Monthly Archives: May 2024

आजचं मार्केट – २८ मे २०२४

आज क्रूड US $८३.३० च्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.१० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.४१ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ४.४४ आणी VIX २४.५० च्या आसपास होते. सोने Rs ७१९०० आणी चांदी Rs ९४३०० च्या आसपास होती. झिंक, कॉपर आणी लेड  मध्ये तेजी होती. 

FII ने Rs ५४१ कोटींची विक्री तर DII ने Rs ९२३ कोटींची खरेदी केली. 

हवामान खात्याने हवामानाचा अंदाज जाहीर केला पाउस चांगला होईल असे जाहीर केले. 

चीनचे मार्केट तेजीत होते. चीप बनवणाऱ्या कंपन्यांसाठी चीन सरकार नवी योजना आणणार आहे. 

ECB जूनमध्ये रेटकट करण्याची शक्यता आहे. 

आज मार्केटमध्ये खालीलप्रमाणे लार्ज ट्रेड झाले. 

PB फिन्टेक ५५ लाख शेअर्स म्हणजे १.२२% इक्विटी मध्ये Rs ६७७ कोटी 

कॉन्कॉर्द बायोटेकमध्ये ३७ लाख शेअर्स ३.५४ % इक्विटी Rs ५१९ कोटी 

इनॉक्स विंड मध्ये ७.07 कोटी शेअर्स २१.७१% इक्विटी    Rs १०८१ कोटी 

HDFC बँकेमध्ये ७.४९ लाख शेअर्समध्ये Rs 114 कोटी 

टिमकीन मध्ये Rs ३५५० प्रती शेअर भावाने Rs १७७५ कोटींचे लार्ज डील यासाठी 6 महिने लॉक इन पिरीयड असेल.  

NALCO चे प्रॉफीट  Rs ९९६.७० कोटी तर उत्पन्न Rs ३५७९ कोटी आणी मार्जिन ३०.९% होते. 

GMDC चे प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. Rs ९.५५ लाभांश जाहीर केला. 

NMDC चे निकाल अपेक्षेपेक्षा  कमी आले.

अस्त्राझेनेका चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs २४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

DCM श्रीराम चे प्रॉफीट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. 

LIC हेल्थ इंशुंअरंस बिझिनेस मध्ये पदार्पण करण्याच्या विचारांत आहे. 

गरवारे टेक्निकल चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. निकाल चांगले आले. 

GOOD YEAR  इंडिया फायद्यातून  तोट्यात गेली  उत्पन्न कमी झाले. 

SMS  लाईफ सायन्सेस चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. 

SH केळकर चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. 

एलजी ईक्विप्मेंट चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

ज्युबिलंट इंडस्ट्रीज चे प्रॉफीट वाढले उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले. 

LIC चे APE वाढले VNB आणी VNB मार्जिन कमी झाले. LIC ने Rs 6 लाभांश दिला. 

विष्णू प्रकाश पुंगलिया चे प्रॉफीट ६८.२% वाढले, रेव्हेन्यू ४४.२% वाढला, मार्जिन वाढून १६% होत. 

सेबीने अग्री कमोडीटीजचे ऑप्शन ट्रेडिंगचे नियम १ जून २०२४ पासून सोपे केले. 

लुमाक्सचे प्रॉफीट वाढून Rs ४४.२ कोटी झाले रेव्हेन्यू वाढून Rs ७५७.४0 कोटी मार्जिन वाढले. 

कीस्टोन रिअल्टी चे QIP द्वारा Rs ८०० कोटी उभे केले. Rs ६०० प्रती शेअर भावाने QIP केला. 

IIFL चे निकाल ३० मे नंतर येईल. RBI चे ऑडीट सुरु आहे. 

अदानी एनर्जी QIP द्वारा Rs १२५०० कोटी उभे करणार. 

नाटको फार्माचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनी शेअर बायबॅक वर विचार करत आहे. 

BHEL ने भाभा आटोमिक सेंटर बरोबर टेक्नोलॉजी ट्रान्स्फर साठी करार केला. 

LAURAS LAB च्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने ५ त्रुटी दाखवल्या. 

TCS क्वांटम डायमंड मायक्रोचीप इमेजर साठी मुंबई IIT  बरोबर करार केला. 

UK हेल्थ रेग्युलेटर मे मार्क्सन फार्माच्या ‘LEVETIRACETAM RELONCHEM ओरल सोल्युशन’ च्या मार्केटिंग साठी मंजुरी दिली. 

DREAM FOLKS फायदा कमी झाला उत्पन्न वाढले 

TTK प्रेस्टीज उत्पन्न वाढले. फायदा कमी झाला. मार्जिन कमी झाले.  

अदानी एन्टरप्रायझेस QIP द्वारा Rs १६६०० कोटी उभारणार आहे. 

इंडो NATIONAL तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले. 

इंगरसॉल RAND चे प्रॉफीट, उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs २० लाभांश दिला.

हिंद रेक्टीफायर ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

SHALBY चे प्रॉफीट वाढले उत्पन्न  वाढले मार्जिन वाढले. 

RITES प्रॉफीट उत्पन्न मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला. 

इनॉक्स विंड सिक्युरिटी द्वारा फंड उभारण्यावर विचार करत आहे. 

3 M इंडिया चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ५२५ स्पेशल लाभांश आणी Rs १६० अंतिम ( फायनल)  लाभांश जाहीर केला. 

J कुमार इंफ्राचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

मान इंडस्ट्रीज चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले.  

NMDC ने आयर्न ओअर  फाईन ची किमत Rs ३५० /टन आणी लम्प्स ची किमत Rs २५० प्रती तन वाढवली. 

IMAGICA WORLD तोट्यातून फायद्यात आली. Rs १६० कोटींच्या तोट्या ऐवजी  Rs ४.८ कोटी फायदा झाला. उत्पन्न वाढले कंपनीने Rs ५.५ कोटींचा वन टाईम लॉस बुक केला.

आज IT, बँक्स, मिडकॅप, स्माल कॅप, CPSE, मेटल, ऑटो, एनर्जी, इन्फ्रा मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले FMCG आणी फार्मा मध्ये खरेदी झाली.   

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७५१७० NSE निर्देशांक निफ्टी २२८८८ बँक निफ्टी ४९१४२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २७ मे २०२४

आज क्रूड US $८२.३o प्रती बॅरल तर रुपया US डॉलर १=₹८३.०० च्या आसपास होते.USA $ निर्देशांक १०४.६३ USA १० वर्षे बाँड यील्ड् ४.४६ आणि VIX २२.८५ होते.सोने Rs ७१९०० तर चांदी Rs ९१९०० च्या

आसपास होते.झिंक मंदीत तर लेड तेजीत होते.PCR १.३७ वरून १.१४ झाले.

