आजचं मार्केट – ६ मे २०२४

.आज क्रूड US $ ८३.४० प्रती barel तर रुपया US $ १= Rs ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५० आणी VIX १६.८० होते. सोने Rs ७०९०० आणी चांदी Rs ८१९०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये मंदी होती. PCR 0.८९ होता.

भारतातील मार्केट  शुक्रवारी CRASH झाले त्याची अनेक कारणे सांगितली जातात. लोकसभा निवडणूकीतील अनिश्चितता, अर्निंग सिझन, मार्जिन ट्रेडिंग इत्यादी. सर्व असेट क्लासेस ला युनिफॉर्म  ट्रीटमेंट आयकर कायद्यांतर्गत असली पाहिजे असा विचार /प्रस्ताव सरकारचा कर विभाग करत आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारची TAX संरचना आहे.  सध्या मुदतीच्या ठेवीवरील व्याज पूर्णपणे करपात्र आहे तर इक्विटी साठी लॉंग टर्म गेन्स वर १०% कर आकारला जातो. पेनल्टीसंबंधीत  नियम बदलले जाऊ शकतात. TAX बेसमध्ये  इरोजन होऊ नये म्हणून सरकार उपाययोजना करेल. 

USA  मध्ये जॉब  नंबर अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे १७५००० आले. अनएम्प्लॉयमेंट ३.९% राहिली. सर्विसेस PMI ४९.४% आला. 

चीनचा सर्विस  PMI ५२.७ वरून ५२.५ तर कॉम्पोझिट PMI ५२.७ वरून ५२.८ झाला.

RBI ने बँकांनी तसेच इतर कर्जदारानी दिलेल्या अंडर कन्स्ट्रकशन प्रोजेक्ट साठी दिलेल्या कर्जांसाठी करायच्या प्रोविजन विषयी ड्राफ्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करून त्याविषयी संबंधितांची  मते १५ जून २०२४ पर्यंत मागवली आहेत.जर बँकेने किंवा इतर फायनान्शीयल  इन्स्टिट्यूटने अंडर कन्स्ट्रकशन प्रोजेक्ट साठी कर्ज दिले असेल तर त्यावर ५ %  प्रोविजन करावी लागेल. ही प्रोजेक्ट ऑपरेशनल झाल्यावर ही प्रोविजन २.५% पर्यंत कमी करता येईल. ज्यावेळी ही प्रोजेक्ट कॅश जनरेट करू लागेल तेव्हा तेव्हा ही प्रोविजन १% इतकी कमी करता येईल. 

कर्ज देणाऱ्या संस्थांनी ( पब्लिक PVT सेक्टर बँक्स, PSE उदा REC, PFC, इरेडा इत्यादी ) प्रोजेक्टची प्रगती नीट मॉनिटर करून प्रोजेक्ट मध्ये कोठल्याही स्टेजवर ‘स्ट्रेस’ निर्माण होतो आहे का या कडे लक्ष ठेवावे.जर प्रोजेक्ट ऑपरेटीव्ह व्हायला ३ वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला तर अशा प्रोजेक्ट कर्जाचे वर्गीकरण STANDARD असेट मधून काढून स्ट्रेस्ड असेट असे करावे. जर प्रोजेक्ट Rs १५ बिलियन ( US $ १७९.९२ मिलियन)पेक्षा जास्त रकमेची असेल तर कर्जदारांनी कन्सोर्शियम स्थापन करणे जरुरीचे आहे.प्रत्येक कर्ज देणाऱ्या संस्थेचे कन्सोर्शियम मध्ये  १० % एक्स्पोजर असले पाहिजे. 

INDEGENE या कंपनीचा Rs १८४१.७६ कोटींचा IPO ( फ्रेश इशू Rs ७६० कोटी आणी Rs १०८१.७६ कोटींचा OFS ) ६ मे २०२४ रोजी ओपन होऊन ८ मे २०२४ ला बंद होईल. ह्याचा प्राईस BAND Rs ४३० ते Rs ४५२ असून मिनिमम लॉट ३३ शेअर्स चा आहे. कंपनी खालील चार क्षेत्रात काम करते. 

इंटरप्राईझ कमर्शियल सोल्युशन्स 

ओम्नीचानेल ACTIVATION 

इंटरप्राईझ मेडिकल सोल्युशन्स 

आणी इंटरप्राईझ क्लिनिकल सोल्युशन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस          कंपनीकडे डिसेंबर २०२३ मध्ये ६५ क्लायंट होते. कंपनीच्या प्रॉफीट आणी रेव्हेन्युमध्ये  वाढ झाली आहे. ही कंपनी लाइफसायन्स कंपन्यांना कन्सल्टन्सी आणी इतर सेवा पुरवते. 

FII ने Rs २३९२ कोटींची विक्री तर DII ने Rs ६९१ कोटींची खरेदी केली. 

ईनॉक्स विंड ने त्यांच्या १ शेअरला ३ बोनस शेअर्स साठी 18 मे २०२४ ही रेकोर्ड डेट निश्चित केली. 

