आजचं मार्केट – १३ मे २०२४

आज क्रूड US $ ८२.५० प्रती barel च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.३५ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४८ आणी VIX २१.५० च्या आसपास होते. सोने Rs ७२४०० आणी चांदी Rs ८४५०० च्या आसपास होती.बेस मेटल्स तेजीत  होती.

USA चीन मधून येणार्या EV वर आणी त्याच्या पार्टस वर ४०० % ड्युटी लावण्याची शक्यता आहे. 

JK सिमेंटचा उत्पादन खर्च  वाढला. व्हॉल्यूम चांगले नाहीत.

BEML चे प्रॉफीट ९% ने रेव्हेन्यू २०% ने आणी मार्जिन ३.८०% ने वाढले. 

यथार्थ हॉस्पिटलने प्रिस्टीन इन्फोकॉम मध्ये Rs ११६ कोटींना १००% स्टेक खरेदी केला. 

INDEGENE चा शेअर BSE वर Rs ६५९.७० आणी NSE वर Rs ६५५ वर लिस्ट झाला. ज्यांना शेअर्स अलॉट झाले  त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले. 

लाल पाथ LAB च्या स्वस्थफीट  या योजनेचा हिसा विक्रीमध्ये २२% वरून २४% झाला. टेस्ट पर  पेशंट रेशियो  २.९ राहिला टेस्ट व्हॉल्यूम ९% ने वाढून १.९१ कोटी टेस्ट झाला. कंपनीजवळ पुरेशी कॅश असल्यामुळे कंपनी दक्षिण भारतात ऑर्गनिक आणी इनऑर्गनिक ग्रोथच्या संधी शोधत आहे. कंपनीचे रिअलायझेशन  पर पेशंट वाढले. 

थर्मक्स चे प्रॉफीट  २२% ने वाढून Rs १९० कोटी झाले. उत्पन्न २०% ने वाढून Rs २७६४ कोटी झाले.

मार्जिन ८.७% वरून ९.९% झाले. कंपनीने सांगितले की स्टील, अग्रो, शुगर, फ्युएल मध्ये थोडा दबाव राहिला . रेड समुद्रातील संकटामुळे केमिकल बिझिनेस मंदीत होता. 

GM ब्रुअरीज २७ मे रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.

वरूण  बिव्हरेजीस चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले

रॉयल ऑरचीड ने सुरतमध्ये ऑल सूट फाईव्ह स्टार हॉटेल ‘THE WORLD’ या नावाने सुरु केले. . 

 SYRMA चे प्रॉफीट उत्पन्न मार्जिन वाढले. 

ABB इंडियाचे प्रॉफीट  वाढून Rs ४५९.२९ कोटी झाले रेव्हेन्यू २८% ने वाढून Rs ३०८०.६० कोटी झाले. मार्जिन वाढून 18.३% झाले. इलेक्ट्रिफिकेशन, प्रोसेस ऑटोमेशन, डाटा सेन्टर्स, स्माल बिल्डींग्स आणी TIER २ आणी TIER ३ शहरांमध्ये विस्तार यामुळे रेव्हेन्युत वाढ झाली. ऑर्डर इंफ्लो १४.६ ने वाढून  Rs ३६०७ कोटी आणी ऑर्डर बुक Rs ८९३५ कोटी होते. 

पिरामल फार्मा चे प्रॉफीट  वाढून Rs १०१ कोटी, रेव्हेन्यू 18% ने वाढून Rs २५५२.३० कोटी आणी मार्जिन वाढून २०.८% राहिले. 

आरती इंडस्ट्रीज प्रॉफीट  Rs १३२ कोटी रेव्हेन्यू Rs १७७३ कोटी आणी मार्जिन १६% होते.

NYULAND LAB चे प्रॉफीट २०% ने कमी होऊन Rs ६७.६ कोटी, रेव्हेन्यू ५% ने कमी होऊन Rs ३८५ कोटी , मार्जिन कमी होऊन २९% वरून २७.८% झाले. 