आज USA, आणि UK ची मार्केट बंद राहतील 

FII ने Rs ९४५ कोटींची विक्री तर DII ने Rs २३२० कोटींची खरेदी केली.

न्यू जेन सॉफ्टवेअर ने १:१बोनस दिला. १८जुलै २०२४ रेकॉर्ड डेट निश्चित केली.Rs ४ लाभांश जाहीर केला .

M&M फॉर्जिंग २९ मे २०२४ रोजी बोनस आणि लाभांश जाहीर करण्यावर विचार करेल.

AFFLE चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले. मार्जींन १९.३%राहिले.

सुंदरम फायनान्स ची डीसबर्समेंट १८.१% नें वाढली.

AUM २७.३%वाढले,NII २०% वाढलें. नेट प्रॉफिट ६०% ने  वाढले.GNPA आणि NNPA कमी झाले.

ग्लेनमार्क फार्मा चा नेट लॉस वाढला, उत्पन्न वाढले, मार्जीन वाढले,USA मधील विक्री कमी झाली. नॉर्थ अमेरिका रेव्हेन्यू कमी झाला. कंपनीने फ्युचर गायडन्स चांगला  दिला. ग्लेन मार्क लाईफ मधील हिस्सा विकून कर्ज कमी केले.

टोरंट फार्मा चे निकाल अपेक्षेनुसार आले. जर्मनी,ब्राझील,

भारत, मधील उत्पन्न वाढले.USA मधील उत्पन्न कमी झाले.

SPARC चा तोटा वाढला, उत्पन्न कमी झाले.

मन्नापुरं फायनान्सचे प्रॉफिट वाढले, NII वाढले, NPA कमी झाले,AUM कमी झाले.

ऑरोबिंदो फार्मा चे उत्पन्न वाढले USA विक्री कमी झाली.

वन टाईम लॉस Rs ११२ कोटी झाला. मार्जीन वाढले.

हिंदुस्थान कॉपर चे मार्जीन वाढले, प्रॉफिट कमी झाले. इतर उत्पन्न ६% कमी झाले.

डिविज लॅब चे मार्जीन ३०% रेव्हेन्यू वाढले. प्रॉफिट वाढले.कंपनी जवळ Rs ३२०० कोटी कॅश आहे.

Veljan डेनिसन १: १ बोनस आणि Rs १७ लाभांश जाहीर केला.२९मे २०२४ रेकॉर्ड डेट निश्चीत केली.

NTPC चे प्रॉफिट कमी झाले. उत्पन्न वाढले 

लुमॅक्सने Rs ३५ लाभांश जाहिर केला. निकाल चांगले आले 

PSP PROJECT चे प्रॉफिट उत्पन्न कमी झाले. मार्जीन 

कमी झाले.

प्रकाश पाईप्स चे निकाल चांगले आले .

मुथूट ने Rs २४ लाभांश जाहीर केला.

STYLAM चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. मार्जीन वाढले. 

पनामा पेट्रो चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले.

BSE ने SPDJ सिंगापूर बरोबर एशिया इंडेक्स मध्ये ५०% शेअर खरेदी करण्यासाठी शेअर पर्चेस अग्रीमेन्ट केले.

गोवा कार्बनने पारादीप प्लांट मध्ये कामकाज सुरु केले.

सोम डिस्टीलरीजला तेलंगणा सरकारकडून बिअर ब्रँड सप्लाय करण्यासाठीं रीतसर मंजुरी मिळाली.

रुचिरा पेपर्स चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जीन कमी झाले.

HBL पॉवर सिस्टिम्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. मार्जीन वाढले.

Stovecraft लॉस (Rs ६ कोटी)मधून प्रॉफिट (Rs ३कोटी) मध्ये  आली.volume ९.४%वाढले.मार्जीन ७.६% होते.उत्पन्न १७%ने वाढले . कंपनीचे नवीन प्रॉडक्ट लाँच laa चांगला प्रतिसाद मिळाला.

पुदुमजी पेपरचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. मार्जीन वाढले.

इलेक्ट्रॉनिक मार्ट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जीन वाढले.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. मार्जीन कमी झाले.Rs १३ लाभांश जाहीर केला.

सॅक सॉफ्ट चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले. 

वेस्ट कोस्ट पेपर चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले. मार्जीन कमी झाले. 

जूनिपर हॉटेल्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जीन वाढले.

इंडो काउन्ट चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले. मार्जीन 

कमी झाले.

आज मेटल, ऑईल & गॅस, ऑटो मधे प्रॉफिट बुकिंग झाले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७५३९० NSE निर्देशांक निफ्टी २२९३२ bank निफ्टी ४९२८१ वर बंद झाले 

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २४ मे २०२४

क्रूड ८१.३८, बोंड yield ४.४६,dollar index १०४.९८ रूपया ८३.२१,vix २१.६१ होते आज इंट्रा डे २३००० ची पातळी पार झाली

काल अमेरिकन मार्केट मंदीत गेले अमेरिकन  manufacturing PMI-५०.९,Services PMI-५४.८ तर composit PMI- ५४.४ आला हे आकडे चांगले आल्यामुळे सर्व कालावधीचे bond yield वाढले आता डिसेंबर पर्यंत रेट कट होण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे प्रॉफिट बुकिंग झाले

काल भारतीय बाजारात एक लाख एकवीस हजार shorts cover झाले 

Laurus Lab च्या आंध्र प्रदेशातील प्लांटला GMP च्या दुर्लक्ष केले आणि 

USFDA ने दाखवलेल्या त्रुटीकडे लक्ष दिले नाही म्हणून warning letterइश्यू केले

Sun Pharma आणि Taro Pharma merger ला शेअर होल्डर ची मंजूरी मिळाली आता Taro Pharma चे us मार्केट मधून delisting होईल

HCL technologies ही CTG communication technology group चे assets २२५ मिलियन डॉलरला घेणार आहे

फोर्टिस हेल्थकेअर चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढलें. कंपनीने काढलेले कर्ज ₹२६४ कोटी आहे.

काँकॉर्ड बायोटेकचे प्रॉफिट ₹९५ कोटी झाले. मार्जिंन कमी झाले. रेव्हेन्यू १७%वाढला.

TRF ला अन्वर इंटरनॅशनल कडून ₹१६१ कोटींची आणि अडानी ग्रूपकडून ₹१७९ कोटींची ऑर्डर मिळाली.

बीकाजी फुड्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले margin वाढले.

होनासा तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले margin वाढले.

Barbeque नेशनचा तोटा कमी झाला. उत्पन्न वाढले.