IDBI बँकेचे प्रॉफीट ४४% ने वाढून Rs १६२८ कोटी ( Rs ११३३ कोटी), NII १२% ने वाढून Rs ३६८८ कोटी झाले. अडवान्सेस १६% ने वाढून १८८६२१ कोटी तर डीपोझीट ८% ने वाढून Rs २७७६५७ कोटी झाले. CASA रेशियो ५०.४३ (५३%) झाला. NNPA 0.३४% ( 0.९२% ) होते. प्रोविजन कमी होऊन Rs ५४७ कोटी ( Rs १२९२ कोटी ) झाली. 

कोटक महिंद्र बँक टेक्नोलॉजी अपग्रेड करण्यासाठी Rs १७०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कोटक महिंद्र बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले. 

ENIL ( रेडीओ मिर्ची ) चे प्रॉफीट FY २४ साठी ५०.६  कोटी झाली (FY २३ मध्ये Rs २.३ कोटी ) रेव्हेन्यू FY २४ साठी Rs ५०० कोटी झाला. चौथ्या तिमाहीसाठी रेव्हेन्यू ४२.४% ने वाढून १४९.३० कोटी झाला. 

PG इलेक्ट्रोप्लास्ट २२ मे २०२४ रोजी शेअर स्प्लिट आणी लाभांशावर विचार करेल. 

ऑरोबिंदो फार्माच्या राजस्थानमधील भिवडी युनिट II  च्या २५ एप्रिल ते ३ मे तपासणीत USFDA ने  ७ त्रुटी  दाखवल्या. 

MRPL चे चौथ्या तिमाहीसाठी निकाल कमजोर आले. 

CDSL ने Rs 1९  अंतिम आणी Rs ३ स्पेशल लाभांश कंपनीला २५ वर्षे झाली म्हणून जाहीर केला. 

अंबरने RESOJET मधील  ५०% स्टेक Rs ३५ कोटींना घेतला. 

ब्रीटानियाचे प्रॉफीट ३.८% ने  कमी झाले. रेव्हेन्यू १.१% वाढला. व्हॉल्यूम चांगले वाढले. 

M & M फायनान्सचा फायदा ९.५% कमी झाला. NII १५.६ % ने वाढले. 

D मार्ट चे प्रॉफीट २२.४% ने वाढून Rs ५६३.३० कोटी तर रेव्हेन्यू २०.९% ने वाढून १२७२६.६० कोटी झाले. 

TITAN चे  निकाल कमजोर आले मार्जिन कमी झाले. 

कार ट्रेड चे प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन वाढले. मार्जिनमध्ये उल्लेखनीय वाढ झाली.

HCL TECH ने अमेझॉन वेब सर्विसेस बरोबर GenAI ADOPTION साठी पार्टनरशिप  करार केला. 

अरविंद ने Rs ३.७५ प्रती शेअर +Rs १ प्रती शेअर स्पेशल लाभांशाची घोषणा केली. 

इंडियन बँकेचे प्रॉफीट Rs १४४७ कोटींवरून Rs २२४७ कोटी झाले. NII Rs ५५०८.३० कोटींवरून Rs ६०१५.४0 कोटी झाले. GNPA QOQ ४.४७% वरून ३.९५ % झाले तर NNPA QOQ 0.५३ % वरून 0.४३ % झाले. बँकेने Rs १२ प्रती शेअर इंटरिम लाभांश जाहीर केला. 

CG पॉवर चे प्रॉफीट  कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

कॅपलीन पाईंट च्या SOFTGEL कॅप्सूल्स ला कोलंबिया ड्रग्स ऑथोरिटीने मंजुरी दिली. याचे उत्पादन पुडुचेरी युनिटमध्ये केले जाते.

ग्राईंडवेल नॉर्टनचे प्रॉफीट  Rs ९९ कोटींवरून Rs ९२.६० कोटी झाले. उत्पन्न Rs ६६५ कोटींवरून Rs ६९१ कोटी झाले. मार्जिन १९ .४५ % वरून १८ .५०% झाले.कंपनीने Rs १७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

ऑरोबिंदो फार्माच्या २ सबसिडीअरीजचे कंपनीत मर्जर करायला NCLT ने मंजुरी दिली. 

M & M फायनान्शियलचे डीसबरसल ४% ने वाढून Rs ३९३० कोटी झाली तर कलेक्शन एफीशिअन्सी ९२% वरून कमी होऊन ८९% झाली. 

मेरिको चे उत्पन्न Rs २२७८ कोटी प्रॉफीट Rs ३०५ कोटी वरून Rs ३२० कोटी झाले. मार्जिन १७.५ % वरून वाढून १९.४% झाले.

रूट मोबाईलचा फायदा कमी झाला उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

ग्लुकोमा च्या औषधाला USFDA ने मंजुरी दिली. 

गुजरात फ्लुओरो चे फायदा उत्पन्न YOY  कमी झाले मार्जिन  कमी झाले 

GHCL ने Rs १२ अंतिम लाभांश जाहीर केला. प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन, कमी झाले.    

आज IT FMCG रिअल्टी हेंल्थकेअर मध्ये खरेदी झाली. मिडकॅप, स्माल कॅप, OIL &GAS, कन्झ्युमर ड्युरेबल, पॉवर या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३८९५ NSE निर्देशांक निफ्टी २२४४२ आणी बँक निफ्टी ४८८९५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.