आजचं मार्केट – १५ मे २०२४

आज क्रूड US $८२.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.९८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४४ आणी VIX २० च्या आसपास होते. सोने Rs ७२२०० च्या आसपास तर चांदी Rs ८५३०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती. 

EV कॉम्पुटर चिप्स, मिनरल्स सारख्या कमोडिटी संबंधात USA आणी चीन यांच्यात ताणतणाव सुरु झाला. USA ने चीन मधून USA मध्ये आयात होणाऱ्या  वस्तूंवर १००% कर लावला. USA मध्ये महागाई कमी झाली आहे पण महागाई कमी होण्याचा वेग कमी आहे. ली ऑटो या चीनी कंपनीचा  शेअर पडला

तर टेसला चा शेअर वाढला.PPI (प्रोड्युसर्स प्राईस  इंडेक्स) 0.५ % ने मंथ ऑन मंथ वाढला.

MSCI ग्लोबल इंडेक्स मध्ये खालील शेअर्सचा  समावेश होण्याची शक्यता आहे आणी त्यामुळे या शेअर्समध्ये कंसांत दाखवल्याप्रमाणे कोटी US $ चा  इंफ्लो येण्याची शक्यता आहे.

सोलर इंडस्ट्रीज ( १७ ) NHPC (१७) BOSCH (१६.४) जिंदाल स्टेनलेस (१६.२) इंडस टोवर (२२.४) पॉलिसी बझार (२२.३) फिनिक्स मिल्स (२१.३) सुंदरम  फायनान्स (२०.७%) . 

तसेच खालील शेअर्स MSCI इंडेक्स मधून बाहेर पडतील आणी त्यांच्या कोटी US $ चा आउटफ्लो कंसांत दाखवल्याप्रमाणे होईल. बर्जर पेंट्स ( ११.१ ), IGL (१०.५ ) Paytm (6.७) 

१ जून २०२४ रोजी हे बदल केले जातील .

अपोलो टायर्स चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले कंपनीने Rs 6 प्रती शेअर लाभांश जाहीर केला.    

FII ने Rs ४०६६ कोटींची विक्री तर DII ने Rs ३५२८ कोटींची खरेदी केली. 

सिप्ला मध्ये प्रमोटर कुटुंब  आणी ओसाका फार्मा २.५३% स्टेक Rs १२८९.५० ते Rs  १३५७.५० या दरम्यान ब्लॉक दिल द्वारा विकला हे डील  यशस्वी झाले. 

कोलगेट चे नेट  प्रॉफीट २०% ने वाढून Rs ३७९ कोटी झाले.मार्जिन ३५.७% राहिले. कंपनीने Rs २६ अंतिम आणी Rs १० स्पेशल लाभांश जाहीर केला. लाभांशासाठी २३ मे २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. ७ जून २०२४ किंवा त्यानंतर लाभांश दिला जाईल. 

प्रीकोल, PSP  प्रोजेक्ट्स, आवास फायनान्स, टिप्स इंडस्ट्रीज, डीक्सन टेक या कंपन्यांत FII ने गुंतवणूक वाढवली. 

भारताला चाबहार पोर्ट ( इराणमध्ये) च्या व्यवस्थापनासाठी १० वर्षासाठी मिळाले. १० वर्षानंतर याची मुदत वाढू शकते. 

ओरीओन प्रो ने १:१ बोनस जाहीर केला.  

रेव्हेन्यू १०.३५% ने वाढून Rs १४८० कोटी झाले. विक्री १०.३५% ने वाढून Rs १४८० कोटी झाले. 

असाही इंडिया ने Rs २ लाभांश जाहीर केला. कंपनीचे प्रॉफीट वाढले उत्पन वाढले. 

SEBI ने LIC ला MPS (मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग नॉर्म्स) नियमातून ३ वर्षांसाठी सुट दिली.

आधार हौसिंग फायनान्स चे BSE वर Rs ३१४.३० आणी NSE वर Rs ३१५ वर लिस्टिंग झाले. 

TBOK चे BSE वर Rs १३८० तर NSE वर Rs १४२६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर ज्यांना अलॉट झाले त्याना चांगले लिस्टिंग गेन्स झाले. 

कोल इंडिया ने चिलीमध्ये लिथीयम या क्रिटीकल मिनरल्स साठी प्रयत्न सुरु केले. कंपनी काँगो आणी झाम्बिया मध्ये क्रिटीकल मिनरल्स संबंधांत डेलिगेशन जून २०२४ मध्ये पाठवणार आहे. 

ऑस्ट्रेलिया मधील लिथीयम माईन्स मध्ये NMDC ला स्वारस्य आहे.

OIL INDIA २० मे २०२४ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल. 

नीरलॉन चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. 

PFC चे प्रॉफीट Rs ३४९२ कोटींवरून YOY १८.४% ने वाढून Rs ४१३५ कोटी झाले. उत्पन्न Rs १०१८५ कोटींवरून YOY २०.२%  ने वाढून Rs १२२४४ कोटी झाले. GNPA QOQ ३.५२% वरून ३.३४% झाले NNPA QOQ 0.९०% वरून 0.८५% झाले. कंपनीने Rs २.५० अंतिम लाभांश जाहीर केला. संदीपकुमार यांची नवीन CFO म्हणून नियुक्ती झाली. 

पारादीप फॉस्फेट चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले. 

ग्रनुअल्सचे प्रॉफीट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १.५० लाभांश जाहीर केला. 

IIFL फायनान्स चा राईट्स इशू पूर्णपणे सबस्क्राईब झाला. 

SBI ने निवडक मुदतीच्या टर्म डीपॉझीटवरील व्याजाचे dr 0.२५% ते 0.७५% एवढे वाढवले. 

ज्योती LAB चे प्रॉफीट वाढले उत्पन्न  वाढले कंपनीने Rs ३.५० लाभांश जाहीर केला. 

KEYSTONE रिअल्टीचे प्रॉफीट कमी झाले. उत्पन्न वाढले निकाल कमजोर आले.

मुकुंद चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न कमी झाले. कंपनीने Rs २ लाभांश जाहीर केला. 

नेक्टर लाईफ सायन्सेसचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले. 

स्पेशालिटी रेस्टोरेंटचे उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले 

पतंजली फूड चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले. 

डिक्सन TECH चे प्रॉफीट Rs ८१ कोटींवरून Rs 98.5 कोटी झाले. उत्पन्न Rs ३०६५ कोटींवरून Rs ४६५८ कोटी झाले. मार्जिन ५.१% वरून ४% राहिले. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. 

TCI चे प्रॉफीट Rs ८१.५ कोटींवरून Rs १०२ कोटी झाले. उत्पन्न Rs ९७९ कोटींवरून Rs १०७९ कोटी झाले. कंपनीने Rs २ लाभांश जाहीर केला. मार्जिन १0.८% राहिले. 

बर्जर पेंट्स चे प्रॉफीट Rs १८६ कोटींवरून Rs २२३ कोटी झाले. उत्पन्न Rs २४४४ कोटींवरून Rs २५२० कोटी झाले. मार्जिन १५.१ % वरून १४% राहिले. 

आज मिडकॅप, स्माल कॅप, कन्झ्युमर गुड्स, पॉवर, मेटल्स, IT, OIL & GAS, क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी झाली तर बँकिंग, FMCG, ऑटो क्षेत्रातील  शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७२९८७ NSE निर्देशांक निफ्टी २२२०० बँक निफ्टी ४७६८७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.