कॅप्लिंन पॉइंटची सबसीडियरी कॅपलिन स्टराईलच्या PHENYLEPHRINE HYDROCHLORIDE OPTHALMIC ला USFDA ची मंजुरी मिळाली.

Aegis logistics फायदा वाढला, उत्पन्न कमी झाले,margin वाढले

EID PARRY फायदा वाढला, उत्पन्न कमी झाले,margin कमी झाले 

PSP PROJECT फायदा, उत्पन्न,margin कमी झाले 

NIIT तोट्यातून फायद्यात, उत्पन्न वाढले,

COROMONDAL international नी पिकाच्या रक्षणासाठी १० नवीन प्रॉडक्ट लाँच केले 

CHEVIOT चां फायदा वाढला उत्पन्न आणि margin कमी झाले 

TTK healthcare फायदा, उत्पन्न वाढले तर margin कमी झाले

अशोक ले लॅडला ७० कोटी one time loss झाला प्रॉफिट ९००.४० कोटी,

उत्पन्न ११२६७ कोटी आणि ४ रुपये ९५ पैसे dividand दिला

GNA Axles फायदा,margin कमी झाले तर उत्पन्न वाढले 

HUDCO चां फायदा उत्पन्न वाढले NII वाढले 

मंनापुरम चां फायदा,NII,gold segment उत्पन्न वाढले 

PNC infra फायदा दुप्पट झाला, उत्पन्न वाढले 

CENTURY PLY चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले margin कमी. झाले आणि १ रूपया dividand दिला

सुंदरम फायनान्स चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले.कंपनीने ₹१६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

63 मून तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न कमी झाले.₹२ लाभांश जाहीर केला.

आज PSE,OIL &GAS, एनर्जी, ऑटो, बँकिंग क्षेत्रात खरेदी तर FMCG, रियलटी,metals, फार्मा मध्ये प्रॉफिट बुकींग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७५४१० NSE निर्देशांक निफ्टी २२९५७ बँक निफ्टी ४८९७१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ मे २०२४

.
आज क्रूड US $ ८१.३०  प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२८ ( आज करन्सी मार्केट बंद आहे.) USA $ निर्देशांक १०४.७९ USA १० वर्षे BOND  यील्ड ४.४२ आणी VIX २१.४८ होते.

आज निफ्टीने इंट्राडे २३००० तर सेन्सेक्सने ७५००० पार केले.३ में २०२४ नंतर निफ्टीने १४ सत्रांत हा टप्पा पार केला.  

 सारेगम चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.  

DELHIVERY ने B २ B शिपमेंटसाठी SUGAR COSMETICS  बरोबर करार केला. 

MAITHAN अलाईजने 0.०३% स्टेक Rs ५०.08 कोटींना BEL मध्ये घेतला. 

SBI MF ने APTUS व्हल्यू  हौसिंग मध्ये ३.७% स्टेक घेतला. 

KPI ग्रीन ने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले. 

गो डिजिटल इन्शुअरन्सचे BSE वर Rs २८१.१० आणी NSE वर Rs २८६ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs २७२ मध्ये दिला असल्याने ज्याना शेअर्स अलॉट झाले त्याना माफक लिस्टिंग गेन्स झाले. 

गोदरेज प्रॉपर्टीजच्या नोइडा प्रोजेक्टमध्ये ६५० घरांसाठी Rs २००० कोटींची बुकिंग झाली. 

पिरामल फार्मा च्या USA मधील मन्युफाक्चरिंग युनिटच्या USFDA ने केलेल्या इन्स्पेक्शन नंतर EIR दिला. 

ज्युबिलंट फूडने भारतात नवीन ८९ स्टोर्स ओपन केली. 

पॉवर ग्रीडचे चौथ्या तिमाहीत  प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. ट्रान्स्मिशन व्यवसायाचे निकाल  कमजोर आले 

GRSB चे प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन वाढले. 

PG  इलेक्ट्रोप्लास्ट चे प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनी १ शेअरचे १० शेअर्स मध्ये स्प्लीट केले 

स्टार हेल्थ मध्ये ४.१३ कोटी शेअर्सचे Rs ५३५ प्रती शेअर या भावाने Rs २२१० कोटींचे  लार्ज डील झाले.

इंडिगो पेंट्स चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ३.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. फ्रेश वर्कर्सची भारती केल्यामुळे मार्जिन वर  परिणाम झाला. 

GLAND फार्मा चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले Rs २० लाभांश जाहीर केला.

अदानी एनर्जी २७ मे पासून QIP द्वारे फंड उभारेल. 

KEYSTONE REALITY Rs १००० कोटींचा QIP Rs ६८२.५१ प्रती शेअर या भावाने आणणार आहे.

 इंडिया बुल्स रिअल एस्टेटने BLU ANNEX चे अक्विझीशन पूर्ण केले. 

GMM PFAUDLERचे प्रॉफीट  उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. कंपनीकडे Rs १६८९ कोटींचा ऑर्डर बॅंक लॉग आहे आणी फ्रेश ऑर्डर इंटेक १४% ने वाढून Rs ८६१ कोटी झाला. 

HEG चे प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. 

स्टार सिमेंट चे प्रॉफीट  कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

धनलक्ष्मी बँकेचे NII कमी झाले प्रॉफीट कमी झाले. NPA कमी झाले. 

ITC चे मार्जिन ३७.२% राहिले. प्रॉफीट Rs ५०२० कोटी झाले. उत्पन्न Rs १६५७९ कोटी झाले. सिगारेट उत्पन्नात ८% वाढ झाली. सिगारेटच्या व्हॉल्यूममध्ये २.३% वाढ झाली. कंपनी हॉटेल बिझिनेस डीमर्ज करण्यासाठी 6 जून २०२४ रोजी शेअर होल्डरसची  मंजुरी घेईल. 

रामको चे प्रॉफीट Rs १२१.४ कोटी रेव्हेन्यू Rs २६७३ कोटी मार्जिन ७० बेस पाईंट ने कमी झाले. व्हॉल्यूम वाढले पण किमती कमी झाल्या. कर्ज Rs १०० कोटींनी  कमी झाले.

ग्रासिम चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले कंपनीच्या तीन युनिटमध्ये लवकरच उत्पादन सुरु होईल आणखी तीन युनिट लावण्याची योजना विचाराधीन आहे. 

मेट्रो ब्रांड चे प्रोफित वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

गांधार चे प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन कमी झाले. 

न्यू इंडिया शुअरन्स चे NPE वाढले.

SML इसुझू चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले. 

स्टीलस्ट्रीप चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले कंपनीला Rs 473 कोटींचे वन टाईम उत्पन्न झाले. 

ICICI लोम्बार्ड ला Rs २८८ कोटींची GST संबंधीत नोटीस मिळाली. 

