आजचं मार्केट – २७ जून २०२४

.आज क्रूड US $ ८५.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०६.०७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३४ आणी VIX १४.४७ च्या आसपास होते. सोने Rs ७१००० आणी चांदी Rs ८६६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स झिंक आणी अल्युमिनियम FLAT तर लेड आणी कॉपरमध्ये तेजी होती.

USA मध्ये नवीन घरांचा डेटा ११.३% ने कमी आला. FEDEX चा शेअर १६% ने वाढला. जापनीज येन घसरला.
FII ने Rs ३५३५ कोटींची विक्री तर DII ने Rs ५१०४ कोटींची खरेदी केली.
GENISYS इंटरनॅशनलने ऑटो आणी मोबिलिटी सोल्युशांसाठी MMG बरोबर करार केला.
CSB बँकेच्या १.६८ कोटी शेअर्सचा Rs ३५२.७५ प्रती शेअर या भावाने Rs ५९५ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
माझगाव डॉक्स मध्ये ९.०५ लाख शेअर्सचे Rs ३९७ कोटींना लार्ज ट्रेड झाले.
भारती एअरटेलने ९७ Mhz Rs ६८५७ कोटींना, भारती हेक्सावेअर ने १५ Mhz Rs १०० कोटींना आणी रिलायंस जिओने १४.४ Mhz Rs ९७३ कोटींना असे स्पेक्ट्रम खरेदी केले.
अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंटच्या अक्विझिशन साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मंजुरी Rs २६७ प्रती शेअर भावाने २३% इक्विटी म्हणजे ७.०६ कोटी शेअर्स घेण्यासाठी मंजुरी दिली. हा सौदा Rs १८८० कोटी कॅश मध्ये झाला.
इंडिया सिमेंट ऑगस्ट सिरीज नंतर F &O सेगमेंटच्या बाहेर जाईल.
JSW एनर्जीने १३२५ MW साठी विंड आणी सोलर प्रोजेक्टच्या संदर्भात पॉवर परचेस अग्रीमेंट केले.
RVNLला दक्षिण रेल्वेकडून १५६.४७ कोटींच्या प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
सुप्रीम इंडस्ट्रीजला Rs ५० कोटींचे 10 KG कॉम्पोझिट सिलेंडर सप्लाय करण्यासाठी IOC कडून LOA मिळाले.
KEC इंटरनॅशनलला त्यांच्या T & D आणी केबल बिझिनेस साठी Rs १०२५ कोटींच्या नव्या ऑर्डर मिळाल्या.
ITD सीमेंटेशन ला Rs १०८२ कोटींचे नवे मरीन CONTRACT मिळाले.
रामकी इन्फ्रा ला Rs १३१.२० कोटींचे प्रोजेक्ट पॉवरग्रीड कडून मिळाले.
SJVN ने ‘AM अमोनिया PVT LTD’ बरोबर ग्रीन अमोनिया प्लांटला रिन्युएबल एनर्जी गरजेनुसार दीर्घ मुदतीसाठी पुरवण्याचा करार केला.
INOX ग्रीन Rs १०५० कोटींचे प्रेफरन्स शेअर्स आणी वॉरंट द्वारा गोळा करतील. २.८९ कोटी शेअर्स इशू करतील.
VI ने ५० Mhz स्पेक्ट्रम ११ सर्कलमध्ये Rs ३५१० कोटींमध्ये घेतले.
अर्चीन केमिकल्स १.२ कोटी शेअर्स किंवा १०.१३ % स्टेक विकणार. यातून Rs ६५५ फ्लोअर प्राईसने Rs ८१८.७० कोटी मिळतील.
PI इंडस्ट्रीज UK च्या AGRICULTUR BIOLOGICAL INPUT कंपनीमधील सर्व शेअर कॅपिटल GBP ३२.७८ मिलीयनला विकत घेणार.
DR रेड्डीज NICOTINELL आणी त्यांचा पोर्टफोलिओ विकत घेणार आहे. यामुळे जागतिक कन्झ्युमर हेल्थकेअर मध्ये बिझिनेस वाढेल.
इलेक्ट्रोनिक्स मार्ट ने दरियागंज येथे नवीन स्टोअर उघडले.
PVR आयनॉक्स ने हैदराबाद मध्ये ४ स्क्रीन मल्टीप्लेक्स सुरु केला. आता त्यांच्या मल्टीप्लेक्स ची संख्या १७५७ झाली.
RVNL ला Rs ७२.७ कोटींच्या नॉर्थ सेन्ट्रल रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
EUGIA च्या पोलेपल्ली येथील इन्जेकटेबल युनिट साठी USFDA ने EIR दिला.
EMCURE फार्माचा IPO ३ जुलै २०२४ रोजी ओपन होऊन ५ जुलैरोजी बंद होईल.
ह्या IPO मध्ये Rs ८०० कोटींचा फ्रेश इशू आणी १.१४ कोटी शेअर्सची OFS असेल.
मार्च २०२५पर्यंत ग्लोबल बॉंड इमर्जिंग मार्केट मध्ये भारताचे वेटेज १०% असेल. इतर चलनांपेक्षा रुपया स्थिर आहे.
BOSCH व्हर्लपूल विकत घेण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची घरगुती उपकरणांमध्ये स्पर्धात्मक ताकत वाढेल आणी ते इतर एशियायी स्पर्धकांबरोबर चांगली स्पर्धा करू शकतील. व्हर्लपूल चे मार्केट कॅपिटलायझेशन US $ ४.८ बिलियन आहे.
DATAMATICSला AI MANAGEMENT सिस्टीम साठी ISO प्रमाणपत्र मिळाले.
रूट मोबाईल ने मायक्रोसॉफ्ट आणी PROXIMUS बरोबर डिजिटल कम्युनिकेशन आणी क्लाउड साठी करार केला. हा STRATEGIC करार ५ वर्ष मुदतीचा आहे.
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया ११ विमानतळा साठी बोली मागवेल. बँगलोर हैदराबाद एअरपोर्टमधील उर्वरीत स्टेक विकेल. भुवनेश्वर, इन्दोर आणी रायपुर विमानतळाचे खाजगीकरण केले जाईल.
आज FMCG, ऑटो, IT, एनर्जी, सिमेंट मेटल्स, OIL & GAS मध्ये तेजी होती. बँकिंग मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९२४३ NSE निर्देशांक निफ्टी २४०४४ बॅंक निफ्टी ५२८११ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.