८४ कोटींची ट्रेड सोल्युशन फायनान्स  कडून मिळाली.
अडाणी टोटल ला UP मधील बरसाणा बायोगॅस प्लांट फेज १ मध्ये कामकाज सुरु झाले. येथे रोज ६०० टन
फीडस्टॉक  क्षमता आहे. ३ फेजची प्रोजेक्ट कॉस्ट Rs २०० कोटी आहे.
ल्युपिनच्या ‘ESLICARBAZEPINE ACETATE’ या टॅब्लेट्स ना USFDA कडून मंजुरी मिळाली. या टॅब्लेट्स पीठमपुर प्लांटमध्ये तयार होतील. कंपनीला १८० दिवसांची एक्सक्ल्युझीव्हिटी  मिळेल. US $ ३५४ मिलियन उत्पन्न अपेक्षित आहे.’APTION’च्या जनरिकला USFDA ची मंजुरी मिळाली.
इंडियन मेटल फेरो अलॉयज ने Rs १५ स्पेशल डिव्हिडंड जाहीर केला. उत्कल कोलच्या अमलगमेशनची योजना रहित केली.
व्हरांडा लर्निंग ने तपस्या एज्युकेशनल सोल्युशन्स मध्ये ५०% इक्विटी घेणार आहे. तपस्या एज्युकेशनचा तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये बिझिनेस आहे. तपस्याचे व्हॅल्युएशन Rs २४० कोटी आहे.
ट्रायडेंटने  त्यांच्या MP मधील बुधनी  येथील प्लांटची कॅपॅसिटी ४२ लूम्सने वाढवली. वर्तमान क्षमता ६२२ लूम्स होती.
कॅनरा बँक त्यांचा कॅनरा रोबेको ऍसेट मॅनेजमेंटमधील १३% स्टेक  RBI कडून मंजुरी मिळाल्यावर विकणार आहे.
ONGC आणि रिलायन्स जो डिफिकल्ट फिल्डमधून जो नैसर्गिक गॅस काढला जातो त्याची किंमत सरकारने US $ ९.९६ प्रती MMBTU वरून US $ ९.८७ MMBTU केली.
टॉरंट पॉवर १५० MW युनिट सेट अप करण्यासाठी Rs १८२५ कोटींच्या प्रोजेक्टसाठी  लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले.
लँडमार्क्स कार्स ने ‘KIA INDIA ‘ हा ब्रँड ऍड करणार आहे. कंपनी आता KIA इंडिया चे १० ब्रॅण्ड्सचे १०  राज्यात प्रतिनिधित्व करेल.
मॅक्रोटेक डेव्हलपर्स सिद्धिविनायक रिअल्टीज मध्ये ५० % स्टेक Rs २५० कोटींना घेणार आहे.
मेट्रो ब्रॅण्ड्स ने CROCKS इंडिया बरोबरची पार्टनरशिप वाढवली.
SBI लाइफला आयकर खात्याकडून Rs ५००० कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
IOB ला आयकर खात्याकडून Rs ६२० कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
EIH Rs ४२१ कोटी गुंतवून ओबेराय LUXURY रिसॉर्टमध्ये ९० रूम्सचे हॉटेल सुरु करणार आहे.
सरकारने कमर्शियल १९ किलो  LPG सिलिंडर्सच्या किमती Rs ३२ ने कमी केल्या. दिल्लीमध्ये Rs ३०.५० ने, कोलकातामध्ये Rs ३२ आणि मुंबईमध्ये Rs ३१.५० ने कमी केल्या.
थायलंड मधून आयात होणाऱ्या अल्युमिनियम फॉइल्स वर सरकारने ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवली याचा  फायदा हिंदाल्कोला होईल.
D-मार्ट ने ८ नवीन स्टोर्स उघडली. आता त्यांची एकंदर ३६५ स्टोर्स  झाली.
कॅन्टाबिल रिटेल ने ५ नवीन शोरूम सुरु केल्या.
होनासा ने कलर्ड कॉस्मेटिक्स च्या क्षेत्रात ‘STAZE’ हे नवीन प्रोडक्ट मार्केटशेअर वाढवण्याकरता लाँच केले.
मारुती सुझुकी ची विक्री १०% ने वाढून १.८७ लाख युनिट झाली. निर्यात १४% ने कमी होऊन २५८९२ युनिट झाली डोमेस्टिक विक्री १.६१ लाख युनिट झाली.
टाटा मोटर्सची एकूण विक्री २% ने वाढून ९०८२२ युनिट झाली. कमर्शियल व्हेइकल्सची विक्री १०% कमी होऊनर ४२२६२ युनिट झाली. इलेक्ट्रिक व्हेइकल्सची विक्री ४% ने वाढून ६७३८ युनिट झाली. डोमेस्टिक पॅसेंजर व्हेइकल्सची विक्री १४% ने  वाढून ५०११० युनिट झाली. एकूण PV  विक्री १४% ने वाढून ५०२९७ युनिट झाली. कंपनीने सांगितले की पॅसेंजर व्हेइकल्ससाठी मागणी येत्या वर्षांत चांगली राहील.
थायरोकेअरला Rs ५१.२९ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
आयशर मोटर्सची रॉयल एन्फिल्डची विक्री ५% ने वाढून ७५५५१ युनिट्स झाली. निर्यात १२३५९ युनिट्स वरून कमी होऊन ९५०७ युनिट झाली.
BOSCH कंपनीला Rs ११६.३८ कोटींची रिफंड लेटर मिळण्याची शक्यता आहे.
SAIL ने २०२४ यावर्षात रेकॉर्ड उत्पादन आणि विक्री केली. कंपनीची विक्री १५% ने वाढून १७.१ MT झाली.
ICRA ने PNB हाऊसिंगचे रेटिंग AA वरून AA+ केले आऊटलूक पॉझिटिव्ह वरून स्टेबल केला.
BEL चा FY २०२४ साठी Rs १९७०० कोटी झाल्या तसेच BEL ला FY २०२४ मध्ये कंपनीला Rs ३५००० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
करूर  वैश्य बँकेचे अड्वान्सेस  १६.०४% ने वाढून Rs ७४४६० कोटी झाले. डिपॉझिट १६.०३% ने वाढून Rs ८९११३ कोटी झाली तर CASA  डिपॉझिट्स ६.४३% ने वाढून २७०८५ कोटी झाली.
VST टिलर्स & ट्रॅक्टर्स ची एकूण विक्री ४८२३ युनिट झाली. पॉवर टिलर्सची विक्री ४०६१ युनिट तर पॉवर ट्रॅक्टर्सची विक्री ७६२ युनिट्स झाली.
आज एनर्जी, फार्मा, PSE, बँकिंग, IT, रिअल्टी,  मेटल्स मध्ये खरेदी झाली. ऑटो FMCG मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४०१५ NSE निर्देशांक निफ्टी २२४६२ बँक निफ्टी ४७५७८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.