आजचं मार्केट – २ मे २०२४

.

आज क्रूड US $ ८३.९० प्रती barel रुपया तर  US $१= Rs ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.७६ USA १0 वर्षे बॉंड यील्ड ४.६२ आणी VIX १३.६० होते. सोने Rs ७११०० तर चांदी Rs ७९९०० होती. बेस मेटल्स तेजीत होते.

USA मध्ये वेजीस १.२% वाढले. जॉब ओपनिंग ८.५ मिलियन झाले. फेडने  सांगितले की महागाई २% पर्यंत कमी होत आहे हे जाणवल्या शिवाय रेट कट सुरु होणार नाहीत. फेडने व्याजाचे दर ५.२५ % ते ५.५०% कायम  ठेवले. ट्रेजरी कॅप US $ ६० बिलियन वरून  US $ २५ बिलियन केली. जून २०२४ पासून सिक्युरिटीज मधील होल्डिंग कमी करणार. फेडची पुढील मीटिंग जून ११-१२ रोजी निश्चित केली आहे. 

FII ने Rs १०७२ कोटींची खरेदी तर DII ने Rs १४२९ कोटींची खरेदी केली. PCR १.२३ वरून १.११ झाला. बायोकॉन  आणी VI BAN मध्ये  होते.

एप्रिल महिन्यासाठी GST कलेक्शन २.१० लाख कोटी झाले. 

भारताचा एप्रिल महिन्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग PMI ५८.८ आला. 

M & M ची ट्रक्टर विक्री २% वाढली आणी निर्यात २३% ने वाढली. 

ASTEC लाईफ मध्ये २६% स्टेक साठी ओपन ऑफर Rs १०६९.७५ प्रती शेअर या भावाने येण्याची शक्यता आहे. 

GODFREY फिलिप्स ने ‘FERRER INDIA’ बरोबर प्रोडक्टस् सप्लाय साठी करार केला. 

NMDC ची आयर्न विक्री ३% ने वाढून ३.५३ लाख MT  झाली तर उत्पादन ३.४८ लाख MT झाले. 

आज जिओ पोलीटिकल तणावामध्ये थोडी वाढ झाली. यामध्ये आता चीनचा प्रवेश झाला आहे. फतेह आणी हमास हे दोन्ही पलेस्टाईन मध्ये प्रतिस्पर्धी ग्रुप आहेत. चीनची पलेस्टाईनशी मैत्री आहे. गाझा मध्ये हमास सरकार चालवते तर वेस्ट बँक मध्ये फतेह चे सरकार आहे. आता चीन मुळे  या दोन ग्रुपमध्ये मैत्री झाली आहे. राफा मध्ये इझरेल नी केलेल्या हल्ल्यात बरेच पलेस्टाइनी मारले गेले. चीन या ताणतणावात सामील झाल्यामुळे इझरेल ला धोका वाढला आहे.    

इंडिया मार्ट चा रेव्हेन्यू जरी १७.१% म्हणजेच ३१४.७ कोटी झाला तरी रेव्हेन्युमध्ये होणार्या वाढीचा वेग मंदावला आहे. मार्जिन २४.६ % वरून २८.१% झाले.पेइंग सबस्क्रायबर २०००० झाले कंपनीने Rs २० लाभांश झाला. 

अंबुजा सिमेंट चे व्हॉल्यूम १७.३ % ने वाढले. रिअलायझेशन कमी झाले. पॉवर आणी फ्युएल कॉस्ट  कमी झाल्या पण बाकीचे खर्च वाढले.मार्जिन १६.७% राहिले. व्हॉल्यूम ८.१ MT वरून ९.५ MT झाले. 

सोना BLW चे  प्रॉफीट उत्पन्न वाढले बॅट्री EV मधील रेव्हेन्यू ३२% वाढला Rs २२६०० कोटींचे ऑर्डर बुक आहे. 