युनो मिंडा चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १.३५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

GOCL कॉर्पोरेशन चे प्रॉफीट कमी झाले. उत्पन्न कमी झाले, ऑपरेशनल लॉस वाढला. 

पेज इंडस्ट्रीजने Rs १२० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. उत्पन्न वाढले , प्रॉफीट वाढले, मार्जिन वाढले. 

न्युक्लीअस सोफ्टवेअर चा फायदा वाढला, मार्जिन वाढले. 

सुब्रोसचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. कंपनीने Rs १.८० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

PCBL चा फायदा वाढला उत्पन्न वाढले. 

उद्या शुक्रवारी BSE सेन्सेक्सचे REBALANCING  जाहीर करण्याची शक्यता आहे. अदानी इंटरप्रायझेसचा समावेश केला जाईल. विप्रो ला वगळले जाईल. विप्रोमध्ये Rs ४६६ कोटींचा आउटफ्लो होईल. BSE १०० मध्ये जीओ फायनंशियाल, अदानी एनर्जी, अदानी POWER, अदानी एनर्जी, अदानी ग्रीन, RECचा समावेश होईल. 

गब्रीएलचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिंन वाढले.

शिल्पा मेडी केअर तोट्यातून फायद्यात आली

JK लक्ष्मी सिमेंट चे प्रॉफिट वाढले मार्जिंन वाढलें उत्पन्न कमी झाले.

इंडिगोचे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले. मार्जिन वाढलें.

आज midcap, ऑटो, बँकिंग,IT मध्ये खरेदी झाली. फार्मा, केमिकल,metals मध्ये दबाव होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स 75418,NSE निर्देशांक निफ्टी 22592,बँक निफ्टी 48766 वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २२ मे २०२४

आज क्रूड US $ ८१.७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.३० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.६५ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४0 आणी VIX २२.१० च्या आसपास होते. सोने Rs ७३८०० चांदी Rs ९४६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती. 

स्ट्राईडस फार्मा च्या ‘SUCRALFATE ओरल सस्पेन्शन’ या अल्सरवरील  औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.

सुझलॉन ला ४०२ MW विंड प्रोजेक्टची ऑर्डर जुनिपर ग्रीन एनर्जी कडून मिळाली . 

BEL ने १७५ एकर जमीन खरेदी  करण्यासाठी UP राज्य सरकारबरोबर करार केला. कंपनीने US $ ११ कोटींचे निर्यातीसाठी लक्ष्य ठेवले आहे. कंपनीचा नॉन डिफेन्स बिझिनेस एकूण बिझीनेसच्या १५% राहील. US $ २० कोटींच्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता.BEL ला Rs ११५० कोटींची ऑर्डर मिळाली.  

स्टार हेल्थ चे शेअर्स Rs ५३०- Rs ५४५ च्या दरम्यान APIS आणी MEDISON हे FPI विकतील. झायडस लाईफच्या अस्थमावरील ‘THEOPHYLLINE’ या औषधाला  USFDA ची मंजुरी मिळाली. वेलस्पन इंटरप्रायझेस  ला महाराष्ट्रामध्ये MSRDC कडून ३ वर्षे मुदतीची Rs १८६५ कोटींची ऑर्डर मिळाली.

DB CORP चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs ८ प्रती शेअर लाभांश जाहीर  केला. 

टीम लीज चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. 

MAX चे प्रॉफीट  वाढले उत्पन्न वाढले. 

सन फार्माचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. मार्जिन कमी झाले. Rs ३७३ कोटींवरून इतर उत्पन्न Rs ६०६ कोटी झाले. 

अवंती फीड्स चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

RBI ने सरकारला Rs २.११ लाख कोटींचा लाभांश जाहीर केला.   

व्हा टेक व्हा बाग ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. कंपनीकडे Rs ११५०० कोटींचे ऑर्डर बुक आहे. 

NIIT लर्निंग चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले.

M & M ने XUV ७०० चे नवीन व्हरायंट AX५ S लॉनच केले. 

TCS ला कुवैतच्या BURGAN बँकेकडून कोअर बँकिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑर्डर मिळाली. 

ओरिएनटल  कार्बनचे प्रॉफीट  वाढले, उत्पन्न वाढले. कंपनीने Rs७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.  

कावेरी सीड्सचा  तोटा कमी झाला , उत्पन्न वाढले. 

TALBROS चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. 

युनिकेम LAB चा तोटा Rs ४४ कोटींवरून Rs १२९ कोटी झाला. उत्पन्न आणी मार्जिन वाढले. 

स्ट्राईडस ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

टिळकनगर डिस्टिलरीज चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.

 भेलचे  प्रॉफीट FLAT, उत्पन्न कमी झाले, ऑर्डर बुक मात्र चांगले आहे. 

मेट्रोपोलीस हेल्थकेअर चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. 

PI इंडस्ट्रीज चे प्रॉफीट वाढले, मार्जिन आणी उत्पन्न वाढले. 

PNC इन्फ्रा महाराष्ट्रामध्ये Rs ४९९४ कोटींच्या रोड प्रोजेक्ट साठी L १ बीडर  ठरली.

USL ला  पाणी संधारण विभागाने Rs ३४५ कोटींची नोटीस पाठवली. 

GR INFRA महाराष्ट्रामध्ये Rs ४३४६ कोटींच्या प्रोजेक्ट साठी L१ बीडर  ठरली. 

शीला फोमचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. स्लीपवल चे ब्रांड व्हॉल्यूम 31% ने तर कुर्लोनचे ब्रांड व्हॉल्यूम १७% ने वाढले. 

हिताची चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न आणी मार्जिन वाढले. ऑर्डर बुक चांगले आहे. 

कॉफोर्ज Rs २२४० कोटींचा Rs ४५३१ फ्लोअर प्राईसने QIP इशू करेल. 

GE पॉवर  तोट्यातून फायद्यात आली.

महिंद्र फायनान्स ला इन्शुअरन्स प्रोडक्ट्स विकण्यासाठी कॉर्पोरेट एजंट म्हणून IRDAI कडून मंजुरी मिळाली.

रिलायंस इंडस्ट्रीज बरोबर भारतामध्ये ELECTROLYSERचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक तंत्र ज्ञान करार केला. 

Paytm चा लॉस वाढला उत्पन्न कमी झाले. 

AWFIS स्पेस सोल्युशनचा   Rs ५९८.९३ कोटींचा IPO  ( Rs १२८ कोटींचा फ्रेश इशू आणी ४७०.९३ कोटींचा OFS असेल)  आज २२/०५ /२०२४ ला ओपन होऊन २७/०५/२०२४ ला बंद होईल. नवीन सेंटर ओपन करण्यासाठी आणी भांडवली खर्चासाठी IPO चे प्रोसीद्स वापरण्यात येतील. 

