Monthly Archives: June 2024

आजचं मार्केट – २८ जून २०२४

आज क्रूड US $ ८७.१० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १ =Rs ८३.४० च्या आसपास होते.
USA $ निर्देशांक १०५.७७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३१ आणी VIX १४.२० च्या आसपास होते. सोने Rs ७१४०० आणी चांदी Rs ८७१०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मध्ये म्हणजे कॉपर आणी लेड मध्ये तेजी होती.तर अल्युमिनियम आणि झिंक मध्ये मंदी होती.
मिड्ल इस्ट मधील जिओ पॉलिटिकल संकटामुळे क्रूडच्या दरांत वाढ होत आहे. ओपेक+ आणी सौदी अरेबियाची क्रूडचा दर US $ ९० च्या आसपास असावा अशी इच्छा आहे.
USA मध्ये जॉबलेस क्लेम २.३३ लाख आले . NYKEE ने अनुमान कमी केले.
JP मॉर्गन ग्लोबल बॉंड इंडेक्स मध्ये भारताचा समावेश होण्याची शक्यता आहे.
FII ने Rs ७६५९ कोटींची खरेदी तर DII ने Rs ३६०६ कोटींची विक्री केली.
SAMHI हॉटेल्स मधील ३% स्टेक GTL कॅपिटल Rs १८७.०७ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने Rs १२० कोटींना विकणार आहे.
HCL TECH मधील 0.४६% स्टेक म्हणजे १.२४ कोटी शेअर्स Rs १४१४.९० प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने Rs १७५६.५० कोटींना विकणार आहे.
JSW इन्फ्रा नवकार कॉर्पोरेशन मधील ७०.३७% स्टेक घेणार आहे.
RBL बॅंक Rs ३५०० कोटी उभारेल तर AU स्माल फायनान्स बॅंक Rs ५००० कोटी QIP द्वारा उभारेल.
युनिकेम LAB ला युरोपीयन कोर्टाने पेटंट डिस्प्युट सेटलमेंट संदर्भात कंपनीच्या विरुद्ध निकाल दिला. अंबुजा सिमेंटमध्ये
अदानी सिमेंटेशनच्या मर्जरला मंजुरी मिळाली याचा स्वाप रेशीयो १ अंबुजा सिमेंटच्या शेअरला १७४ अदानी सिमेंटेशनचे शेअर्स असा आहे.
भारत सरकारने सुरक्षा उपकरणांच्या आयातीवरील सूट २०२९ पर्यंत वाढवली.
ल्युपिंनला युरोपीयन कोर्टाने लावलेला युरो ४ कोटींचा दंड माफ करण्यात आला.
VI मध्ये ३.04 कोटी शेअर्सचे Rs ६२ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
पॉलीकॅब मध्ये ३८.०२ लाख शेअर्सचे Rs २५५० कोटींचे लार्ज डील झाले.
अदानी पोर्टमध्ये ७१.३५ लाख शेअर्सचे Rs १०४८ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
भारती एअरटेलने त्यांच्या TARIF मध्ये २०% दरवाढ ३ जुलै २०२४ पासून केली. कंपनीने Rs 300 अर्पुज चे लक्ष्य ठेवले आहे. भारती HEXACOM ने सर्कल दरांमध्येही वाढ केली .
रिलायंस जिओ ने TARIF मध्ये १२%-२५% एवढी वाढ केली.
सेबी ने लिक्विडीटी आणी व्हॉल्यूम यांच्यावर आधारीत F & O सेगमेंटसाठी एन्ट्री आणी एक्झिटसाठी नवीन नियम मंजूर केले.
IPKA LAB ला युरोपियन कोर्टाने Rs १२५ कोटींचा दंड लावला.
STANLEY लाइफस्टाइल चा शेअर IPO मध्ये Rs ३६९ ला दीला आहे. BSE वर Rs ४९९ आणी NSE Rs ४९४.९५ लिस्ट झाला.
CDSL २ जुलैला बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.
JNK ला Rs ३५० कोटी ते Rs ५०० कोटींची ऑर्डर रिलायंस कडून मिळाली.
मिल्क फुड या कंपनीने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट , १:१ बोनस शेअर आणी Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
इरेडा आणी हुडको यांना अंदाजपत्रकात इन्कमटॅक्स च्या सेक्शन ५४ अंतर्गत आणण्याची शक्यता असल्यामुळे यांच्या बॉंड खरेदीवर आयकरामध्ये सुट मिळण्याची शक्यता आहे.
भेलला झारखंड मध्ये थर्मल प्रोजेक्टसाठी Rs १३३०० कोटींची ऑर्डर मिळाली.
GMR ला NHAI कडून हैदराबाद विजयवाडा एक्स्प्रेस ची १३८७ कोटींची ऑर्डर मिळाली. पहिल्या टप्प्यांत Rs ८५० कोटी आणी दुसर्या टप्प्यात Rs ५३७ कोटी मिळतील.
ब्रिगेड एन्टरप्रायझेसने येलहांका बंगलोरमध्ये ‘ब्रिगेड इन्सिग्निया’ ही प्रीमियम रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट launch केली. यातून ब्रिगेडला Rs ११००कोटीन्चे उत्पन्न अपेक्षित आहे.
कृष्णा मेडिकल ने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केले.
कोची शिपयार्डची सबसिडीअरी UCSL ने नॉर्वेची कंपनी ‘WILSON ASA’ बरोबर ६३०० TDW ड्राय कार्गो वेस्सलच्या डिझाईन आणी उभारणी साठी करार केला.
BEL ला Rs ३१७२ कोटींची ऑर्डर मिळाली.
सरकार IRFC, NFL, RCF, माझगाव डॉक्स मधील १०% स्टेक OFS च्या माध्यमातून विकण्याची शक्यता आहे.
नझारा टेक्नोलॉजी च्या सबसिडीअरीने ‘FREAKS 4 U’ मधील उरलेला ८६.४९% स्टेक Rs २७१.४८ कोटींना शेअर SWAP द्वारा घेणार आहे.
आलेम्बिक फार्माच्या DOXYCYCLINE साठी ४०mg कॅप्सूल्स साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
रिलायंस ची मार्केट कॅप आज Rs २१ लाख कोटी झाली.
क्रॉम्पटन ने लेड बॅटन लाईटचे नवीन व्हरायंट launch केले.
HDFC लाईफ ला आयकरखात्याकडून AY २०२१-२०२२ साठी Rs १४९५ कोटींची TAX डिमांड नोटीस मिळाली.
NHPC ने 200 MW सोलर पॉवर प्रोजेक्ट साठी GUNVL बरोबर Rs ८४७ कोटींचे पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
हेल्थ केअर ग्लोबलने VIZAG HOSPITAL मध्ये ५१% स्टेक घेतला.
मिडकॅप, स्माल कॅप,रिअल्टी PSE, मेटल्स मध्ये खरेदी झाली. तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९०३२ NSE निर्देशांक निफ्टी २४०१० आणी बॅंक निफ्टी ५२३४२ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २७ जून २०२४

.आज क्रूड US $ ८५.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०६.०७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३४ आणी VIX १४.४७ च्या आसपास होते. सोने Rs ७१००० आणी चांदी Rs ८६६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स झिंक आणी अल्युमिनियम FLAT तर लेड आणी कॉपरमध्ये तेजी होती.