नोव्हार्तिस चे प्रॉफीट कमी होऊन Rs १४.६८ कोटी ( Rs २५ कोटी ) रेव्हेन्यू ७% ने कमी होऊन Rs ८१.७ कोटी तर मार्जिन १३.८% (१२%) राहिले. इतर उत्पन्न कमी झाले Rs 6.6 कोटीचा TAX खर्च झाला. 

ITDC चे प्रॉफीट ६८% ने वाढून Rs ३२.४ कोटी, रेव्हेन्यू ३.८% ने कमी होऊन Rs १४७.८० कोटी आणी मार्जिन २२% राहिले ( १३% )

APL अपोलो ट्युब्सचे प्रॉफीट १५.६% ने कमी होऊन Rs १७०.४0 कोटी उत्पन्न ७.६ % ने वाढून Rs ४७६५.७ कोटी मार्जिन ५% (७.३% ) राहिले. विक्री ४% ने वाढली. 

JSW स्टील्स चे उत्पादन 0.४% ने वाढून २१.२ लाख टन झाले. ८८ % क्षमता वापर झाला. 

झायडस लाईफ सायन्सेस च्या 1MG TABLETS ला USFDA ची अंतिम मंजुरी. एलर्जी, डोळ्याचे आजार, श्वाश्वोश्वासाचे आजार, कॅन्सर यावर  हे औषध परिणाम कारक आहे. या औषधाचे उत्पादन  कंपनीच्या बद्दी येथील प्लांटमध्ये  होईल. या औषधाला USA मध्ये US $ १.८ मिलीयनचे  मार्केट आहे.

दिलीप बिल्डकॉन चे निकाल चांगले आले.

युनियन बँकेचे NII १४% ने वाढून Rs ९४३७ कोटी झाले. प्रॉफीट 19% ने वाढून Rs ३३११ कोटी झाले. NIM ३.०९% होते. GNPA ४.८३% वरून ४.७६ झाले. NNPA १.08% वरून १.०३% झाले. बँकेचा CASA रेशियो कमी झाला. स्लीपेजीस २४% ने वाढून Rs ३३२३ कोटी झाले. 

बँक ऑफ इंडियाची डीपॉझीट १०.२% ने वाढून Rs ७.३७ लाख कोटी झाले. एडवान्सेस  १६% ने वाढून Rs ५.६३ लाख कोटी झाले. NII ७% ने वाढून Rs ५९३७ कोटी आणी प्रॉफीट ७% ने वाढून १४३९ कोटी झाले. GNPA ५.३५% वरून कमी होऊन ४.९८ % तर NNPA १.४१% वरून १.२२%, प्रोविजन Rs ५०१.१० कोटींवरून Rs १८२६ कोटी झाली. CASA रेशियो ४३% होता. 

करुर व्यास बँकेने Rs २.40 लाभांश जाहीर केला. बँकेचे प्रॉफीट वाढले NII वाढले. GNPA QOQ १.५८% वरून १.४० झाले. NNPA QOQ 0.४२% वरून 0.४0% झाले.

UPL चे प्रॉफीट  Rs ४०  कोटी झाले. कंपनीचे उत्पन्न Rs १४०७८ कोटी झाले. मार्जिन १३.७% राहिले. कंपनीला Rs १०५ कोटींचा वन टाईम  गेन झाला. तर TAX  खर्च Rs ३११ कोटींवरून Rs ११० कोटी झाला

CE इन्फो चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. Rs ३.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

ZOMATO तोट्यातून फायद्यात आली Rs १७५ कोटी फायदा झाला. उत्पन्न Rs २०५६ कोटींवरून Rs ३५६२ कोटी झाले. कंपनीला इतर उत्पन्न Rs २३५ कोटी झाले. 

ETHOS चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले 

TVS ने २.२ KWH क्षमतेची बॅटरी असलेली i QUB हे नवीन व्हरायंट मार्केटमध्ये आणले. 

कमजोर सुरूवातीनंतर मार्केटमध्ये  खरेदी झाली  

 ट्यूब इन्व्हेस्टमेंट ने Rs १.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. प्रॉफीट कमी झाले. उत्पन्न वाढले. 

INOX इंडिया चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. .

SMC ग्लोबलचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स  ७२७७६   NSE निर्देशांक निफ्टी २२१०४ बँक निफ्टी ४७७५४  वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.