याचा प्राईस बँड Rs 364 ते ३८३ असून मिनिमम लॉट ३९ शेअर्सचा  आहे. 

GAIL  मध्य प्रदेशातील ETHANE क्राकिंग युनिटमध्ये Rs ५०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.   

इंडियन बँक Rs ५००० कोटी भांडवल वाढवणार आहे. 

Nykaa चे प्रॉफिट,उत्पन्न मार्जींन वाढले

Jubilant food चे प्रॉफिट, उत्पन्न मार्जीन वाढले one time gain १७० कोटी झाला

Petronet LNG profit ,margin वाढले उत्पन्न कमी झाले 

आज मेटल्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. शेवटच्या  तासांत मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी झाली. FMCG रिअल्टी, फार्मा एनर्जी आणी IT मध्ये खरेदी झाली. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४२२१ NSE निर्देशांक निफ्टी २२५९७ आणी बँक निफ्टी ४७७८१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २१ मे २०२४

.

आज क्रूड US $ ८३.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.३० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.६१ आणी USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४४ होते.VIX २२.१० च्या आसपास होते.  सोने Rs ७३९००  आणी चांदी Rs ९४१०० च्या आसपास होते.बेस मेटल्स तेजीत होती.

टारो फार्मा चे ग्रॉस प्रॉफीट १२% ने वाढून US $ ८.७४ कोटी तर उत्पन्न US $ १६.४९ कोटी झाले. झुआरी इंडस्ट्रीज ला Rs 200 कोटींमध्ये TEXMAKO रेल चे शेअर घेण्यासाठी मंजुरी मिळाली. इंटरग्लोब एविएशन चा मार्केट शेअर ६०.५% वरून ६०.6% झाला. स्पाईस जेटचा  मार्केट शेअर ५.३% वरून ६.१७% झाला. एअर इंडियाचा मार्केट शेअर १३.१% वरून १४.२% झाला.

 AETHER इंडस्ट्रीज फायद्यातून तोट्यात गेली. Rs ३७,.५ कोटी प्रॉफीट ऐवजी Rs १.४ कोटी तोटा झाला. उत्पन्न Rs १८३ कोटी वरून Rs ११७ कोटी झाले. मार्जिन कमी झाले. 

SP अपरल्सचे प्रॉफीट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

वेल्स्पून चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले. 

FIIने Rs ९३ कोटींची तर DII ने Rs १५३ कोटींची विक्री केली.  

पटेल एन्जिनीअरिन्गचे प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन वाढले. कंपनीने Rs ३३१ कोटी कर्ज कमी केले. सोनपापडीच्या  संबंधीत केस २०१८ची आहे. कंपनीचा याच्याशी काही संबंध नाही. 

सोलारा ऍक्टिव्हच्या विशाखापट्टनम युनिटचे USFDA ने १४ मे ते १७ मे २०२४ दरम्यान केलेल्या इन्स्पेक्शन  शून्य तृटी दाखवल्या. 

ल्युपिन च्या SOMERSET मन्युफाक्चरिंग युनिटच्या तपासणीत  USFDA ने 6 निरीक्षणे नोंदवली. 

OIL इंडियाने तुमच्याजवळ असलेल्या दोन  शेअरमागे एक बोनस शेअर इशू करण्याची घोषणा केली. यासाठी रेकॉर्ड डेट २ जुलै निश्चित केली. Rs ३.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

व्हर्लपूल चे प्रॉफीट वाढले रेव्हेन्यू आणी मार्जिन वाढले. 

इंडिया सिमेंट चा तोटा कमी झाला उत्पन्न कमी झाले. क्षमता वापर ५१% वरून ६३% झाला. स्पर्धा वाढली. वाहतुकीचा खर्च वाढला. 

अनुपम रसायन प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. 

उज्जीवन SFB चे NII वाढले, प्रॉफीट वाढले. 

BEL चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. ऑर्डर बुक चांगले आहे. 

SAIL चे प्रॉफीट कमी झाले. सेल्स व्हॉल्यूम कमी झाले. 

व्हील्स इंडियाचे निकाल चांगले आले. 

ASK ऑटो, पॉवर मेक, अल्फाजीओ, यांचे तिमाही निकाल चांगले आले. 

सालासार ने EMC LTD Rs १७८ कोटींमध्ये खरेदी केली. 

रेटगेन चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

मान इंडस्ट्रीजला Rs ५०५ कोटींची पाईप सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली. 

बलरामपूर चीनीची  यावर्षी भांडवल गुंतवणुकीची योजना नाही. 

अरविंद FASHIONचे प्रॉफीट उत्पन्न मार्जिन वाढले. 

चांदीचे भाव १५% ने, झिंक चे भाव १०% ने अल्युमिनियमचे भाव ७% ने आणी कॉपर चे भाव १४% ने वाढले. कोकिंग कोल च्या किमती कमी झाल्या. 

स्टीलचे  चीनमधून होणारे डम्पिंग कमी झाले.

निबे या कंपनीने DRDO बरोबर अंटी टेररिस्ट व्हेइकल्स चे उत्पादन आणी विक्री साठी आणी टेक्नोलॉजी ट्रान्स्फरसाठी लायसेन्सिंग करार केला.  

EID PARRY ने हलीयाल शुगर युनिटमध्ये १२० KMPD डीस्टिलरी सुरु केली. 

मोरेपन LAB चे  निकाल चांगले आले. प्रॉफीट  उत्पन्न मार्जिन वाढले.    

आज रेल्वे, मेटल्स, PSE, एनर्जी फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर बँकिंग आणी FMCG क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रोफित बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३९५३ NSE निर्देशांक निफ्टी २२५२९  बँक निफ्टी ४८०४८ वे बंद झाले 

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ मे २०२४

आज क्रूड US $ ८४.०० प्रती बॅरलच्या आसपास  तर रुपया US $१= Rs ८३.३४ होता. USA $ निर्देशांक १०४.४५, USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४२ आणी VIX २०.२० होते. कमोडीटी मार्केट बंद होती. 

USA मार्केट मध्ये DOW JONES हा निर्देशांक  ४०००० च्या वर बंद झाला  GAMESTOP चा शेअर २०% पडला तर REDDIT चा शेअर १०% ने वाढला.

FII ने Rs १६१६ कोटींची आणी DII ने Rs १५५६ कोटींची खरेदी केली. 

सिग्नेचर ग्लोबलने  गुरूग्राम हरयाणा मध्ये १४.६५ एकर जमीन खरेदी करण्यासाठी करार केला. 

