आजचं मार्केट – १३ जून २०२४

. आज क्रूड US $ ८२.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१ = Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.३८, USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ४.३१ आणी VIX १३.९९ होते. सोने Rs ७१४०० आणी चांदी Rs ८८४०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मध्ये मंदी होती.

USA मध्ये मे २०२४ मध्ये महागाई निर्देशांक ३.३% आला ( एप्रिल २०२४ मध्ये ३.४%) तुलनात्मक रीत्या महागाई थोडी कमी झाली.फेडने व्याज दरांत कोणताही बदल केला नाही. व्याजाचे रेट ५.२५ -५.५० दरम्यान स्थिर ठेवले. फेडने सांगितले की महागाई कमी होत आहे पण महागाई कमी होण्याचा वेग आणी प्रमाण कमी आहे. लेबर मार्केट प्री कोविड पातळीला आहे. फेड ने सांगीतले की या वर्षअखेर १ रेटकट आणी येत्या वर्षांत ३ रेटकट होण्याची शक्यता आहे.
भारताचा मे २०२४ महिन्यासाठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ) ४.७५% तर एप्रिल २०२४ महिन्यासाठी IIP ५ %आला.
सरकार ११ लाख टन चणा ऑस्ट्रेलियामधून आयात करणार आहे.
सनफ्लॉवर ऑइल, वेजिटेबल ऑइल , पाम ऑईलची आयात मे महिन्यात MOM वाढली तर सोया ऑईल ची निर्यात कमी झाली.
CAMS ची सबसिडीअरी CAMSERP ने इन्शुरन्स पोर्टफोलिओ व्यवस्थापन PLATFORM ‘BIMA CENTRAL’ launch केला.
M & M फायनान्स ने कोटक लाईफ बरोबर ग्राहकांना लाईफ इन्शुरन्स उपलब्ध करण्यासाठी करार केला.
ORIONPRO ला ऑन लाईन पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम सुरु करायला RBI ने मंजुरी दिली.
L & T ला Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटी दरम्यान ONGC कडून दमण अपसाइड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साठी ऑर्डर मिळाली.
२२ जून २०२४ रोजी GST कौन्सिल ची मीटिंग होईल यात कॉम्प्लायन्स ची प्रक्रिया सोपी करण्यावर चर्चा होईल. ऑन लाईन गेमिंग वरील GST ची समीक्षा होणार नाही.
FII ने Rs ४२७ कोटींची खरेदी आणी DII ने Rs २३४ कोटींची खरेदी केली.
नागार्जुना फर्टीलायझरच्या प्रमोटर्सनी 0.२% स्टेक बुधवारी ओपन मार्केटमध्ये विकला.
GENSOL २५० MW / ५०० MW बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टिमसाठी यशस्वी बीडर ठरली. हे टेंडर गुजरात उर्जा विकास निगम ने काढले होते. ही ऑर्डर १२ वर्ष मुदतीची असून यातून Rs २६८० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.
PTC इंडिया फायनान्शियलला सेबी ने दंड केला.
EXIDE ने EXIDE एनर्जी सोल्युशन मध्ये गुंतवणूक वाढवली. आता ही गुंतवणूक Rs २४५२ कोटी झाली. EESL ही बंगलोरला लिथियम आयन बॅटरी उत्पादन आणी विक्री करणार आहे.
SAKSOFT ही कंपनी ‘AUGEMENTO LAB’ मध्ये १००% स्टेक Rs १०० कोटींना घेणार आहे यातील Rs ३५ कोटी अपफ्रंट आणी उरलेली रक्कम २ वर्षांत प्रगती पाहून द्यायचे आहेत.
DR रेड्डीज ने ‘INGENUS फार्मा’ बरोबर करार केला. DR रेड्डीजने ‘CYCLOPHOSPHAMIDE इंजेक्शन’ चे कमर्शियलायझेशन करण्यासाठी करार केला.
टोरंट फार्मा च्या इंद्राद युनिटची तपासणी ३ जून २०२४ ते १२ जून २०२४ या काळांत USFDA ने करून FORM नंबर ४८३ इशू करून ५ त्रुटी दाखवल्या. डेटा इंटग्रीटी चा इशू नाही.
