आजचं मार्केट – ३ मे २०२४

आज क्रूड US $ ८३.९० प्रती barel च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.30 च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.१६ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५९ आणी VIX १५.0४  होते. सोने Rs ७०७०० आणी चांदी Rs ८०२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.

आज चीन आणी जपानचे बाजार बंद होते.  

APLE ने ओळीने 6 वेळा BUYBACK केला. शेअर ८% ने वाढला. QUALCOM चे निकाल चांगले आले  CARAVANA चे निकालही चांगले आले. ३७७ कंपन्यांपैकी ७७ कंपन्यांनी सुंदर निकाल जाहीर केले. 

FII ने Rs ९६५ कोटींची विक्री तर DII ने Rs १३५२ कोटींची खरेदी केली. 

जागतिक घटनांचा  आणी संकेतांचा भारतातील मार्केटवर  फारसा परिणाम दिसत नाही. FII ची विक्री चालू  आहे पण DII च्या खरेदीमुळे परिणाम जाणवत नाही. SIP चा ओघ चालूच आहे

FII ने ITC मधील स्टेक कमी केला. .  

कमिन्सने त्यांचा फ्युचर गायडंस 0 ते ५% वरून -५% ते ५% केला. त्यामुळे शेअरमध्ये काही काळ विक्री झाली.

M & M ला FY २४ मध्ये ६७४ पेटंट मिळाली. 

नॉर्थ अमेरिकेमधील क्लास 8 ट्रकची मागणी सतत ५ महिने कमी झाली. या महिन्यात 18 % घट झाली. याचा परिणाम रामकृष्ण फोर्जिंग वर होईल. 

बजाज ऑटोने PULSAR NS ४०० बाईक launch केली. बजाज ऑटो 18 जून २०२४ रोजी पहिली LNG मोटारसायकल launch करणार. 

राणे ब्रेक्स चे प्रॉफीट,उत्पन्न, मार्जिन वाढले. 

वोल्तेम्प ट्रान्सफॉर्मर्सचे प्रॉफीट २२.९ % ने वाढून Rs ९३.५ कोटी झाले. रेव्हेन्यू १४.६ % वाढून Rs ५०४.२० कोटी झाला. मार्जिन २०% वरून २१.१% झाले. ऑर्डर बुक ३७% ने वाढून Rs १८५९ कोटी झाले. बडोद्याच्या जारोड खेड्यात नवीन ट्रान्सफॉर्मर उत्पादन करणार्या युनिटसाठी योग्य जमीन पाहिली आहे. 

KEI इंडस्ट्रीज चे प्रॉफीट  १९ .९ % ने वाढून Rs २४४.५० कोटी झाले. रेव्हेन्यू 18.6% ने वाढून Rs २३१९.२० कोटी झाला. मार्जिन १०.४३% वरून १०.५४% झाले. डोमेस्टिक विक्री १३.३% ने वाढून Rs ८९६ कोटी निर्यात १२.१% ने वाढली तर EPC प्रोजेक्ट चा रेव्हेन्यू ५२.५% ने वाढून Rs ३४०.४० कोटी झाला. पेंडिंग ऑर्डर बुक Rs ३५३१ कोटी  होते. 

सीएट चे प्रॉफीट २२.७% ने कमी होऊन Rs १०२.३० कोटी तर रेव्हेन्यू ४.१% ने वाढून Rs २९९२ कोटी झाला. मार्जिन १२.८% वरून १३.१ % झाले. कंपनीने Rs १०० कोटी कर्ज कमी केले. 

अजंता फार्मा टेंडर ऑफर रूटने १०.२८ लाख शेअर्स Rs २७७० प्रती शेअर या दराने BUYBACK करणार. ३० मे २०२४ ही रेकॉर्ड डेट  निश्चित केली आहे. प्रॉफीट ६५.७% ने वाढून Rs २०२.७० कोटी झाले. 

कोफोर्जने  CIGNITI TECH मध्ये ५४% स्टेक घेतला.Rs 19 प्रती शेअर लाभांश जाहीर केला. फायदा आणी मार्जिन कमी झाले उत्पन्न वाढले. 

JBM ऑटो प्रॉफीट वाढले रेव्हेन्यू वाढला.मार्जिन वाढले कंपनीने Rs १.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ICCL ( इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड )  चे प्रॉफीट Rs १० कोटींवरून Rs ५० कोटी झाला. 

OMAx ऑटो सुंदर निकाल. 

CIE चे निकाल कमजोर, 

रेलटेलचे  प्रॉफिट,रेव्हेन्यू , वाढले मार्जिन कमी झाले

ब्ल्यू डार्ट चे प्रॉफीट  वाढले रेव्हेन्यू आणी मार्जिन वाढले. 

हिंदुस्थान झिंक ७ मे २०२४ रोजी लाभांशावर विचार करेल. 

बजाज फायनान्स ECOM आणी डिजिटल INSTALMENT, EMI कार्डवरील निर्बंध RBI ने WITH  IMMEDIATE EFFECT काढून टाकले . आता EMI कार्डाद्वारे कंपनी कर्ज देऊ शकेल. 

CARLYL येस बँकेमधील २% स्टेक Rs १५०० कोटींना विकणार. CARLYL चा येस बँकेत ८.७४ % स्टेक आहे. 

कोल इंडिया चे प्रॉफीट २५.८% ने वाढून Rs ८६४०.५० कोटी रेव्हेन्यू १.९% ने कमी होऊन Rs ३७४१० कोटी झाला. मार्जिन ५८० बेसिस पाईंट वाढून २४.५% वरून ३०.३% झाले. 

MOIL चे उत्पादन २२% ने वाढून १.६  लाख टन  आणी विक्री १७% ने वाढून १.१५ लाख टन  झाली.

फर्स्ट सोर्स चे प्रॉफीट रेव्हेन्यू आणी मार्जिन वाढले. 

GO  FASHION चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

MRF ने Rs १९४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

गोदरेज प्रॉपर्टीज चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने बुकिंग Rs २७००० कोटींपर्यंत आणी कॅश कलेक्शन Rs १५००० कोटी पर्यंत होईल तर कंपनीने डिलिव्हरी गायडंस १.५० कोटी SQFEETचा  दिला. 

अदानी ग्रीन चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले. 

फर्स्ट सोर्स ने ‘QUINTESSENCE’ चे अधिग्रहण केले. 

रेमंडचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs १० लाभांश दिला. कंपनीला त्यांची ENGG डिविजन वेगळी करण्यासाठी तसेच एअरोस्पेस आणी डिफेन्स साठी वेगळे युनिट बनवण्यासाठी मंजुरी मिळाली. 

JSW इंफ्राचे प्रॉफीट  उत्पन्न मार्जिन वाढले. कार्गो व्हॉल्यूम ९% ने वाढले.

आज IT,ऑटो,बँकिंग, मिडकॅप, समा;स्मालकॅपमध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. फार्मा आणी PSE मध्ये खरेदी झाली.  

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३८७८ NSE निर्देशांक निफ्टी २२४७५  बँक निफ्टी ४८९२३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.