USA मध्ये नवीन घरांचा डेटा ११.३% ने कमी आला. FEDEX चा शेअर १६% ने वाढला. जापनीज येन घसरला.
FII ने Rs ३५३५ कोटींची विक्री तर DII ने Rs ५१०४ कोटींची खरेदी केली.
GENISYS इंटरनॅशनलने ऑटो आणी मोबिलिटी सोल्युशांसाठी MMG बरोबर करार केला.
CSB बँकेच्या १.६८ कोटी शेअर्सचा Rs ३५२.७५ प्रती शेअर या भावाने Rs ५९५ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
माझगाव डॉक्स मध्ये ९.०५ लाख शेअर्सचे Rs ३९७ कोटींना लार्ज ट्रेड झाले.
भारती एअरटेलने ९७ Mhz Rs ६८५७ कोटींना, भारती हेक्सावेअर ने १५ Mhz Rs १०० कोटींना आणी रिलायंस जिओने १४.४ Mhz Rs ९७३ कोटींना असे स्पेक्ट्रम खरेदी केले.
अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंटच्या अक्विझिशन साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मंजुरी Rs २६७ प्रती शेअर भावाने २३% इक्विटी म्हणजे ७.०६ कोटी शेअर्स घेण्यासाठी मंजुरी दिली. हा सौदा Rs १८८० कोटी कॅश मध्ये झाला.
इंडिया सिमेंट ऑगस्ट सिरीज नंतर F &O सेगमेंटच्या बाहेर जाईल.
JSW एनर्जीने १३२५ MW साठी विंड आणी सोलर प्रोजेक्टच्या संदर्भात पॉवर परचेस अग्रीमेंट केले.
RVNLला दक्षिण रेल्वेकडून १५६.४७ कोटींच्या प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
सुप्रीम इंडस्ट्रीजला Rs ५० कोटींचे 10 KG कॉम्पोझिट सिलेंडर सप्लाय करण्यासाठी IOC कडून LOA मिळाले.
KEC इंटरनॅशनलला त्यांच्या T & D आणी केबल बिझिनेस साठी Rs १०२५ कोटींच्या नव्या ऑर्डर मिळाल्या.
ITD सीमेंटेशन ला Rs १०८२ कोटींचे नवे मरीन CONTRACT मिळाले.
रामकी इन्फ्रा ला Rs १३१.२० कोटींचे प्रोजेक्ट पॉवरग्रीड कडून मिळाले.
SJVN ने ‘AM अमोनिया PVT LTD’ बरोबर ग्रीन अमोनिया प्लांटला रिन्युएबल एनर्जी गरजेनुसार दीर्घ मुदतीसाठी पुरवण्याचा करार केला.
INOX ग्रीन Rs १०५० कोटींचे प्रेफरन्स शेअर्स आणी वॉरंट द्वारा गोळा करतील. २.८९ कोटी शेअर्स इशू करतील.
VI ने ५० Mhz स्पेक्ट्रम ११ सर्कलमध्ये Rs ३५१० कोटींमध्ये घेतले.
अर्चीन केमिकल्स १.२ कोटी शेअर्स किंवा १०.१३ % स्टेक विकणार. यातून Rs ६५५ फ्लोअर प्राईसने Rs ८१८.७० कोटी मिळतील.
PI इंडस्ट्रीज UK च्या AGRICULTUR BIOLOGICAL INPUT कंपनीमधील सर्व शेअर कॅपिटल GBP ३२.७८ मिलीयनला विकत घेणार.
DR रेड्डीज NICOTINELL आणी त्यांचा पोर्टफोलिओ विकत घेणार आहे. यामुळे जागतिक कन्झ्युमर हेल्थकेअर मध्ये बिझिनेस वाढेल.
इलेक्ट्रोनिक्स मार्ट ने दरियागंज येथे नवीन स्टोअर उघडले.
PVR आयनॉक्स ने हैदराबाद मध्ये ४ स्क्रीन मल्टीप्लेक्स सुरु केला. आता त्यांच्या मल्टीप्लेक्स ची संख्या १७५७ झाली.
RVNL ला Rs ७२.७ कोटींच्या नॉर्थ सेन्ट्रल रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
EUGIA च्या पोलेपल्ली येथील इन्जेकटेबल युनिट साठी USFDA ने EIR दिला.
EMCURE फार्माचा IPO ३ जुलै २०२४ रोजी ओपन होऊन ५ जुलैरोजी बंद होईल.
ह्या IPO मध्ये Rs ८०० कोटींचा फ्रेश इशू आणी १.१४ कोटी शेअर्सची OFS असेल.
मार्च २०२५पर्यंत ग्लोबल बॉंड इमर्जिंग मार्केट मध्ये भारताचे वेटेज १०% असेल. इतर चलनांपेक्षा रुपया स्थिर आहे.
BOSCH व्हर्लपूल विकत घेण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची घरगुती उपकरणांमध्ये स्पर्धात्मक ताकत वाढेल आणी ते इतर एशियायी स्पर्धकांबरोबर चांगली स्पर्धा करू शकतील. व्हर्लपूल चे मार्केट कॅपिटलायझेशन US $ ४.८ बिलियन आहे.
DATAMATICSला AI MANAGEMENT सिस्टीम साठी ISO प्रमाणपत्र मिळाले.
रूट मोबाईल ने मायक्रोसॉफ्ट आणी PROXIMUS बरोबर डिजिटल कम्युनिकेशन आणी क्लाउड साठी करार केला. हा STRATEGIC करार ५ वर्ष मुदतीचा आहे.
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया ११ विमानतळा साठी बोली मागवेल. बँगलोर हैदराबाद एअरपोर्टमधील उर्वरीत स्टेक विकेल. भुवनेश्वर, इन्दोर आणी रायपुर विमानतळाचे खाजगीकरण केले जाईल.
आज FMCG, ऑटो, IT, एनर्जी, सिमेंट मेटल्स, OIL & GAS मध्ये तेजी होती. बँकिंग मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९२४३ NSE निर्देशांक निफ्टी २४०४४ बॅंक निफ्टी ५२८११ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २६ जून २०२४

