आजचं मार्केट – १० मे २०२४

आज क्रूड US $ ८४.४० प्रती barel तर रुपया US $ १= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.१७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४४ आणी VIX १८.९० होते. सोने Rs ७२२०० आणी चांदी Rs ८५३०० होते. बेस मेटल्समध्ये तेजी होती.

FII ने Rs ६९९५ कोटींची विक्री तर DII ने Rs ५६४३ कोटी ची खरेदी केली.  

शाम मेटलीक्सचे स्टेनलेस स्टील उत्पादन, अल्युमिनियम FOIL, कार्बन स्टीलचे उत्पादन वाढले. स्पेशालिटी अलोय, पेलेट यांचे उत्पादन कमी झाले. 

PNC  इन्फ्राटेक ने NHAI बरोबर Rs ३९८.६ कोटी मध्ये सेटलमेंट केली. 

MGL चे प्रॉफीट,उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले. 

IGL चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. 

ब्रिगेडने बंगलोरमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट launch केले. यातून कंपनीला Rs ६६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. 

गोपाल स्नॅक्सचे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. 

सूर्योदय SFB चे NII वाढले, AUM वाढले, NPA कमी झाले, स्लीपेजिस कमी झाली 

VST टीलर्स आणी ट्रॅक्टर चे प्रॉफीट,  उत्पन्न, मार्जिन कमी झाले कंपनीने Rs २० लाभांश जाहीर केला. 

रिलेक्सोचे प्रॉफीट उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. 

BPCL चा फायदा Rs ५४६० कोटींवरून Rs ४२२४ कोटी झाले. उत्पन्न Rs १.१६ लाख कोटी झाले मार्जिन ७.९% राहिले. BPCL ने १:१ बोनस जाहीर केला. कंपनीने Rs २१ लाभांश जाहीर केला. बोनस शेअर्स मिळण्यासाठी २२ जून २०२४ ही रेकोर्ड डेट निश्चित केली. लाभांशासाठी रेकोर्ड डेट नंतर कळवली जाईल.

सोलारा ऍक्टिव्ह फार्मा  राईट्स इशू द्वारा Rs ४४९.९५  कोटी Rs ३७५ प्रती  शेअर या दराने उभारेल 

कंपनी तुमच्या जवळ असलेल्या ३ शेअरमागे १ राईट्स शेअर ऑफर करेल. या राईट्स इशू साठी १५ मे २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. हा राईट्स इशू २८ मे २०२४ ला ओपन होऊन ११ जून २०२४ रोजी बंद होईल. राईट्स शेअर PARTLY पेड  असून पहिला हप्ता जून 2024 मध्ये, दुसरा हप्ता एप्रिल २०२५ मध्ये आणी अंतिम हप्ता एप्रिल २०२६ ला पेमेंट करावा लागेल. 

ABBOT LAB चे प्रॉफीट  २४.१% ने वाढून Rs २८७ कोटी झाले. रेव्हेन्यू ७.१% ने वाढून Rs १४३८ कोटी झाला. मार्जिन वाढून  २२.९% झाले. कंपनीने Rs ४१० लाभांश जाहीर केला. यासाठी 19 जुलै २०२४ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली. 

APE (ANNUAL PREMIUM EQUIVALENT) GROWTH आणी प्रीमियम ग्रोथ खालील कंपन्यांची एप्रिल महिन्यासाठी खालील प्रमाणे राहिली. 

HDFC LIFE               २१%            ४.३% 

ICICI PRU                  ३६%           २८%

MAX LIFE                   ३५%           ४१% 

SBI LIFE                      २१%           २६% 

LIC                               31%          ११३%

POLICAB चे प्रॉफीट Rs ४२५ कोटींवरून Rs ५४६ कोटी झाले. उत्पन्न Rs ४३२४ कोटींवरून Rs ५५९२ कोटी झाला. मार्जिन १३.६% झाले Rs ३० लाभांश जाहीर केला. 

