आजचं मार्केट – ३ एप्रिल २०२४

आज क्रूड US $ ८९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.४० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.३६ आणि VIX ११.५१ होते. सोने Rs ६९७०० आणि चांदी
Rs ७८००० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
FII ने Rs १६२३ कोटींची विक्री तर DII ने Rs १९५३ कोटींची खरेदी केली.
SRM काँट्रॅक्टर्सचे BSE वर Rs २२५ आणि  NSE वर Rs २१५ वर लिस्टिंग झाले.
अल्ट्राटेक सिमेंटने तामिळनाडू आणि छत्तीसगढ मध्ये ५.४ MTPA क्षमतेचे २ नवीन ग्रीनफिल्ड प्लांट सुरु केले. या प्लांट्समध्ये Rs ३२४०० कोटी गुंतवणूक करणार. आता अल्ट्राटेक सिमेंटची एकूण क्षमता १५१.६ MTPA  होईल.
धनलक्ष्मी बँकेची डिपॉझिट्स ६.८% ने वाढून Rs १४२५९ कोटी तर ऍडव्हान्सेस ५.६% ने वाढून Rs १०४०९ कोटी झाले. गोल्ड लोन  २४.९% ने वाढून Rs २८३९ कोटी झाले.
हिंदुस्थान झिंक चे उत्पादन १% ने कमी होऊन २९९ KT झाले.रिफाईंड उत्पादन ही १% वाढले.
नाल्को चे मेटल उत्पादन ४.६३ लाख टन तर विक्री ४.७ लाख टन झाली.
MOIL  चे उत्पादन ३५% ने वाढून १७.५६ लाख टन तर विक्री ३०% ने वाढून १५.३६ लाख युनिट झाली.
नॉर्थ अमेरिकेमधील क्लास ८ ट्रक साठी मागणी २५७००  ट्रक्स वरून १७३०० ट्रक्स झाली. याचा परिणाम भारत फोर्जवर होईल.
निफ्टी ५० चा F & O मार्केटमधील लॉट २६ एप्रिल २०२४ पासून ५० ऐवजी २५ चा असेल.
रामको सिमेंटने ओडिशामधील ग्राइंडिंग युनिटमध्ये  लाईन II चे  कमर्शियल उत्पादन सुरु केले. आता ओडिशाच्या ग्राइंडिंग युनिटची क्षमता १.८MTPA होईल.
करूर  वैश्य बँकेने PC ज्वेलर्सच्या कर्जाची सेटलमेंट मान्य केली.
EASF बँकेला ऑथोराइझ्ड डिलर कॅटेगरी  १ चे लायसेन्स मिळाले. ते आता फॉरीन एक्स्चेंजचे काम करू शकतील.
अनुपम रसायनने जपानीज मल्टीनॅशनलबरोबर US $ ९० मिलियन किंवा Rs ७४३ कोटींचे लेटर ऑफ इन्टेन्ट साइन केले.
बायोकॉन ब्रँडेड फॉर्म्युलेशन बिझिनेस एरिस लाईफ सायन्सेसला Rs १२४२ कोटींना विकणार.
एशियाना HSG ने त्यांचे गुरु ग्रामचे ‘आशियाना AMARAH’ ची फेज ३ (३.७७ लाख SQFEET सेलेबल एरिया ) Rs ४४०.३२ कोटींना विकली.
HCL टेकच्या आर्म ने  त्यांच्या USA मधील स्टेट स्ट्रीट इंटरनॅशनल होल्डिंग बरोबरच्या JV मधील ४९% स्टेक डायव्हेस्ट केला.
श्रीराम प्रॉपर्टीजच्या आर्मला Rs ४४६.७९ कोटींची टॅक्स पेनल्टी ऑर्डर मिळाली.
सोम डिस्टीलरीजने त्यांचा शेअर स्प्लिट केला. त्यांनी त्यांच्या शेअरची दर्शनी किंमत Rs ५ ऐवजी Rs २ केली. ह्या प्रमाणांत शेअर अलॉट केले जातील.
स्टार हेल्थ ने कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी साठी ‘PHONETE’बरोबर करार केला.
ग्रॅन्युअल्सच्या USA मधील व्हर्जिनिया प्लाण्टला USFDA ने VAI ( व्हॉलंटरी आक्षण इनिशिएटेड) रिपोर्ट दिला.
सरकारने गॅस बेस्ड पॉवर प्लांट्सना GAIL आणि पेट्रोनेट LNG यांच्याकडून पॉवर कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार गॅस खरेदी करायला सांगितले. गॅस बेस्ड पॉवर प्लांट्सनी आपले पॉवर उत्पादन वाढवण्याची तयारी ठेवावी असे सरकारने सांगितले. हवामान खात्याने येता उन्हाळा फार कडक असेल असे सांगितले त्यामुळे सरकारने ही सूचना जारी केली. सरकारने सांगितले की तशीच गरज भासली तर सरकार इलेक्ट्रिसिटी ऍक्ट चा सेक्शन ११ अमलांत आणेल.
इन्फोसिसचे सबसिडीअरी इन्फोसिस फिनॅकल ‘JAND BANK’ बरोबर डिजिटल सोल्युशन्स पुरवण्यासाठी करार केला.
‘VI’ ने सांगितले की ते FPO ( फॉलो ऑन पब्लिक)  इशू  दवारा Rs १५००० ते Rs २०००० कोटी उभारतील.
 आज रिअल्टी FMCG ऑटो, फार्मा इन्फ्रामध्ये प्रॉफिट बुकिंग झाले तर मिडकॅप, स्मॉल कॅप, PSU बँका, PSE मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३८७६ NSE निर्देशांक निफ्टी २२४३४ बँक निफ्टी  ४७६२४  वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.