आज क्रूड US $ ८५.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.६४ USA 10 वर्षे बॉंड यील्ड ४.२७ आणी VIX १४.२७ च्या आसपास होते. सोने Rs ७१४०० आणी चांदी Rs ८६९०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
USA मध्ये DOW JONS 300 बेस पाईंट मंदीत होते. NASDAQ तेजीत होते. NVIDIA मध्ये ६.७% तेजी होती. WALLMART ने कमजोर आउटलुक दिला त्यामुळे WALLMART २.२% आणी होम डेपो ३.6% ने पडला.
FII ने Rs ११७६ कोटींची खरेदी तर DII ने Rs १४६ कोटींची विक्री केली.
गुलशन पॉलि आसाममध्ये गोलपारा येथे इथनोल उत्पादन युनिट सुरु करणार आहे.
एस्त्राझेनेकाची फुफुसाच्या कॅन्सर साठी असलेल्या औषधाची ट्रायल अयशस्वी झाली.
वेदान्ताच्या शेअर्समध्ये १४.७८ कोटी शेअर्सचे (३.९२% इक्विटी) Rs ६३३९ कोटीचे लार्ज ट्रेड झाले.
हिंदुस्थान फुड्स मध्ये २९.३१ लाख शेअर्सचे Rs १५० कोटींमध्ये लार्ज डील झाले.
शारदा मोटर्सच्या शेअर्स मध्ये १३.४७ लाख शेअर्सचे Rs १९९६.१० प्रती शेअर भावाने Rs २६९ कोटींचे लार्ज डील झाले.
CE इन्फो मध्ये ६ .११ लाख शेअर्सचे Rs १४३ कोटींमध्ये लार्ज डील झाले
सांघि इंडस्ट्रीजचे प्रमोटर्स अंबुजा सिमेंट २.३६ % आणी रवी सांघि १.१६% स्टेक असा एकूण ३.५२% स्टेक OFS च्या माध्यमातून Rs 90 प्रती शेअर भावाने विकणार आहेत.
माझगाव डॉक्स ला सरकारने नवरत्नाचा दर्जा दिला.
येस बॅंक DEBT सिक्युरिटी च्या माध्यमातून फंड उभारण्यावर २३ ऑगस्ट २०२४ रोजी विचार करेल. .
विष्णू प्रकाश पुंगलिया या कंपनीला प्रयागराजच्या जल सप्लाय स्कीमसाठी UP जल निगम कडून LOA मिळाले. ही ऑर्डर Rs 273 कोटींची आहे.
आता कमोडीटी मार्केट मध्ये ७ शेतकी कमोडीटीच्या फ्युचर ट्रेडिंग वर BAN आहे. मोहरी आणी सोयाबीनच्या फ्युचर ट्रेडिंग वरील BAN उठवण्याचा सरकार विचार करत आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र Rs ५००० कोटी आणी सेन्ट्रल बॅंक Rs २००० कोटी QIP इशू द्वारा उभारेल.
SBI ने Rs १०००० कोटींचे बॉंड इशू केले. NTPC NCD द्वारे Rs १२०० कोटी उभारेल.
GSK फार्माला ७१.६५ कोटींची कर संबंधांत डिमांड नोटीस मिळाली.
S & P ने अदानी पोर्टचे रेटिंग BBB-आणी आउटलूक पॉझीटीव्ह केला.
DEE डेव्हलपमेंट इंजिनीअरचे ६७% प्रीमियमवर लिस्टिंग झाले. BSE वर Rs ३२५ आणी NSE वर Rs ३३९ वर लिस्टिंग झाले. ज्याना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
सरकारला आज स्पेक्ट्रम ऑक्शन मध्ये Rs १११३१ कोटी मिळाले. स्पेक्ट्रम साठी जास्त मागणी बिहार, UP, MP, पश्चिम बंगाल या राज्यातून आली. एकूण 6 राउंडमध्ये १३१ Mhz स्पेक्ट्रमचा लिलाव झाला.
भारती एअरटेलने Rs ८००० कोटी ते Rs ९००० कोटी तर रिलायंस जिओ ने Rs १००० कोटी आणी VI ने Rs १२०० कोटी स्पेक्ट्रमच्या ऑक्शनमध्ये भरले.
HAL ने Rs १३ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.
अदानी टोटल ला PNGRB ने जालंधर शहरांत सिटी GAS डीस्ट्रीब्युशन नेटवर्क साठी मंजुरी दिली .
आयनॉक्स ग्रीनला Rs १०५० कोटी उभारायला मंजुरी मिळाली.
JK सिमेंट २० लाख टन प्रती वर्ष क्षमतेचे नवीन सिमेंट GRINDING युनिट प्रयागराजमध्ये सुरु केले. RIL ची मार्केट कॅप २०.५० लाख कोटीपेक्षा जास्त झाली.
ITD सिमेंटेशन ला Rs १०८० कोटींची नवीन मरीन ऑर्डर मिळाली.
आज एनर्जी, OIL & GAS, बँकिंग, फार्मा, FMCG आणी टेलिकॉम क्षेत्राशी संबंधीत शेअर्समध्ये खरेदी झाली तर रिअल्टी, IT, मेटल्स, ऑटो, PSE क्षेत्राशी संबंधीत शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८६७४ NSE निर्देशांक निफ्टी २३६६८ आणी बॅंक निफ्टी ५२८७० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २५ जून २०२४

आज क्रूड US $ ८६.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.४८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२३ आणि VIX १४.२२ च्या आसपास होते. सोने Rs ७१६०० चांदी Rs ८८८०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.

USA मध्ये NVIDIA मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. रसेल २००० मध्ये खरेदी झाली.
FII ने Rs ६५४ कोटींची तर DII ने Rs ८२० कोटींची विक्री केली.
आज सरकारने Rs ९६००० कोटींच्या स्पेक्ट्रमचा ऑक्शन सुरु केला.
हप्पीएस्ट माइंड मध्ये ७.०१ % इक्विटी चे १.0८ लाख शेअर्सचे Rs ८४८.८० प्रती शेअर या दराने लार्ज डील झाले.
अल्केम LAB मध्ये ३.५८ लाख शेअर्सचे Rs १७७ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
कल्पतरू प्रोजेक्टला Rs २३३३ कोटींची ऑर्डर मिळाली.
SCHAEFFLER कंपनीने ‘PLANETARY GEAR SYSTEM’ लॉन्च केली.
अमर राजाने लिथीयम आयन सेल टेक्नोलॉजी साठी टेक्निकल लायसेन्सिंग अग्रीमेंट GIB एनर्जीx झेकोस्लोव्हाकिया बरोबर करार केला. त्यामुळे अमर राजाला या कंपनीची LFP टेक्नोलॉजी मिळेल.
क्राफ्ट्समन ऑटोने ‘सनबीम लाईटवेटिंग सोल्युशन्स आणी केदार कॅपिटल फंडाबरोबर करार केला. बोरोसील Rs ३३१.७५ प्रती शेअर्सने Rs १५० कोटींचा QIP इशू करणार.
इंटेलेक्ट डिझाईन एरेना ने ‘VANITY’ या कॅनडास्थित कंपनी बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन साठी ७ वर्ष मुदतीचा करार केला.
स्वान एनर्जी IFFCO कडून ‘TRIUMPH OFFSHORE PVT LTD.’ मधील ४९% स्टेक Rs ४४० कोटींना खरेदी करणार.
SH केळकर ची ‘केवा फ्लेवर’ ही सबसिडीअरी आहे. SH केळकरने ‘केवा फ्लेवर’ चा ‘NUTASTE’मधील 40% स्टेक Rs १२.५ कोटींमध्ये घेण्यासाठी करार केला.
मुथूट कॅपिटल यांनी IRDAI कडे कॉर्पोरेट एजंट म्हणून रजीस्टर करण्यासाठी अर्ज केला.
विष्णू प्रकाश पुंगलिया ला गोव्याच्या पब्लिक वर्क्स DEPT कडून 15 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी Rs ६७.८ कोटींची ऑर्डर मिळाली.
KIMS २८ जून २०२४ रोजी शेअर स्प्लीटवर विचार करेल.
RBL बॅंक, AU स्माल फायनान्स बॅंक, SATIN क्रेडीट केअर, आणी इंड स्विफ्ट LAB या कंपन्या २७ जून रोजी फंड रेझिंग वर विचार करेल.
भारताची सेवा निर्यात वाढल्यामुळे भारताची ‘CURRENT ACCOUNT GAP’ पॉझीटीव्ह झाली. ० .०६ % सरप्लस झाली.
दालमिया भारतने तामिळनाडू मध्ये ग्राफाईट माईन्स ची बोली जिंकली.
ओबेरॉय रिअल्टी ने NCR मध्ये Rs ५९७ कोटींना १४.८ एकर जमीन खरेदी केली. २.6 मिलियन SQFT एरिया डेव्हलप करता येतील.
इंडिगो जेद्दा साठी जाणाऱ्या फ्लाईट ची संख्या दुप्पट करणार आहे.
हिताची एनर्जीला Rs ७३० कोटींची ऑर्डर मिळाली.
ALKEM LAB च्या बद्दी युनिटला USFDA ने EIR दिला.
जूनमध्ये सरासरीपेक्षा १०% कमी पाउस पडेल.
टाटा मोटर्सने बजाज फायनान्सबरोबर कमर्शियल व्हेइकल्स फायनानसिंगसाठी करार केला.
टेकमहिंद्राची सबसिडीअरी HEALTH NEXT INC’ चे तिच्या पेरेंट कंपनीमध्ये म्हणजे टेक महिंद्र (अमेरिका) मध्ये मर्ज करण्यासाठी मंजुरी मिळाली.
शिल्पा मेडिकेअर च्या हैदराबाद ‘BIO ANALYTICAL LAB’ चे इन्स्पेक्शन USFDA ने पूर्ण करून EIR दिला.
आज बँकिंग आणी IT क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली. रिअल्टी, PSE, मेटल्स, एनर्जी, FMCG, ऑटो मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. आज सेन्सेक्स, निफ्टी, आणी बॅंक निफ्टी कमाल स्तरावर होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८०५३ NSE निर्देशांक निफ्टी २३७२१ बॅंक निफ्टी ५२६०६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २४ जून २०२४

