आजचं मार्केट – १२ एप्रिल २०२४

.

आज क्रूड US $ ९०.३० प्रती barel तर रुपया US $ १= Rs ८३.30 च्या  आसपास होते. US $ निर्देशांक १०५.२९ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ४.५७ VIX ११ .३० होते. सोने Rs ७२५०० आणी चांदी
Rs ८३९०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
USA मध्ये इन्फ्लेशन निर्देशांक ३.५  आणी कोअर इन्फ्लेशन ४.८ होते. त्यामुळे बुधवारी  मार्केट पडले
पण गुरुवारी सावरले. APPLE चा शेअर ४.३% ने वाढला. MAC प्रोडक्ट्स OVHARHAUL करणार आहे त्यासाठी नवीन AI फोकस चीप वापरणार आहे. NVIDIA,AMEZON, वाढले. JP मॉर्गन, वेल्स फार्गो, सिटीग्रुप, BLACKROCK, स्टेट स्ट्रीट या कंपन्यांचे निकाल नजीकच्या भविष्यात  अपेक्षित आहेत.
‘FUZZY PANDA’ या शॉर्ट सेलरने  इन्शुअरन्स FRAUD संबंधात वारंवार टिपणी केल्यामुळे ‘GLOBE LIFE’ चा शेअर पडला पण नंतर सावरला.
FII ने Rs २७७८ कोटींची खरेदी आणी DII ने Rs १६३ कोटींची खरेदी केली.
सन फार्मा च्या दादरा प्लान्टला USFDA ने OAI ( ऑफीशियल एक्शन इनिशिएटेड ) रीपोर्ट दिला.
DR रेड्डीज ने औषधाशिवाय मायग्रेन साठी त्यांचे ‘NERIVIO’ हे उपकरण भारतानंतर युरोप मध्ये  इंट्रोड्युस  केले. जूनमध्ये UK आणी दक्षिण आफ्रिकेत जून २०२४ मध्ये इंट्रोड्युस करतील.
मेट्रोपोलिटन हेल्थकेअर  ही कंपनी DEBTFREE झाली. रेव्हेन्यू १०% ने आणी कोअर बिझिनेस १५% ने वाढला. किमती वाढवल्यामुळे आणी व्हॉल्यूम वाढल्यामुळे मार्जिन वाढले.
फिनिक्स मिल्स चे टोटल  कन्झम्प्शन २७% ने वाढून Rs २८१८ कोटी आणी ग्रॉस रिटेल कलेक्शन  ३७% ने वाढून Rs ७९१ कोटी झाले.
उनो मिंडा ने त्यांच्या ५ वर्षे टप्याटप्याने Rs ५४२ कोटी गुंतवणूक करून   ग्रीनफिल्ड PV व्हील्सच्या १.२० लाख PV व्हील्स  क्षमतेच्या प्लांटसाठी IMT खारखोडा येथे मोठी जमीन खरेदी केली. पहिल्या टप्प्याचे उत्पादन FY २६ च्या दुसऱ्या  तिमाहीत सुरु होईल.
CAMS ला RBI कडून ऑनलाईन पेमेंट अग्रीगेटर चे लायसेन्स मिळाले
महाराष्ट्र सीमलेस ला ONGC कडून कॅसिंग सीमलेस पाईप्स ची Rs ६७४ कोटींची ४४ आठवड्यात पूर्ण करण्याची ऑर्डर मिळाली.
VI चा Rs १८००० कोटींचा  FPO  18 एप्रिल ते २२ एप्रिल २०२४ दरम्यान ओपन राहील. याचा प्राईस  बंद Rs १०- Rs ११ ठरवला आहे.
सिक्वेंट सायंटिफिक ने त्यांची सबसिडीअरी ‘ALIVIRA ANIMAL HEALTH’ ला Rs १५० कोटींच्या कर्जासाठी हमी दिली. तसेच सबसिडीअरीच्या ९९.९९ % शेअर्स तारण म्हणून ‘CATALIST TRUSTEESHIP लिमिटेड’ कडे तारण ठेवले. ही कंपनी आयर्लंडच्या युनिटला US $ २५ मिलीयनचे कर्ज बारक्लेज बँक देईल.
विप्रोने श्री मलय जोशी यांची ‘अमेरिकाज १ STRATEGIK I’ चे CEO म्हणून नेमणूक केली.