गोदरेज ग्रुपच्या इस्टेटीची वाटणी झाली. आदी आणी नादिर गोदरेज यांच्या कडे लिस्टेड  कंपन्यांचा व्यवसाय, जमशेद आणी स्मिता यांच्या कडे गोदरेज बॉईस चा व्यवसाय, LAND बँक आणी मुंबईतील मालमत्ता राहील. 

कोटक बँकेचे जॉइंट मँनेजींग डायरेक्टर मणियन  यांनी राजीनामा दिला. श्री मणीयान आता सप्टेंबर २०२४ मध्ये फेडरल बँकेत  जातील. 

हवेल्सचे प्रॉफिट वाढून Rs ४४८.९ कोटी झाले. रेव्हेन्यू १२.१% ने वाढून Rs ५४३४ कोटी झाले. मार्जिन ११.७% राहिले. स्वीच गिअर केबल वायर व्यवसायात प्रगती. 

इंडस TOWER चे प्रॉफीट ३२.५% ने वाढून Rs १८५३ कोटी झाले रेव्हेन्यू ६.५% ने वाढून Rs ७१९३ कोटी झाले. मार्जिन ५७% ( ५१% ) राहिले. 

अडानी टोटल चे प्रॉफीट ७१.५% ने वाढून Rs १६८ कोटी झाले. नैसर्गिक गॅसच्या किमती कमी झाल्याचा फायदा रेव्हेन्यू ४.७% वाढून Rs ११६७ कोटी झाला विक्री २०% ने वाढली. 

RVNL पूर्व रेल्वेच्या आसनसोल डिविजन अंतर्गत सितारामपूर  बायपास लाईन टाकण्यासाठी Rs ३९०.९७ कोटींच्या CONTRACT साठी L 1 बीडर ठरली. 

विप्रोने नोकियाची डिजिटल वर्कप्लेस सर्विसेस ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मल्टी इअर्स मल्टी मिलियन US $ चे कॉनट्रक्ट केले.

एस्कॉर्टस ची एकूण ट्रक्टर विक्री 0.७% ने कमी होऊन ७५१५ युनिट झाली. डोमेस्टिक ट्रक्टर विक्री १.२% ने कमी होऊन ७१६८ युनिट झाली. 

टाटा मोटर्सचे एकूण सेल्स ११% ने वाढून ७७५२१ युनिट झाले. पसेंजर व्हेईकल विक्री २% कमी झाली कमर्शियल व्हेईकल विक्री वाढली EV ची विक्री कमी झाली. 

आयशर मोटर्सची कमर्शियल व्हेईकल ची विक्री कमजोर राहिली. रॉयल एनफिल्डची विक्री १२% ने वाढून ८१८७० युनिट झाली 

TVS मोटर्सचे एकूण  सेल्स  २५% ने वाढून ३.८३ लाख युनिट झाले. EV  सेल्स १६% नेYOY वाढले.

मारुतीची विक्री सलग ३ महिने कमी होत आहे. एप्रिल २०२४ मध्ये विक्री ५% ने कमी झाली. निर्यातीत सुधारणा झाली. पण डोमेस्टिक ग्रोथ १.३ % राहिली. 

कोल इंडिया चे एप्रिल २०२४ मध्ये उत्पादन ७.३% ने वाढून ५७.६ MT वरून ६१.८ MT झाले ऑफ टेक ६२.३ MT वरून ६४.३ MT झाला. 

कमर्शियल LPG ची किमत Rs 19 ने कमी झाल्या. विंडफॉल TAX  Rs ९६०० वरून Rs ८४०० इतका केला. डीझेल आणी ATF दरांमध्ये काही बदल नाही. 

सांघि १६ मे २०२४ रोजी शेअर  स्प्लिट वर विचार करेल तसेच निकाल जाहीर करेल. 

फेडरल बँक, 5 स्टार फायनान्स, जिओजिट,नेटवेबचे तिमाही निकाल चांगले आले.  

LANDMARK ला जयपूर, अलवर,भिवडी, येथे होण्डा कार्स इंडिया च्या डीलरशिप साठी LOI मिळाले. 