.आज क्रूड US $ ८५.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१ =Rs ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.३७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२५ आणी VIX १४.00 च्या आसपास होते. सोने Rs ७१७०० आणी चांदी Rs ८९१०० च्या आसपास होते. लेड तेजीत आणी कॉपर झिंक मंदीत होते.

US $ आणी जापनीज येन यांचा विनिमय दर जर १६० च्या वर गेला तर जापनीज सेन्ट्रल बॅंक हस्तक्षेप करेल. USA मधील घरांची विक्री 0.७० % ने कमी झाली. कार ट्रेड मध्ये ७०.१७ लाख शेअर्सचे Rs ५८१ कोटींचे लार्ज डील झाले.
IGL,, MGL, गुजरात GAS साठी CNG च्या किमती Rs १ प्रती KG वाढवल्या.
MAS फायनांशियल्स ने QIP द्वारा Rs ५०० कोटी उभारले.
हिरोमोटो कॉर्प १ जुलै २०२४ पासून त्यांच्या मोटारसायकल आणी स्कूटर्स च्या किमती Rs १५०० ने वाढवणार आहे.
संघवी मुव्हर्सला Rs १८० कोटींच्या दोन वर्किंग ऑर्डर्स मिळाल्या.
सरकारने डाळीवर आणी गव्हावर STOCK लिमिट लावली. डाळीन्साठी होलसेलर साठी 200 MT तर रिटेलर साठी ५ MT आणी इम्पोर्टर साठी त्याने ४५ दिवसांच्या आत STOCK विकला पाहिजे असे STOCK लिमिट लावले.
सरकारने गव्हासाठी होलसेलर साठी ३००० टन आणी रिटेलर साठी १० टनाचे STOCK लिमिट 31 मार्च २०२५ पर्यंत लावले.
सेंच्युरी टेक्स्टाईल ने पुण्यातील मांजरी येथे १६.५ एकर जमीन खरेदी केली. या प्रोजेक्टमध्ये Rs २५०० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.
वेदांताने प्रमोटर्स स्टेक विकण्याच्या बातमीचे खंडन केले.
सिप्ला च्या गोवा युनिटच्या १० जून ते २१ जून दरम्यान झालेल्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने 6 त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला. हा प्लांट फेबृआरी २०२0 पासून तर कंपनीचा इन्दोर येथील प्लांट नोव्हेंबर २०२३ पासून वार्निंग लेटरवर आहे.
खतांवरील GST कमी करण्यासाठी करण्यात आलेली विनंती GST कौन्सिलने ग्रुप ऑफ मिनिस्टर्स कडे सोपवली.
बायोकॉन च्या विशाखापट्टणम च्या API युनिटच्या २१ जून रोजी झालेल्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या.
ल्युपिन च्या सॉमरसेट युनिटच्या ७ मे ते १७ मे दरम्यान केलेल्या तपासणी साठी USFDA ने EIR दिला.
प्रेस्टीजने Rs ५००० कोटी QIP द्वारा उभारले.
PB फिनटेकने पॉलिसी बझारला Rs 200 कोटी आणी पैसा बझारला Rs ५० कोटी कर्ज दिले.
JSW एनर्जीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन कडून विंड -सोलर हायब्रीड पॉवर प्रोजेक्ट 300 MW ISTS साठी LOA मिळाले. कंपनीचे ग्रीन हायड्रोजन आणी ग्रीन ऑक्सिजन प्लांट्स जून २०२५ पर्यंत कार्यरत होतील. कंपनी हा ग्रीन हायड्रोजन आणी ग्रीन ऑक्सिजन JSW स्टील या कंपनीला सप्लाय करेल. कंपनी राजस्थामध्ये 1 GW चा बॅटरी स्टोरेज प्रोजेक्ट जून २०२५ पर्यंत सुरु करण्याची शक्यता आहे. ग्रीन हायड्रोजन चे उत्पादन आणी उपयोग वाढवण्यासाठी फरटीलायझर सेक्टरला ग्रीन अमोनिया जास्त देणार. ग्रीन अमोनियाचे अलोकेशन ५.५ लाख टनांवरून वाढवून ७.५ लाख टन केले.
सोलर कुकर, मिल्क कॅन, पेपर बॉक्स यांवर आता १२% GST लागेल.
स्प्रिंकलर वरील GST १२% केली.
IREDA Rs १५०० कोटीचे बॉंडस इशू करणार आहे.
गार्डन रिच शिपबिल्डर्सला US $५४ मिलीयन्सची ३३ महिन्यांत ४ व्हेसल्स डिझाईन, बिल्डींग आणी डिलिव्हर करण्यासाठी ऑर्डर मिळाली.ही ऑर्डर ४ मल्टी पर्पज व्हेसल्स साठी जर्मन कंपनी CARSTEN REHDER SCHIFFSMAKLER AND REEDEREL कडून मिळाली. कंपनीला आणखी ४ अश्याच शिप्स साठी नजीकच्या भविष्यात ऑर्डर मिळू शकते.
सन फार्मा ला GLoo ३४ याच्या फेज १ ट्रायलमध्ये सकारात्मक रिझल्ट मिळाले झाली.
आज बॅंक & फायनांशियल्स , FMCG, कॅपिटल गुड्स, ऑटो, PSE क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर स्माल कॅप, फार्मा, IT, मेटल्स, PSU बँकांमध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७७३४१ NSE निर्देशांक निफ्टी २३५३७ आणी बॅंक निफ्टी ५१७०३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २१ जून २०२४

आज क्रूड US $ ८५.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.१८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२६ आणी VIX १३.२५ च्या आसपास होते. सोने Rs ७२७०० आणी चांदी Rs ९१५०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.