PNB चे GNPA कमी होऊन ५.७३% झाले. NNPA  कमी होऊन 0.७३% झाले. CASA रेशियो ४१% तर NIM ३.१० % राहिले. बँकेने NIM  साठी २.९ ते ३% चा गायडंस दिला.

गो DIGIT  जनरल इन्शुअरन्सचा Rs २६१४.६५ कोटींचा IPO ( Rs ११२५ कोटींचा फ्रेश इशू आणी Rs १४८९.६५ कोटींचा OFS)  १५ मे २०२४ ला ओपन होऊन १७ मे २०२४ रोजी बंद होईल. शेअर्सचे लिस्टिंग २३ मे २०२४ रोजी होण्याची शक्यता आहे. प्राइस बॅंड  Rs २५८ ते Rs २७२ आहे आणी मिनिमम लॉट ५५  शेअर्सचा आहे.कंपनी मोटार इन्शुअरन्, हेल्थ इन्शुरन्स, TRAVEL,PROPERTY , मरीन, आणी इतर प्रोडक्ट्स ऑफर करते. 

हेस्टर बायो ने Rs 6 लाभांश दिला. प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले.

RVNL साउथ इस्ट सेन्ट्रल रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी L १ बीडर ठरली. 

वेंकीजचे प्रॉफीट  वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.प्रॉफीट Rs २५.२ कोटींवरून ३३.५ कोटी झाले. उत्पन्न Rs १०४४.५० वरून कमी होऊन Rs ८९५.९० कोटी झाले. मार्जिन ३.५% वरून ५.६ % झाले. 

HPCL ने सांगितले की २०२४ अखेर बारमेर रिफायनरी सुरु होईल. 

TVS होल्डिंगला  होम क्रेडीट इंडिया फायनान्स मध्ये ८०.७४ % स्टेक Rs ५५४ कोटींमध्ये घेण्यासाठी मंजुरी. 

बजाज हिंदुस्थानचे प्रॉफीट  कमी झाले, उत्पन्न कमी झाले,  

लाल पाथ LAB चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs 6 लाभांश दिला. 

कल्याणी स्टील चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले कंपनीने Rs १० लाभांश जाहीर केला. 

सफायर चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. 

NCL इंडस्ट्रीज चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs २.५० लाभांश जाहीर केले.

GE शिपिंग चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, कंपनीने Rs १०.८० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

सिप्ला चे प्रॉफीट Rs ५२५.६० कोटींवरून Rs ९३९.00 कोटी झाले. उत्पन्न Rs ६१६३ कोटी झाले ( Rs ५७३९ कोटी) मार्जिन २०.५% वरून २१.३% झाले. इतर उत्पन्न Rs 135 कोटींवरून Rs २४५ कोटी झाले. 

NETWEB च्या  हरयाणा प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले. 

फाईन ऑर्गनिक्स चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले , कंपनीने Rs १० फायनल लाभांश जाहीर केला. 

बँक ऑफ बरोडा चे प्रॉफीट Rs ४७७५.३० कोटींवरून Rs ४८८६.५० कोटी झाले. NII Rs ११५२४.८० कोटीनवरून Rs ११७९२ कोटी झाले. NNPA 0.७० % वरून 0.६८ झाले. GNPP ३.०८ वरून २.९२ झाले. अडवान्सेस  QOQ ४% तर १३% YOY झाले NIM ३.१०% वरून ३.२७% झाले. स्लीपेजीस Rs २६१८ कोटींवरून Rs ३२०० कोटी झाले. 

टाटा मोटर्सचे प्रॉफीट २१८.९२ % वाढून Rs ५४०७ कोटींवरून Rs १७४०७ कोटी झाले. उत्पन्न १३.२६ % ने वाढून १.१९ लाख कोटी झाले. कंपनीने Rs 6 फायनल आणी Rs ३ स्पेशल लाभांश  जाहीर केला TAX क्रेडीट Rs ६२१ कोटींवरून Rs ८१५९ कोटी झाले. मार्जिन १४.२% राहिले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२६६४ NSE निर्देशांक निफ्टी २२०५५ आणी बँक निफ्टी ४७४०१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.