आजचं मार्केट – २ एप्रिल २०२४

.

आज क्रूड US $ ८७.८० प्रती बॅरलच्या आसपास तर  US $१= Rs ८३.३० च्या आसपास होती. US $ निर्देशांक १०५.०२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३० आणि VIX १२.०२ होते. सोने Rs ६८६०० आणि चांदी ७६१००च्या आसपास होती.
मेक्सिकोच्या ऑइल फिल्ड मध्ये उत्पादन बंद झाले.
USA चा मार्च महिन्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ( इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटअनुसार )  ५०.३ आला हा १८ महिन्यांच्या स्ट्रॉंग लेव्हलवर आहे. फेब्रुवारीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग PMI ४७.८ होता.
मार्च २०२४ महिन्यासाठी भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ५९.१( ५६.९ फेब्रुवारी महिन्यासाठी होता) म्हणजे १६ वर्षांच्या कमाल स्तरावर होता.
HG इन्फ्राला जोधपूर विद्युत वितरण निगम कडून Rs १०७ कोटींची ऑर्डर मिळाली.
FII नी Rs ५२२ कोटींची विक्री तर DII ने Rs १२०८ कोटींची खरेदी केली.
मार्च २०२४ मध्ये GST कलेक्शन १.७८ लाख कोटी झाले.
व्होडाफोनने Rs २०००० कोटी फंड्स गोळा करण्यासाठी EGM ( एक्सट्रा ऑर्डीनरी जनरल मीटिंग) बोलावली.
AB फॅशनने  मदुरा फॅशन चा बिझिनेस बाहेर काढून स्वतंत्र लिस्टेड एंटीटी करणे आणि स्वतःकडे रिटेल, एथनिक, लक्झरी आणि डिजिटल ब्रँड ठेवणे अशी कॉर्पोरेट ऍक्शन नियोजित केली आहे.
होंडा मोटार सायकल आणि स्कुटर्स इंडिया बाईक रिकॉल करणार आहेत. या बाईक्स हरयाणामधील BAVAL प्लांटमध्ये उत्पादन केलेल्या होत्या. या बाईकच्या इंजिनमधून ऑइल लिकेज होत आहेत. याचे काही पार्ट्स UNO मिंडाने  बनवले असण्याची शक्यता आहे.
हिरोमोटोची विक्री ५.६% ने कमी होऊन ४.९ लाख युनिट झाली. डोमेस्टिक विक्री ८.७% ने कमी होऊन ४.५९ लाख झाली. निर्यात ८७.६% ने वाढून ३११५८ युनिट झाली.
अशोक लेलँडची विक्री ४% ने कमी होऊन २२८६६ युनिट झाली. डोमेस्टिक विक्री ७% ने कमी झाली.
M&HCV ची विक्री ७% ने वाढून १५५६२ युनिट झाली.
TVS मोटर्सची  विक्री १२% ने वाढून ३.५५ लाख युनिट झाली. २ व्हिलर्सची विक्री १२% ने वाढून ३.४४ लाख युनिट झाली. EV ची विक्री ०.७% ने कमी होऊन १५२५० युनिट झाली.
असोसिएटेड अल्कोहोल ची MP मधील ६ जिल्ह्यातील लायसेन्सेस रिन्यू झाली.
 BASF ने क्लीन रिन्यूएबल एनर्जी कंपनी KK २C बरोबर २५ वर्षे  दीर्घ मुदतीचे पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
बजाज ऑटो ची एकूण विक्री २५% ने वाढून ३.६५ लाख युनिट झाली. निर्यात ३९% ने वाढून १.४५ लाख युनिट झाली. CV विक्री ५२०१९ युनिट्स झाली. २ व्हीलर विक्री ३.१३ लाख युनिट झाली. डोमेस्टिक २ व्हीलर विक्री २७% ने वाढून २.२ लाख झाली.
जानेवारी २०२४ महिन्यामध्ये जिओ ने ४१.७८ लाख ग्राहक जोडले तर भारती एअरटेलने ७.५२ लाख ग्राहक जोडले. ‘VI’ ने १५.५२ लाख ग्राहक गमावले.
झोमॅटोला Rs १८४.२० कोटी तर मारुतीला Rs २३८.७० कोटी टॅक्स डिमांड नोटीस मिळाली.
अनंतराज  ने गुरुग्राम ६३A प्रोजेक्ट मध्ये Rs ४१५० कोटींचे प्रिसेल्स कलेक्शन केले.
झोमॅटोमध्ये ०.०८% इक्विटी म्हणजे ६९.९० लाख शेअर्समध्ये लार्ज  डील झाले.