DR रेड्डीज च्या दुआदा युनिटचे USFDA ने इन्स्पेक्शन करून २ त्रुटी दाखवल्या आणी फॉर्म नंबर ४८३ इशू केला. 

UPLचा राइटस इशू येण्याची शक्यता आहे. साधारण Rs ४२०० कोटींचा किंवा US $ ५० कोटीचा असू शकतो. DRHP फाईल करावे लागेल. ९० ते १३५ दिवस लागतील. 

ट्रेन्टचा (Rs ३६५५ कोटींचा इंफ्लो)  आणी BEL ( Rs ३०६० कोटींचा इंफ्लो )  समावेश निफ्टी मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअर्समध्ये पॅसिव्ह फंडाचा  इंफ्लो होईल.

LTIMINDTREE आणी DIVIS LAB बाहेर पडतील. या शेअर्समध्ये Rs १७६० कोटींचा आउट फ्लो होईल. 

फायझर चे प्रॉफीट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. 

भारत बिजली प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

ASTRAL चे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी झाले.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे  चौथ्या तीमाहिचे  निकाल चांगले आले.

झी इंटरप्रायझेसचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs १ लाभांश दिला. 

DELHIVERY चा तोटा कमी झाला निकालांत सुधारणा दिसली. 

गोदरेज इंडस्ट्रीजचे निकाल कमजोर आले. 

NHPC चे निकाल कमजोर आले. 

DB केमिकल्स चे निकाल चांगले आले. 

शोभा चे निकाल कमजोर आले. 

किर्लोस्कर फेरस चे निकाल कमजोर आले.

नेस्लेच्या पेरेंट  कंपनीला देण्यात येणाऱ्या ४.५%  ROYALTY मध्ये ५ वर्षांत 0.७५% वाढवून ५.२५%  करायला  शेअर होल्डर्सनी मंजुरी दिली नाही. 

सुदर्शन केमिकल्सचे निकाल चांगले आले. 

बँक ऑफ बरोडाने CCIL, IFSC बरोबर करार केला.

LEMON TREE हॉटेल्स ने गुजराथ येथील सोमनाथमध्ये हॉटेल उघडले.   

VELIJAN  DENISON ने १:१ बोनस जाहीर केला. यासाठी २५ मे २०२४ रोजी रेकॉर्ड डेट निश्चीत केली. २३ मे २०२४ रोजी निकाल आणी लाभांशावर विचार करेल. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४००५ NSE निर्देशांक निफ्टी २२५०२ आणी बँक निफ्टी ४८१९९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १७ मे २०२४

आज क्रूडUS $ ८३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.५२ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३७ आणी VIX २०.२० च्या आसपास होते. सोने Rs ७२९०० आणी चांदी Rs ८७१०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.

USA चा निर्देशांक DOW जोन्स ४०००० वर पोहोचला तीन वर्षांत  १०००० पाइंट वाढले.   

FII ने Rs ७७६ कोटींची विक्री तर DII ने Rs २१२८ कोटी खरेदी केली . FII ची कॅश सेगमेंट मध्ये विक्री कमी झाली असली तरी इंडेक्स फ्युचर, शेअर्स फ्युचर्स मध्ये विक्री आहे. 

VI चा तोटा वाढला.Rs ६९८६ कोटींवरून Rs ७६७४ कोटी झाला. मार्जिन कमी झाले ARPU  Rs १४६ झाला. पुढील वर्षांत Rs ५०००० कोटी ते Rs ५५००० कोटींची गुंतवणूक करणार. 

वेदांता ने Rs ११ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. ह्यासाठी २५ मे २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली. कंपनी Rs ८५०० कोटी एवढे फंड उभारणार आहे. 

PB फिनटेक मध्ये १.८६% ईक्विटीसाठी फ्लोअर प्राइसने BLOCK DEAL द्वारा Rs १०५३ कोटींचे DEAL झाले. कंपनीला Rs १०५३ कोटी मिळतील. हे पैसे TAX पेमेंटसाठी वापरले जातील. पुढील वर्षभरात प्रमोटर्स स्टेक विकणार नाहीत. 

BIOCON चा फायदा ५७% कमी होऊन Rs 135.५ कोटी तर रेव्हेन्यू वाढून Rs ३९१७ कोटी झाला. मार्जिन 300 बेस पाईंटने कमी झाले. मार्केट शेअर वाढला. 

कॉंकार चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले. 

प्रिन्स पाईप चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. व्हॉल्यूम १६% ने वाढले. 

क्रोम्प्टनचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

त्रिवेणी टरबाइंसचे प्रॉफीट वाढले उत्पन्न आणी मार्जिन वाढले. ऑर्डर बुक १७% ने YOY वाढले. 

JK  पेपर प्रॉफीट कमी झाले उत्पन्न FLAT राहिले मार्जिन कमी झाले. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. REALIZATION कमी झाले. 

पोकर्ण प्रॉफीट वाढले, उत्पन्न FLAT आणी मार्जिन वाढले. 

DCX चे प्रॉफीट वाढले उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. 

अदानी पोर्टला  नॉर्वेच्या सोव्हरीन पेन्शन फंडातून वगळले. ताणतणावाच्या वातावरणांत व्यक्तिगत कायद्याचा भंग झाला. त्यांनी चीनची वायचाय POWER, L ३ HARRIS टेक लाही  वगळले. मार्च २०२२ मध्ये मियांमार च्या पोर्ट टर्मिनल मध्ये स्टेक होता तो अदानी पोर्टने विकला  हे कळवले नाही.

BEML ला नॉर्दर्न कोल फिल्ड्स कडून Rs २५० कोटींची ऑर्डर मिळाली. 

M & M च्या व्यवस्थापनाने सांगितले की फार्म इक्विप्मेंट  मधील मार्जिन मध्ये सुधारणा झाली. ऑटो सेक्टरमध्ये मार्जिन १.७% वरून ८.८% झाले. BII  M &M च्या EV बिझिनेस मध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनी ट्रक्टर सेगमेंट मध्ये नवीन मॉडेल लॉन्चकरून मार्केट शेअर वाढवण्याच्या  प्रयत्नांत राहील. 

वीर हेल्थ केअर या कंपनीला US $ १९७७९३ ( Rs १६५ लाखांची ) निर्यातीसाठी ऑर्डर मिळाली. 

ग्लेनमार्क फार्माच्या ‘BRIMONIDINE TARTRATE’ आणी  ‘TIMOLOL MALEATE’

OPTHALMIC सोल्युशन्स ला ANDA मंजुरी मिळाली. 

झायडस लाईफ आणी MSN यांनी ‘CADOZANTRINIB’ याच्या सप्लाय आणी लायसेन्सिंग साठी करार केला. 