USA मध्ये इन्फ्लेशन मे महिन्यासाठी २.६% ( एप्रिल साठी २.४ %) झाले. USA मध्ये जॉबलेस क्लेम्स २.३८ लाख आले. DOW जोन्स 300 पाईंट तेजीत होता . एनर्जी शेअर्स तेजीत होते. . अक्सेन्च्युअरचे उत्पन्न US $ टर्ममध्ये १% कमी होऊन US $ १६५० कोटी झाले. कंपनीचा कॅश लाभांश १५% वाढून US $१.२९ प्रती शेअर झाला. GAAP ऑपरेटिंग मार्जिन १.८०% ने वाढून १६% झाले. एडजस्टेड ऑपरेटिंग मार्जिन 0.१०% वाढून १६.४% झाले. नवीन बुकिंग US $ २११० कोटी झाले. जनरेटीव्ह AI बुकिंग US $ 90 कोटी झाले. कंपनीने उत्पन्नासाठी फ्युचर गायडंस १%-३% वरून १.५%-२.५% एवढा कमी केला. मार्जिन गायडन्समध्ये बदल केला नाही. अक्सेन्च्यूअरचे निकाल चांगले आल्यामुळे IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदी झाली.
बॅंक ऑफ इंग्लंड ने त्यांच्या व्याजदरांत कोणताही फरक केला नाही रेट ५.२५% वर कायम ठेवले. स्विस बँकेने व्याजाचे दर 0.२५% ने कमी केले.
भारताचा जून महिन्यासाठी मन्युफाक्चरिंग PMI ५८.५( ५७.५, सर्विस PMI ६०.४ (६०.२) आले. कॉम्पोझिट PMI ६०.९ (६०.५) आले.
FII ने Rs ४१५ कोटींची खरेदी आणी DII ने Rs ३२६ कोटींची विक्री केली.
अमर राजा INOBAT AS नॉर्वे मध्ये ४.५% स्टेक घेण्यासाठी GBP २० मिलियन्स ची गुंतवणूक करणार आहे.
युनियन बँकेचे रेटिंग S & P ग्लोबल ने BBB – आणी आउट लुक पॉझीटीव्ह केला.
ONGC मध्ये देवेंद्रकुमार यांची CFO म्हणून नेमणूक झाली.
हिंदुस्थान झिंक ने ‘AEsir TECH USA बरोबत झिंक बॅटरी बनवण्यासाठी MOU केले.
ASTER DMच्या शेअरमध्ये ४.५६ कोटी शेअर्सचे ( ९.१४% इक्विटी) Rs १५७६ कोटींचे लार्ज डील झाले.
सनफार्मानेआणी सिप्ला टाकेडा फार्मा या जपानी कंपनी बरोबर GASTRO ड्रग ‘VONOPROZEN’ या औषधाची भारतात विक्री करण्यासाठी MOU केले.
कमिन्सने Rs २० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
‘STANLEY लाइफस्टाइल’ चा IPO २१ जूनला ओपन होऊन २५ जूनला बंद होईल. याचा प्राईस बॅंड
Rs ३५१-Rs ३६९ असून मिनिमम लॉट 40 शेअर्सचा आहे. दर्शनी किमत Rs २ आहे. हा IPO Rs ५३७ कोटींचा असून Rs 200 कोटींचा फ्रेश इशू आणी Rs 3३७ कोटींची OFS आहे. ही कंपनी २००७ मध्ये बंगलोर येथे स्थापन झाली ही कंपनी लक्झ्युरी फर्निचरचे उत्पादन आणी विक्री करते. कंपनीची सध्या ६३ स्टोर्स आहेत. कंपनी हैदराबाद, दिल्ली, मुंबई मध्ये स्टोर्स उघडण्याची शक्यता आहे. हाय नेटवर्थ इंडीवीज्युअल्स आणी हायएंड हॉटेल ह्यांचे ग्राहक आहेत. सोफा, सिटींग फर्निचर, वार्डरोब आणी इतर लक्झ्युरी फर्निचर बनवतात. कंपनीच्या उत्पादनाला इंडोनेशिया आणी चीन मधून मागणी आहे. कंपनी आणखी १०० ते ११० स्टोर्स उघडू शकते.
‘VI’ ने १७ सर्कल मध्ये 5G रोल आउट साठी अटी पुऱ्या केल्या. DOT कडून 4G आणी 5G नेटवर्क टेस्टिंग करून घेतले.
विप्रोचा आज सेन्सेक्समधील शेवटचा दिवस असून उद्यापासून अदानी पोर्ट सेन्सेक्समध्ये सामील होईल.
TCS ने झेरॉक्स बरोबर IT टेक्नोलॉजी, जनरेटीव्ह AI आणी क्लाउड मध्ये ट्रान्सफॉर्मेशन साठी डील साईन केले.
GIC हौसिंगच्या काही भागांत मालवेअर ATTACK झाला/.
जिंदाल स्टेनलेस ने मोझांबिक ला १०० फ्रेट WAGAN साठी स्टेनलेस स्टील सप्लाय केले.
टाईम टेक्नोप्लास्ट ला पेसोकडून हायड्रोजन सिलिंडर्ससाठी ऑर्डर मिळाली.
गोदरेज NCD द्वारा Rs ५०० कोटी उभारणार.
पॉवर ग्रीड ने राजस्थान राज्य विद्युत निगम बरोबर ट्रान्स्मिशन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी JV केले.
त्रिवेणी एन्जिनीअरिन्गने ३६.३४% स्टेक सर शादिलाल एन्टर प्रायझेस मध्ये Rs ४५ कोटींना घेतला.
आज मिडकॅप, स्मालकॅप, OIL & GAS, FMCG, रिअल्टी, एनर्जी, बँकिंग ,आणी PSE मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. IT, फार्मा, आणी मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७७२०९ NSE निर्देशांक निफ्टी २३५०१ आणी बॅंक निफ्टी ५१६६१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २० जून २०२४

