आजचं मार्केट – १६ एप्रिल २०२४

.

आज क्रूड US $ ९०.८० प्रती BAREL तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.२७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५९ आणी VIX १२.७१ होते. सोने Rs ७२८०० आणी चांदी Rs ८४००० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
USA मधील रिटेल सेल्सचा डेटा खूप चांगला आला. टेसला ने सांगितले की ते १०% स्टाफ कमी करणार आहेत. त्यामुळे फेड रेट कट करण्याऐवजी रेट कायम ठेवेल किंवा वाढवेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज FII ने Rs ३२६८ कोटींची विक्री तर DII ने Rs ४७६३ कोटींची खरेदी केली.
VST मध्ये दमाणीने त्यांचा स्टेक १.५% ने वाढवला.
रशियाची अल्युमिनियम उत्पादनातील दिग्गज कंपनी RUSAL ने सांगितले की ते अल्युमिनियम उत्पादनांत २५% कपात करणार आहेत.
चीनची Q1 GDP ग्रोथ ५.३% राहिली. चीनचे रिटेल सेल्स ३.१% राहिले ( ५.५% ) इंडस्ट्रीयल
ऑऊटपुट ७% वरून ४.५% आला.( कमी झाला )
हैप्पी फोर्जिंग ला Rs ५०० कोटींचे कॉन्त्रट  मिळाले.
BPCL ने नोईडा एअरपोर्ट औथारीटी बरोबर ATF पाईपलाईन साठी करार केला.
खाद्य तेलांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया आणी मलेशिया मध्ये लेबर प्रॉब्लेम आहेत. लाल समुद्रातील संकटामुळे फ्रेट ( जहाज वाहतुकीचे दर ) वाढले आहेत.
कॅप्लीन पाईंटची सबसिडीच्या OFLOXOCIN  OPTHALMIC सोल्युशन साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
DYNACON सिस्टिम्स ला Rs २३३ कोटींची  ऑर्डर मिळाली
PNC इंफ्राटेक ला NHAI कडून Rs ११७ कोटी सेटलमेंट ची रक्कम मिळाली.
आदित्य बिर्ला ग्रुप लवकरच रिटेल ज्वेलरी क्षेत्रांत पदार्पण करून Rs ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने ओम्नी CHANEL ABCD D 2C PLATFORM LAUNCH केला.
शॉपर स्टोप ने शिलॉंग येथे पहिले स्टोअर स्थापन केले.
कोल इंडियाने त्यांचे कॅपेक्स चे टार्गेट १२० % पूर्ण केले त्यांचे कॅपेक्स Rs १९८४० कोटी झाले.
ABB ने अल्युमिनियम लो व्होल्टेज मोटर्स ची  दोन नवीन प्रोडक्ट LAUNCH केली या प्रोडक्टस् ची नावे IE-3 आणी IE-4 अशी ठेवली आहेत.
क्रिसिल या कंपनीने Rs ७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफीट कमी होऊन Rs १४६ कोटींवरून Rs १३८ कोटी झाले. उत्पन्न Rs Rs ७१५ कोटींवरून वाढून Rs ७३८ कोटी झाले. मार्जिन २८.४% वरून कमी होऊन २६.१ % झाले.
सिप्ला IVIA चा ब्युटी आणी पर्सनल केअर Rs २४० कोटींना घेणार आहे. प्रथम Rs १३० कोटी देणार आणी काही विशिष्ट लक्ष्य पूर्ण केल्यावर Rs ११० कोटी तीन वर्षांत दिले जातील. IVIA च्या ASTABERRY, IKIN , भीमसेनी या उत्पादनांमुळे  कंपनीच्या स्कीन केअर सेगमेंटला सपोर्ट मिळेल.
ट्रांस्फोर्मेर आणी रेक्टीफायर या कंपनीला गुजरात एनर्जी ट्रान्स्मिशन कॉर्पोरेशन कडून २९ ट्रान्सफार्मर्स आणी १  रीअक्टर साठी दिलेली ऑर्डर रद्द करणार होते त्यांनी आता कंपनीला ऑर्डर्स देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ट्रान्सफार्मर्स आणी रेक्टीफायरच्या शेअरमध्ये खरेदी झाली.
अडानी एनर्जी सोल्युशन्सला १७ लाख मीटर्स साठी ऑर्डर मिळाली.
स्टरलाईट   टेक्नोलॉजी या कंपनीने Rs १००० कोटी QIP द्वारा उभारले. ही रक्कम BALANCE शीट सुधारण्यासाठी करण्यात येईल.
अल्केम LABने सांगितले की त्याच्या कंपनीला इम्प्लांट डीव्हाईसेस  सेग्मेंट मध्ये प्रगती करण्यात रस आहे.येत्या ५ वर्षांत या सेगमेंटचा विस्तार करू. कंपनीची एकूण 19 प्लांट आहेत. कंपनीने भारतात ७ बायोसिमिलर प्रोडक्ट्स LAUNCH केली आहेत.
राडीको खेतानने कोहिनूर रिझर्व डार्क रम LAUNCH केली.
SPARC च्या ‘VODABATINIB’ हे ल्युकेमिया वरील औषध रीइंस्टेट करणार. लायसेन्ससाठी प्रयत्न करणार. US $ २० मिलीयांचे कॅश मार्केट उपलब्ध आहे.
GTPL हाथवे ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. Rs १०.८ कोटींच्या तोट्याऐवजी  Rs १६ कोटी फायदा  झाला. रेव्हेन्यू १६.७% ने वाढून Rs ८०८ कोटी झाला. मार्जिन ७० बेसिक पाईंट कमी झाले.
इंडिगो चा मार्केट शेअर ६०.५%झाला ( ६०.१ %) स्पेस जेट चा मार्केट शेअर ५.३% राहिला ( ५.२% )
जीओ फायानंशियल सर्विसेस आणी BLACK ROCK यांनी  वेल्थ व्यवस्थापन आणी ब्रोकरेज बिझिनेस साठी करार केला.
गुजरात GAS ने IOC बरोबर IOC च्या ऑऊटलेट्स वर लिक्विड फ्युएल, ऑटोमोटिव्ह ल्युब्रीकंट, ग्रीज पुरवेल आणी IOC साठी CNG FACILITY देईल.
सासकेन टेक्नोलॉजी ने ‘JOY NEXT FORGE’ बरोबर इनोव्हेशन आणी ग्लोबल फूटप्रिंट्स वाढवण्यासाठी करार केला.
इंडियन हॉटेल्सने राजस्थान मधील पुष्कर येथे ताज ब्रांडेड रिसोर्ट  साठी करार केला.
आज IT, बँकिंग, मेटल्स, रिअल्टी, इन्फ्रा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफीट  बुकिंग झाले. स्माल कॅप, फार्मा, FMCG, PSE क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२९४३ NSE निर्देशांक निफ्टी २२१४७ आणी बँक निफ्टी ४७४८४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.