फेडरल बँकेचे प्रॉफीट Rs ९०३ कोटींवरून Rs ९०६ कोटी झाले. NII Rs २१९५ कोटी ( Rs १९०९ कोटी ) GNPA २.१३ ( २.२९) NNPA 0.६० (0.६४ ) आणी NIM ३.२१ (३.३६ ) होते. स्लीपेजीस कमी झाली बँकेने Rs १.२० लाभांश जाहीर केला. 

REC च्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांनी आता रिन्युएबल एनर्जीवर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या ५ -६ वर्षांत रिन्युएबल एनर्जीचा व्यवसाय Rs ३ लाख  कोटींपर्यंत वाढवायचे लक्ष्य ठेवले आहे. AUM येत्या ५-६ वर्षांत १० लाख कोटी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या तिमाहीत AUM  १७% वाढून ५.०९ लाख कोटी झाले. कंपनीने सांगितले की पॉवर डीस्ट्रीब्युशन मध्ये मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागेल. थर्मल पॉवर प्लांट मध्ये लोन ग्रोथ होईल. कंपनीने जनरेशन मध्ये Rs ४१७९ कोटी , रिन्युएबल मध्ये Rs ६१६७ कोटी ट्रान्स्मिशन मध्ये Rs १९१६ कोटी आणी डीस्ट्रीब्युशन मध्ये Rs २०९८९ कोटीची  डीस्बर्समेंट केली.

अदानी एन्टरप्रायझेसने Rs १.३० प्रती शेअर लाभांश दिला. प्रॉफीट Rs.७८१ कोटींवरून Rs ४५० कोटी झाले. उत्पन्न Rs २८९४४ कोटींवरून Rs २९१८० कोटी झाले. मार्जिन १२.५ % वरून १०.९% झाले. कंपनीने Rs ६२७ कोटींचा वन टाईम लॉस बुक केला.

स्कीपर LTD चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले , मार्जिन कमी झाले. 

डाबर चा फायदा Rs २९३ कोटींवरून Rs ३४१ कोटी झाला. उत्पन Rs २८१५ कोटी झाले . मार्जिन १६.६% राहिले. कंपनीने Rs २.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीच्या डोमेस्टिक व्हॉल्यूम मध्ये ४.२% वाढ झाली. कंपनीने सांगितले की सर्व सेक्टरमध्ये विशेषतः हेअर ऑईल आणी टूथ पेस्ट सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ झाली. 

साउथ इंडियन बँक चे प्रॉफीट Rs ३३४ कोटींवरून Rs २८८ कोटी झाले. NII Rs ८५७ कोटींवरून Rs ८७५ कोटी झाले. GNPA ४.७४ वरून QOQ ४.५० झाले तर NNPA १.६१ वरून QOQ १.४६ झाले. 

ऑरोबिंदो फार्माने ‘PURPLE BELLFLOWER’ या साउथ आफ्रिकेतील कंपनी बरोबर करार केला. 

रामकृष्ण फोर्जिंगचे प्रॉफीट वाढले , उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

ब्ल्यू स्टार ने Rs ७ अंतरिम लाभांश जाहीर केला. प्रॉफीट Rs २२५ कोटींवरून Rs १७० कोटी झाले उत्पन्न Rs २६२४ कोटींवरून Rs ३३२८ कोटी झाले. 

अदानी पोर्टचे प्रॉफिट Rs ११३९ कोटींवरून ७७% ने वाढून Rs २०१५ कोटी झाले. कंपनीने Rs ६  प्रती शेअर लाभांश जाहीर केला. रेव्हेन्यू 19% ने वाढून Rs ५७९७ कोटींवरून Rs ६८९६ कोटी झाले. मार्जिन ५६ ४ वरून वाढून ५८.६   झाले.    

मिडकॅप, PSE, एनर्जी , ऑटो, मेटल्स, ऑईल &GAS,फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली. बँकिंग, रिअल्टी, IT क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४६११ NSE निर्देशांक निफ्टी २२६४८ बँक निफ्टी ४९२३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.