आजचं मार्केट – १८ मे २०२४

आज क्रूड US $ ८४.०० प्रती बॅरलच्या आसपास  तर रुपया US $१= Rs ८३.३४ होता. USA $ निर्देशांक १०४.४५, USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४२ आणी VIX २०.२० होते. कमोडीटी मार्केट बंद होती. 

USA मार्केट मध्ये DOW JONES हा निर्देशांक  ४०००० च्या वर बंद झाला  GAMESTOP चा शेअर २०% पडला तर REDDIT चा शेअर १०% ने वाढला.

FII ने Rs १६१६ कोटींची आणी DII ने Rs १५५६ कोटींची खरेदी केली. 

सिग्नेचर ग्लोबलने  गुरूग्राम हरयाणा मध्ये १४.६५ एकर जमीन खरेदी करण्यासाठी करार केला. 

DR रेड्डीज च्या दुआदा युनिटचे USFDA ने इन्स्पेक्शन करून २ त्रुटी दाखवल्या आणी फॉर्म नंबर ४८३ इशू केला. 

UPLचा राइटस इशू येण्याची शक्यता आहे. साधारण Rs ४२०० कोटींचा किंवा US $ ५० कोटीचा असू शकतो. DRHP फाईल करावे लागेल. ९० ते १३५ दिवस लागतील. 

ट्रेन्टचा (Rs ३६५५ कोटींचा इंफ्लो)  आणी BEL ( Rs ३०६० कोटींचा इंफ्लो )  समावेश निफ्टी मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअर्समध्ये पॅसिव्ह फंडाचा  इंफ्लो होईल.

LTIMINDTREE आणी DIVIS LAB बाहेर पडतील. या शेअर्समध्ये Rs १७६० कोटींचा आउट फ्लो होईल. 

फायझर चे प्रॉफीट वाढले उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले. 

भारत बिजली प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. 

ASTRAL चे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी झाले.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे  चौथ्या तीमाहिचे  निकाल चांगले आले.

झी इंटरप्रायझेसचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs १ लाभांश दिला. 

DELHIVERY चा तोटा कमी झाला निकालांत सुधारणा दिसली. 

गोदरेज इंडस्ट्रीजचे निकाल कमजोर आले. 

NHPC चे निकाल कमजोर आले. 

DB केमिकल्स चे निकाल चांगले आले. 

शोभा चे निकाल कमजोर आले. 

किर्लोस्कर फेरस चे निकाल कमजोर आले.

नेस्लेच्या पेरेंट  कंपनीला देण्यात येणाऱ्या ४.५%  ROYALTY मध्ये ५ वर्षांत 0.७५% वाढवून ५.२५%  करायला  शेअर होल्डर्सनी मंजुरी दिली नाही. 

सुदर्शन केमिकल्सचे निकाल चांगले आले. 

बँक ऑफ बरोडाने CCIL, IFSC बरोबर करार केला.

LEMON TREE हॉटेल्स ने गुजराथ येथील सोमनाथमध्ये हॉटेल उघडले.   

VELIJAN  DENISON ने १:१ बोनस जाहीर केला. यासाठी २५ मे २०२४ रोजी रेकॉर्ड डेट निश्चीत केली. २३ मे २०२४ रोजी निकाल आणी लाभांशावर विचार करेल. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ७४००५ NSE निर्देशांक निफ्टी २२५०२ आणी बँक निफ्टी ४८१९९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.