NAVA लिमिटेड चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

धनुका अग्रीटेक चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले. 

LANDMARKS कार्स ने KIA बरोबर करार केला. 

GPT इन्फ्रा प्रोजेक्ट ने १:१ बोनस जाहीर केला, प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. Rs १ लाभांश दिला. ३० मे २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली. 

GO FASHION ने APPARELS बरोबर फ्रन्चाइजी करार केला. UAE  आणी सौदी अरेबिया मध्ये ‘GO COLOR’ ब्रांड साठी ५ वर्ष मुदतीचा करार केला. 

EMS ( इलेक्ट्रोनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस ) या कंपन्या इलेक्ट्रोनिक हार्डवेअर चे  डिझाईन आणी उत्पादन सेवा पुरवतात. या कंपन्या IT टेलिकॉम, डिफेन्स, मेडिकल आणी कंझ्युमर इंडस्ट्रीज आणी इतर इंडस्ट्रीज ना सेवा पुरवतात. ह्या कंपन्या प्रिंटेड सर्किट बोर्डची असेम्ब्ली करतात. उदा DIXON TECH, अंबर, KAYNES टेक, आणी क्रांपटन 

LT फुड्स चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले. 

पॉली मेडीक्युअरचे प्रॉफीट उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला. 

GSK फार्माचे प्रॉफीट, उत्पन्न वाढले कंपनीने Rs ३२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

प्रकाश इंडस्ट्रीज चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले. 

टीवी टुडे चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. 

वर्रोक ENGG चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले.  

झायडस लाईफचे  प्रॉफीट  वाढून Rs ११८२ कोटी झाले. उत्पन्न Rs ५५३३.८० कोटी झाले मार्जिन २९.५% राहिले. 

JSW स्टीलचे  प्रॉफीट कमी होऊन Rs १३२२ कोटी उत्पन्न कमी होऊन Rs ४६२६९ कोटी तर मार्जिन कमी होऊन १३.२% राहिले. 

बंधन बँकेचे प्रॉफीट  उल्लेखनीय रीत्या कमी झाले. प्रोविजन वाढून Rs १७७४ कोटी झाली NII वाढून Rs २८६६ कोटी झाले. GNPA ७.०२% कमी होऊन ३.८४% आणी NNPA २.२१% वरून कमी होऊन १.११% झाले.  

बलरामपुर चिनीचे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. 

आज मिडकॅप, स्माल कॅप, ऑटो, रिअल्टी, OIL & GAS,मेटल्स आणी बँकिंग मध्ये खरेदी झाली. IT आणी FMCG मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३९१७ NSE निर्देशांक निफ्टी २२४६६ आणी बँक निफ्टी ४८११५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १६ मे २०२४

आज क्रूड US $ ८३.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.40 च्या आसपास होते. USA $ निर्देशांक  १०४.०० USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३२ , FII ची विक्री 2833 कोटी , DII ची खरेदी 3788 कोटी झाली

अमेरिकेत महागाईचा दर 3.4%आला 3.5%येईल अशी अपेक्षा होती तीन वर्षाच्या lower level ला महागाई आली त्यामुळे रेट कट करण्यासाठी दबाव वाढला यामध्ये कोअर महागाई 3.6%आली 3.8%ची अपेक्षा होती

आज जपानच्या GDP चे आकडे आले GDP कमी झाला एक डॉलर=१५४ येन हा दर झाला

Windfall TAX कमी केला ८४०० वरून ५७०० प्रती टन केला पेट्रोल,डिझेल,ATF वर ड्युटी zero ठेवली

HAPPIEST MIND नी नेक्स्ट जेन सोल्यूशन साठी SOLVIO बरोबर करार केला 

G R INFRA la NHAI नी LOA दिले होते हे ८९८ कोटींच्या प्रोजेक्ट साठी दिले होते ते रद्द केले

ORIEN PRO नी वॉलेट सोल्यूशन साठी गुगल बरोबर करार केला public transport साठी हवे होते

Texmaco रेल चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिंन वाढले.

लिंकन फार्मा चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिंन वाढले. कंपनीने ₹१.८० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

सनशिल्ड केमिकल्स चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले.

KOPRAN प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मारजिन वाढले.कंपनीने ₹३ लाभांश जाहीर केला.

कॅपलिन पॉइंट चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जींन वाढले. कंपनीने ₹२.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला 

DCW चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले.

M & M प्रॉफिट वाढले मार्जींन १२ .४ % आले उत्पन्न वाढले २१ रुपये १० पैसे  लाभांश जाहीर केला रिझल्ट चांगला आला

HAL चां फायदा ४३०९ कोटी, उत्पन्न १८.२% ,आणि मार्जिन  २६ % वरून.   ४० % झाले

रिलायंस इंडस्ट्रीजने आज REC सोलार नॉर्वे AS ची विक्री ओस्लो लिस्टेड एलकेम ASA ला करण्याचा USA $२२मिलियन chaa व्यवहार पूरा केला.

    GAIL चां फायदा,,उत्पन्न,मार्जिंन कमी झाले 

भारती एअरटेल कर्ज कमी करणार व्यवसायात भांडवल घालणार आहे त्यासाठी त्यांना tarriff रेट वाढवावे लागतील 

INFO EDGE नी १२ रुपये लाभांश जाहीर केला फायदा, उत्पन्न, मार्जिंन वाढले

INDOCO REMEDIES फायदा कमी झाला उत्पन्न वाढले

FACT फायद्यातून तोट्यात गेली उत्पन्न ,मार्जिंन कमी झाले

V GUARD फायदा,उत्पन्न, मार्जीन वाढले

६ जूनला होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत आहे Earnest Money deposit ४३५० कोटी रुपये मिळाले 

मदरसन वायरींगचा रिझल्ट चांगला आला 

CROMPTON चे प्रॉफिट उत्पन्न वाढले तर मार्जिन कमी झाले

IT,reality, consumer goods यात तेजी होती 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३६६३,NSE निर्देशांक निफ्टी २२४०३,BANK NIFTY ४७९७७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १५ मे २०२४

आज क्रूड US $८२.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.९८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४४ आणी VIX २० च्या आसपास होते. सोने Rs ७२२०० च्या आसपास तर चांदी Rs ८५३०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती. 

EV कॉम्पुटर चिप्स, मिनरल्स सारख्या कमोडिटी संबंधात USA आणी चीन यांच्यात ताणतणाव सुरु झाला. USA ने चीन मधून USA मध्ये आयात होणाऱ्या  वस्तूंवर १००% कर लावला. USA मध्ये महागाई कमी झाली आहे पण महागाई कमी होण्याचा वेग कमी आहे. ली ऑटो या चीनी कंपनीचा  शेअर पडला

तर टेसला चा शेअर वाढला.PPI (प्रोड्युसर्स प्राईस  इंडेक्स) 0.५ % ने मंथ ऑन मंथ वाढला.