HFCL ने तिच्या सबसिडीअरीला  Rs ३७८.०२ कोटींच्या मंजूर झालेल्या कर्जासाठी SBI CAP ला हमी दिली.
ZAGGLE प्रीपेड ने योकोहामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बरोबर ‘ZAGGLE SAVE ऑफरिंग’ साठी २ वर्षांचा करार केला.
नेसले इंडिया एप्रिल २५ २०२४ रोजी FY 24 Q4 चे निकाल आणी लाभांशावर  विचार करेल.
ISGEC हेवी इंजिनीअरिंग  ची सबसिडीअरि ‘CAVIET BIOFUEL प्रोडक्ट्स INC फिलीपाईन’ने त्यांच्या फिलीपाईन मधील इथनॉल उत्पादन युनिटमध्ये कामकाज सुरु केले.
ऑईल इंडियाच्या x-MASS ट्री या आसाम मधील तिनसुखिया जिल्ह्यातील तेल विहिरीत लिकेज झाले.
मॉरीशस बरोबरच्या भारताच्या ‘डबल TAX अव्हायडन्स अग्रीमेंट ‘ आता अमेंडमेंट झाली. ‘प्रिन्सिपल पर्पज टेस्ट’  या योजनेत सहभागी होण्याचा मुख्य हेतू या TREATY  चा फायदा घेणे आहे का याचा शोध घेतला जाईल. ही टेस्ट पास केली नाही तर TREATY चा फायदा दिला जाणार नाही.
रमा  स्टील ट्युब्स  २२ एप्रिल २०२४ रोजी फंड रेझिंग वर विचार करेल.
PVR INOX ने कोची मध्ये ९ स्क्रीन आणी बंगलोरमध्ये १४ स्क्रीन चे मल्टिप्लेक्स चालू केले.
गॉडफ्रे फिलिप्स च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने त्यांचा रिटेल बिझीझ्नेस बंद करण्याचा निर्णय घेतला. या बिझीनेसमधून कंपनीचा FY २२-२३ रेव्हेन्यू Rs ३९६ कोटी म्हणजे एकूण रेव्हेन्युच्या ९.३% होता.
बँक ऑफ टोकियो-मित्सुबिशी UFJ ने HDB फायनान्शीयल सर्विसेस मध्ये २०% स्टेक घेणार आहे,. HDB फायनांशियल ही HDFC बँकेची नॉन बँकिंग सबसिडीअरी आहे. या सबसिडीअरीचे व्हॅल्यूएशन  US $ ९-१० बिलियन आहे असे मानले जाते
वक्रांगी ने ‘ग्लोबल ONE एन्टरप्राईजेस (MAX TV) बरोबर OTT सर्विसेससाठी  अग्रीमेंट केले.
HAPPIEST MIND ने ‘ENERCON’ हे सस्टेनेबल विंड एनर्जी सोल्युशन बाजारांत आणले.
कोलते पाटील या कंपनीचे कलेक्शन २०% ने वाढून Rs ५९२ कोटी व्हॉल्यूम १०.०३ लाख SQFEET
तर रिअलायझेशन Rs ७२२६ प्रती  SQFEET झाले.
दभासा या ल्युपिन च्या युनिटच्या USFDA ने केलेल्या ८ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान केलेल्या तपासणीत एकही त्रुटी दाखवली नाही.
आज TCS ने त्यांचे FY 24 Q 4 चे निकाल जाहीर केले. प्रॉफीट Rs ११७३४ कोटींवरून Rs १२२४० कोटी झाले. रेव्हेन्यू Rs ६०५८३ कोटींवरून Rs ६१२३७ कोटी झाला. EBIT मार्जिन २५% वरून २६% झाले. कंपनीने Rs २८ फायनल लाभांश जाहीर केला हा लाभांश AGM झाल्यानंतर चार दिवसांत मिळेल.ATRITION रेट  १३.३% वरून १२.५ झाला. US $ रेव्हेन्यू ७३६.३० कोटी झाला.कॉन्सटनट करन्सी ग्रोथ १.१% झाली.
प्रथम EPC प्रोजेक्टला Rs ४९७ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज मिडकॅप, स्मॉल कॅप, फार्मा, OIL &GAS, FMCG, रिअल्टी, एनर्जी, निफ्टी बँक मध्ये प्रॉफीट प् बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४२४४ NSE निर्देशांक निफ्टी २२५१९ आणी बँक निफ्टी ४८५६४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.