आजचं मार्केट – १४ मे २०२४

आज क्रूड US $ ८३.४० प्रती barel च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.२७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४८ आणी VIX २१.00 च्या आसपास होते.आज VIX हा मार्केटमधील वोलातालीटी दाखवणारा निर्देशांक कमी होत होता. सोने Rs ७२००० तर चांदी Rs ८५४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी कॉपर, अल्युमिनियम, झिंक, लेड मध्ये तेजी होती. 

USA मध्ये GAMESTOP चा  शेअर ७४% ने वाढला. 

चीन सरकार बॉंड द्वारा १.३ त्रीलीयान युआन एवढी रक्कम उभारण्याचा विचार करत आहे. 

FII ने Rs ४४९९ कोटींची विक्री तर DII ने Rs ३५६३ कोटींची खरेदी केली.PCR 0.९१ वरून 0.९६ झाला.

एप्रिल महिन्यासाठी CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ४.८५ वरून ४.८३ झाला तर कोअर  महागाई  ३.३० वरून ३.२० झाली. 

बलरामपुर चीनी, हिंदुस्थान कॉपर, GMR, VI, SAIL, PNB, झी, कॅनरा बँक, पिरामल एन्टरप्रायझेस बॅन मध्ये होते. 

श्रीराम फायनान्स त्यांचा हाउसिंग फायनान्स  बिझिनेस म्हणजे श्रीराम हौसिंग फायनान्स वारबर्ग पिन्कस ला Rs ४६३० कोटींना विकणार आहे. 

कोचीन शिपयार्ड ला हायब्रीड SOV साठी Rs ५०० ते १००० कोटींची ऑर्डर मिळाली. 

TCS ने ह्युमन सेंट्रिक AI सेंटर ऑफ एक्सलंस फ्रान्स मध्ये सुरु केले. 

DLF मध्ये ६१.५% ग्रोथ झाली. प्रॉफीट Rs ९२०.७० कोटी आणी रेव्हेन्यू ४६.६ % वाढून Rs २१३५ कोटी झाले. कंपनीने Rs ५ लाभांश जाहीर केला. 

JSPL चे प्रॉफीट  वाढून Rs ९३३.५ कोटी तर रेव्हेन्यू कमी होऊन Rs १३४८७ कोटी झाले. कंपनीने Rs १५३.५ कोटींचा वन टाईम लॉस बुक केला.   

वेदान्ता १६ मे २०२४ रोजी लाभांश आणी FPO, राईट्स इशू द्वारा फंड रेझिंग वर विचार करेल. 

बॉम्बे बर्मा तोट्यातून फायद्यात आली. 

RBI ने QUANT म्युच्युअल फंडाला RBL बँकेत ९.९८ % स्टेक अग्रीगेट होल्डिंग म्हणून घेण्यासाठी मंजुरी दिली. 

हिंदुस्थान झिंक राजस्थानमधील भुरिया आणी जांगपुरा कांकरिया गारा या गोल्डब्लॉक्स साठी बीडर म्हणून क्वालिफाय झाली. 

स्टरलाइट टेक्नोलॉजी ला UAE ची कंपनी DU टेलिकॉमने STRATEGIK   फायबर पार्टनर म्हणून निवडले आणी त्यांच्या बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप करार केला.

एप्रिल महिन्यासाठी WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) 0.५३% वरून १.२६% झाला. WPI १३ महिन्याच्या कमाल स्तरावर आहे. 

देवयानी INTERNATIONAL नफ्यातून तोट्यात गेली. कंपनीला Rs ७.५ कोटी तोटा झाला . उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ४२.३ कोटींचा वन टाईम लॉस बुक केला. 

झायडस वेलनेस चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले. 

मुक्का प्रोटीनचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. 

ICICI लोम्बार्ड चे प्रीमियम २२% ने तर मार्केटशेअर ६० बेसिस पाईंट ने वाढला 

जनरल  इन्शुरन्स कंपनीचे प्रीमियम ३.९% वाढले आणी मार्केट शेअर २०० बेसिस पाईंट ने कमी झाला.

 MATRI MONEY.com चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

PVR INOX चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले. 

BASF चे प्रॉफीट, उत्पन्न आणी मार्जिन वाढले. 

अपार इंडस्ट्रीज चे प्रॉफीट  वाढले उत्पन्न वाढले. कंपनीने Rs ५१ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

बजाज इलेक्ट्रिकल चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. 

सफारी इंडस्ट्रीज ( इंडिया ) चे प्रॉफीट वाढले उत्पन वाढले. Rs १.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

ज्युबिलंट इंग्रेव्हिया चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन, कमी झाले. कंपनीने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

CHALET हॉटेल्स चे तिमाही निकाल चांगले आले. 

सूर्य रोशनीचे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

आंध्र पेपर ने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केले. कंपनीने Rs १० लाभांश जाहीर केला. 

ऑन मोबाईल ग्लोबल चा तोटा कमी झाला, कंपनीने Rs २.७० लाभांश जाहीर केला. 

शाम मेटालिकचे प्रॉफीट, उत्पन्न कमी झाले. Rs २.७० लाभांश जाहीर केला. 

BLS INTERNATIONAL चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

किर्लोस्कर ब्रदर्स चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

डायनामिक्स केबलचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले.

रेडीको  खेतानचे  प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.  कंपनीने Rs ३ लाभांश जाहीर केला. 

भारती HEXACOM चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले 

THYROCAREचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

भारती एअरटेलने Rs ८ फायनल लाभांश जाहीर केला. कंपनीला Rs २०७२ कोटी प्रॉफीट ( २४४२.00 कोटी ), उत्पन्न ३७५९९.१० कोटी ( ३७८९९.५० कोटी ), ARPU Rs २०९ ( Rs २०८ ) झाला. मार्जिन ५२.१ % ( ५२.९) राहिले. कंपनीच्या इंडिया बिझिनेस मोबाईल रेव्हेन्यू २% ने वाढला. Rs २२०६५.७० कोटी झाला. 

श्री सिमेंटचे प्रॉफीट Rs ५४६.२० कोटींवरून Rs ६६१.८० कोटी झाले. उत्पन्न Rs ४७८५ कोटींवरून Rs ५१०१ कोटी झाले मार्जिन 18.७% वरून २६% झाले. 

सिमेन्सचे प्रॉफीट Rs ४७१.40 कोटींवरून Rs ८०२.५० कोटी झाले. उत्पन्न Rs ४८५७.८० कोटींवरून Rs ५७४९.00 कोटी झाले. मार्जिन १२.८० वरून १५.३% झाले. कंपनीला त्यांचा एनर्जी बिझिनेस वेगळा करण्यासाठी मंजुरी मिळाली.

M & M ची सबसिडीअरी  महिंद्र होल्डिंग न्यू दिल्ली सेंटर फोर साईट मधील ३०.८३ % स्टेक Rs ४२५ कोटींना विकणार.   

मिडकॅप,स्माल कॅप, मेटल्स, PSU बँक्स, रेल्वे, डिफेन्स, ऑटो, OIL & GAS, रिअल्टी, एनर्जी कन्झ्युमर गुड्स मध्ये खरेदी झाली. FMCG आणी फार्मा मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३१०४ NSE निर्देशांक निफ्टी २२२१७ बँक निफ्टी ४७८५९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.