आज क्रूड US $ ८५.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६५ च्या आसपास होता. USA $ निर्देशांक १०५.00 USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२४ आणी VIX १३.६० च्या आसपास होते. सोने Rs ७२१०० चांदी Rs ९०८०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती. रुपया मार्केट बंद होताना ८३.६५ या किमान स्तरावर होता
UK मधील महागाई निर्देशांक २% आला. चीनच्या बँकांनी कर्जावरील व्याजाच्या दरांत बदल केला नाही. १ वर्षासाठी ३.४५% आणी ५ वर्षांसाठी ३.९५% कायम ठेवला. USA मार्केट बंद होती.
FII ने Rs ७९०८ कोटींची तर DII ने Rs ७१०८ कोटींची खरेदी केली.
सन टीव्ही आणी GNFC बॅन मधून बाहेर आले.
रेट गेन च्या शेअर्समध्ये २१.५६ कोटी शेअर्सचे Rs ७४५ प्रती शेअर या दराने Rs १६१ कोटींचे लार्ज डील झाले.
RCF मध्ये आज Rs २५७ कोटींचे लार्ज डील झाले.
पिरामल एन्टरप्रायझेसमध्ये १.०७ कोटी शेअर्सचे Rs ९७६ कोटींचे डील झाले.
जिंदाल स्टेनलेस स्टील ने मेड इन इंडिया फ्रेट WAGANS बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील सप्लाय केले.
सरकारने आज १४ खरीप पिकांची MSP FY २४-२५ साठी वाढवली. यात तूर, उडीद, मुग, सोयाबीन, सनफ्लॉवर, कॉटन यांचा समावेश आहे. या MSP मधील वाढीवर सरकार Rs २ लाख कोटी खर्च करणार आहे.
गोवा कार्बनने स्टील आणी फौंड्री उद्योगासाठी GCARB +हे सस्टेनेबल कार्बन सोल्युशन launch केले.
‘ओला इलेक्ट्रिक’ आणी ‘EMCURE’ या कंपन्याना IPO आणण्यासाठी मंजुरी मिळाली.
रेलटेल ला साउथ सेन्ट्रल रेल्वे कडून Rs २० कोटींचे टेलीकम्युनिकेशन साठी ऑर्डर मिळाली.
SAPPHIRE कंपनी त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन करणार आहे.
गोकुळदास एक्सपोर्ट Rs ३५० कोटींमध्ये BRFL टेक्स्टाईल या कंपनीचे अक्विझिशन करणार आहे. यामध्ये Rs ५० कोटी ताबडतोब द्यायचे आहेत तर हा खरेदीचा व्यवहार जून २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
IOC ने GPS रिन्युएबल बरोबर अग्रीमेंट केले.
ब्लू डार्टने ‘ड्रोन’ ची कंपनी SKYE AIR बरोबर ड्रोन डिलिव्हरीसाठी करार केला.
टाटा कम्युनिकेशनला ANSDBS एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट बँकेकडून ५ वर्ष मुदतीचे US $ २५ कोटींचे कर्ज मिळणार आहे.
PNB हौसिंगच्या शेअर्समध्ये जनरल अटलांटिक ४.२% स्टेक Rs ७७३ प्रती शेअर फ्लोअर प्राईसने सुमारे Rs ८३० कोटींना विकणार आहे. सेलर्स साठी ६० दिवसांचा लॉकइन पिरीयड असेल.
वेदान्ता Rs १००० कोटी NCD द्वारा उभारणार आहे.
सन फार्माच्या दादरा युनिटला USFDA ने वार्निंग लेटर दिले.
MAS फायनांशियल्स १.४ कोटींचा Rs २८६.२५ प्रती शेअर या दराने Rs ४०० कोटी QIP द्वारा उभारणार आहे.
GENSOL ला गुजरात उर्जा विकास निगम कडून बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम साठी दुसरी TRANCH २५० MW /५०० MWH साठी ऑर्डर मिळाली ही ऑर्डर १२ वर्ष मुदतीची आणी Rs २६८५ कोटींची आहे.
GMR अर्बन ने बॉस्चग्लोबल SOFTWEAR बरोबर स्मार्ट मीटर्स क्लाउड आणी IT इंफ्राला
जोडण्यासाठी करार केला . GMR ला ७५.६९ लाख स्मार्ट मीटर्ससाठी ऑर्डर मिळाली आहे.
KEI च्या राखोली आणी चिंचपाडा येथील कामकाज संपामुळे बाधीत झाले..
रिलायंस जिओने एप्रिल मध्ये २६.८७ लाख सबस्क्रायबर( मार्च २१.४ लाख) जोडले तर ‘VI’ ने ७.३५ लाख सबस्क्रायबर गमावले ( मार्च ६ .८४ लाख ) तर भारतीने ७.५२ लाख सबस्क्रायबर जोडले( मार्च १७.५ लाख)
ब्रिगेडने कोचीमधील इंफोपार्क येथील वर्ल्स ट्रेड सेंटर डेव्हलप करण्यासाठी करार केला.
सोम डीस्टीलरिजचे लायसन्स २० दिवसांसाठी सस्पेंड केले.
जागरणकडे आलेली Rs २०३ कोटींची GST ची मागणी रद्द झाली.
गोदरेज ग्रुपच्या वाटणीला CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ) ने मान्यता दिली.
AWFIS ही अलीकडेच लिस्टिंग झालेली कंपनी तोट्यातून फायद्यांत आली. निकाल चांगले आले.
विंडसर मशीनच्या ABD ब्रांडचा IPO येण्याची शक्यता आहे.
अलाईड ब्लेंडर्स & डीस्टीलर्स या कंपनीचा IPO २५ जूनला ओपन होऊन २७ जून ला बंद होईल. कंपनीचा ऑफिसर्स CHOICE हा ब्रांड लोकप्रिय आहे कंपनीचा ऑफिसर्स CHOICE हा व्हिस्कीचा ब्रांड प्रसिद्ध आहे. ३.५६ कोटी शेअर्सचा फ्रेश इशू आणी १.७८ कोटीं शेअर्सचा OFS असेल. दर्शनी किमत Rs २ आहे. प्राईस बॅंड Rs २६७ ते Rs २८१ आहे मिनिमम लॉट ५३ शेअर्सचा आहे.
सिमेन्स कडून ज्युपिटर WAGANSला ३६ आक्झिलीअरी बॅटरीसाठी ऑर्डर मिळाली.
ब्रिगेडने US $ 18 मिलियन चे डील केले.
अंदाजपत्रकासाठी अर्थमंत्र्यांच्याबरोबर झालेल्या मिटींगमध्ये F & O सेगमेंटमध्ये ‘हाय फ्रिक्वन्सी ट्रेडर्स’ ज्यांचा टर्नओव्हर Rs १००० कोटींच्या वर आहे त्यांच्यावर लागणारा STT कर वाढवावा अशी शिफारस करण्यात आली.
आज ऑटो आणी फार्मा या दोन क्षेत्रांत प्रॉफीट बुकिंग झाले.बँकिंग, रिअल्टी, मेटल्स आणी OIL & GAS, एनर्जी, खते या क्षेत्रामध्ये जोरदार खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७७४७८ NSE निर्देशांक निफ्टी २३५६७ आणी बॅंक निफ्टी ५१७८३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक bpphatak@gmail.com

९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ जून २०२४

आज क्रूड US $ ८५.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.40 च्या आसपास होते . US $ निर्देशांक १०५.२८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२१ आणी VIX १३.६० च्या आसपास होते. सोने Rs ७१७०० आणी चांदी Rs ८९००० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.

