आजचं मार्केट – ७ मे २०२४

आज क्रूड US $ 83.50 प्रति बॅरल होता तर रुपया US $ 1 = रु. US $ इंडेक्स 105.18 USA 10 वर्षाचे बाँड उत्पन्न 4.47 आणि VIX 17.00 होते. सोने 71,300 रुपये आणि चांदी 82,8 रुपये होते बेस मेटल चमकदार होते. 

चीन मध्ये एकूण औद्योगिक व्यवसाय वाढल्यामुळे बेस मेटल्स मध्ये तेजी होती. 

FII ने  Rs २१६८ कोटींची विक्री तर DII ने Rs ७८१ कोटींची खरेदी केली. PCR 0.८५ होता. 

रेडिंगटन ने त्यांची तुर्किये मधील सबसिडीअरी IYZI पेमेंट US $ ९.२ कोटींमध्ये पूर्णपणे विकली. 

टाटा  कम्युनिकेशन ने  CLAUDlyte ऑटोमेटेड  एज लॉनच केले. 

ग्लांड फार्माच्या कॅन्सरवरील PLERIXFOL या इंजेक्शन ला USFDA ची मंजुरी मिळाली. 

हिंदुस्थान झिंकने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

सुवेन लाईफसायन्सेस चे उत्पन्न आणी तोटा कमी झाला. 

गुजरात फ्लुओरो चे प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. 

तामिळनाडू मर्कनटाईल बँकेने कर्जावरील व्याजाचे दर १० ते १५ बेसिस पाईंट ने वाढवले. 

मुठूत  मायक्रो फायनान्स चे प्रॉफीट २६.५% ने तर डीसबर्समेंट १८%, AUM ३२% ने आणी NII ४९% ने वाढले.

नवीन फ्लुओरीन चे प्रॉफीट कमी झाले. Rs १३६ कोटींवरून Rs ७० कोटी झाले तर उत्पन्न कमी होऊन Rs ६९७ कोटींवरून Rs ६०२ कोटी झाले. मार्जिन २८.९% वरून कमी होऊन 18.३% राहिले. कंपनीने Rs ७ लाभांश जाहीर केला. 

DR REDDIJ ने Rs 40 लाभांश जाहीर केला. कंपनीला Rs १३०७ कोटी प्रॉफीट झाले. उत्पन्न Rs ७०८३ कोटी तर मार्जिन २६.४% राहिले. कंपनीचे CFO पराग अगरवाल 31 जुलै २०२४ पासून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी MV NARSIHAMAM यांची नेमणूक करण्यात आली.  

DCM श्रीराम चे प्रॉफीट ,उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. 

गुजरात GAS चे प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन वाढले निकाल चांगले आले. 

HPCL आणी BPCL या कंपन्या ८ मे रोजी बोनस शेअर इशू करण्यावर विचार करतील. 

ल्युपिन चे प्रॉफीट उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी, मार्जिन अपेक्षेप्रमाणे आले. त्यांचा USA मधील व्यवसाय अडचणीत आहे. 

हिंदाल्को च्या शिपमेंट जास्त झाल्या पण अल्युमिनियमची  सरासरी किमत कमी झाली. 

गोदरेज कन्झ्युमरचे व्हॉल्यूम चांगले. वन टाईम लॉस बुक केला आहे निकाल चांगले आहेत.

जिंदाल स्टील नेव्हीसाठी DRDO च्या स्मार्ट  सिस्टीम मध्ये स्पेशल आलोय स्टील शीट्स सप्लाय करणार. 

कजारिया सेरामिक्स चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs 6 लाभांश जाहीर केला. 

DLF च्या PRIVANA WEST मध्ये एका आठवड्यात ८०० घरांची Rs ५२०० कोटींना विक्री झाली. 

ब्रिटानिया ने Rs ७३.५० लाभांश जाहीर केला. कंपनीची AGM १२ ऑगस्ट ला होईल. AGM मध्ये ह्या लाभान्शाला मंजुरी मिळाल्यावर रेकार्ड डेट ठरवली जाईल. 

SRF चे प्रॉफीट उत्पन्न कमी झाले मार्जिन 19.५% राहिले.

IRB INFRA चे प्रॉफीट  उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

ग्लांड फार्माच्या EDARVONE इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली. 

एप्रिल २०२४ महिन्यासाठी UK JLR विक्री 19% ने वाढून ४७२२ युनिट वरून ५६२७ युनिट झाली. IDFC चे प्रॉफीट Rs ३३८७ कोटीवरून Rs ३४८ कोटी तर उत्पन्न Rs ५२.6 कोटींवरून Rs ९.७ कोटी झाले. 

ग्राफाईट इंडिया चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs ११ लाभांश जाहीर केला. 

सेंच्युरी टेक्स्टाईलने Rs ५ लाभांश जाहीर केला. प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. 

हिंद मीडिया व्हेंचर्सचा नफा कमी झाला महसूल FLAT राहिला.

आज मिडकॅप, स्मालकॅप, बँकिंग, फार्मा, ऑटो मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. FMCG, IT मध्ये खरेदी झाली. आज मोठ्या प्रमाणावर प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३५१२ NSE निर्देशांक २२३०२ बँक निफ्टी ४८२८५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.