MSCI ग्लोबल इंडेक्स मध्ये खालील शेअर्सचा  समावेश होण्याची शक्यता आहे आणी त्यामुळे या शेअर्समध्ये कंसांत दाखवल्याप्रमाणे कोटी US $ चा  इंफ्लो येण्याची शक्यता आहे.

सोलर इंडस्ट्रीज ( १७ ) NHPC (१७) BOSCH (१६.४) जिंदाल स्टेनलेस (१६.२) इंडस टोवर (२२.४) पॉलिसी बझार (२२.३) फिनिक्स मिल्स (२१.३) सुंदरम  फायनान्स (२०.७%) . 

तसेच खालील शेअर्स MSCI इंडेक्स मधून बाहेर पडतील आणी त्यांच्या कोटी US $ चा आउटफ्लो कंसांत दाखवल्याप्रमाणे होईल. बर्जर पेंट्स ( ११.१ ), IGL (१०.५ ) Paytm (6.७) 

१ जून २०२४ रोजी हे बदल केले जातील .

अपोलो टायर्स चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs 6 प्रती शेअर लाभांश जाहीर केला.    

FII ने Rs ४०६६ कोटींची विक्री तर DII ने Rs ३५२८ कोटींची खरेदी केली. 

सिप्ला मध्ये प्रमोटर कुटुंब  आणी ओसाका फार्मा २.५३% स्टेक Rs १२८९.५० ते Rs  १३५७.५० या दरम्यान ब्लॉक दिल द्वारा विकला हे डील  यशस्वी झाले. 

कोलगेट चे नेट  प्रॉफीट २०% ने वाढून Rs ३७९ कोटी झाले.मार्जिन ३५.७% राहिले. कंपनीने Rs २६ अंतिम आणी Rs १० स्पेशल लाभांश जाहीर केला. लाभांशासाठी २३ मे २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. ७ जून २०२४ किंवा त्यानंतर लाभांश दिला जाईल. 

प्रीकोल, PSP  प्रोजेक्ट्स, आवास फायनान्स, टिप्स इंडस्ट्रीज, डीक्सन टेक या कंपन्यांत FII ने गुंतवणूक वाढवली. 

भारताला चाबहार पोर्ट ( इराणमध्ये) च्या व्यवस्थापनासाठी १० वर्षासाठी मिळाले. १० वर्षानंतर याची मुदत वाढू शकते. 

ओरीओन प्रो ने १:१ बोनस जाहीर केला.  

रेव्हेन्यू १०.३५% ने वाढून Rs १४८० कोटी झाले. विक्री १०.३५% ने वाढून Rs १४८० कोटी झाले. 

असाही इंडिया ने Rs २ लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफीट वाढले उत्पन वाढले. 

SEBI ने LIC ला MPS (मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग नॉर्म्स) नियमातून ३ वर्षांसाठी सुट दिली.

आधार हौसिंग फायनान्स चे BSE वर Rs ३१४.३० आणी NSE वर Rs ३१५ वर लिस्टिंग झाले. 

TBOK चे BSE वर Rs १३८० तर NSE वर Rs १४२६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर ज्यांना अलॉट झाले त्याना चांगले लिस्टिंग गेन्स झाले. 

कोल इंडिया ने चिलीमध्ये लिथीयम या क्रिटीकल मिनरल्स साठी प्रयत्न सुरु केले. कंपनी काँगो आणी झाम्बिया मध्ये क्रिटीकल मिनरल्स संबंधांत डेलिगेशन जून २०२४ मध्ये पाठवणार आहे. 

ऑस्ट्रेलिया मधील लिथीयम माईन्स मध्ये NMDC ला स्वारस्य आहे.

OIL INDIA २० मे २०२४ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल. 

नीरलॉन चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. 

PFC चे प्रॉफीट Rs ३४९२ कोटींवरून YOY १८.४% ने वाढून Rs ४१३५ कोटी झाले. उत्पन्न Rs १०१८५ कोटींवरून YOY २०.२%  ने वाढून Rs १२२४४ कोटी झाले. GNPA QOQ ३.५२% वरून ३.३४% झाले NNPA QOQ 0.९०% वरून 0.८५% झाले. कंपनीने Rs २.५० अंतिम लाभांश जाहीर केला. संदीपकुमार यांची नवीन CFO म्हणून नियुक्ती झाली. 

पारादीप फॉस्फेट चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले. 

ग्रनुअल्सचे प्रॉफीट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १.५० लाभांश जाहीर केला. 

IIFL फायनान्स चा राईट्स इशू पूर्णपणे सबस्क्राईब झाला. 

SBI ने निवडक मुदतीच्या टर्म डीपॉझीटवरील व्याजाचे dr 0.२५% ते 0.७५% एवढे वाढवले. 

ज्योती LAB चे प्रॉफीट वाढले उत्पन्न  वाढले कंपनीने Rs ३.५० लाभांश जाहीर केला. 

KEYSTONE रिअल्टीचे प्रॉफीट कमी झाले. उत्पन्न वाढले निकाल कमजोर आले.

मुकुंद चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs २ लाभांश जाहीर केला. 

नेक्टर लाईफ सायन्सेसचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. 

स्पेशालिटी रेस्टोरेंटचे उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले 

पतंजली फूड चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले. 

डिक्सन TECH चे प्रॉफीट Rs ८१ कोटींवरून Rs 98.5 कोटी झाले. उत्पन्न Rs ३०६५ कोटींवरून Rs ४६५८ कोटी झाले. मार्जिन ५.१% वरून ४% राहिले. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

TCI चे प्रॉफीट Rs ८१.५ कोटींवरून Rs १०२ कोटी झाले. उत्पन्न Rs ९७९ कोटींवरून Rs १०७९ कोटी झाले. कंपनीने Rs २ लाभांश जाहीर केला. मार्जिन १0.८% राहिले. 

बर्जर पेंट्स चे प्रॉफीट Rs १८६ कोटींवरून Rs २२३ कोटी झाले. उत्पन्न Rs २४४४ कोटींवरून Rs २५२० कोटी झाले. मार्जिन १५.१ % वरून १४% राहिले. 

आज मिडकॅप, स्माल कॅप, कन्झ्युमर गुड्स, पॉवर, मेटल्स, IT, OIL & GAS, क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली तर बँकिंग, FMCG, ऑटो क्षेत्रातील  शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२९८७ NSE निर्देशांक निफ्टी २२२०० बँक निफ्टी ४७६८७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७