USA मध्ये रिटेल सेल्सचे आकडे अनुमानापेक्षा कमी आले. NVIDIA मध्ये तेजी होती. या शेअरने मायक्रोसॉफ्टलाही मागे टाकले. AI शेअर्समध्ये तेजीचा ओघ चालू आहे. ZF स्टीअरिंगमाधील ५% स्टेक WABCO Rs १४९८० प्रती शेअर या दराने ब्लॉक डील च्या माध्यमातून विकणार आहे. Rs १४९२३ कोटी अपेक्षित आहेत.
GLAND फार्माचे ८.२ मिलियन शेअर्स Rs १७५0 प्रती शेअर भावाने ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे.
सांसेरा एन्जिनीअरिन्ग चे ६२.५३ लाख शेअर्स (११.६६ % इक्विटी) Rs ११५१.२० ते Rs १२११.७५ प्रती शेअर दरम्यान विकणार Rs Rs ७५७.७० कोटी अपेक्षित आहे
स्नोमन लॉजिस्टिक्सच्या प्रमोटर्सनी त्यांचा स्टेक ४५.८९% वरून ४६.०७ % केला.
BLW ला ट्रक्शन मोटर्ससाठी PLI सर्टिफिकेट मिळाले.
भारत फोर्ज US $ 40 मिलियन्स ची गुंतवणूक करणार आहे.
नेट वेब ने नवीन AMD लॉनच केले.
टाटा मोटर्सने CJLRI या नावाने चीनमध्ये सबसिडीअरी स्थापन केली.
फरटीलायझरवरील GST ५% वरून 0% करण्यावर २२ जून च्या GST कमिटीच्या बैठकीत विचार करेल. तसेच अन्दाज पत्रकांत काही सवलती खतांसाठी मिळण्याची शक्यता आहे.
एरीएटेड ड्रिंक्स वरील १२% सेस हटवण्याचा प्रस्ताव GST बैठकीत येण्याची शक्यता आहे.
टाटा टेक्नोलॉजी मायक्रोसॉफ्ट आणी टाटा मोटर्स बरोबर कोलाबोरेशन करणार आहे.
AXIs बँकेने MAX लाईफमधील त्यांचा स्टेक १९.० २% वरून १९ .९९% केला ह्यासाठी Rs ३३६ कोटींची गुंतवणूक केली.
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्स च्या किमती १ जुलै २०२४ पासून २% ने वाढवणार.
क्राफ्ट्समन ऑटो Rs १२०० कोटी Rs ४४०० प्रती शेअर फ्लोअर प्राईस ने QIP द्वारे उभारेल.
प्रेस्टीज त्यांचे हॉस्पिटल असेटस विकणार आहे. तसेच २१ जूनला QIP वर विचार करेल.
FII ने Rs २५६९ कोटींची खरेदी तर DII ने Rs १५५६ कोटींची खरेदी केली.
GNFC आणी piramal बॅन मध्ये गेले तर GMR बाहेर आला. बलरामपुर हिंदुस्थान कॉपर, इंडिया सिमेंट, SAIL, सन टीव्ही बॅन मध्ये राहिले.
VI ने सांगितले की त्यांनी इंडस TOWER मधील स्टेक विक्रीतून मिळालेल्या सुमारे १८८०० कोटीच्या रकमेचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी केला जाईल.
टायटन ने सांगितले की त्यांनी आता पर्यंत १० ‘झोया’ ब्युटीक उघडली आहेत आणी येत्या ५ वर्षांत आणखी १५ झोया ब्युटीक उघडण्याची योजना आहे. झोया लक्झरी ज्वेलरी मार्केटमध्ये काम करते. भारतात हे मार्केट फार छोटे आहे. हे लक्झरी ज्वेलरी मार्केट २५% ते ३०% CAGR ने वाढत आहे.नवीन नवीन कंपन्या यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढत आहे. झोया ब्रांड ३०% ते 40% CAGR ने वाढत आहे. हे मार्केट पर्ल, डायमंड, आणी प्रेशस कलर स्टोन्स मध्ये डीलिंग करते. भारतात प्रेशस कलर स्टोन्स जडवलेल्या दागिन्यांना जास्त मागणी आहे. टायटन ने यांची निरनिराळी डिझाईन तयार करून त्यांची पेटंट घेतली आहेत. टायटन त्यांच्या ‘झोया’ ब्रांड विषयी आशावादी आहेत.
२६ जूनला HAL ची अंतिम लाभांशावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक आहे.
सकुमा एक्स्पोर्ट १ जुलै २०२४ रोजी बोनस शेअर्स वर विचार करेल.
व्हीनस रेमिडीजला ला PAN अमेरिकन ऑथोरिटीकडून ओन्कोलोजी टेंडर मिळाले.
HCL TECH ने टेक्नोट्री बरोबर करार केला.
महाराष्ट्रामधील ‘वाढवण’ पोर्टला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
DEE डेव्हलपमेंट इंजीनीअर्स या १९८८ ला स्थापन झालेल्या कंपनीचा Rs ४१८.01 कोटींचा IPO ( यांत Rs ३२५ कोटींचा फ्रेश इशू आणी Rs ९३.01 कोटींची OFS आहे) 19 जूनला ओपन होऊन २१ जूनला बंद होईल. ह्या शेअर्सचे लिस्टिंग २६ जूनला होण्याची शक्यता आहे. ही कंपनी स्पेशियलाईज्द प्रोसेस पाईपिंग सोल्युशनच्या व्यवसायात आहे ग्राहकांच्या ऑर्डर प्रमाणे पाईपिंग अरेन्जमेंट करून देतात. या कंपनीचे ९ प्लांट आहेत ही कंपनी OIL & GAS,. न्युक्लीअर पॉवर ,केमिअल्स आणी पेट्रोकेमिकल्स कंपन्यांसाठी काम करते.
आज बँकिंग, IT क्षेत्रांत खरेदी झाली. निफ्टी बँकेने ५१९५७ हा इंट्राडे उच्चांक गाठला. इन्फ्रा, रिअल्टी, PSE, ऑटो, मेटल्स, FMCG, OIL & GAS, एनर्जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७७३३७ NSE निर्देशांक निफ्टी २३५१६ बॅंक निफ्टी ५१३९८ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक

bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ जून २०२४

.आज क्रूड US $ ८४.१० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.४४ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२८ आणी VIX १३.३४ च्या आसपास होते. सोने Rs ७१६०० आणी चांदी ८९१०० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होते.

FII ने Rs २१७६ कोटींची तर DII ने Rs ६५६ कोटींची खरेदी केली.
USA मधील औषधांच्या किमती डबल डीजीट ने कमी झाल्याने त्यांचा परिणाम DR रेड्डीज आणी ऑरोबिंदो फार्मा वर होईल.
LIC त्यांच्या LAND बँकेचे मोनेटायझेशन करण्याच्या विचारांत आहे. LIC ने हेल्थ इन्शुरन्स च्या क्षेत्रांत प्रवेश करण्याच्या बातमीवर आम्ही अशा बऱ्याच प्रस्तावांवर विचार करत आहोत असे सांगितले.
L & T ला Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटी दरम्यान त्यांच्या बिल्डींग आणी FACTORY बिझिनेस साठी ऑर्डर मिळाली. आहे.
IXIGO चे BSE वर Rs 135 आणी NSE वर Rs १३८.१० वर लिस्टिंग झाली. हा शेअर IPO मध्ये Rs ९३ वर दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्याना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
IIFL चे RBI ने सुरु केलेले ऑडीट संपले.
HAL ला १५६ COMBAT हेलिकॉप्टर साठी संरक्षण मंत्रालयाने ऑर्डर दिली. ह्या ऑर्डरचे मूल्य Rs ४००००कोटीं ते ५०००० कोटीचे आहे.
झोमाटो Paytmचा एन्टरटेनमेंट बिझिनेस अक्वायर करण्याच्या विचारांत आहे. पण अजून बाइंडीग अग्रीमेंट झाले नाही.
इंडीगोचा डोमेस्टिक पसेंजर मधील मार्केटशेअर ६१.६% वरून ६०.६ % झाला तर एअर इंडियाचा MAARKETSHEAR १४.२% वरून १३.७% झाला. विस्ताराचा मार्केटशेअर ९.७% वर स्थिर रहिला तर स्पाईस जेटचा मार्केट शेअर ४.७% वरून ४% एवढा झाला.
फीच ने भारताच्या ग्रोथचे अनुमान ७% वरून ७.२% केले.
युरोपियन कमिशनने भारतातून आयात होणार्या ऑपटीकल फायबर केबल्स वर एंटीडंपिंग ड्युटी लावली. HFCL ने निर्यात केलेल्या ऑपटिकल फायबर केबल्स ला एन्टीडंपिंग ड्युटी लागणार नाही.
झायडस लाइफच्या फोर्मेज SEZ मधील मातोडा युनिटच्या 18 मार्च ते २७ मार्च दरम्यान झालेल्या तपासणीत USFSA ने OAI ( ऑफिशियल एक्शन इनीशीएटेड) दिला.
बायोकॉन च्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील API युनिट 6 च्या तपासणीत USFDA ने ३ त्रुटी दाखवल्या.
भारत सरकारने क्रूडवरील विंडफॉल TAX Rs ५२०० प्रती टन वरून Rs ३२५० प्रती टन केला. डीझेल पेट्रोल आणी ATF वर कोणत्याही प्रकारची ड्युटी आकारली जाणार नाही.
विप्रोने HANESBRANDS या एपरल ब्रांड बरोबरची भागीदारी वाढवली.
अदानी एन्टरप्रायझेसच्या प्रमोटर्सनी त्यांचा स्टेक ७१.९३ % वरून ७३.९५ % केला.
RVNL इस्ट कोस्ट रेल्वेच्या Rs १६० कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरले.
ब्राईट कॉम ग्रुपमधील ट्रेडिंग सस्पेंड झाले.
ज्युबिलंट फार्मा पेट रेडीओ फार्मसीने नेटवर्क USA मध्ये 6 नवीन ठिकाणी सुरु करण्यासाठी US $ ५० मिलियन ची गुंतवणूक करणार आहे. FY २०२७- FY २०२८ ला हे युनिट सुरु होईल.
TCS ला US डिस्ट्रिक्ट कोर्ट डल्लास आणी टेक्सास ने ट्रेड सिक्रेट च्या संदर्भांत US $ 56.१५ मिलियन कॉम्पेंसेटरी DAMAGES आणी US $ 112.३० मिलियन एक्झेम्प्लरी DAMAGES लावली.
लोढाच्या वडाळ्याच्या प्रोजेक्टसाठी Rs ११८.१० कोटी STAMP ड्युटी ड्यू असे हायकोर्टाने सांगितले. भारती एअरटेलने Rs ७९०४ कोटी स्पेक्ट्रम चार्जेस २०१२ -२०१५ या वर्षांसाठी भरले.
पिडीलाईट च्या सबसिडीअरीने INDUSTRIA CHIMICA ADRALICA SPA बरोबर विशिष्ट UV टेक्नोलॉजी साठी करार केला.
M & M २०३० पर्यंत २३ नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे. FY २५ -FY २७ मध्ये Rs २७००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
आलेम्बिक फार्माच्या ‘DABIGRATAN ETSIBLE’ कॅप्सूल्स ला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली. १०० mg TABLET साठी INPRINCIPLE मंजुरी मिळाली.
GMR एअरपोर्ट ने सांगितले की पसेन्जर ट्राफिक ७% ने वाढून १.08 कोटी झाली.
सिप्ला ची सबसीडीअरी सिप्ला EU ही ETHIRIS मध्ये ३ लाख युरोंची गुंतवणूक करणार आहे.
कल्पतरू प्रोजेक्टच्या प्रमोटर्स ने Rs १००० कोटींचे शेअर्स म्हणजे ५.४३% इक्विटी म्हणजे ९१३१ लाख शेअर्स विकले.
ज्युबिलंट फार्मोवाच्या कॅनडा उत्पादक युनिटच्या तपासणीत USFDA ने १५ त्रुटी दाखवल्या.,
मिडकॅप, स्मालकॅप,रिअल्टी, PSE, बँकिंग एनर्जी इन्फ्रा या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर फार्मा, FMCG, मेटल मध्ये प्रोफित बुकिंग झाले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ७७३०१ NSE निर्देशांक निफ्टी २३५५७ बॅंक निफ्टी ५०४४० वर बंद

