आजचं मार्केट – ८ मे २०२४

आज क्रूड US $ ८३.०० प्रती barel च्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.५० च्या आसपास होता.  US $ निर्देशांक १०५.५४ आणी USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४६ आणी VIX १७.५० च्या आसपास होते. सोने Rs ७१२०० आणी चांदी Rs ८२९०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये  तेजी होती

FII ने Rs ३६६८ कोटींची विक्री तर DII ने Rs २३०४ कोटींची खरेदी केली. PCR 0.७८ होता. 

आज पासून आधार हौसिंग फायनान्स चा Rs ३००० कोटींचा ( Rs १००० कोटींचा फ्रेश इशू आणी Rs २००० कोटींचा OFS) ओपन होऊन १० मे २०२४ रोजी बंद होईल. याचा प्राईस बँड Rs 300 ते Rs ३१५ चा असून मिनिमम लॉट ४७ शेअर्स चा आहे. शेअरची दर्शनी किमत Rs १० आहे.लोअर इन्कम वर्गातील पगारी आणी सेल्फएम्प्लॉइड ग्राहकांवर कंपनीचा फोकस आहे. लोनची सरासरी साईझ Rs १० लाख आहे. कंपनीच्या भारतात ५०० शाखा आहेत. 

TBO टेक चा IPO Rs १५५० कोटींचा ( Rs ११५० कोटींचा OFS आणी Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू ) आज ओपन होऊन १० मे २०२४ रोजी बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ८७५ ते Rs ९२० असून मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे . दर्शनी किमत Rs १ आहे. 

IMF ने भारताच्या ग्रोथचे अनुमान ७.६ % वरून ७.८% वर केले. सरकारचे अनुमान ७.६ % आहे. चीफ इकॉनॉमिक अडवायझरने सांगितले की FY २५ साठी ७% ग्रोथचे सरकारचे अनुमान आहे. 

डिक्सनच्या सबसिडीअरीने नोकिया सोल्युशन्स बरोबर टेलिकॉम प्रोडक्टस् चे उत्पादन आणी डेव्हलपमेंट  करण्यासाठी करार केला.

पिडीलाईट चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले. कंपनीने एक Rs ७१.७ कोटींचा वन टाईम लॉस  बुक केला. 

व्होल्टास चे प्रॉफीट कमी होऊन Rs ११०.६० कोटी झाले. रेव्हेन्यू ४२.१% ने वाढून Rs ४२०२ कोटी झाले तर मार्जिन ७.३८ वरून कमी होऊन ४.५% झाले. युनिटरी कुलिंग प्रोडक्ट  व्यवसाय २७% ने वाढला. AC व्यवसाय ३५% ने वाढले, डोमेस्टिक सेल्स ३८% ने वाढले. आंतरराष्ट्रीय व्यवसायात अडचणी , कतार मध्ये Rs १०८ कोटी लॉस झाला. कंपनीने Rs ५.५ लाभांश जाहीर केला. 

JSW एनर्जीचे  प्रॉफीट  उत्पन्न मार्जिन वाढले.  

IGL  चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न FLAT व्हॉल्यूम ६ % ने वाढून ८.७३ MMSCMD झाले. कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला.

PB फिनटेक चे प्रॉफीट वाढले प्रीमियम वाढला. 

KEC INTERNATIONAL चे प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन वाढले. फायदा दुप्पट झाला. Rs १८१०० कोटींचा ऑर्डर इंफ्लो. मार्जिन कंपनीने दिलेल्या गायडंसपेक्षा कमी आहे. 

RADIKO खेतान ने जैसलमेर इंडियन क्राफ्ट जीन लॉंच केली. 

भारतीय कोस्ट गार्ड आणी  JSPL मध्ये स्वदेशी मरीन ग्रे स्टील सप्लाय करण्यासाठी MOU झाले. 

UBL चे निकाल अपेक्षेप्रमाणे होते. 

बालाजी अमाईन्स ने Rs ११ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. प्रॉफीट ३७.७% वाढून Rs ६८ कोटी उत्पन्न ८% वाढून Rs ४१४ कोटी, मार्जिन २७.५ % राहिल्र.

हिंदाल्को नोव्हेलीस  US $ १.२ बिलीयानचा  IPO आणण्याचा  विचार करत आहे. यासाठी VALUATION US $ 18 बिलियन केले आहे. 

हिरोमोटो चे प्रॉफीट Rs ८५८ कोटींवरून Rs १०१६ कोटी तर उत्पन्न Rs ८३०६ कोटींवरून Rs ९५१९ कोटी झाले. मार्जिन १३% वरून १४.४% झाले. कंपनीने Rs 40 लाभांश जाहीर केला.कंपनीला ब्राझील मध्ये उत्पादन युनिट सुरु करायला मंजुरी मिळाली 

भारत फोर्ज चे प्रॉफीट वाढून  Rs ३८९.६० कोटी तर उत्पन्न वाढून Rs २३२८.५० कोटी मार्जिन २८.३% राहिले. कंपनीने Rs १३.३ कोटीचा वन टाईम लॉस बुक केला. कंपनीने Rs 6.५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

स्टरलाइट टेक्नोलॉजीचा तोटा वाढला ( Rs ५७ कोटींवरून Rs ८२ कोटी ) उत्पन्न कमी होऊन Rs ११२२ कोटी झाले. 

डेल्टा कॉर्प ने ALPHA ALT आणी पेनिन्सुला LAND बरोबर LAND डेव्हलपमेंट PLATFORM लॉनच करण्यासाठी करार केला,. कंपनी मुंबईमध्ये या PLATFORM द्वारा Rs ७६५ कोटींची गुंतवणूक करणार आहे.

पिरामल इंटरप्रायझेस तोट्यातून फायद्यात आली. Rs १९६ कोटींचा तोटाऐवजी  YOY Rs १३७ कोटी  फायदा झाला. कंपनीचे उत्पन्न Rs २१३२ कोटींवरून Rs २४७३ कोटी झाले.कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

टाटा पॉवर चे प्रॉफीट Rs ११५८ कोटींवरून Rs १५३७ कोटी झाले. उत्पन्न Rs १२४५४ कोटींवरून Rs १५८४७ कोटी झाले. मार्जिन १६.३% वरून १४.७ % झाले.   

कॅनरा बँकेचे प्रॉफीट Rs ३७५७.२० कोटी तर NII Rs ९५८० कोटी झाले. GNPA ४.३९% वरून ४.२३% झाले. NNPA १.३२% वरून १.२७% झाले. बँकेने Rs १६.१० लाभांश जाहीर केला. 

HT मेडिया तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले. 

आज कन्झ्युमर गुड्स, OIL & GAS, मेटल्स पॉवर ऑटो मध्ये खरेदी झाली. तर बँकिंग आणी रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३४६६ NSE निर्देशांक निफ्टी २२३०२  बँक निफ्टी ४८०२१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.