व्हर्लपूल ने HUL बरोबर मार्केटिंग साठी करार केला.
शोभा राईट्स इशू द्वारा Rs १६५१ प्रती शेअर या दराने तुमच्या जवळील ४७ शेअर्सला ६ शेअर या प्रमाणात राईट्स इशू करून Rs २००० कोटी उभारेल हा राईट्स इशू २८ जून २०२४ ला ओपन होऊन ४ जुलाईला बंद होईल. या राईट्स इशुसाठी 19 जून ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
नेसले त्यांच्या गार्डियन कंपनीला ४.५% दराने ५ वर्षांसाठी रॉयलटी डेट राहील. या कंपनीने लाभांशासाठी १६ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
L &T ट्रेड फायनान्स मध्ये ८.८० कोटींचे Rs १७०.६० प्रती शेअर या दराने लार्ज डील झाले.
इंडिगो मध्ये ५.२१ लाख शेअर्सचे Rs २२४ कोटी मध्ये लार्ज डील झाले.
साखरेची MSP सरकार वाढवण्याचा विचार करत आहे.
टाटा पॉवरने ३० बस डेपो मध्ये ८५० ई-बस चार्जिंग पाइंट लावले.
लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकाने पॉलिसी ची मुदत पूर्ण होण्याआधी पॉलिसी बंद केली तर इन्शुरन्स कंपनी जी रक्कम देते त्याला सरेंडर व्हल्यू म्हणतात. आता IRDAI ने सांगितले की पॉलिसी धारकाने जेव्हढा प्रीमियम भरला असेल त्याच्या ७८% किमान स्पेशल सरेंडर व्हाल्यू लाईफ इन्शुरन्स कंपन्यांनी परत केला पाहिजे. यामुळे न्यू बिझिनेस मार्जिन १% पर्यंत कमी होईल असा अंदाज काही लाईफ इन्शुरन्स कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
360 ONE WMI या कंपनीने ‘वेल्थ टेक PLATFORM ET मनी’ हा (टाईम्स ग्रुपचा ) Rs ३६५.८० कोटींना घेण्यासाठी डेफीनिटीव्ह अग्रीमेंट केले. यात Rs ८५.८ कोटी कॅश आणी 360 ONE वेल्थ चे ३.५ मिलियन शेअर्स इशू केले जातील. ET मनी 360 ONE वेल्थ मध्ये इन्व्हेस्टेड राहील. या खरेदीमुळे ‘ET मनी’च्या ‘हाय नेट वर्थ’ ग्राहकांचा 360 ONE WMI ला फायदा होईल. ET मनी चे टोटल असेट्स Rs २८००० कोटी असून यात MF बिझिनेसचा शेअर Rs २५००० कोटींचा आहे.
VI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने प्रेफरनशियल अलॉटमेंटद्वारा Rs २४५८ कोटी उभारायला मंजुरी दिली. VI आता नॉन प्रमोटर्स नोकिया सोल्युशन्स आणी नेटवर्क ला Rs १५२० कोटींचे तर एरीकसन ला Rs ९३८ कोटींचे शेअर्स अलॉट करेल. या प्रेफरन्स अलॉट केलेल्या शेअर्सची किमत FPऑ च्या किमतीपेक्षा ३५% जास्त असेल. आणी या शेअर्सला 6 महिन्यांचा लॉक-इन पिरीयड असेल. आता VI मध्ये AB GRUP आणी व्होडाफोनचा स्टेक ३७.३% आणी सरकारचा स्टेक २३.२% असेल. या प्रेफरन्स अलॉटमेंटद्वारा उभारलेल्या पैशांचा उपयोग 4G कव्हरेज आणी 5G नेटवर्क लॉंच करण्यासाठी करावा लागेल.
आज ऑटो,IT, रिअल्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स च्या क्षेत्रामध्ये खरेदी झाली.
आज सेन्सेक्स, निफ्टी, मिडकॅपमध्ये रेकॉर्ड क्लोजिंग झाले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ७६८१० NSE निर्देशांक निफ्टी २३३९८ आणी बॅंक निफ्टी ४९८४६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
bpphatak@gmail.com
९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.