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १४ जून २०२४

.आज क्रूड US $ ८२.३० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.२२ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२६ होते. VIX १३.01 च्या आसपास होते. सोने Rs ७११०० तर चांदी Rs ८७८०० च्या आसपास होती. आज झिंक तेजीत होते.

FII ने Rs ३०३३ कोटींची विक्री तर DII ने Rs ५५४ कोटींची विक्री केली.
बॅंक ऑफ जपानने व्याजाचा दर 0 – 0.01% निश्चित केला.
हवेल्स १५ लाख युनिट AC उत्पादन क्षमता असलेल्या युनिटमध्ये गुंतवणूक करणार आहे.
मर्सिडीज महाराष्ट्रांत Rs ३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
LIC ने DR रेड्डीज मधील स्टेक ४.९५ % वरून ५ .०१ % केला.
विप्रोने ट्रान्सफॉर्म ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी सिमेन्स बरोबर करार केला.
निटको मुंबईमधील प्रॉपर्टी चे मोनेटायझेशन करणार आहे. रुणवाल कन्स्त्रक्शन बरोबर Rs २३२ कोटींचे कन्व्हेयन्स डीड करणार.
सुवेन फार्मा ने ‘SAPALA ORGANICS’ मधील १०० % स्टेक घेण्यासाठी करार केला. सुरुवातीला ६७.५ % स्टेक Rs २२९.५ कोटींना घेणार. उरलेला स्टेक वर्ष २०२७ नंतर घेणार.
सुझलॉन ने कॉर्पोरेट गव्हर्नन्स साठी खेतान आणी कंपनीची नेमणूक केली.
नाल्कोने बॉक्साइट माइनिन्ग साठी ओडिशा सरकार बरोबर कोरापुट जिल्हा पत्तंगी तालुक्यामध्ये ६९७.९७९ हेक्टर साठी करार केला. यातून ३.५ मिलियन टन उत्पादन अपेक्षित आहे.
अंबुजा सिमेंट पेन्ना सिमेंट Rs १०४२२ कोटींना घेणार. त्यामुळे 14MTPA उत्पादन क्षमता वाढेल. एकंदर क्षमता 89 MTPA होईल. आंध्र तेलंगणा मध्ये प्रवेश होईल. मार्जिन /टन वाढेल.
RITES ने DMRC ( दिल्ली मेट्रो रेल सिस्टीम कॉर्पोरेशन) बरोबर MOU केले.
सिग्नेचर ग्लोबल ने गुरूग्राम मध्ये ३.८ एकर जमीन घेतली. यात 6 लाख SQFT एरिया डेव्हलप करता येईल. आता ते लो कॉस्ट हाउसिंग प्रोजेक्टवरून मिड्सेगमेंट आणी प्रीमियम सेगमेंट वर फोकस करणार आहे.
ल्युपिनच्या नागपूर युनिटच्या तपासणीत USFDA ने कोणतीही त्रुटी दाखवली नाही आणी फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
चीनमधून आयात होणाऱ्या PVC पेट रेझिन वर ANTI DUMPING ड्युटी बसवली
भारताचा मे २०२४ महिन्यासाठी WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) २.६१% राहिला. एप्रिल महिन्यासाठी
१.२६% होता.
झायडस लाइफच्या ‘AZILSARTAN MEDOXOMIL CHLORTHALIDONE’ या औषधाला USFDA कडून इनप्रिन्सिपल मंजुरी मिळाली.
रेलटेलला Rs २४ कोटींची ऑर्डर मिळाली.
मे २०२४ या महिन्यानी सेवा क्षेत्रात चांगली वाढ झाली. मे २०२४ मध्ये निर्यातीत डबल डीजीट ग्रोथ झाली. निर्यात US $ 300 कोटींनी वाढली.
जेफरीज च्या इंडिया ओन्ली लॉन्ग पोर्टफोलिओ मध्ये GMR एअरपोर्ट चा समावेश केला तर AXI s बँकेचे वेटेज कमी केले.
BHEL ला अदानी ग्रुपकडून २ पॉवर प्लान्ट साठी एकूण Rs ७००० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
जिंदाल स्टेनलेस ने CHROMENI स्टील PVT LTD मध्ये ४६% स्टेक घेतला.
ऑटोमोटीव्ह रूफ सोल्युशन साठी मिंडा कॉर्प ने HSIN CHONG मशिनरी वर्क्स कंपनी बरोबर JV केले.
‘VI’ त्यांचा इंडस टोवर मधील पूर्ण २१.५ % स्टेक पुढील आठड्यात US $२.३ बिलियन चा स्टेक विकणार आहे.
टाटा ELXSI रेड HAT बरोबर अप्लीकेशन्स मॉनेटायझेशन करून ऑपरेशनल एक्स्पेन्डी चर कमी करण्यासाठी JV केले
आज निफ्टी आणी सेन्सेक्स ने रेकॉर्ड क्लोझिंग दिले. ऑटो रिअल्टी, मेटल फार्मा, PSE, मिडकॅप स्मालकॅप मध्ये खरेदी झाली तर IT क्षेत्रातील शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७६९९२ NSE निर्देशांक निफ्टी २३४६५ बॅंक निफ्टी ५०००२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७