HDFC बँकेमध्ये ९.२६ लाख शेअर्समध्ये Rs १३६ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
बजाज ऑटोने सांगितले की नवीन मॉडेल्स लाँच केल्यामुळे १२५CC + मोटारसायकल्स मध्ये मार्केट शेअर २६% झाला. एशियन  आणि लॅटिन अमेरीकन मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘TRIUMPH’ मध्ये हाय डबल डिजिट ग्रोथ होईल असा अंदाज आहे. मोठ्या EV चे प्रदर्शन चांगले आहे. नवीन लाँचेस फायदेशीर ठरले बजाज ऑटो चा EV  २ व्हीलर  मार्केटमध्ये १३.६% मार्केट शेअर आहे.
NMDC चे उत्पादन ५.६MT वरून ४.८६ MT झालेविक्री ४.८४MT वरून ३.९६ MT झाले. उत्पादन आणि विक्री दोन्हीतही घट झाली.
CSB बँकेच्या ठेवी २१.२७% ने वाढून Rs २९७१९ कोटी झाल्या. सोन्याच्या तारणावरील कर्ज २१.९% ने वाढून ११८१७ कोटी झाले. एकूण कर्ज १७.९% ने वाढून Rs २४५७४ कोटी झाले.
साऊथ इंडियन बँकेचे ऍडव्हान्सेस ११.४४% ने वाढून Rs ८०३६७ कोटी तर डिपॉझिट ११.२% ने वाढून १.०१ लाख कोटी झाली. CASA ९४ बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ३२.०८% झाले.
ल्युपिन च्या ‘MIGALASTAT’ कॅप्सुल्सला  USFDA ने मंजुरी दिली. ह्याचे उत्पादन गोवा प्लांटमध्ये होईल. याची विक्री US $ ३८८ मिलियन अपेक्षित आहे.
BDL चा रेव्हेन्यू Rs २४८९.४० कोटींवरून Rs २३५० कोटी झाला. ऑर्डर बुक Rs १९४६८ कोटी आहे.
UFLEX च्या सबसिडीअरीने १८००० MTPA क्षमतेच्या  CPP फिल्म प्रोडक्शन लाईनचे कामकाज सुरु केले.
६ Q -४०० विमानांची मालकी स्पाईस जेटला ट्रान्स्फर केली.
श्री सिमेंटने आंध्र प्रदेशांत  गुंटूर जिल्ह्यात ३० लाख टन क्षमता असलेला सिमेंट प्लांट सुरु केला.
CAMS ची सबसिडीअरी ‘CAMSREP’ने  सर्व विमा पॉलिसिज डिजिटल फॉरमॅटमध्ये देण्यास सुरुवात केली. IRDAI ने अलीकडेच सर्व विमा पॉलिसिज डिजिटल फॉरमॅट मध्ये देणे अनिवार्य केले आहे.
आयन एक्सचेंजला Rs २५१ कोटींची ऑर्डर मिळाली.
JK सिमेंटने ऍसेट तारण ठेवून Rs १२००० कोटी कर्जाची उभारणी करायला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली.
मनकाईन्ड फार्माच्या OTC बिझिनेस ‘SLUMP SALE’ बेसिस वर विक्रीसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मंजुरी दिली.
M & M फायनान्सियल्स ने मार्च २०२४ मध्ये Rs ६१०० कोटींची (९% वाढ) डिसबर्समेंट केली तर जाने -मार्च
तिमाहीमध्ये डिसबर्समेंट ११% ने वाढून Rs १५३०० कोटी झाली. मार्च २०२४ मध्ये कलेक्शन कार्यक्षमता १०१% राहिली.
टाटा टेक्नॉंलॉजीने BMW बरोबर लक्झरी कार्सच्या सॉफ्टवेअर सोल्युशन्ससाठी JV केले.
वाढत्या उन्हाळ्यामुळे सरकारने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आणि पुरेसा वीज पुरवठा करण्यासाठी  सूचना केली. यामध्ये या काळांत प्लांट मेंटेनन्स टाळण्याची सूचना केली.
पीडिलाइटने फेवीक्विक चे ४ नवे व्हेरियंट लाँच केले.
सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सिमेंटचे भाव Rs ८० प्रती बॅग वाढवले आहेत. आंध्र प्रदेशांत Rs ३० ते Rs ४० महाराष्ट्रांत Rs २० ते Rs ४० प्रती बॅग भाव वाढवले.
आज मिडकॅप, स्मॉल कॅप, मेटल्स, ऑइल&गॅस, इन्फ्रा, रिअल्टी, एनर्जी,  FMCG  क्षेत्रामधील शेअर्समध्ये खरेदी झाली तर IT आणि फार्ममध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३९०३ NSE निर्देशांक निफ्टी २२४५३  बँक निफ्टी ४७५४५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.